Halloween Costume ideas 2015

येवला तहसीलदारांना मॉब लीचिंग विरोधात निवेदन

शकील शेख (येवला)–
झारखंड मध्ये झालेल्या मॉब लिचिंग च्या विरोधात येवल्यातून मुस्लिम समाज तसेच अर्जुन कोकाटे भाऊसाहेब आहेर महिंद्र पगारे एॅड समीर देशमुख नानासाहेब शिंदे अजहर शाह  रश्मी ताई पालवे अश्विनी जगदाळे रेखाताई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अजहर शाह यांनी सदर निवेदन सर्वाना वाचून सांगितले व  अश्या घटना आपल्या देशात नेहमी होत असल्या तर आपल्या देशाचे भवितव्य धोक्यात येईल असे मनोगत व्यक्त केले प्रा अर्जुन कोकाटे यांनी घडलेल्या घटनेच निषेध व्यक्त करत  राष्ट्र सेवा दल अश्या घटनेचा निषेध करते तसेच महिलांनी आपली संख्या वाढवायला हवी अश्या कामासाठी असे आव्हान केले.
किशोर सोनवणे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपले जाहीर पाठिंबा आहे असे मत व्यक्त केलं नानासाहेब शिंदे यांनी काँग्रेस पक्ष अश्या घटना कधी सहन करणार नाही दोषींवर सरकारने लवकरच निर्णय घ्यावा असे सांगितले समीर देशमुख यांनी आजच्या या निवेदन साठी मी आमच्या आय काँग्रेस च्या वतीने जाहीर पाठिंबा देतो भाऊसाहेब आहिरे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आपले समर्थन व्यक्त केले महिंद्र पगारे यांनी आपल्या भाषणात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर बशिर पठाण शेरू भाई मोमीन यांचे ही  भाषण झाले या वेळी महिलांनीही आपले सहभाग नोंदवला तहसीलदार यांना निवेदन महिलांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी सर्व उपस्तिथानी घडलेल्या घटनेचे निषेध व्यक्त केले  याप्रसंगी अडव्होकेट साजिद शेख शकिर शेख जावेद मोमीन हमजा मन्सूरी अजीज शेख फारुख शेख भानुदास पठारे संदिप जोंधळे रेखाताई साबळे रश्मी ताई पालवे आफरिन शेख  इशरत खान कविता माळी दयानंद जाधव बखतीयार शेख फरीद खान सूत्र संचालन व नियोजन अजहर शाह यांनी केले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget