Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१६५) हे सर्व पैगंबर शुभवार्ता देणारे व भय दाखवणारे म्हणून पाठविले होते२०७ की त्यांना पाठविल्यानंतर लोकांजवळ अल्लाहविरूद्ध कोणतेही प्रमाण राहू नये.२०८ आणि अल्लाह सर्व  परिस्थितीत वर्चस्व बाळगणारा व बुद्धिमान व विवेकशील आहे.
(१६६) (लोक मानत नाहीत तर न मानोत) परंतु अल्लाह ग्वाही देतो की हे नबी (स.)! जे काही त्याने तुमच्यावर अवतरले आहे आपल्या ज्ञानाने अवतरले आहे, यावर ईशदूतदेखील  साक्षी आहेत यद्यपि अल्लाह साक्षी असणे सर्वथा पुरेसे आहे.
(१६७) जे लोक त्याला मानण्यास स्वत: नकार देतात व इतरांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात, नि:संशय ते पथभ्रष्टतेत सत्यापासून फारच दूर गेले आहेत.
(१६८,१६९) अशाप्रकारे ज्या लोकांनी अश्रद्धा व विद्रोहाची पद्धत अवलंबिली आणि जुलूम,अन्याय व अत्याचारास प्रवृत्त झाले, अल्लाह त्यांना मुळीच क्षमा करणार नाही आणि त्यांना  कोणताच मार्ग नरकाच्या मार्गाशिवाय दाखविणार नाही, ज्यामध्ये ते सदैव राहतील. अल्लाहसाठी हे काही अवघड कार्य नाही.
(१७०) लोकहो! हा पैगंबर तुमच्याजवळ तुमच्या पालनकत्र्याकडून सत्य घेऊन आला आहे. श्रद्धा ठेवा, तुमच्यासाठीच उत्तम आहे, आणि नकार देत असाल तर लक्षात ठेवा आकाशांत व  पृथ्वीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचे आहे२०९ आणि अल्लाह सर्वज्ञदेखील आहे व बुद्धिमानसुद्धा.२१०
(१७१) हे ग्रंथधारकांनो! आपल्या धर्मात अतिशयोक्ति करू नका.२११ आणि अल्लाहशी सत्याखेरीज इतर कोणतीही गोष्ट जोडू नका. मरयमपुत्र इसा मसीह याव्यतिरिक्त इतर काहीच  नव्हता की तो अल्लाहचा एक पैगंबर होता.२१२ आणि एक आदेश होता की जो अल्लाहने मरयमकडे पाठविला.२०७) म्हणजे या सर्वांचे एकच काम होते आणि ते म्हणजे ज्या लोकांनी अल्लाहच्या पाठविलेल्या शिकवणीवर ईमान आणले आणि आपले आचरण त्यानुसार दुरुस्त केले तर त्यांना  शुभसूचना द्यावी की ते सफल आणि सौभाग्यपूर्ण आहेत. जे चुकीच्या मार्गावर चालत राहिले म्हणजे चुकीचा विचार आणि आचारावर जीवनव्यवहार करीत राहिले त्यांना वाईट  शेवटाविषयी सावध केले जावे.
