Halloween Costume ideas 2015

चौफेर गुणवत्तेमुळे इंग्लंडचा विजय

कुठलाही विजय आपल्या नावे करून घेण्यासाठी गुणवत्तापूर्ण खेळाडू आपल्या टीममध्ये असणे आवश्यक असते आणि त्यासोबत त्यांच्यात विजयाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी टीम  प्रशासनाचे मोठे योगदान असते. नुकताच आयसीसी वर्ल्डकप 2019 पार पडला आणि त्यात इंग्लंडने हा कप आपल्या नावे केला. इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्यात झालेला अटीतटीच्या  सामन्यात इंग्लंडला जास्तीच्या चौकारांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आले आणि पहिल्यांदाच इंग्लंड नंबर एकची टीम म्हणून नावारूपास आली. याचे विजयाचे विविध अंगानी  विश्लेषण करता येईल. मात्र इंग्लंडच्या विजयी टीमकडे सुक्ष्म दृष्टीटाकूने पाहिले असता इंग्लंड हा गुणवत्तेला प्राधान्य देणारा देश असल्याचे चटकन आपल्या लक्षात येईल. याचा   आदर्श इतर देशांनी घेतला तर निश्चितच ते प्रगतीकडे वाटचाल करतील, यात शंका नाही. विषय खेळाचा असो का राजकारणाचा की समाजकारणाचा अथवा अन्य कुठलाही; गुणवत्ता  हीच सर्वपरे असते.
आता हेच पहा ना इंग्लंडला विजयी करण्यामध्ये ज्याने सिंहाचा वाटा उचलला त्या बेन स्टोक हा मूळचा न्यूझिलंडचा. त्याच्यावर विश्वास दाखवून इंग्लंडने त्याला आपल्या संघात स्थान  दिले आणि त्याने चमत्कार करून दाखविला. जी गोष्ट स्टोकची तीच कॅप्टन इयान मॉर्गनची. हा मूळचा आर्यलैंडचा खेळाडू. डब्लिनमध्ये 10 सप्टेंबर 1986 जन्मलेला. त्याची गुणवत्ता  पाहून इंग्लंडने त्याला संघाची जबाबदारी सोपविली. ती त्याने जीव ओतून सांभाळली. गोलंदाज जोफ्रा आर्चर हा ब्रिज टाऊन बार्बाडोस, वेस्ट इंडिज असून, टॉम कुरन, जेसम रॉय हे  दक्षिण आफ्रिकेचे गुणवंत खेळाडू होत. जोफ्रा तर कृष्णवर्णीय. तरी त्याच्या कातडीच्या रंगाचा विचार न करता त्याच्या गुणवत्तेचा विचार केल्यानेच त्याने इंग्लंडला विजयापर्यंत  पोहोचविण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग नोंदविला. मोईन अली, आदिल रशीद हे पाकिस्तानी वंशाचे ब्रिटशमध्ये जन्मलेले खेळाडू व सच्चे पक्के मुसलमान. त्यांच्या दाढीचा विचार न  करता त्यांच्या गुणवत्तेचा विचार केल्याने त्यांनी नुसता खेळच केला नाही तर आपल्या श्रद्धेची ऊर्जा त्यांनी इतर खेळाडूंना स्थलांतरित केली व संघाचे मनोधैर्य खचणार नाही, याची दक्षता घेतली.
त्याचा परिणाम असा झाला की, अनेक सामने हरल्यावरसुद्धा संघाचे मनोबल टिकून राहिले. म्हणूनच कप जिंकल्यानंतर कॅप्टन मॉर्गन याला पत्रकारांनी विचारले की, हा कप तुम्ही  नशिबाने जिंकलाय काय? तर त्याने उत्तर दिले की आमच्या बरोबर अल्लाह होता. स्वतः ख्रिश्चन धर्मीय असून, आपल्या यशाचे श्रेय अल्लाहला देण्यामागे आदिल रशीद व मोईन अली  यांची खरी भूमिका होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूळ ब्रिटीश वंशाच्या खेळाडूंनीसुद्धा आपले मन मोठे करून या विदेशी खेळाडूंच्या गुणवत्तेचा आदर राखला. त्यांना योग्य ते सहकार्य  केले. त्यामुळे हा संघ एकसंघ झाला. नसता संघामध्ये संघ असता तर त्यांनी वर्ल्डकप कधीच जिंकला नसता. या ठिकाणी न्यूझिलंड संघाचा उल्लेख न करणे त्यांच्यावर अन्याय  करण्यासारखे होईल. त्यांनी खऱ्या खेळ भावनेने ह्या वर्ल्डकपमध्ये खेळून जगभरातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली. इंग्लंडच्या विजयापेक्षा जास्त चर्चा न्यूझिलंडच्या पराजयाची झाली.  इंग्लंडच्या संघाने कप जिंकला मात्र न्यूझिलंडच्या संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. विजयश्री पर्यंत बरोबरी साधली मात्र चौकारांच्या संख्येच्या आधारामुळे त्यांना पराजय पत्कारावा लागला.
एवढेच नव्हे तर इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंड जी की तेथील रिझर्व्ह बँक आहे. तिच्या गव्हर्नरपदी निवड होणाऱ्यांच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये भारताचे रघुराम राजन यांचे नाव  अग्रस्थानी आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आज जगाने एका अशा कालखंडात प्रवेश केलेला आहे जेथे धर्म, जात, देशाच्या सीमा गळून पडलेल्या आहेत. आता प्रगती  करावयाची असेल तर चारही बाजूंनी गुणवान माणसं प्रत्येक देशाला आपल्याशी जोडून घ्यावी लागतील. ही बाब आपल्या देशाच्या राजनेत्यांच्या लक्षात जेवढ्या लवकर येईल तेवढ्या  लवकर आपल्या देशाचे भले होईल. आपल्या देशात प्रादेशिक अस्मिता एवढी जपली जाते की, एखाद्या प्रांताचे जास्त खेळाडू संघात गुणवत्तेनुसार स्थान प्राप्त करीत असतील तरी  केवळ ते एका विशिष्ट प्रांताचे आहेत म्हणून त्यांचा विरोध होताना दिसून येतो. या क्षुद्र मानसिकतेतून जोपर्यंत आपण निघणार नाही तोपर्यंत आपला देश प्रगती करणार नाही. त्यामुळे  प्रत्येकाने आपल्या गुणवत्तावाढीकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- बशीर शेख
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget