लातूर शहरातील एका 56 वर्षीय महिलेने 70 वर्षीय पती रशीद शेख यांनी एका दमात तीन तलाक दिल्याचा गुन्हा भारतीय दंड सहिता 1860 अंतर्गत 498 ए, 323, 504, 506 आणि मुस्लिम महिला (विवाह हक्काचे संरक्षण) वटहुकूम 2018 (4) अन्वये विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर येथे नोंद केला होता. यावर पती रशीद शेख यांनी अॅड. एस.एम.कोतवाल यांच्या मार्फत न्यायालयात आपले म्हणणे मांडले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण आरोपीला जामीन मंजूर केला. तीन तलाकचा कायदा अस्तित्वात आल्यापासून या घटनेतील आरोपीला जामीन मंजूर होण्याची पहिलीच घटना असल्याचे समोर आले आहे.
काय आहे तलाक?
अल्लाहला वैध बाबींमधील सगळ्यात नापसंद बाब तलाक आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीचे संबंध अतिशय टोकाला पोहोचले तर पुरूष आपल्या पत्नीला तलाक देऊ शकतो. तलाक दिल्यानंतर पत्नीला तिच्या मुदतीनंतर सन्मानासहित तिच्या माहेरी पाठविण्यास सांगितले आहे. मुलांच्या सांभाळाची सर्व जबाबदारी अल्लाहने पुरूषांवर दिलेली आहे. तसेच पुरूषांकडून जर महिलेला त्रास होत असेल तर ती पुरूषाकडून ’खुला’ घेऊ शकते. त्याच्यापासून ती वेगळी होऊ शकते. अपवादात्मक स्थितीत तलाक आणि खुला ही पुरूष आणि स्त्री यांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. तलाक आणि खुलाची पद्धत अतिशय न्याय आहे. मात्र लोक त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे तलाकची प्रक्रिया जरी न्याय्य व खरी असली तरी लोकांच्या चुकीच्या वापरामुळे सरकारला याबाबत कडक कायदा करावा लागला. मात्र तो कायदा फायदा कमी आणि नुकसान अधिक करणारा ठरत आहे. सरकारने एका दमात तीन तलाक देणार्या पुरूषाला तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली.मात्र या कायद्याच्या तरतुदींचा काही महिलांकडून होणार्या संभाव्य गैरवापरावर सरकारने कुठलीही प्रतिबंधक तरतूद केली नाही.
अशीच तलाकच्या गैरवापराची घटना लातुरात घडली, असे प्रत्यक्षदर्शनी दिसून येते. अॅड. कोतवाल यांनी केलेला युक्तीवाद आणि न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे पाहून न्यायालयाने आरोपीला दिलेला जामीन यावरून पत्नीकडून तलाकचा गैरवापर झाल्याचे वाटते. अॅड. कोतवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
- बशीर शेख
Post a Comment