Halloween Costume ideas 2015

पैगंबरांवर ईमान : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे माननीय उमर (रजि.) आले आणि म्हणाले, ‘‘आम्हाला यहुद्यांच्या (ज्यूंच्या) काही गोष्टी योग्य वाटतात,  यावर आपले काय मत आहे? त्यापैकी काही गोष्टी आम्ही लिहून घ्याव्यात काय?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जसे ज्यू आणि खिश्चन लोक आपले ग्रंथ सोडून खड्ड्यात पडले  तसे तुम्हीदेखील मार्गभ्रष्टतेच्या खड्ड्यात पडू इच्छिता? मी तुमच्याजवळ तो धार्मिक कायदा आणला आहे जो सूर्यासम प्रकाशमान आणि आरशासम स्पष्ट आहे आणि जर आज मूसा  (अ.) जिवंत असते तर त्यांनादेखील माझे आज्ञापालन करावे लागले असते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान बाळगल्यानंतर आवश्यक आहे की मनुष्याने आपली इच्छा, आपली आकांक्षा आणि आपल्या मनोकामनांना पैगंबरांनी आणलेल्या उपदेशाच्या अधीन करावी, पवित्र कुरआनच्या हातात आपल्या इच्छेची लगाम द्यावी, असे न केल्यास पैगंबरांवर ईमान बाळगण्यास काहीही अर्थ उरत नाही.

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य मोमिन (ईमानधारक) होऊ शकत नाही जोपर्यंत मी त्याच्या दृष्टीने  त्याचा पिता, त्याचा पुत्र आणि सर्व मानवांपेक्षा अधिक प्रिय होत नाही.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की मनुष्य मोमिन तेव्हाच बनतो जेव्हा पैगंबर आणि त्यांनी आणलेल्या ‘दीन’ (जीवनधर्म) वरील आस्था इतर सर्व आस्थांपेक्षा  अधिक असेल. पुत्राचे प्रेम वेगळ्याच मार्गावर जाण्यास सांगते, पित्याचे प्रेम वेगळ्या मार्गावर जाण्यास सांगते आणि पैगंबर मुहम्मद (स.) दुसऱ्या मार्गावर चालण्यास सांगतात. मग  जेव्हा मनुष्य सर्व आस्थांना अमान्य करून फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यास तयार होतो तेव्हा समजा की तो सच्चा मोमिन (ईमानधारक) आहे, पैगंबरांवर प्रेम करणारा  आहे. असाच मनुष्य इस्लामला हवा आहे आणि असेच लोक जगाचा इतिहास घडवितात. अपूर्ण ईमान पत्नी व मुले आणि पिता व भावाच्या प्रेमांवर कात्री कशी चालवू शकेल!

माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वुजू केली (हात-पाय-तोंड धुवून शुचिर्भूत होणे) तेव्हा पैगंबरांचे काही सहकारी  पैगंबरांच्या वुजूचे पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावरून फिरवू लागले, तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही असे करण्यास उद्युक्त झालात?’’ लोकांनी म्हटले, ‘‘अल्लाह  आणि त्याच्या पैगंबरावरील प्रेम.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर प्रेम करण्याने जे खूश होतात त्या लोकांनी सत्य बोलावे आणि जेव्हा त्यांच्या ठेवण्यात आलेली  ठेव सुरक्षितपणे तिच्या मालकाला परत करावी आणि शेजाऱ्यांशी सद्व्यवहार करावा.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वुजूचे पाणी घेऊन पवित्रतेसाठी आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर मळणे पैगंबरांवरील प्रेमापोटी होते. हे काही वाईट कृत्य नसल्यामुळे पैगंबरांनी त्यांच्यावर रागावण्याचा प्रश्नच नाही. पैगंबरांनी त्यांना सांगितले की प्रेमाचे श्रेष्ठत्व यात आहे की अल्लाह आणि पैगंबरांनी जे आदेश दिले आहेत त्यांच्या अवलंब करावा. पैगंबरांनी जो जीवनधर्म  सांगितला आहे त्यास आपल्या जीवनाचा धर्म बनवावा. पैगंबरांचे आज्ञापालन करणे पैगंबरांवरील प्रेमाचे सर्वांत उच्च स्थान आहे, अट एवढीच की ते पैगंबरांशी अतीव आसक्तीसह करावे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget