अन्नाला धर्म नसतो : झोमॅटो
अलिकडेच अन्न पुरवठ्याच्या क्षेत्रात प्रकाशझोतात आलेल्या झोमॅटो कंपनीचे जोरदार अभिनंदन होत आहे. कारणही मोठे मजेशीर आहे. प्रत्येक बाबतीत जातीयवादाच्या चष्म्याने पाहण्याची जी सवय मागच्या चार-पाच वर्षात काही लोकांना लागलेली आहे, त्याला बळी पडलेला एक तरूण पंडित अमित शुक्ला याने झोमॅटोवरून जेवणाची ऑनलाईन ऑर्डर दिली. जेवण घेऊन जेव्हा त्याच्याकडे मुस्लिम तरूण आला तेव्हा त्याने दिलेली ऑर्डर रद्द केली. तसा इशारा त्याने कंपनीला ट्विटरद्वारे दिला होता. हे माहित असूनही झोमॅटो कंपनीने शुक्ला याला जोरदार उत्तर देत म्हटले आहे की, ’फुड हॅज नो रिलीजन’ (अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो). झोमॅटोच्या या उत्तराचे सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे. दुःख या गोष्टीचे आहे की अल्पावधीतच पाहता-पाहता आपल्या देशाच्या तरूणांच्या डोक्यांचे कंडीशनिंग किती चुकीच्या पद्धतीने करण्यात काही शक्तींना यश आले आहे.
Post a Comment