(१७१) ...आणि एक आत्मा होता अल्लाहकडून२१३ (ज्याने मरयमच्या गर्भात मुलाचे रूप धारण केले) म्हणून तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवा२१४ आणि असे म्हणू नका की, ‘‘तीन’’ आहेत.२१५ परावृत्त व्हा, हे तुमच्याच हिताचे आहे. अल्लाह तर फक्त एकच ईश्वर आहे. तो पवित्र आहे यापासून की त्याचा कोणी पुत्र असावा.२१६ पृथ्वी व आकाशांतील साऱ्या वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत,२१७ आणि त्यांच्या पालनासाठी व देखरेखीसाठी केवळ तोच पुरेसा आहे.२१८
२१३) येथे स्वत: पैगंबर इसा (अ.) यांना `रूहूम मिन्हु' (अल्लाहकडून एक रूह (आत्मा)) म्हटले आहे. सूरह २ (अल्बकरा) मध्ये याविषयी आले आहे, ``अय्यदनाहु बिरूहील कुद्स'' (आम्ही पवित्र आत्म्याने इसा (अ.) यांची मदत केली) दोन्ही वाक्यांचा अर्थ होतो की अल्लाहने इसा (अ.) यांना पवित्र आत्मा प्रदान केला होता ज्यास दुष्टता शिवू शकत नव्हती. (स्पर्श करू शकत नव्हती) सर्वथा सत्य आणि सत्यवादिता होती. पूर्णत: नैतिक श्रेष्ठता होती. हेच वैशिष्ट्य पैगंबर इसा (अ.) यांच्या अनुयायांना दाखविण्यात आले होते. परंतु त्यांनी (खिस्ती लोकांनी) यातसुद्धा अतिशयोक्ती केली. `रुहुम-मिनल्लाही' (अल्लाहकडून एक आत्मा) याला ठीक `रूहुल्लाह' (अल्लाहचा आत्मा) बनवून टाकला. आणि `रूहुल कुद्दुस' (पवित्र आत्मा) Holy Ghost चा अर्थ लावला की तो अल्लाहचा पवित्र आत्मा होता जो इसा (अ.) म्हणजे मसीहच्या आत प्रविष्ट झाला होता. अशाप्रकारे अल्लाह आणि मसीह इसा (अ.) यांच्या बरोबरीने एक तिसरा ईश्वर (खुदा) `रूहुल कुद्दुस' (पवित्र आत्मा) बनवून टाकला.
२१४) म्हणजे अल्लाहला आपला एकमेव उपास्य माना आणि सर्व पैगंबरांच्या पैगंबरत्वाला स्वीकारा ज्यांच्यापैकी एक पैगंबर इसा (अ.)सुध्दा आहेत. हीच आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांची खरी शिकवण होती आणि हेच सत्य आहे ज्यास इसा (अ.) यांच्या सच्च्या अनुयायांनी मान्य केले पाहिजे.
२१५) म्हणजे तीन देवांच्या (त्रिदेव, ट्रीनिटी) च्या श्रद्धेचा त्याग करा, मग तो कोणत्याही रूपात तुमच्या मनात घर करून बसलेला का असेना. सत्य हेच आहे की खिश्चन लोक एकाच वेळी एकेश्वरत्वाला (तौहिद) मानतात आणि त्रिदेववादाला (Trinity) सुद्धा मानतात. आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांचे स्पष्ट कथन जे बायबलमध्ये आहेत, त्यांच्या आधारावर कोणी इसाई (खिस्ती) याला नाकारू शकत नाही की खुदा एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी खुदा नाही. त्यांच्यासाठी हे मान्य करण्याऐवजी दुसरा कोणताच मार्ग नाही की एकेश्वरत्वच (तौहिद) खरा जीवनधर्म आहे. परंतु जो एक भ्रम त्यांना प्रारंभी झाला होता, की अल्लाहचा `कलाम' इसा (अ.) च्या रूपात प्रकट झाला आणि अल्लाहचा आत्मा त्यात समाविष्ट झाला. यामुळे खिस्ती लोकांनी मसीह (इसा) आणि पवित्र आत्मा (रुहूल कुद्दुस) यांच्या प्रभुतेलासुद्धा समस्त जगाच्या खुदा, प्रभुच्या बरोबर मान्य करून अकारण आपल्या स्वत:वर अनिवार्य करून ठेवले. या बळजबरीच्या अनिवार्यतेमुळे त्यांच्यासाठी ही न सुटणारी समस्या बनली, की त्यांनी एकेश्वरत्वाच्या विचारसरणीसह त्रिदेव धारणेला आणि त्रिदेव (Trinity) धारणेसह एकेश्वरत्वाच्या धारणेला कशाप्रकारे आबाधित ठेवावे.
२१६) हे खिस्ती लोकांच्या चौथ्या अत्युक्ती (गुलू) चे खंडन आहे. खिस्ती कथने जर खरी असली तरी त्यातून (मुख्यत: पहिल्या तीन इंजिलांपासून-बायबल-) अधिकतर हेच सिद्ध होते की इसा (अ.) यांनी अल्लाह आणि दासांच्या संबंधांना पिता आणि संतानच्या संबंधाची उपमा दिली होती. पिता हा शब्द अल्लाहसाठी केवळ रूपकाच्या स्वरुपात वापरत असत. ही विशेषता एक त्या इसा (अ.) यांचीच नाही तर प्राचीन काळापासून बनीइस्राईल (यहुदी) अल्लाहसाठी पिताचा शब्द प्रयोग करत आले आहेत आणि याची अनेक उदाहरणे बायबल (जुना करार) मध्ये उपलब्ध आहेत. मसीह इसा (अ.) यांनी बोली भाषेनुसार हा शब्द वापरला होता. इसा (अ.) अल्लाहला केवळ स्वत:चाच नव्हे तर समस्त मानवजातीचा बाप म्हणत असत. परंतु खिस्ती (इसाई) लोकांनी येथे पुन्हा अत्युक्तीने (गुलु) काम घेऊन इसा (अ.) यांना अल्लाहचा एकुलता एक पुत्र ठरविले. यांचा विचित्र दृष्टिकोन या संदर्भात आहे की इसा मसीह अल्लाहचे प्रत्यक्ष रूप आहे आणि अल्लाहच्या `कलाम' अल्लाहच्या आत्माचा सशरीर प्रकटरूप आहे. म्हणून तो अल्लाहचा एकुलता एक पुत्र आहे. अल्लाहने आपल्या एकुलत्या पुत्राला पृथ्वीवर यासाठी पाठविले की, मनुष्यजातीचे अपराध आपल्या माथी घेऊन सूळावर चढावे. तसेच आपल्या रक्ताने मनुष्यजातीच्या अपराधांचे प्रायश्चित (कफ्फारा) भोगावे. याविषयीचे कोणतेच प्रमाण इसा (अ.) यांच्या कथनांद्वारे ते देऊ शकत नाहीत. ही श्रद्धा खिस्ती लोकांच्या स्वत:च्या विचारसरणीचे फलित आहे आणि त्या अत्युक्तीचा परिणाम आहे की आपल्या पैगंबराच्या (इसा (अ.) यांच्या) महान व्यक्तित्वाने खिस्ती बांधव प्रभावित होऊन अत्युक्तीत पडले. अल्लाहने येथे `प्रायश्चित' च्या श्रद्धेचे खंडन केलेले नाही. कारण खिस्तींच्या जवळ ही काही स्थायी श्रद्धा नाही. इसा मसीह (अ.) यांना अल्लाहचा पुत्र बनविण्याचा परिणाम आणि या प्रश्नाचे सूफी मतानुसार मिळणारे दार्शनिक उत्तर असे आहे की जेव्हा इसा मसीह (अ.) अल्लाहचे एकुलते एक पुत्र होते तर सूळीवर चढून त्यांनी धिक्कारित मृत्यू का पत्करला? म्हणजे वरील श्रद्धेचे आपोआप खंडन होते जर इसा (अ.) हे अल्लाहचे पुत्र असल्याचे खंडन केले आणि या भ्रमाला नष्ट केले की इसा (अ.) यांना सुळीवर चढविले गेले होते.
२१७) म्हणजे जमिनीत व आकाशांतील निर्मितीपैकी कोणाशीही अल्लाहचा संबंध पितापुत्राचा नाही तर फक्त निर्माता आणि निर्मितीचा संबंध आहे.
२१८) म्हणजे अल्लाह आपल्या सृष्टीची व्यवस्था करण्यासाठी समर्थ आहे. त्याला दुसऱ्या कोणाची मदत घेण्याची गरज नाही किंवा कोणाला आपला मुलगा बनवावा.
Post a Comment