Halloween Costume ideas 2015

हजयात्रेकरूंसाठी बार्शी टाकळीत प्रशिक्षण शिबीर

बार्शीटाकळी (नाजीम खान)
इस्लाम धर्माच्या मुख्य पाच स्तंभापैकी हजयात्रा एक आहे. आर्थिक ऐपत असणाऱ्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर हजयात्रा अनिवार्य आहे. मात्र हजदरम्यान करण्यात येत असलेल्या   विधींची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आपल्याकडील हजयात्रेकरूंना याची इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी बार्शी टाकळी येथे जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
यावेळी काशिफ अहमद, अब्दुल सुबुर सर ,अजीम फलाही, मौलवी मुजफ्फर यांची आदींचे यावेळी मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाची सुरूवात मुबश्शीर खान यांनी कुरआन पठणद्वारे केली.  मौलवी मुजफ्फर म्हणाले, हज यात्रेला जाण्यापूर्वी तुमच्यावर जर कोणाचा हक असेल किंवा तुमच्याकडे कोणाची ठेव (अमानत) असेल तर ते त्याला परत करून जा. वैध संपत्तीतूनच  प्रत्येकाने हजयात्रा करावी. त्यामुळे फलनिष्पती होते. हजदरम्यान प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.मुदस्सर खान मुनज्जीर अली खान  नसरुल्ला खान, नदीम सर जावेद सर,रिझवान काझी, मुदस्सीर अली खान,मोईज भाई शाकीर हरूनी, असलम भाई, ताहीर भाई, जाकीर भाई आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समद  इमाम साहब यांनी केले. आभार जमात ए इस्लामी हिंद बार्शिटाकळीचे अध्यक्ष डॉ. मुदस्सीर खान यांनी मानले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget