Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२८२) ....परंतु जी व्यापारी देवाणघेवाण तुम्ही आपापसांत हातोहात करता ती लिहिली गेली नाही तरी हरकत नाही,३२९ पण व्यापारासंबंधी सौदे ठरवीत असताना साक्षीदार ठरवत जा. लिहिणाऱ्याला व साक्षीदाराला त्रास दिला जाऊ नये.३३० असे कराल तर गुन्हेगार ठराल. अल्लाहच्या प्रकोपापासून स्वत:चे रक्षण करा. तो तुम्हाला योग्य कार्यपद्धतीची शिकवण देतो आणि त्याला प्रत्येक बाबीचे ज्ञान आहे.
(२८३) जर तुम्ही प्रवासात असाल आणि दस्तावेज लिहिणारा कोणी मिळाला नाही तर वस्तू कब्जेगहाण ठेवून व्यवहार करा.३३१ जर तुमच्यापैकी एखाद्याने दुसऱ्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी एखादा व्यवहार केला, तर ज्याच्यावर विश्वास ठेवला गेला आहे, त्याने अमानत परत केली पाहिजे आणि त्याने अल्लाहचे - आपल्या पालनकत्र्याचे भय बाळगावे. आणि साक्ष कदापि लपवू नका.३३२ जो साक्ष लपवितो त्याचे हृदय पापाने भरलेले आहे. आणि अल्लाह तुमच्या कृत्यांपासून गाफील नाही.
(२८४) आकाशांत३३३ व पृथ्वीमध्ये जे काही आहे ते सर्व अल्लाहचे आहे.३३४ तुम्ही आपल्या मनांतील गोष्टी प्रकट करा अथवा लपवा, अल्लाह कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडून त्यांचा हिशेब घेईल.३३५ मग त्याला हा अधिकार आहे, त्याने हवे त्याला माफ करावे आणि हवे त्याला शिक्षा द्यावी. प्रत्येक गोष्टीवर त्याला सामर्थ्य आहे.३३६


३२९) म्हणजे दैनंदिन व्यवहारात विक्रीचा व्यवहार लिखित होणे उत्तम आहे. जसे आजकाल कॅशमेमोव्‌दारे  व्यवहार होतो. याचप्रमाणे दैनंदिन व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी लिखापढी केली नाही तरी चालेल.
३३०) म्हणजे कुणा व्यक्तीला साक्षीदार बनण्यासाठी बाध्य केले जाऊ नये. किंवा लिखापढी करण्यास बळजबरी करू नये. आणि कोणी लिहिणाऱ्याला किंवा साक्षीदाराला या कारणामुळे त्रास देऊ नये की तो त्याच्या हिताविरुद्ध सत्य साक्ष देतो.
३३१) याचा हा अर्थ नाही की गहाण व्यवहार फक्त प्रवासातच होऊ शकतो. परंतु अशी स्थिती अधिकांश प्रवासात निर्माण होते म्हणून उल्लेख आला आहे. गहाणखत लिहिणे असंभव असेल तर केवळ त्याच स्थितीत रेहन (गहाण) चा मामला केला जावा. जेव्‌हा कर्ज देणारा लिखापढी करण्यास तयार नसेल तर काही वस्तू गहाण ठेवून कर्ज घेतले जाऊ शकते. परंतु कुरआन तर अनुयायींना दानशीलतेची शिकवण देतो आणि उच्च चारित्र्याला हे अशोभनीय आहे की एक व्यक्ती मालदार आहे आणि गरजवंताला तो काही गहाण ठेवूनच कर्ज देत असेल. म्हणून कुरआनमध्ये या दुसऱ्या स्थितीचा उल्लेख जाणीवपूर्वक आलेला नाही. येथे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे की गहाण देणे म्हणजे कर्ज देणाऱ्याला आपले पैसे परत मिळण्याची खात्री व्‌हावी परंतु त्याला गहाण ठेवलेल्‌या वस्तूपासून फायदा घेण्याचा अधिकार नाही. गहाण ठेवलेल्‌या घरात तो मनुष्य राहात असेल किंवा त्याचे भाडे खात असेल तर तो व्याजच खातो. कर्जावर सरळसरळ व्याज घेणे आणि गहाण ठेवलेल्‌या वस्तूपासून फायदा घेणे या दोहोंत सैद्धान्तिक रूपाने काहीच फरक नाही. एखादे जनावर गहाण ठेवले असेल तर त्याचे दूध वापरू शकता आणि त्यावर स्वार होणे व सामानाची ने-आण करू शकता. कारण तो चाऱ्याचा बदला आहे जो जनावराला तो मनुष्य घालतो.
३३२) साक्षी न देणे किंवा साक्षीद्वारा सत्य गोष्ट सांगण्यास नकार देणे दोन्ही साक्ष लपविणे आहे.
३३३) येथे व्याख्‌यान समाप्त होत आहे ज्याप्रमाणे अध्यायाचा प्रारंभ जीवनधर्माच्या (इस्लाम) मूलभूत शिकवणींनी झाला होता त्याचप्रमाणे अध्यायसमाप्तीसुद्धा त्या मूलभूत तÎवांचा उल्लेख करूनच होत आहे ज्यावर इस्लामी जीवनव्यवस्था अवलंबून आहे. तुलनेसाठी या अध्यायाच्या सुरवातीच्या पहिल्‌या सात आयती डोळ्यांसमोर ठेवल्‌यास अधिक स्पष्ट होईल.
३३४) इस्लाम धर्माची (इस्लामी जीवनव्यवस्थेची) ही सर्वप्रथम मूलभूत अट आहे. अल्लाह जमीन व आकाशांचा स्वामी आहे आणि त्यातील सर्व वस्तूंचा तोच मालक आहे आणि अल्लाहचेच राज्‌य चहुकडे आहे. हीच एक मूलभूत वास्तविकता आहे. म्हणूनच अल्लाहच्या आज्ञापालनाच्या मार्गाशिवाय दुसरा पर्यायच मनुष्यापुढे शिल्लक राहात नाही.
३३५) या वाःयात आणखी दोन गोष्टींचा उल्लेख आला आहे. एक प्रत्येकजण अल्लाहसमोर हिशेब देण्यास बाध्य आहे. दुसरे हे की, जमीन व आकाशांच्या ज्या बादशाहासमोर मनुष्याला जाब द्यावा लागले तो ज्ञात, अज्ञाताचे पूर्ण ज्ञान राखून आहे, मनातील विचार आणि संल्पपसुद्धा तो जाणून असतो.
३३६) अल्लाहच्या अमर्याद अधिकारांचा हा उल्लेख आहे. त्याला कोणत्याच कायद्याने बांधून ठेवलेले नाही, की त्यानुसार तो कार्य करण्यास बाध्य आहे. परंतु तो तर साधिकार स्वामी आहे. शिक्षा देणे आणि माफ करण्याचे सर्व अधिकार त्यालाच आहेत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget