Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१५६) मग आपल्या कुफ्र -अधर्मा अश्रद्धेमध्ये१८९ हे इतके पुढे गेले की मरयमवर भयंकर आळ घेतला.१९०
(१५७) आणि खुद्द सांगितले की आम्ही पैगंबर मसीह मरयमपुत्र इसा (अ.) याला ठार केले आहे.१९१ खरे पाहता१९२ प्रत्यक्षात यांनी त्याला ठारही केले नाही की व्रुâसावरदेखील चढवले  नाही, परंतु मामला यांच्याकरिता संदिग्ध बनविण्यात आला.१९३ आणि ज्या लोकांनी यासंबंधी मतभेद दर्शविले आहेत तेदेखील खरे पाहाता शंकेत  गुरफटले आहेत. यांच्याजवळ या  मामल्यासंबंधी काहीच ज्ञान नाही, केवळ अनुमानाचे अनुसरण आहे.१९४ त्यांनी ‘मसीह’ला खचितच ठार केलेले नाही.


१८९) हे वाक्य व्याख्यानाच्या मूळ विषयांशी संबंधित आहे.
१९०) आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांच्या जन्माचा प्रसंग यहुदी लोकांत अगदी परिचित होता. ते ज्या दिवशी जन्माला आले त्याच दिवशी अल्लाहने सर्व यहुदी लोकांना यावर साक्षी  बनविले की हे एक असाधारण व्यक्तित्वाचे बाळ आहे. या बाळाचा जन्म एक चमत्कार आहे. एक नैतिक अपराधाचा तो परिणाम मुळीच नाही. (याचा स्पष्ट पुरावा पाळण्यातच  शिशुच्या तोंडाने वदवून दिला गेला होता) त्या बालकाने उंच व स्पष्ट आवाजात लोकांना संबोधित केले, ``मी अल्लाहचा दास आहे. अल्लाहने मला ग्रंथ दिला आहे आणि पैगंबर बनवून  पाठविले आहे.'' (कुरआन १९ : ३०) याचमुळे आदरणीय पैगंबर इसा (अ.) तारुण्यावस्थेत पोहचेपर्यंत कोणीही आदरणीय मरयम यांच्यावर व्यभिचाराचे लांछन लावले नाही किंवा इसा  (अ.) यांनासुद्धा लांछित केले नाही.परंतु वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी पैगंबरत्वाच्या कामाचा शुभारंभ केला आणि यहुदींच्या दुष्कर्मांची निंदा करण्यास सुरवात केली. तेव्हा इसा (अ.) यांनी यहुदींच्या धार्मिक विद्वानांना आणि धर्मशास्त्रींना त्यांच्या पाखंडीपणाबद्दल धारेवर धरले. जनसामान्यांत आणि विशिष्ट जनांत जो दुराचार माजला होता त्यावर कडाडून हल्ला  चढविला. आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांनी लोकांना अल्लाहने दिलेल्या जीवनपद्धतीला वैयक्तिक आणि समाजजीवन व्यवहारात स्थापित करण्याचे आवाहन केले. हा मार्ग संकटांनी व त्यागाने भरलेला मार्ग होता. म्हणून हे धूर्त अपराधी लोक सत्याला दडपण्यासाठी षड्यंत्र रचू लागले. याच वेळी त्यांनी हे सांगितले की जे तीस वर्षापर्यंत सांगितले नव्हते, की आदरणीय  मरयम (अ.) व्यभिचारिणी आहे (अल्लाहचा आश्रय) आणि तिचा हा मुलगा व्यभिचारिणीची औलाद आहे. परंतु हे धूर्त अन्यायी पूर्णता जाणून होते की हे दोन्ही माता-पुत्र या घाणीपासून  पवित्र आहेत. त्यांची ही लांछनास्पद कृती वास्तविकतेवर आधारित नव्हती; हे त्यांनाही स्पष्ट माहीत होते. हे त्यांनी फक्त सत्याच्या विरोधात रचलेले एक कुभांड होते. म्हणून  अल्लाहने या लांछनास्पद कृतीला अन्याय किंवा असत्याऐवजी `कुफ्र' (अधर्म) म्हटले आहे. कारण या कुभांडाने त्या यहुदी धर्मशास्त्री आणि विद्वानांचा मूळ उद्देश तर अल्लाहच्या  धर्माचा मार्ग थोपणे होता. एका निर्दोष स्त्रीला बदनाम करण्याच्या उद्देश नव्हता.
१९१) म्हणजे अपराधी प्रवृत्ती इतकी वाढली होती की पैगंबरांना पैगंबर म्हणून जाणत होते तरी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला आणि गर्वाने म्हणू लागले की आम्ही अल्लाहच्या पैगंबराची  हत्या केली आहे. वर पाळण्याचा प्रसंगाचा उल्लेख आला आहे. त्यावरून हेच कळते की यहुदी लोकांना इसा (अ.) यांचे पैगंबरत्व मान्य करण्यास काही एक शंका नव्हती. तसेच इसा  (अ.) यांनी अनेक स्पष्ट चमत्कारसुद्धा लोकांना दाखविले होते. (कुरआन ३ : ४९) त्यावरून तर हे नि:संदेह स्पष्ट झाले होते की इसा (अ.) अल्लाहचे पैगंबर आहे. म्हणून हे स्पष्ट होते   की यहुदी लोकांनी जे काही इसा (अ.) यांच्याशी (केले ते अल्लाहचे पैगंबर आहे, हे माहीत होते म्हणूनच केले.) प्रत्यक्षात हे विचित्र वाटते की लोकांना माहीत होते की इसा (अ.)  अल्लाहचे पैगंबर आहेत आणि तरी त्यांची हत्या करावी? खरे तर अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राष्ट्राचे हे एक लक्षण आहे. ते आपल्यात अशा व्यक्तीला सहन करूच शकत नाही, जो  त्यांना वाईटांपासून रोखतो आणि दुराचारापासून परावृत्त करून सदाचाराकडे बोलवितो. असे लोक मग ते पैगंबर जरी असले तरी दुष्ट लोकांनी त्यांना कैदेत तरी डांबले होते किंवा त्यांना  ठार केले होते. (यहुदी लोकांचा इतिहास अशा कुप्रसिद्ध घटनांनी भरलेला आहे)
१९२) या आयतमध्ये पुन्हा संदर्भविरहीत वर्णन आले आहे.
१९३) या आयतने स्पष्ट होते की आदरणीय पैगंबर इसा मसीह (अ.) फासावर चढविण्याअगोदर उचलून घेतले गेले. यहुदी आणि खिस्ती लोकांचा हा विचार की इसा मसीह (अ.) यांना  फासी दिली गेली, ही एक भ्रामक आणि खोटी गोष्ट आहे. कुरआन आणि बायबलचा तुलनात्मक अध्ययन केल्याने कळून येते की पेलातुशच्या न्यायलयात पैगंबर इसा मसीह (अ.) हे  हजर झाले होते. परंतु जेव्हा पेलातुश (न्यायाधीश) ने मृत्यूदंड दिला तेव्हा यहुदी लोकांनी इसा (अ.) सारख्या पवित्र अंत:करणाच्या मानवाच्या तुलनेत एक `दस्यु'च्या प्राणाला मूल्यवान  ठरविले. अशाप्रकारे त्यांनी आपल्या असत्यावादावर अंतिम मोहर लावली तेव्हा अल्लाहने इसा (अ.) यांना आकाशात उचलून नेले. नंतर यहुदी लोकांनी ज्या माणसाला सुळावर चढविले  तो दुसरा कोणीतरी होता. त्यालाच त्यांनी मरयम यांचा पुत्र समजले होते. आता दुसऱ्याला सूळावर चढविण्यात लोकांना संभ्रमावस्थेत का पाडले याचा माहितीस्त्रोत उपलब्ध नाही. तसेच  यहुदी लोक समजून का बसले की त्यांनी इसा (अ.) यांनाच सूळावर चढविले आहे जेव्हा मरयम (अ.) यांचे पुत्र इसा (अ.) त्यांच्या हातून केव्हाच निसटले होते!
१९४) `मतभेद करणारे' म्हणजे खिस्ती लोक आहेत. त्यांच्यामध्ये पैगंबर इसा (अ.) यांना सूळावर चढविण्याविषयी असे एक निश्चित कथन नाही ज्यावर सर्वजण सहमत होतील. अनेक   कथनं याविषयीची आहेत. म्हणूनच खरी सत्यता या खिस्ती जणांसाठीही संदिग्ध गोष्ट बनून राहिली आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget