Halloween Costume ideas 2015

जमाअते इस्लामी हिंदच्या मदत कार्यामुळे नागरिकांतून समाधान

भींत कोसळून 27 नागरिक मृत्यूमुखी, शेकडो जखमी, संसारोपयोगी साहित्य गेले वाहून, शासनाची तोकडी मदत


मुंबई (शोधन सेवा)
मुंबईच्या मलाड परिसरात एका ईमारतीची भींत कोसळून 27 लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो लोक जखमी झाले. पावसामुळे मदद कार्यात व्यत्यय येत होता. अशा कठिण परिस्थितीत   जमाअत-एइस्लामी हिंद शाखा मलाडच्या वतीने तात्काळ मदद कार्यास प्रारंभ करण्यात आला. जखमींना स्थानिक एनजीओजच्या साह्याने हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. पावसाचा  जोर एवढा होता की त्या परिसरातील काही घरे व झोपडपट्या वाहून गेल्या. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यामुळे काही परिवार उघड्यावर आले. अशा 100 कुटुंबाना तात्काळ  जमाअतने गरम चादरी, ब्लँकेटसचे वाटप केले. रूग्णांना दवाखान्यात जावून विचारपूस केली तसेच त्यांना फळे, बिस्कीटे वाटप करण्यात आली.
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मुंबईत मुसळधार पावसाने मुंबई मनपाच्या कारभाराचे वाभाडे काढले. दोनच पावसामध्ये मुंबई तुंबली. वेगवेगळ्या उपनगरांमधील सकल भागात मोठ्या प्रमाणात  पाणी साचून घरांचे अतोनात नुकसान झाले. तीन दिवसातच जवळपास 1000 मिली मिटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे जवळपास 50 लोकांचे प्राण गेले. लोकल रेल्वे तर   पाण्यावरून चालत असल्याचा भास होईल, इतपत परिस्थिती बिकट झाली. मलाड परिसरात काहींची घरे वाहून गेली, इमारतीची मोठी भिंत कोसळल्याने 27 लोक मृत्यूमुखी पडले तर  शेकडो जखमी झाले. घटना घडल्याचे माहिती होताच जमाअते इस्लामी हिंदच्या मलाडा शाखेने मदद कार्यास सुरूवात केली. स्थानिक प्रशासन, व नागरिकांच्या सोबतीने रूग्णांना  जवळच्या भगवती हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. गेल्या 45 वर्षात असे दुसऱ्यांदा घडलेले आहे. 2005 च्या जुलै महिन्यात असाच पाऊस झालेला होता. सध्या जीवनमान सामान्य स्थितीवर येत आहे. परंतु, अधुनमधून पावसाचा तडाखा बसत असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत. आंबेडकर नगरच्या दुर्घटनेतील शोकाकुल परिवारांची तारांबळ उडालेली आहे.  त्यांना आपल्या मृत नातेवाईकांचा धड शोकही करता येत नाहीये आणि मुसळधार पावसामध्ये स्वतःचे रक्षणही करता येत नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मृतकाच्या कुटुंबाला 5 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केलेली आहे. ही राशी अत्यंत अल्प आहे. कारण पावसात फक्त लोकांचे  जीवच गेलेले नाहीत तर जीवन जगण्याचे सर्व साहित्य वाहून गेलेले आहे. स्थानिक रहिवाशी आणि जमाअत-ए-इस्लामी हिंदचे कार्यकर्ते हसिब यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,  ते आपल्या सोबत्यांसह पीडित लोकांना भोजन, स्वच्छ पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून जमेल तेवढी मदत करीत आहेत. काही लोकांना आर्थिक मदतही देण्यात आलेली  आहे. हसीब यांनी पुढे असेही सांगितले की, जमाअतने प्रभावित लोकांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. पीडित 100 कुटुंबाला प्रत्येकी 2 चटाया, 2 ब्लँकेट देण्यात आले असून, लहान मुले,  वृद्धांना पौष्टिक बिस्कीटे वितरित करण्यात येत आहेत. जमाअतचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सलीम खान आणि हबीब यांनी या कामी मोलाची मदद करत आहेत. या कामात स्थानिक  एनजीओज आणि पोलिसही धडाडीने काम करत आहेत. जमाअतच्या मलाड शाखेतील सर्व पदाधिकारी या दुःखद घटनेतील परिवारांना होईल तेवढी मदत करत असल्याचे अजमत खान म्हणाले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget