आज जगात पाणी हा महत्वाचा घटक आहे. कारण जल नहीं तो कुछ नहीं! पृथ्वीतलावर मानवजातीच्या अतीरेकामुळे आज निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे. अन्न, वस्त्र, निवारा याची मुख्य जड पाणी आहे. कारण पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्यच नाही. भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी पाण्याचा हाहाकार! होतांना आपण पाहतो.
आजही अनेक देश पाण्यासाठी कडवी झुंज देत आहे. आज आपण कुठेही गेलो तरी पाणी अत्यावश्यक आहे. आकाश-पाताळ, पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण म्हणजेच आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मानव, पशु-पक्षी, जिवजंतु हे पाण्याविना जगुच शकत नाही. पाण्याविना निसर्ग नाही व मानवही नाही. म्हणजेच आज पाणी सर्वांसाठीच अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. १९९२ ला पर्यावरण व विकास या विषयावर संयुक्त राष्ट्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळेस विश्र्व जल दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली व संयुक्त राष्ट्र संघानेने प्रत्येक वर्षी २२ मार्चला विश्व जल दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. यानंतर १९९३ मध्ये २२ मार्चला संपूर्ण जगात विश्र्व जल दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यावेळेस जल संरक्षण आणि रख-रखाव यावर जनजागृतीचे मोठे अभियान छेडण्यात आले.
विश्व जल दिवसाला पाणी वाचविण्याचा "संकल्प" दिवस सुध्दा म्हटल्या जाते. या दिवसाला पाणी संरक्षणा विषयी जागृगता व पाण्याचे महत्व याला जास्त महत्त्व दिले जाते. आज मानवाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे पाणी आहे.कारण पाण्याविना संपूर्ण सृष्टीअधुरी आहे.आपण जगाच्या भुभागाचा विचार केला तर या पृथ्वीतलावर ७० टक्के पाणी व ३० टक्के भूभाग आहे. तरीही जगात पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते. कारण ७० टक्के समुद्राचे पाणी खारे असल्यामुळे पीण्यायोग्य नाही.सध्या संपूर्ण जग अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करतांना दिसते. त्यामुळे जगात अनेक नवीन नवीन समस्या उदयास येतांना दिसतात.
आज संपूर्ण जगात पीण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे जगातील वाढती लोकसंख्या यामुळे जगातील ५० टक्के जंगलसंपदा मानवाच्या अतिरेकामुळे नस्तनाबुत झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत न मुरता ते सरळ समुद्रात जात आहे. आज जगात अत्यंत गंभीर समस्या निर्माण होऊन दिवसेंदिवस समुद्राची पातळी वाढत आहे.समुद्राची पातळी वाढण म्हणजेच पृथ्वीतलावरील संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत धोक्याची घंटा आहे. पाण्याचा विषय साधा नसून अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.आज संपूर्ण जगात पीण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे.
जगात वाढते कारखाने व अनेक परमाणु परीक्षण यामुळे निसर्गानचे संतुलन डगमगतांना दिसत आहे. कारखाण्यांच्या दूषित वातावरणामुळे अनेक हिमकडे कोसळताना आपण पहातो. यामुळे संपूर्ण जगात महाप्रलय, त्सुनामी आल्याचेसुध्दा आपणासर्वांना ग्यात आहे.
जगातील हिमकडे साबुत राहिले तर पाण्याची समस्या आपोआप कमी होईल. परंतु मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी हिमकड्यांचा बळी घेतांना दिसत आहे. अनेकदा देवभूमित आलेला महाप्रलय हा हिमकडा कोसळल्याने आलेला महाप्रलय आहे. संपूर्ण भारतात ८० टक्के पिण्यायोग्य पाणी हिमकड्यातून मिळत असते. परंतु मानवाच्या अतिरेकामुळे हिमकडे वेळेच्या आधी वितळायला लागले तर या पृथ्वीतलावर २० वर्षांनंतर पिीण्याकरिता एक थेंब सुध्दा पाणी मिळणार नाही. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी तळागाळातुन प्रयत्न व्हायलाच पाहिजे.
आज जंगलातील संपूर्ण हिंसक पशु शहरांकडे का येत आहे. याचा विचार कोणीच करीत नाही. परंतु जगातील संपूर्ण मानवजातीने हे लक्षात ठेवले पाहिजे की जंगलातील हिंसक पशु-पक्षी शहरात येत नसून आपण त्यांच्या घरावर म्हणजेच जंगलावर अतिक्रमण करीत आहोत. त्यामुळे जंगलातील पशु-पक्षी शहरात व गावात येतांना दिसतात. पूर्वी छोटे-छोटे तलाव असायचे.परंतु आज पुर्विचे छोटे-छोटे तलाव वस्ती व कारखाण्यामध्ये परिवर्तीत झालेले दिसुन येतात.आज गावात, शहरात, वस्तीत संपूर्ण ठिकाणी पीण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतांना दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे मानवाने निसर्गावर केलेला अत्याचार होय. सध्याच्या काळात जगामध्ये आगजनीच्या घटना व वनवेलागने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक मोठमोठी जंगले अजुनही जळत आहे. कारण मानवाने जमिनीच्या पोटातील पाणी संपूर्णतः निचोडून (आटवून) टाकले आहे. जगातील अनेक भागात ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतांना आपण पहातो. भूकंप, त्सुनामी ह्या संपूर्ण घटना पृथ्वीतलावर पाण्याची पातळी कमी होत असल्याने होत आहे.कारण जंगलसंपदा टिकून रहाली असती तर पाण्याची समस्या मुळातच राहिलीच नसती. पाणी टिकून राहिले असते तर ज्वालामुखी, त्सुनामी, महाप्रलय,भूकंप, वनवे लागने इत्यादी विनाशकारी घटनांचा उद्रेक झाला नसता. अजूनही मानवजाती पाण्याचे महत्व समजल्याचे दिसून येत नाही. पूर्वी नदी, ओढे, तलाव, झरा व विहिरीतून पाणी घ्यायचे परंतु आता नदी,तलाव व विहिरी आटुलागल्या आहेत. विहिरीची खोली ५० ते ६० फुटांपर्यंत असायची परंतु पाण्याचा दुष्काळ पहाता ५० ते ६० फुटांपर्यंतचे विहिरीचेसुध्दा पाणी आटल्याचे दिसून येते. आता मानवजातीने बोरवेलचा सहारा घेऊन ५०० ते ७०० फुटांवर पाण्यासाठी जावे लागत आहे.मनुष्याला पाण्याचा अधिकार फक्त ५० ते ६० फुटांपर्यंतच होता. परंतु मानवाने पाण्यासाठी संपूर्ण सीमा ओलांडून पाताळात जाऊन तेथील पाण्यावर अतीक्रमन केल्याचे दिसून येते. म्हणजेच मानवाने सापाच्या बिळात हात टाकला आहे. ज्या पाण्यावर मानवजातीचा तिळमात्र अधिकार नाही तेही पाणी आपण आपली तहान भागवण्यासाठी वापरीत आहोत.हा मानवाचा निसर्गसृष्टीवर खुला अन्याय व अत्याचार नाही काय?
आज मानवाच्या निष्काळजीपणामुळे व अतिरेकामुळे जंगले वाळून (सुकली) गेली आहे. संपूर्ण जग बारूदच्या ढिगाऱ्यावर बसले आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहे. अनेक देशात गृहयुद्ध सुरू आहे. उदाहरण द्यायचे झाले तर अझरबैजान-आर्मेनिया, खाडी युद्ध, अफगाणिस्तान,इराण-इराक संघर्ष आणि आता रशिया -युक्रेन युद्धाने जनुकाय रक्ताची नदी वाहत आहे की काय असे वाटत आहे. यामुळे युक्रेनमध्ये आगेचा लोंढा दिसत होता. त्याचप्रमाणे अनेक देश परमाणुपरीक्षण करतांना आपण पहातो. अशा परीस्थितीत पृथ्वी पाण्याचे संग्रहन कसे काय करेल? मानव आज आगीशी खेळत आहे तो पाण्याचे महत्व विसरल्याचे दिसून येते. संपूर्ण जगाने पाणी वाचवीण्याचा संकल्प करायला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा आवश्यक आहे यात दुमत नाही. परंतु अन्न, वस्त्र, निवारा यांची उत्पत्ती ही पाण्यापासूनच होत असते.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाने 22 मार्चला विश्व जल दिवस साजरा करतांना पाण्याचे महत्व समजुन घेतले पाहिजे.
जगापुढे शुद्ध पाण्याची गंभिर समस्या आहे. पाण्यासाठी अनेक देशांमध्ये हाहाकार! माजल्याचे दिसून येते. पाणी वाचविण्यासाठी भारतासह संपूर्ण जगाने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावयण व निसर्ग सुरक्षित तर पाणी सुरक्षित. पाणी सुरक्षित तर मानव, पशुपक्षी, जीव-जंतु सुरक्षित, जिव सृष्टी सुरक्षित तर पृथ्वी सुरक्षित ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे.आज अनेक देशांतील जंगल संपदा नस्तनाबुत करून कारखाने, शहरे मोठ्या प्रमाणात उभारले आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जंगलातील हिंसक प्राणी (वाघ, अस्वल, सिंह, कोल्हा, बिबट्या, जहरीले साप) शहरात शिरकाव करतांना दिसतात. मोठ्या प्रमाणात जिवीत हानी सुध्दा झाली आहे.याचे मुख्य कारण म्हणजे जंगलातील पाण्याचा तुटवडा होय.आज पाण्यासाठी मानव व प्राणी एकमेकांचे कट्टर शत्रृ बनल्याचे दिसून येते.त्यामुळे संपूर्ण जगाने पाणी वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे. असे भाकीत आहे की २०४० मध्ये भारतात प्यायला पाणी मिळणार नाही. अशी स्थिती येवू शकते याला नाकारता येत नाही.संयुक्त राष्ट्राने जगातील पाण्याच्या परिस्थितीच्या अहवालामध्ये ही भीती वर्तवली आहे.
जगात पुढे पाण्याचे भिषन संकट येणार असून भारत या संकटाच्या केंद्रस्थानी रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नद्या, सरोवर, तलाव यामध्ये उपलब्ध असलेले पीण्याचे पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. त्यामुळे कारखान्याचे दूषित पाणी व सांडपाणी यांना पिण्याच्या पाण्यापासून कोसो दूर ठेवण्याची गरज आहे. दूषित पाणी पिल्यामुळे जगात दरवर्षी लाखोच्या संख्येने मानवीय हाणी व पशुपक्ष्यांची हानी मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येते यालाही थांबविण्याची गरज आहे. एका वर्षात पडलेले पावसाचे पाणी अडवीता आले तर पाच वर्षे पुरेल इतका पाणी साठा आपल्याला उपलब्ध होवू शकतो. परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे अजुनही आपल्याला जमले नाही.
आताही ८० टक्के पाणी प्रदूषित आहे.पाण्याच्या स्त्रोतांचे होणारे प्रदूषण आणि पाणी साठविण्यासाठी नसलेले नियोजन हे दोन प्रश्न आहेत. यावर दुर्लक्ष सुरूच राहील्यास येणाऱ्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांचे दिला आहे. मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे त्यामुळे हे लक्षात ठेवले पाहिजे की पाणी संपले तर आपण संपू, आपण संपलो तर जग संपेल! त्यामुळे विश्र्व जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकांनी पाणी वाचविण्याचा "संकल्प" केला पाहिजे. तेव्हाच पाणी वाचेल. त्याचप्रमाणे "पाणी वाचवा देश वाचवा" हा निर्धार संपूर्ण जगाने अंगीकारला पाहिजे. आज जगातील वाढती पाण्याची समस्या यामुळे अनेक पशुपक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते. याकरिता जल विश्र्व दिनाच्या निमित्ताने वाढते प्रदूषण रोखण्याचा व पाणी वाचविण्याचा निर्धार सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.
- रमेश कृष्णराव लांजेवार
नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९
Post a Comment