(२८६) आमचे अपराध पोटात घे, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर, तूच आमचा वाली आहेस, काफिरांच्या विरूद्ध आम्हाला सहाय्य कर.३४२
३४२) या प्रार्थनेच्या (दुवा) आत्म्याला पूर्णत: समजण्यासाठी ही गोष्ट नजरेसमोर ठेवली गेली पाहिजे, की हे दिव्य अवतरण हिजरतच्या एक वर्षापूर्व मेराजच्या वेळी झालेले आहे. तेव्हा मक्का येथे इस्लाम आणि कुफ्र यांच्यातील संघर्ष चरमसीमेला पोहचला होता आणि मुस्लिमांवर संकटांचे डोंगर कोसळले होते. या परिस्थितीमध्ये मुस्लिमांना शिकवण देण्यात आली की आपल्या पालनकर्त्या स्वामीजवळ अशाप्रकारे प्रार्थना करा. स्पष्ट आहे की देणारा स्वत:च मागणाऱ्यांसाठी प्रार्थनेची (मागण्याची) पद्धत दाखवीत आहे; तर स्वीकृतीची शाश्वती आपोआप होते. म्हणून ही प्रार्थना (दुवा) मुस्लिमांसाठी त्या काळी मन:शांतीचे एक मोठे कारण बनली. याव्यतिरिक्त या प्रार्थनेत हेसुद्धा मुस्लिमांशी वेगळ्या पद्धतीने सांगितले गेले, की आपल्या भावनांना एखाद्या अनुचित दिशेत वाहू देऊ नका तर त्यांना या प्रार्थनेच्या साच्यात साकारू द्यावे.
आलिइमरान
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) अलिफ, लाऽऽम, मीऽऽम. (२) अल्लाह तो चिरंजीवी नित्य सत्ता ज्याने सृष्टीची व्यवस्था सांभाळली आहे. खरोखरच त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही.१
(३-४) हे पैगंबर (स.)! त्याने तुमच्यावर हा ग्रंथ अवतरला जो सत्य घेऊन आला आहे व त्या ग्रंथांच्या सत्यतेला प्रमाणित करत आहे, जे पूर्वी अवतरले होते. यापूर्वी त्याने मानवांच्या मार्गदर्शनाकरिता तौरात व इंजिल अवतीर्ण केले आहे.२ आणि त्याने ती कसोटी अवतीर्ण केली आहे, (जी सत्य आणि असत्य यातील फरक दर्शविणारी आहे.) आता जे लोक अल्लाहचा आदेश स्वीकारण्यास नकार देतील त्यांना निश्चितच कठोर शिक्षा मिळेल. अल्लाह अमर्याद शक्तीचा स्वामी आणि दुष्कर्मांचा बदला घेणारा आहे.
(५) पृथ्वी आणि आकाशांतील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही.३ (६) तोच तर आहे, जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचा रूप हवे तसे घडवितो.४ त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही.
१) तपशीलासाठी पाहा सूरह - २ (अल्बकरा) टीप नं. २७८.
२) सर्वसाधारणात: लोक `तौरात' म्हणजे बायबलचा जुना करारमधील सुरूवातीची पाच पुस्तके समजतात. तसेच इंजिल (बायबल) म्हणजे बायबलच्या नव्या करारातील प्रसिद्ध चार पुस्तकांना समजतात. याचमुळे हा पेच निर्माण होतो की काय खरेच हे ग्रंथ ईशग्रंथ आहेत? काय कुरआन त्या सर्व बाबींना पुष्टी देतो जे या ग्रंथांमध्ये नमूद आहेत? वास्तविकता तर ही आहे की `तौरात' हे बायबलच्या जुन्या करारातील सुरूवातीच्या पाच पुस्तकांचे नाव नाही तर ते त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. तसेच बायबल नवीन कराराच्या चार पुस्तकांचे नाव नाही तर ते त्यांच्यामध्ये अंकित झालेले आहेत.
३) म्हणजेच तो सृष्टीच्या सर्व रहस्यांना जाणणारा आहे. म्हणून जो ग्रंथ त्याने अवतरित केला आहे तो पूर्णत: सत्याधिष्ठित आहे. तसेच विशुद्ध सत्य फक्त याच ग्रंथात मनुष्याला मिळू शकते जे त्या ज्ञानी आणि बुद्धीविवेकी अस्तित्वाकडून अवतरित झाले आहे.
४) यात दोन महत्त्वाच्या तथ्यांना स्पष्ट केले आहे. एक म्हणजे तुमच्या प्रकृतीला तो जसे जाणतो तसा दुसरा कोणी जाणू शकतच नाही. तुम्हीसुद्धा जाणू शकत नाही. म्हणून त्या अल्लाहच्या मार्गदर्शनाला मान्य करण्याव्यतिरिक्त तुमच्यासमोर दुसरा मार्ग नाही. दुसरे तथ्य म्हणजे ज्याने तुमची गर्भधारणा होण्यापासून ते नंतरच्या अवस्थेत तुमच्या लहान-मोठ्या गरजांची पूर्तता करण्याची व्यवस्था केली. कसे शक्य आहे की तो ऐहिक जीवनात तुमच्या मार्गदर्शनाची व्यवस्था करणार नाही? जेव्हा की तुमची सर्वांत अधिक गरज तर हीच आहे.
Post a Comment