Halloween Costume ideas 2015

एसआयओने केले 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

लातूर (शादाब शेख)
- स्टूडंटस् ईस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडीया, लातूर शहर शाखेच्या वतीने शहरातील सात खाजगी व एक मनपा शाळेतील तब्बल 200 होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहीत्याचे वाटप करण्यात आले. शहरातील डॉ. इक्बाल ऊर्दू गर्ल्स हायस्कूल, हजरत सूरतशाह वली ऊर्दू स्कूल, मौलाना आझाद स्कूल, अलफलाह ऊर्दू हायस्कूल, रूकय्याबेगम ऊर्दू  स्कूल, एच.पी हायस्कूल, सिटीझन प्रायमरी स्कूल व खाडगाव रोड येथील म.न.पा. शाळेचा समावेश होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत ज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यात  आले व जीवनात ऊंच भरारी घेण्याकरीता करावे लागणारे प्रयत्न यावर सखोल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या स्तूत्य उपक्रमात वरील नमूद शाळांतील  सर्व शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शहराध्यक्ष अली हैदर पटेल, सचिव अब्दूल्लाह मनियार, डॉ.मिर्झा तंजील बेग, इंजी.शादाब शेख, एच.पी.शाळेचे मुख्याध्यापक प्रा.मजहर शेख, अहमद सर,पर्यवेक्षक मठपती सर तसेच खाडगाव रोड येथील म.न.पा.शाळेचे वैजापूरे सर, स्थानिक नगरसेवक मा.अय्यूब मनियार, इक्बाल   ऊर्दू शाळेचे कादरी सर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. या अमूल्य कार्यात संघटनेच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget