Halloween Costume ideas 2015

श्रीलंकेत मुस्लिम विरोधी दंगे

- इरफान इंजिनियर
अलिकडे 26 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या पूर्वेकडील कंपारा शहरामध्ये तर 2 मार्च रोजी केंडी जिल्ह्याच्या टेडेनिया आणि उडीस पट्टुआमध्ये मुस्लिम विरोधी दंगली झाल्या. अंपारामध्ये झालेल्या दंगलीची सुरूवात एका विचित्र पद्धतीने झाली. एका मुस्लिम हॉटेलमध्ये काही बौद्ध सिंहली जेवण करत होते. तेंव्हा त्यांच्यापैकी एकाच्या ताटात गव्हाच्या पिठाचा तुकडा आला. तेव्हा त्यांना शंका आली की जेवणामध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिसळलेल्या आहेत. यासंदर्भात जेवण तयार करणार्या मुस्लिम स्वयंपाक्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात त्याला प्रश्न विचारण्यात आला की, जेवणात गर्भनिरोधक गोळ्या मिसळल्यात काय? तेव्हा तो डोके हालवताना दिसून येतो. वास्तविक पाहता त्याने घाबरून डोके हलवले होते. एवढ्याच निमित्ताने दक्षिणपंथी सिंहिली संघटनांनी मुस्लिमांच्या विरूद्ध दंगली सुरू केल्या. वास्तविक पाहता नंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की, पुरूषांना मुलं जन्माला घालण्यासाठी अपात्र करणार्या गोळ्याच अस्तित्वात नाहीत. केंडीमध्ये 22 फेब्रुवारीला 4 मुस्लिम युवकांनी केलेल्या मारहाणीत एका सिंहिली वाहनचालकाचा मृत्यू झाला. त्या वाहनचालकाने नशेमध्ये ट्रक चालवून अपघात केला होता. चालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्या युवकांना घटनेच्या दिवशीच पोलिसांनी अटक केली. तरी परंतु, या घटनेनंतर झालेल्या दंगलीत सरकारच्या कथनानुसार मुस्लिमांच्या 465 घरांचे, दुकानांचे आणि वाहनांचे नुकसान करण्यात आले.
    या दोन्ही घटनांवरून एक गोष्ट लक्षात येते की, श्रीलंकेमध्ये मुस्लिमांच्याविरूद्ध भय, संदेह आणि पूर्वाग्रह किती मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. श्रीलंकेमध्ये विविध वर्णीय मुस्लिम समुदाय राहतो. ज्यात मूर, मलय, बोहरा, खोजा आणि मेमन यांचा समावेश आहे. 2012 साली झालेल्या जनगणनेनुसार श्रीलंकेत मुस्लिमांची जनसंख्या 9.66 टक्के एवढी आहे. मुस्लिम समुदायाचा मोठा भाग मूर मुस्लिमांचा आहे. हे मूर वंशीय लोक तमीळ भाषा बोलतात. असे असतांनासुद्धा एलटीटीईच्या विरोधात मूर मुस्लिमांना सिंहिली बौद्धांनी सोबत घेतले होते. त्यावेळेस मूर आणि सिंहिली यांच्यात कुठलेच मतभेद नव्हते. मात्र तमिळ एलटीटीई आतंकवादाचा नायनायट झाल्यानंतर राष्ट्रवादी बौद्ध सिंहिली लोकांना एका नव्या शत्रूची गरज भासू लागली. तेव्हा त्यांनी आपल्या समाजात दबदबा कायम राखण्यासाठी मुस्लिमांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली.     जगातल्या मुस्लिम विरोधी वातावरणाचा त्यांना उपयोग झाला. लेखकाने या संबंधी जेव्हा एका बौद्ध भिक्शुकाशी चर्चा केली तेव्हा त्याने सांगितले की, ’हे मुस्लिम लोक बौद्ध संस्कृतीच्या विरोधात आपली मुस्लिम संस्कृती जपू पाहत आहेत, हे आम्हाला पसंत नाही.’
    बोधू बाल सेना (बीबीएस) या बुद्धीस्ट फोर्स आर्मीची स्थापना विमालजोति आणि सगलगोडा-अत्थज्ञानसरा यांनी केली होती. 2012 साली झालेल्या बीबीएसच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुस्लिमांच्या स्वतंत्र ओळखीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. मुस्लिमांचा हलाल भोजनाचा आग्रह आणि मुस्लिम महिला जो बुरखा वापरतात त्याला विरोध करण्यात आला होता. याच अधिवेशनात बौद्ध समुदायावर कुटुंब नियोजनाच्या उपायांचाही विरोध करण्यात आला होता. बीबीएसने एकीकडे बौद्धांना विशेष अधिकारांची मागणी केली होती तर दूसरीकडे त्यांची मागणी होती की, मुस्लिमांचे अ-इस्लामीकरण करून त्यांना बौद्ध संस्कृतीत सामील करण्यात यावे.
    अतिवादी बौद्ध सिंहिली नेतृत्व आपल्या लोकांना एकसंघ ठेऊ इच्छितो. यासाठी ते असा तर्क देतात की, सिंहिली बौद्धांना राहण्यासाठी संपूर्ण जगात श्रीलंका हा एकच देश आहे. याउलट मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन अन्य देशात ही जाऊन राहू शकतात. असे करून हे लोक मूर आणि सिंहिली ख्रिश्चनांची श्रीलंका ही मातृभूमी आहे हे सत्य नाकारतात. सिंहिलींचा राष्ट्रवाद वाढत्या मशिदींच्या संख्येचाही विरोधी आहे. मस्जिदींच्या वाढत्या संख्येला ते मुस्लिमांच्या संख्या वाढीशी जोडतात.
    बीबीएसचे महासचिव गणसारा यांनी भारतात भाजपा सरकारचे स्वागत केलेले आहे. त्यांचा दावा आहे की, दक्षिण एशियामध्ये हिंदू-बौद्ध शांती क्षेत्राच्या निर्मितीसाठी ते संघाशी चर्चा करीत आहेत. तथापि, राम माधव यांनी बीबीएसशी संघाच्या कुठल्याही प्रकारच्या संबंधांचा इन्कार केला आहे. मात्र त्यांनी समाज माध्यमांवर बीबीएसची प्रशंसा करतांना लिहिले आहे की, ’बोधू बाल सेना मूलतः विदेशी धर्मांपासून आपल्या देशाच्या संस्कृती रक्षणाची भाषा बोलते.” माधव यांचे हे मत संघाच्या मताशी साधर्म्य साधणारे आहे. संघाचाही उद्देश हिंदू धर्म रक्षा हाच आहे. बीबीएस आणि आरएसएस दोघांचे काल्पनिक शत्रू ख्रिश्चन आणि मुस्लिम हे आहेत. बौद्ध आणि हिंदू श्रेष्ठतावादी संघटना काल्पनिक शत्रूंचे काल्पनिक भय दाखवून बहुसंख्य समाजाला आपल्या ध्वजाखाली एकत्रित करू इच्छितात. जेणेकरून ते स्वतःला आपआपल्या धर्माच्या संस्कृति रक्षकाप्रमाणे स्थापित करू शकतील. त्यांना लोकशाही संस्थांच्या सन्मानाशी काही देेणेघेणे नाही.
    दक्षिणपंथी अतिवादी संघटना छोट्या घटनांना मोठे रूप देऊन त्याआड अशा लोकांवर हल्ले करतात ज्यांचे त्या घटनेशी काही देणेघेणे नसते. प्रशासन जर पीडितांच्या संरक्षणासाठी पुढे येत असेल तर त्याला सरकारी तुष्टीकरण घोषित केले जाते. खरे पाहता हे अतिवादी लोक लोकशाही आणि कायद्याच्या विरूद्ध युद्ध करीत आहेत.
    2013 मध्ये बीबीएसच्या एका अधिवेशनात 1300 बौद्ध भिक्शुंसह 16 हजार व्यक्ति उपस्थित होते. तेव्हा या संघटनेचे महासचिव गणेशसरा यांनी महारगमा घोषणापत्र जारी केले. त्यात म्हटलेले होते की, या देशात सिंहली बौद्धांचे सरकार आहे. हा देश सिंहली बौद्धांचा देश आहे आणि या ठिकाणी सिंहल्यांचेच शासन असायला हवे. लोकशाही आणि बहुवादी मुल्य सिंहली वंशाला नष्ट करून टाकतील. अधिवेशनात उपस्थित लोकांना आवाहन करत त्यांनी सांगितले होते की, मुस्लिमांच्या विरूद्ध जनतेने नागरी पोलीस बळाच्या रूपात काम करायला हवे.
    बीबीएसने आरएसएस प्रमाणे अनेक गोष्टी सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ 17 मार्च 2013 रोजी आयोजित एका रॅलीमध्ये बीबीएसने घोषणा केली रत्नापूर जिल्ह्यातील कुरागला बौद्ध मठाच्या परिसरात दहाव्या शतकातली जी मस्जिद आहे तिला मुस्लिम कठ्ठरपंत्यांनी एक बौद्ध इमारतीला नष्ट करून त्या ठिकाणी बांधली आहे. भारतात बाबरी मस्जिद राम जन्मभूमी तोडून बांधली गेली, हा दावा मुस्लिमांनी भारतात दीर्घकाळ राज्य केले असल्यामुळे धकून गेला. मात्र श्रीलंकेमध्ये मुस्लिमांनी कधीच राज्य केले नाही. श्रीलंका सुरूवातीला पोर्तुगाल तर नंतर ब्रिटनचा उपनिवेश होता.
    बीबीएसने फॅशन बग आणि नो लिमिट नामक हॉटेल श्रृंखलांवरही हा आरोप लावला की ते बौद्ध सिंहलींना मुस्लिम बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. या दोन्ही हॉटेल श्रृंखलांचे मालक मुस्लिम आहेत. सततच्या या हल्ल्यांमुळे श्रीलंकेतील मुस्लिमही आता संघटित होवू लागले आहेत. एशियन मुस्लिम अॅक्शन नेटवर्कचे मुस्तफा निहामात यांनी लेखकाशी बोलतांना सांगितले की, श्रीलंकेत जवळपास 3 हजार मस्जिदी आहेत. त्यात बहुतकरून तमिळ भाषेचा उपयोग केला जातो. परंतु, अलिकडेच कोलंबोच्या पाच मस्जिदीमध्ये जुम्याचा खुत्बा हा सिंहली भाषेत दिला जात आहे. मूर मुस्लिम हे अतिशय कष्टाळू असून त्यातील बहुतेक व्यावसायिक लोक आहेत. एका टॅक्सी ड्रायव्हरने लेखकाला सांगितले की, श्रीलंकेतील प्रत्येक दूसरी दुकान ही एक तर मूर मुस्लिमाची आहे किंवा तामिळांची. ही अतिशयोक्ती असू शकते मात्र हे सत्य आहे की, प्रत्येक दंगलीमध्ये मुस्लिमांच्या व्यवसायिक प्रतिष्ठानांना सर्वाधिक नुकसान पोहोचविले जाते.
    सर्वच देशातील दक्षिणपंथी राष्ट्रवादी संघटना ह्या बहुसंख्य समुदायातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना दुसर्या धर्मियांची भिती घालतात. उपयुक्त शिक्षण आणि विभिन्न समुदायांमध्ये संवाद साधून या समस्येचा सामना करता येऊ शकतो. भारताप्रमाणे श्रीलंकेची राज्यघटना ही सर्व नागरिकांना समान दर्जा देते व प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. परंतु, कार्यपालिका घटनेला निष्पक्षपणे लागू होवू देत नाही. श्रीलंकेच्या एका मंत्र्याने एका शिष्टमंडळाशी बोलताना ज्यात लेखकही सामिल होते सांगितले की, ”दंगलीमध्ये सामिल फार कमी लोकांवर खटले भरले जातात. त्यातीलही फारच कमी लोकांना शिक्षा मिळते. हिंसा रोखण्यासाठी घृणास्पद गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुप्तहेर व्यवस्थेला अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. गुप्त सूचनांवर प्रभावशाली कार्यवाही करणे ही आवश्यक आहे.”
    वास्तविक पाहता श्रीलंका सरकारने मुस्लिम विरोधी दंग्यांना गंभीरपणे हाताळलेले आहे. समाज माध्यमांवर प्रतिबंध लावलेला आहे व आणिबाणीही घोषित केलेली आहे. परंतु, आणिबाणीमुळे मिळालेल्या अतिरिक्त अधिकारांचा दुरूपयोग करून प्रशासनाने परत अल्पसंख्यांक मुस्लिमांना प्रताडित केलेले आहे. श्रीलंकेत आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आर्थिकदृष्ट्या श्रेष्ठ वर्ग दक्षिणपंथी राष्ट्रवादी विचारांच्या लोकांना आर्थिक मदत देत आहे. ज्या योगे अन्य समुदायांच्या गरिबी हटावच्या कार्यक्रमाला बाधा पोहचेल.
    (मूळ इंग्रजीतून हिंदी भाषांतर अमरिश हरदेनिया, हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय.शेख, बशीर शेख)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget