Halloween Costume ideas 2015

महागाई ही गरीब व सर्वसामान्यांसाठी महाश्राप!

देशात दिवसेंदिवस महागाई विक्राळ रूप धारण करीत आहे. एलपीजी गॅस सिलेंडर व पे-डिझेल दर वाढीने कंपन्यांना व सरकारला अरबो रूपयांचा फायदा होत आहे.परंतु सरकार गरीबांची व सर्वसामान्यांचे खिशे कापत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. परंतु राजकीय पुढारी, केंद्र सरकारे व राज्य सरकारे यावर लक्ष न देता बघ्याची भूमिका बजावतांना दिसतात. आज घरगुती गॅसने एकहजारी पार करून गरीब व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडुन घायाळ केले. त्याचप्रमाणे पेट्रोल ११३.५३ रूपये व डिझेल १००.०९ रूपये करून सर्वसामान्यांना आगीत लोटले. यामुळे संपूर्ण भाव आकाशाला भिडल्याने भारतात महागाईचा भडका उडुन वनवा लागल्याचे दिसून येते.

निवडणुकांच्या काळात सर्वच राजकीय पक्ष-विपक्ष व सरकारे महागाई कमी करण्याचे भरगच्च आश्वासन देवून घोषणा पत्र तयार केले होते. निवडणुका झाल्यानंतर सर्वसामान्यांना होणाऱ्या वेदना राजकीय पुढारी विसरतात ही स्वतंत्र भारताची शोकांतिका म्हणावी लागेल. १५० वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यांना हाकलून लावण्यासाठी थोर पुरुषांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्रता सेनानींनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने राजकीय खेळी करून इंग्रजांना सळोकीपळो करून सोडले. तेव्हाच आपण स्वतंत्र झालो व मोकळा श्वास घेऊन गुण्यागोविंदाने जगु लागलो तो दिवस म्हणजे १९४७. ज्या महापुरुषांनी भारतीय जनतेसाठी आपले बलिदान दिले आणि भारतीय जनता सुखी व समाधानी रहावी या उद्देशाने जो लढा चालविला त्यांला आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी खिंडार पाडल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार इत्यादींशी गरीब व सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींला खतपाणी घालण्याचे काम आजचा राजकीय पुढारी, केंद्र सरकारे व राज्य सरकारे करतांना दिसते.

आपण अन्न, वस्त्र, निवारा याला जास्त महत्त्व देतो आणि दिले पाहिजे. आज ज्या गॅसच्या भरोशावर गोरगरीब, सर्वसामान्य अन्न शिजवितो तोच एलपीजी गॅस सिलेंडर 1000 हजारी पार करीत असेल तर गरीबांनी जगावे की मरावे असा प्रश्न उद्भवतांना दिसतो. आजच्या परिस्थितीत सर्व वस्तूंनी महागाईच्या बाबतीत संपूर्ण शिखर गाठल्याचे दिसून येते. तीखट, तेल, मीठ आणि गॅस हे गरीब व सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत जिवनावश्यक वस्तू आहे. कारण यामुळे वितभर पोटाला आधार मिळतो आणि अशा अत्यावश्यक वस्तू महाग होने म्हणजे सरकारकडून खुला पोटात छुरा खुपसनेच म्हणावे लागेल. सर्वच वस्तू महाग होत आहे त्यात जर अती आवश्यक वस्तु महाग होणे म्हणजे सरकारमार्फत जहरीले बीज रोवून गरीब व सर्वसामान्य जनतेची खुली हत्याच म्हणावी लागेल.

कोरोना काळात गरीब व सर्वसामान्यांना अक्षरशः डॉक्टरांनी लुटले. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि आता महागाईने यात तेल टाकून सर्वसामान्यांना आगीत भस्मसात करीत असल्याचे दिसून येते. म्हणजेच आजच्या परिस्थितीत महागाईने खालून वरपर्यंत सर्वांनाच जखडलेले दिसून येते. महागाई गरीब व सर्वसामान्यांसाठी "गले की हड्डी" बनल्याचे दिसून येते. याचा संपूर्ण फायदा राजकीय पुढारी घेत आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर असे वाटते की सरकार कोण चालवीत आहे आणि विपक्ष कोण आहे? हे अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला समजलेच नाही. कारण आघाडी सरकार आपले सरकार ५ वर्षे टिकून रहावे याच प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या वेदनांची व दु:खाची अजीबात चिंता नाही.विरोधकांचा विचार केला तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणे-घेणे नाही. कारण त्यांच्या जवळ सत्ता नसल्याने ते आगबबुला झाले आहेत. त्यांचे एकच मिशन आहे ते म्हणजे सरकार पाडणे.यासाठी ईडी, सीबीआय, आयटीमार्फत चौकशी करून सत्ता हस्तगत करावी. अशा पध्दतीने पक्ष-विपक्ष आपला लपंडाव खेळून गरीब व सर्वसामान्यांची थट्टा करीत आहे.

गरीब व सर्वसामान्यांन समोर अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस डॉक्टरांची फी व औषधोपचार सुध्दा करू शकत नाही.कारण डॉक्टरांची अवाढव्य फी आणि आभाळाला टेकलेल्या औषधांच्या किंमती यामुळे सर्वसामान्य घायाळ झालेला आहे.म्हणजेच गरीब व सर्वसामान्य व्यक्ती यांना खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून तर औषधोपचारापर्यंत कडवी झुंज द्यावी लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत अनेकांना आपले प्राण सुध्दा गमवावे लागते ही अत्यंत दु:खाची बाब आहे. सरकार महागाईचे अनेक कारणे सांगणार व सांगतसुध्दा आहे. यात मुख्य कारण म्हणजे रशिया -युक्रेन युद्ध यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहे असे सरकारचे म्हणणे आहे. आजी-माजी आमदार-खासदारांनी आपल्या जवळ करोडोंची चल-अचल संपत्ती आहे ती ताबडतोब सरकारच्या तिजोरीत जमा करावी व महागाई कमी करण्यास आतभार लावावा.राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, सुप्रीम कोर्ट, प्रधानमंत्री यांना आग्रह व विनंती आहे की देशातील आजी-माजी आमदार-खासदार यांची पेंशन, पगार व इतर भत्ते ताबडतोब बंद करावे. यामुळे आपोआप अरबो रूपयांचा सरकारचा खर्च वाचेल केंद्राची व संपूर्ण राज्यांची तिजोरीत भरण्यास मोठी मदत होईल.कारण देशाच्या १३५ कोटी जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम मूठभर राजकीय पुढाऱ्यांनीच केले आहे. आज राजकीय पुढारी कोणतीही मेहनत न करता, घाम न गाळता गाडी, बंगला व करोडोंची चल-अचल संपत्ती यांच्या जवळ दिसून येते ही संपूर्ण संपत्ती गरीब व सर्वसामान्यांचे रक्त पिऊन उभारली आहे. यावर ईडी, सीबीआय, आयटी यांनी पक्षपात न करता संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांची कठोर चौकशी केली पाहिजे. विजय माल्या निरव मोदी मेहुल चोक्शी इत्यादींसह अनेकांनी भारताची चलनातील अरबो रूपया विदेशात नेला यालासुध्दा दोषी भारतीय राजकीय पुढारीच आहेत. कारण यांचे विदेशात पलायन राजकीय पुढाऱ्यांनीच केले. त्याचे प्रायचित्त आज गरीब व सर्वसामान्यांना महागाईच्या रूपाने भोगावे लागत आहे. हे भारतीय लोकशाहीचे दुर्भाग्य म्हणावे लागेल!

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget