पुणे
सोमवार, 18 एप्रिल 2022 रोजी सेंट पॅट्रिक कॅथेड्रल येथील पुण्याच्या बिशपच्या घराचे दरवाजे उघडले आणि मुस्लिमांसाठी इफ्तार (उपवास सोडणे) आयोजित करण्यात आला. या मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमाला मुस्लिम तसेच ख्रिश्चनांसह 200 हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शांतता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट विविध समुदायातील लोकांनी ठेवले होते. जमात-ए-इस्लामी हिंद कॅम्प युनिट- पुणेचे अध्यक्ष करीमुद्दीन शेख म्हणाले, "हा एक सुंदर अनुभव होता. सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमध्ये आमच्या वेगवेगळ्या धर्मांच्या बंधुभगिनींसोबत इफ्तार होतं. आम्ही रमजानचा पवित्र महिना आणि मुस्लिमांसाठी उपवासाचे महत्त्व यावर एक संक्षिप्त व्याख्यानही आयोजित केले होते. या वेळी धर्मांमधील काही समविचारांचादेखील उल्लेख करण्यात आला, ज्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला."
आर. रेव्ह. बिशप थॉमस डाबरे म्हणाले, 'पुणे शहरातील मदर चर्चमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची ही दुसरी वेळ आहे. शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आणि इतर समुदायांच्या लोकांशी संबंध दृढ करण्यासाठी आंतरधर्मीय संवादांबद्दल मी नेहमीच बोललो आहे, जे शांततेत एकत्र राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे."
आयएनसी नेते माननीय साहिल केदारी हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अशा शांतताप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला. चर्चच्या कर्मचाऱ्यांनी मुस्लिम उपस्थितांना नमाज पठण (प्रार्थना) करण्याची व्यवस्था केली तेव्हा या कार्यक्रमामुळे बंधुत्वाची हृदयस्पर्शी प्रतिमा तयार झाली.
Post a Comment