जालना (अ.क.सेवा)
जमाअते इस्लामी हिंद जालना आणि एसआयओ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मौलाना बशीर अहेमद राही, प्रा. वाजीद अली खान, महाराष्ट्र प्रदेश सचिव एसआयओ शेख जावेद अहेमद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली. त्यानंतर इस्लामचा संदेश कुरआनच्या मार्गदर्शनाच्या आधारे, पैगंबरांनी ईश्वरी संदेश देण्यासाठी केलेले प्रयत्न, इस्लामचा संदेश, त्याचा अर्थ, अपेक्षा आणि संधी. इस्लामचा संदेश पोहोचवताना आलेले सुंदर अनुभव या विषयावर भाषणे झाली.

Post a Comment