Halloween Costume ideas 2015

करामत खेकड्यांची की कंत्राटदाराची?

कोकणात पाऊस हा नेहमीचाच. त्यामुळे त्या ठिकाणी बांधली जाणारी धरणे हे पावसाच्या पाण्याचा दबाव सहन करण्याइतपत मजबूत बांधावीत हे ओघाने आलेच. परंतु, अवघ्या 17  वर्षापूर्वी बांधलेल्या चिपळून तालुक्यातील तिवरा धरण फुटीमुळे 24 लोकांना हाकनाक प्राण गमवावे लागले. आश्चर्य म्हणजे या धरण फुटीची जबाबदारी धरण बांधणाऱ्या कंत्राटदाराकडे  न येता धरणातील खेकड्यांकडे आली हे कोण आश्चर्य!
महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी गेल्या अनेक वर्षातला सर्वोत्तम विनोद करत खेकड्यांना या धरणफुटीसाठी जबाबदार धरले. त्यावर उत्तर देतांना बांधकाम खात्यातील  भ्रष्टाचाराला वाचा फोडणारे निवृत्त अभियंता पांढरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की, खेकडे कधीही पाच ते सात फुटापेक्षा जास्त बिळे तयार करत नाहीत. या धरणाचा  पाया भरण्यासाठी काळ्या मातीऐवजी तेथीलच लाल माती वापरली गेल्यामुळे धरणाच्या भिंतीची पकड जमीनीला बसू शकली नाही व धरण फुटले, असे पांढरे म्हणाले. मुळात तिवरे  धरणाचे काम खेम कन्स्ट्रक्शन्स कडून करण्यात आले होते. ही कंपनी स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांची होती. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक रहिवाशांच्या धरणासंबंधीच्या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. व जी काही दुरूस्ती करण्यात आली ती पुरेशी नव्हती. म्हणून धरण फुटले. आता रत्नागिरी-सिंधूदूर्ग मतदारसंघातील खा.विनायक राऊत  यांनी आपले खांदे समर्थक व कंपनीचे मालक सदानंद चव्हाण यांची पाठराखण करत या धरणाच्या निकृष्ट कामासाठी सरकारी अभियंत्यांना जबाबदार ठरविले आहे. आता प्रश्न असा  आहे की, राज्याचे मंत्री खेकड्याला जबाबदार धरतात तर खासदार भ्रष्ट अभियंत्यांना धरतात, यातील खरे कोण? शिवाय, अद्याप कोणावरच कायदेशीर कार्यवाही करण्यात न  आल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना न्याय कोण देणार? असा प्रश्न लोकांमध्ये चर्चिला जात आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget