Halloween Costume ideas 2015

यह कहां आ गये हम....


महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिंदे सरकारला समर्थन मिळाले. या वेळी विधानसभेत इतके खेळीमेळीचे वातावरण होते की असे दृष्य कधीच पाहायला मिळाले नसावे. लोकांना वाटत  होते की फ्लोअर टेस्ट होते की शोकसभा. मागचे सरकार गेले म्हणून पण त्या सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. शिवसेनेशी बंड करून शिवसेनेत गेलेले आमदार गुवाहटीतून मुंबईत परतल्यावर हिंसाचार माजतो की काय शिवसैनिक एकमेकांशी भिडतील की काय, पण तसे काही झाले नाही. सर्वकाही आनंदाने एकदिलाने पार पडले. मुख्यमंत्री आणि इतरांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी जे काही घडले त्यातील काही किस्से आपल्या भाषणात आमदारांना सुनावले. खूप करमणूक झाली. असे वाटतच नव्हते की महाराष्ट्राचे राजकारण किती गंभीर वळणावर पोहोचले होते. आणि जसे जल्लोशाचे वातावरण विधानसभेत पाहायला मिळाले त्यावरून कुणाच्याही लक्षात येत नव्हते की राज्याच्य प्रश्नांवरही याच विधानसभेत चर्चा व्हायची असते. आणि सध्या महाराष्ट्रात बऱ्याच समस्या आहेत, पण ठीक आहे. हे तर नेहमीचेच असते. कधी कधी हसतखेळत सभासदांचे अधिबेशनही व्हायला हवे. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, मंत्रीपद गेल्याचे त्यांना काहीही दुःख नाही. त्यीं मंत्री असताना कोणकोणत्या आमदारांना, मंत्र्यांना किती निधी दिला याचाही तपशील लोकांसमोर आणला. सर्वांत जास्त निधी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणजेच त्यांच्या खात्याला दिला. त्यांनी तारीखवार तपशील देत एकूण १२००० कोटी रुपयांचा निधी गेल्या अडीच वर्षांत देण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली आणि म्हणून ते जनतेलाही कळले. या अधिवेशनात सरकारच्या बाजूने १६४ मते पडली तर विरोधात ९९ मते पडली. काँग्रेसचे ११ आमदार या अधिवेशनात उपस्थित नव्हते. हे त्यांचाय परंपरेला शोभूनच. ते कोणत्याही समयी सभागृहात हजर नसतात. कारण काय कुणालाच आणि काँग्रेस पक्षाला स्वतःलाच माहती नसेल. सभागृहात जसे आनंदाचे पर्व साजरे केले गेले ते पाहता महाराष्ट्रात आता शांतता नांदेल याची खात्री आहे. नाही तर लोकांना चिंता होती की गुवाहटीवाले मुंबईत व्हाया गोवा दाखल झाल्यावर शिवसैनिक दोन्ही बाजूने, समोरासमोर येतील आणि राज्याची शांतता भंग होईल. मात्र तसे काही झाले नाही म्हणून सर्व नागरिकांना याच्या शुभेच्छा! राजकारणात आपण कोणत्या वळणावर आलो आहोत समजत नाही. इतक्या शांततेने जर सत्तांतर होत असेल तर उगीच काळजी घेण्याचे कारण काय? पाच वर्षांत दोन मुख्यमंत्री होतात यापेक्षा अधिक जरी झाले आणि अशाच शांततापूर्ण वातावरणात अधिवेशन पार पडले तर कोणत्या नागरिकाला कसला आक्षेप. शेवटी सत्तेसाठी तर निवडणुका होत असतात. निवडणुकीत कुणाला विजय मिळतो, कुणाच्या पदरी पराजय येतो. त्यासाठी सभागृहातच सत्तांतर होत राहिले तर काय हरकत. येत्या अडीच वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुका देखील मैत्रीच्या वातावरणात व्हाव्यात ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची इच्छा असेल. एकाला सत्ता मिळाली तर दुसऱ्याला दोन-अडीच वर्षांत मिळणारच. हा सर्व सत्तेचा खेळ आहे. नागरिकांनी आपली दिशाभूल करून घेऊ नये.

जाता जाता.... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शासन-प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी जी सत्ता राबविली त्याचे कौतुक देशभर झाले होते. उत्तम कामगिरीत ते देशात दुसऱ्या स्थानी होते. ते मुख्रमंत्री झाले यामागे जणू ईश्वरी योजनाच होती असे वाटते. कारण त्यांनी कोरोनाचे संकट ज्या खुबीने हाताळले त्यासाठी न्यायालयाने त्यांचे कौतुक केले. देशात सर्वत्र ऑक्सिजनमुळे लोकांचे प्राण गेले, तसे महाराष्ट्रात घडले नाही. उद्धव ठाकरे यांनी आपले नाव महाराष्ट्राच्या इतिहासात ठळक अक्षरांनी नोंदवले.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget