जकात एक ईबादतच नसून आत्मशुद्धीचे साधनही...
भारताच्या दूर्गम भागात राहणाऱ्या गरीबांच्या चेहऱ्यावर स्मित पसरविण्यासाठी यातील राशीचा उपयोग केला जाईल.
जमाअते इस्लामी हिंद तर्फे मुस्लिमांमधील व्याप्त गरीबी सांघिक प्रयत्नांतून दूर करण्यासाठी आणि समाजामध्ये आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी एक धर्मार्थ संघटन जकात सेंटर ऑफ इंडियाच्या नावे उभे करण्यात आले असून, ज्याचे उद्घाटन नवीन दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजामध्ये जकात संकलन आणि वितरणाची सामुहिक व्यवस्था कशी असावी या बाबतीत संवेदनशीलता आणि जागरूकता वाढविण्याची गरज आहे. जकात एक ईबादतच नसून आत्मशुद्धीचे साधनही आहे. जकात सेंटर इंडियाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभापैकी जकात एक स्तंभ असून, यासंबंधीची सर्व माहिती तपशीलासह या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गरजवंतांची मदत करणे सधन मुस्लिमांचे धार्मिक कर्तव्य आहे. यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष आणि जकात सेंटर इंडियाचे चेअरमन एस.अमिनअल हसन यांनी या सेंटरचा उद्देश सांगितला. तसेच यात जमा होणाऱ्या जकातीच्या पैशाच्या बाबतीत पूर्ण पारदर्शिता बाळगली जाईल आणि जबाबदारीने काम केले जाईल.ुुु.ूरज्ञरींलशपींशीळपवळर.ेीस या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने गेटवे प्रक्रियेअंतर्गत नागरिकांना आपली जकात जमा करता येईल. यात सवलत व्हावी म्हणून क्यूआर कोडचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी या केंद्राचे सदस्य डॉ. मोहियोद्दीन गाझी यांनी जकात व्यवस्थेसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. जकात सेंटर इंडियाच्या संकेतस्थळामध्ये जकात काय आहे? ती कोणावर अनिवार्य आहे? त्यास घेणारे पात्र कोण आहेत? जकात कशी मोजावी? या संबंधीचे सविस्तर विवरण संकेतस्थळावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
या सेंटरचा उद्देश्य असाही आहे की, भारताच्या दूर्गम भागात राहणाऱ्या गरीबांच्या चेहऱ्यावर स्मित पसरविण्यासाठी यातील राशीचा उपयोग केला जाईल. या संकेतस्थळामार्फत होणाऱ्या रकमेतून गरीबीमुक्त आणि आत्मनिर्भर समाज तयार करण्याचा सामुहिक प्रयत्न अपेक्षित आहे. जकात केंद्र भारताचे सचिव अब्दुल जब्बार सिद्दीकी यांनी या केंद्राच्या पाच उद्देशांना स्पष्ट करतांना सांगितले की, 1. लोकांमध्ये जकातीचे धार्मिक महत्त्व आणि त्यापासून होणारे सामाजिक लाभ तसेच श्रीमंतांकडून गरीबांकडे संपत्ती स्थानांतरित करण्याच्या लाभांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल.
कुरआनच्या निर्देशानुसार गरीब आणि गरजवंतांमध्ये जकात आणि उश्र कार्यक्रम आयोजित केले जातील. 3. पात्र गरीबांच्या कल्याणासाठी पेन्शन, राशन, भोजन, चिकित्सा, शिष्यवृत्तीसाठी सहाय्यता प्रदान केली जाईल. 4. जकात घेण्यास पात्र असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन करून त्यांना चालना दिली जाईल. 5. नवनवीन विधी आणि रणनिती तयार करण्यासाठी संशोधन आणि वैज्ञानिक गतीविधींचे आयोजन करून प्रभावी वित्त पोषण करण्यात मदत केली जाऊ शकेल.
www.zakatcenterindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने गेटवे प्रक्रियेअंतर्गत नागरिकांना आपली जकात जमा करता येईल.
Post a Comment