२०८) म्हणजे या सर्व पैगंबरांना पाठविण्याचा उद्देश एकच होता आणि तो म्हणजे मानवजातीसमोर अल्लाह आपले म्हणणे स्पष्टत: सांगू इच्छित होता जेणेकरून परलोकांत मार्गभ्रष्ट  लोकांनी बहाणा करू नये, की आम्ही जाणत नव्हतो. तसेच तुम्ही सत्य जाणून घेण्यासाठीची कोणतीच व्यवस्था जगात केली नव्हती. याच एकमेव उद्देशासाठी अल्लाहने जगात विभिन्न   भागांत पैगंबर पाठविले आणि ग्रंथ अवतरित केले. या पैगंबरांनी मानवजातीच्या मोठ्या भागापर्यंत सत्यज्ञान पोहोच केले आणि आपल्या मागे ग्रंथ सोडून गेले. त्या ईशग्रंथांपैकी कोणते  न कोणते ग्रंथ प्रत्येक युगात मानवाच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध होते. आता अशा स्थितीत कोणी मार्गभ्रष्ट बनतो तर याचे दोषारोपण तो अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर करूच  शकत नाही. तो मनुष्य स्वत: दोषी ठरतो कारण त्याच्याकडे ईशसंदेश पोहचला होता आणि त्याने त्याला स्वीकारले नाही किंवा दोषी ते लोक ठरतात ज्यांना सरळमार्ग (अल्लाहने  दाखविलेली जीवनपद्धती) माहीत होता. परंतु त्यांनी अल्लाहच्या दासांना मार्गभ्रष्टतेत लथपत होतांना पाहिले होते तरी त्यांना सावध केले नाही.
२०९) म्हणजे पृथ्वी व आकाशांच्या स्वामीची अवज्ञा करून तुम्ही त्याला काहीच हानी पोहचवू शकत नाही. नुकसान जे काही होईल ते तुमचेच होईल.
२१०) म्हणजे तुमचा अल्लाह बेखबर नाही की त्याच्या राज्यात राहून तुम्ही अपराध करावेत आणि त्याला माहीत होऊ नये. अल्लाह तर आपल्या आदेशांची अवज्ञा करणाऱ्यांचा बंदोबस्त करतो.
२११) येथे ग्रंथधारकांशी अभिप्रेत खिस्ती आहेत आणि `गुलु'चा अर्थ होतो एखाद्या गोष्टीच्या समर्थनात मर्यादेचे पालन न करणे. यहुदी लोकांचा अपराध होता की ते इसा (अ.) यांच्या  विरोधात आणि नाकारण्यात मर्यादेला पार करून गेले. खिस्ती लोकांचा अपराध आहे की त्यांनी इसा (अ.) यांच्या श्रद्धेपोटी आणि प्रेमापोटी मर्यादांचे उल्लंघन केले आणि पैगंबर इसा  (अ.) यांना खुदाचा बेटा तसेच स्वयं खुदा ठरवून टाकले.
२१२) मूळ शब्द `कलिमा' आहे. मरयमकडे कलिमा पाठविण्याचा अर्थ आहे की अल्लाहने आदरणीय मरयम (अ.) यांच्या गर्भाशयावर (रहम) हा फर्मान अवतरित केला की तू गर्भधारणा   करून घे. खिस्ती लोकांना प्रारंभी पैगंबर इसा (अ.) बापाविना जन्माला येण्याचे हेच रहस्य सांगितले गेले होते. परंतु त्यांनी युनानी तत्त्वज्ञानामुळे मार्गभ्रष्ट होऊन प्रथमत: शब्द  `कलिमा' यास `वाक्य' अथवा `बोल'च्या समानार्थी समजून घेतले (Logos) नंतर या कलाम व वाणीशी अभिप्रेत अल्लाहच्या वैयक्तिक कलामच्या गुणाचा अर्थ काढला. नंतर त्यांनी विचार  केला की अल्लाहच्या या वैयक्तिक गुणाने आदरणीय मरयम (अ.) यांच्या गर्भात प्रवेश करून ते शारीरिक रूप धारण केले जे इसा (अ.) च्या रूपात प्रकट झाले. अशाप्रकारे खिस्ती  लोकांत पैगंबर इसा (अ.) खुदा असण्याची विकृत धारणा निर्माण झाली आणि या चुकीच्या विचाराने आपला पाया घट्ट केला की खुदाने स्वत: आपल्याला किंवा आपल्या अनादिकालिक  गुणांपैकी किंवा वाणी अथवा कलामच्या गुणांना मसीह (इसा (अ.)) च्या रूपात प्रकट केले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget