Halloween Costume ideas 2015

सूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(२५) सरतेशेवटी यूसुफ (अ.) पुढे आणि ती मागे असे दाराकडे धावले आणि तिने पाठीमागून यूसुफ (अ.) चा सदरा (ओढून) फाडून टाकला. दारावर त्या दोघांनी तिच्या पतीला उपस्थित पाहिले. त्याला पाहताच स्त्री म्हणू लागली, ‘‘कोणती शिक्षा आहे त्या माणसासाठी ज्याने तुझ्या पत्नीवर वाईट हेतू ठेवावा? याशिवाय अन्य कोणती शिक्षा असू शकते की तो कैद केला जावा अथवा त्याला कठोर यातना दिली जावी?’’ 

(२६) यूसुफ (अ.) ने सांगितले, ‘‘हीच मला फूस लावण्याचा प्रयत्न करीत होती’’ त्या स्त्रीच्या स्वत:च्या कुटुंबियांपैकी एका व्यक्तीने (परिस्थितीजन्य पुराव्यावरून) साक्ष प्रस्तुत केली२४ की, ‘‘जर यूसुफ (अ.) चा सदरा पुढून फाटला असेल तर स्त्री खरी आहे आणि हा खोटा 

(२७) आणि याचा सदरा पाठीमागून फाटला असेल तर स्त्री खोटी व हा खरा.’’२५ 

(२८) जेव्हा पतीने पाहिले की यूसुफ (अ.) चा सदरा पाठीमागून फाटला आहे तेव्हा तो म्हणाला, ‘‘या तर तुम्हा स्त्रियांच्या ‘खसलती’ आहेत. खरोखर मोठ्या भयंकर असतात तुमच्या चाली. (२९) यूसुफ (अ.)! या मामल्याकडे दुर्लक्ष कर. आणि हे महिले! तू आपल्या अपराधाची क्षमा माग तूच मुळात अपराधी होतीस.’’२५अ 



२४) या घटनेवरून तात्कालीन परिस्थितीचे आकलन होते. घराच्या मालकाबरोबर त्या स्त्रीच्या नातेवाईकांपैकी कोणी येत असेल. त्याने हा विवाद ऐवूâन सांगितले असेल की जेव्हा की, हे दोघे एकदुसऱ्यावर आरोप लावित आहेत आणि कोणी साक्षीदार नाही. अशा स्थितीत परिस्थितीजन्य साक्ष ठेवून शोध घेतला जाऊ शकतो. या साक्षीदाराने अनुमानाच्या साक्षीकडे लक्ष देणे एक बुद्धीसंगत साक्ष आहे. त्याला पाहून त्वरित लक्षात येते की हा परिस्थितीची जाण राखणारा आणि अनुभवी माणूस आहे. परिस्थिती समोर आल्यावर त्वरित तो शोधवृत्तीने खोलात घुसून निर्णयाप्रत आला.

२५) म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचा सदरा समोरुन फाटला असता तर स्पष्ट आहे की यूसुफकडून सुरवात झाली आणि स्त्री स्वत:ला वाचविण्यासाठी संघर्ष करीत होती. परंतु यूसुफ (अ.) यांचा सदरा मागून फाटला आहे, म्हणून स्पष्ट होते की स्त्री त्याच्यामागे लागली होती आणि यूसुफ तिच्यापासून आपली सुटका करू पाहात होता. या साक्षीत एक परिस्थितीजन्य साक्ष लपलेली होती कारण त्या साक्षीत लक्ष केवळ यूसुफ (अ.) यांच्या सदऱ्याकडे दिले. याने स्पष्ट होते की स्त्री शरीर किंवा तिच्या पोषाखावर आक्रमकतेची एकही निशाणी नव्हती. जर तो प्रयत्न बळजबरी करण्याचा असता तर त्याचे स्पष्ट चिन्ह स्त्रीवर दिसून आले असते.

२५अ) बायबलमध्ये या घटनेला विक्षिप्त् पद्धतीने सांगितले गेले आहे, 

``तेव्हा त्या स्त्रीने त्याचा सदरा हातात धरून सांगितले माझ्याशी संभोग कर तेव्हा तो आपला सदरा तिच्या हातात देऊन पळून गेला. जेव्हा त्याने पाहिले की सदरा तिच्या हातात देऊन आपण पळालो तेव्हा आपल्या लोकांना बोलावून त्याने सांगितले की तो एका स्त्रीशी आमची चेष्टा करण्यासाठी आमच्याजवळ घेऊन आला होता. तो माझ्याशी बलात्कार करण्यासाठी घरात घुसला तेव्हा मी ओरडू लागले. जेव्हा त्याने पाहिले की मी ओरडू लागले आहे तेव्हा त्याचा सदरा माझ्या हातात सोडून पळून गेला. तिने त्याचा सदरा त्याचे पतीराज घरी परत येईपर्यंत जवळ ठेवला. जेव्हा तिच्या पतीने तिचे सर्व गाऱ्हाणे ऐकले तेव्हा तो रागावला आणि यूसुफला कैदेत टाकले. (उत्पत्ति ३९ : १२-२०) या विक्षिप्त् कथनाचे सार म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचा पोषाख (सदरा) असा होता की इकडे जुलेखाने त्याला हात लावताच तो आपोआप तिच्या हातात पडला नंतर यूसुफ (अ.) तसेच अर्धनग्नावस्थेत तेथून पळाले आणि त्यांचा पोषाख त्या स्त्रीजवळच राहिला अशाप्रकारे यूसुफ (अ.) अपराधी होते यावर कोणाला शंका येणार?

बायबलचे  कथन  वरीलप्रमाणे आहे. तलमूदच्या  वर्णनात  आहे  की  फोतीफारने जेव्हा आपल्या पत्नीची ही तक्रार ऐकली तेव्हा त्याने यूसुफला फार मारले आणि त्याच्याविरुद्ध दावा ठोकला. न्यायालयाने यूसुफच्या सदरा पाहून निर्णय दिला की अपराध स्त्रीने केला आहे, कारण सदरा मागून  फाटलेला आहे पुढून नव्हे. परंतु बुद्धिवान मनुष्य विचार करू शकतो की कुरआन उल्लेख तलमूदच्या वर्णनाशी जवळचा आहे. शेवटी याला का मान्य केले जावे की एक पदाधिकारी त्याच्या पत्नीवर गुलामाने हात टाकल्यावर हा मामला तो स्वत: न्यायालयात घेऊन गेला असेल? हा अत्यंत स्पष्ट उल्लेख आहे कुरआन आणि इस्राईली वर्णनाच्या अंतराविषयीचा. इस्लामवरील पाश्चात्य विद्वानांचे आरोप यामुळे निरर्थक ठरते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे सर्व बनीइस्राईलींची नक्कल केली आहे. खरे तर कुरआनने यात सुधारणा केली आहे आणि सत्य घटना जगाला दाखवून दिली आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget