Halloween Costume ideas 2015

सत्याची साक्ष

मुस्लिमांना आम्ही ज्या गोष्टीकडे बोलावितो ती गोष्ट ही आहे की, त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल व ती पूर्ण करण्यासाठी ते तयार होतील. ती जबाबदारी जी की मुस्लिम  होण्याच्या नात्याने त्यांच्यावर येते. तुम्ही फक्त एवढे म्हणून सुटका करून घेऊ शकणार नाहीत की, ’’आम्ही मुस्लिम आहोत आणि आम्ही अल्लाह आणि त्याच्या धर्माला मानलेले  आहे.’’ उलट जेव्हा तुम्ही अल्लाहला आपला ईश मानलेले आहे आणि त्याने जो धर्म तुम्हाला दिलाय त्याचा तुम्ही एक व्यवस्था म्हणून स्वीकार केलेला आहे. तर त्यासोबत काही  जबाबदाऱ्यासुद्धा तुमच्यावर येतात ज्यांची जाणीव तुम्हाला असायला हवी आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची चिंता तुम्हाला असायला हवी. जर तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार  नाहीत तर त्याच्या कोपापासून या जीवनात वाचू शकाल ना परलोकात. त्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्या फक्त एवढ्याच नाहीत की तुम्ही अल्लाहवर, त्याच्या दुतांवर, त्याच्या  ग्रंथावर, त्याच्या प्रेषितांवर आणि निवाड्याच्या दिवसावर विश्वास ठेवला. ती जबाबदारी फक्त एवढीही नाही की तुम्ही नमाज अदा केली, रोजे राहिले, हजला गेले आणि जकात दिली.  ती फक्त एवढीही नाही की तुम्ही विवाह, घटस्फोट, वारसाहक्क इत्यादी गोष्टींमध्ये इस्लामने घालून दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली. या सर्वासोबत एक मोठी आणि अवजड  जबाबदारी आपल्यावर ही अनिवार्यरित्या येते की, तुम्ही सगळ्या जगासमोर या सर्व गोष्टींचे साक्षीदार म्हणून उभे रहा. ’मुस्लिम’ या नावाने तुम्हाला एक वेगळा समुदाय  बनविण्यामागचा जो उद्देश्य कुरआनने स्पष्ट केलेला आहे तो हाच आहे की, तुम्ही अल्लाहच्या सर्व बंद्यांसमोर सत्याची साक्ष द्याल. जेणेकरून उद्या ते हे आरोप करू शकणार नाहीत  की त्यांना अंधारात ठेवले गेले.
कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आणि या प्रमाणे आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट समुह बनविलेला आहे जेणेकरून तुम्ही लोकांसमोर साक्ष द्याल आणि प्रेषित तुमच्यासमोर साक्ष  देतील.’’ (सुरे बकरा आयत नं. 145).
हा मुस्लिम समुदायाला जन्माला घालण्याचा खरा उद्देश आहे. जर का हा उद्देश तुम्ही पूर्ण केला नाही तर लक्षात ठेवा तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ घालविले आहे. सत्याची साक्ष देण्याचे  कर्तव्य अल्लाहने तुमच्यावर टाकलेले आहे. त्याचा आदेश आहे की, ’’हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा बाळगली, अल्लाहसाठी उभे राहणारे आणि ठीक-ठीक सत्याची साक्ष देणारे बना.’’ (सुरे  मायदा आयत नं.6). आणि हा फक्त केवळ आदेशच नाही तर ताकीदवजा आदेश आहे. अल्लाह फरमावितो की, ’’त्या व्यक्तीपेक्षा मोठा अत्याचारी आणखीन दूसरा कोण असेल  ज्याच्याकडे अल्लाहकडून एक साक्ष आलेली आहे आणि त्याने ती लपविली.’’ (सुरे बकरा आयत नं. 140).
त्यानंतर अल्लाहने तुम्हाला हे सुद्धा दाखवून दिले आहे की, या कर्तव्यपूर्तीचा परिणाम काय होणार आहे? तुमच्यापूर्वी या साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये ज्यू लोकांना उभे केले गेले होते.  मात्र त्यांनी काही प्रमाणात सत्याला लपविले आणि काही प्रमाणात सत्याच्या विरूद्ध साक्ष दिली. म्हणून ते सत्याचे नव्हे तर असत्याचे साक्षीदार होऊन गेले. याचा परिणाम हा झाला की  अल्लाहने त्यांना दूर लोटून दिले. त्यांच्यावर अल्लाहचा कोप झाला. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’अपमान आणि दारिद्रय त्यांच्यावर टाकून देण्यात आले आणि त्यांनी आपल्या  डोक्यावर अल्लाहचा कोप ओढवून घेतला.’’ (सुरे बकरा आयत नं.61).
हीच साक्ष ज्याची जबाबदारी आता तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे. याचा अर्थ जे सत्य तुमच्याकडे आलेले आहे, जे सत्य तुमच्यावर स्पष्ट करण्यात आलेले आहे, मानवाला  जीवनात आणि मरणोप्रांत जीवनात यशस्वी होण्याचा जो एकमेव मार्ग आहे, तो तुम्हाला दाखविण्यात आलेला आहे. या सर्वांची साक्ष तुम्ही जगासमोर द्यावी व सांगावे की, हाच सत्य  मार्ग आहे. तुमची साक्ष अशी असायला हवी की, सत्य आणि असत्य दोहोंमधील फरक ठळकपणे वेगळा दिसेल आणि जगातील लोक हा तर्क देऊ शकणार नाहीत की, आम्हाला तर  सत्याचा पत्ताच नव्हता. हीच साक्ष घेऊन अनेक प्रेषित पृथ्वीवर पाठविण्यात आले होते. हीच साक्ष देणे त्या सर्वांवर अनिवार्य करण्यात आले होते आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद  (सल्ल.) यांच्यानंतर ही साक्ष देण्याची जबाबदारी सामुहिकरित्या मुस्लिम समाजावर टाकण्यात आलेली आहे. जशी की ती पे्रषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर त्यांच्या जीवन काळामध्ये  व्यक्तीगत स्तरावर टाकण्यात आलेली होती.
ही साक्ष किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज याच गोष्टीवरून लावा की, मानवजातीसाठी अल्लाहने विचारपूस आणि बक्षीस आणि शिक्षेचा जो कायदा केलेला आहे तो पूर्णपणे याच  साक्षीवर अवलंबून आहे. अल्लाह युक्ती (हिकमतवाला), दया आणि न्याय करणारा आहे. त्याच्या हिकमत आणि दया तसेच न्यायप्रियतेशी ही गोष्ट अजिबात सुसंगत नाही की लोकांना  त्याची मर्जी माहितच नसावी आणि त्याने त्यांना त्याच गोष्टीला जबाबदार धरावे की ते त्याच्या मर्जीच्याविरूद्ध का चालले? लोकांना हे माहितच नसेल की सत्य मार्ग कोणता आहे?  आणि तो (अल्लाह) लोकांची मार्गभ्रष्ट झाले म्हणून पकड करेल. लोकांना या गोष्टीचा थांगपत्ताच नसेल की त्यांना कोणत्या गोष्टींबाबत विचारले जाईल ? आणि त्या अनोळखी  गोष्टीबद्दल त्यांच्याशी विचारपूस केली जाईल. म्हणूनच अल्लाहने जगाची सुरूवातच एका प्रेषिताला पाठवून केली. त्यानंतर वेळोवेळी अनेक प्रेषित पाठविले. ज्यांनी लोकांसमोर सत्याची  साक्ष दिली व त्यांना समजावून सांगितले की तुमचे व्यवहार कसे असावेत व तुम्हाला जन्माला घालण्याचे कारण काय? तसेच अल्लाहची मर्जी काय आहे?
जीवन जगण्याचा हाच खरा मार्ग आहे. हीच पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालका (अल्लाह)ची मर्जी संपादन करू शकता. हे ते काम आहे जे तुम्ही करायला हवे आणि हे ते  काम आहे ज्यांच्यापासून तुम्हाला लांब रहायचे आहे. ह्या अमुक गोष्टी आहेत ज्यांच्याबाबतीत मेल्यानंतर तुमच्याकडे विचारपूस केली जाईल. हीच ती साक्ष आहे जी अल्लाहने आपल्या  प्रेषितांच्या मार्फत लोकांसमोर दिली होती. त्याचा उद्देश्य कुरआनमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की, लोकांना अल्लाहसमोर हा तर्क देण्याची संधी राहू नये की आम्ही अनभिज्ञ होतो  आणि जी गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती त्याला जबाबदार धरून तुम्ही आम्हाला पकडताय. ’’ (हे सारे प्रेषित) आनंद वार्ता देणारे आणि भीती घालणारे बनवून पाठविण्यात आले होते  जेणेकरून हे प्रेषित आल्यानंतर लोकांकडे (आपण निर्दोष) असल्याचा तर्क अल्लाहसमोर कोणी देऊ शकणार नाही. अल्लाह जबरदस्त शक्तीमान आणि हिकमतवाला आहे’’ (सुरे निसा  : 165).’’येणेप्रमाणे अल्लाहने हा तर्क पुढे केला जावू नये म्हणून त्याची जबाबदारी प्रेषितांतवर टाकली आणि त्यांना या महत्वाच्या जबाबदारीवर नेमले की, जर त्यांनी सत्याची साक्ष लोकांसमोर ठीक-ठीक दिली तर मग लोक आपल्या कर्मासाठी स्वतः जबाबदार राहतील. मात्र जर प्रेषितांकडून साक्ष देण्यामध्ये निष्काळजीपणा करण्यात आला आणि त्यामुळे लोक  पथभ्रष्ट झाले तर मात्र प्रेषितांची पकड होईल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रेषितांच्या पदाची ही नजाकत होती की, एक तर त्यांनी सत्याची ठीक- ठीक साक्ष देऊन लोकांना कारण  सांगण्याची संधीच देऊ नये, नाहीतर लोक उलट त्यांच्यावर आरोप लावतील की, ह्यांनी आपल्या पदाचा मान राखत अल्लाहचा संदेश आमच्यापर्यंत ठीक- ठीक पोहोचवलेला नाही. लोक  म्हणतील ऐ अल्लाह! जीवन जगण्याचा जो सरळ मार्ग तुम्ही प्रेषितांना सांगितला होता तो मार्ग तर त्यांनी आम्हाला दाखविलाच नाही. हेच कारण होते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. आपल्यावरील या जबाबदारीच्या ओझ्याच्या जाणीवेसंबंधी अतिशय संवेदनशील होते. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या तर्फे सत्याची साक्ष देण्यामध्ये कुठलाच निष्काळजीपणा केला नाही  आणि लोकांना त्यांच्यावर आरोप करण्याची संधीच मिळू नये यासाठी आयुष्यभर जीव तोडून प्रयत्न केले.
प्रेषितांच्या मार्फत ज्या लोकांपर्यंत सत्य, ज्ञान आणि उपदेशाचा मार्ग पोहोचला ते एक उम्मत (समुदाय) बनवले गेले आणि त्यांच्या दर्जाला शोभेल अशी ही नाजूक जबाबदारी, जीचे  ओझे प्रेषितांवर टाकले गेले होते आता या उम्मतच्या वाट्याला आलेले आहेत. प्रेषित (सल्ल.) यांचे पायीक आणि वारस होण्याच्या प्रतिष्ठेतून त्यांचा हा मान ठरविला गेला की, त्यांनी  सत्याची साक्ष द्यावी. त्यानंतरही लोक सुधरले नाही तर मग त्यांची पकड केली जाईल. आणि जर यांनी (मुस्लिमांनी) सत्याची साक्ष देण्यामध्ये टाळाटाळ केली किंवा सत्याऐवजी  असत्याची साक्ष दिली तर इतर लोकांच्या अगोदर हे स्वतः पकडले जातील. अगोदर त्यांच्याकडून त्यांच्या कामागिरीबद्दल विचारपूस होईल आणि त्या लोकांच्या कर्माबाबतही विचारपूस  यांच्याचकडून केली जाईल की तुम्ही सत्याची साक्ष न दिल्यामुळे किंवा चुकीची साक्ष दिल्यामुळे हे बाकीचे लोक मार्गभ्रष्ट, दंगेखोर आणि पापी झाले. (क्रमशः)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget