Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्र एकवटला; माणुसकीचे दर्शन

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आदी भागात आलेल्या महापुरामुळे सर्वच क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. वित्तहानीचा तर आकडाच सांगता येत नाही. 50 पेक्षा अधिक  लोकांचा यात जीव गेला. शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. शेती, घरे, दुकाने वाहून गेली. आसमानी संकटातून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी  महाराष्ट्र एकवटल्याचे दिसून आले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सर्वधर्मीय नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी मोठी रक्कम आणि अनेक जीवनावश्यक वस्तू पाठविल्या. सोमवारी महाराष्ट्रात ईद उल अजहा सण होता. यावेळी   प्रत्येक शहर, गाव, व तालुक्यातील इदगाह मैदानात पूरग्रस्तांसाठी निधी जमा करून पाठविण्यात आला. कित्येक ठिकाणी नागरिकांनी ईद साजरी न करता कुर्बानीचे पैसे पूरग्रस्तांना  दिले. जमाअत-ए-इस्लामी हिंद, जमियते उलेमा हिंद आदी संघटनांनी समाजबांधवांना आवाहन करून निधी जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविला. जमाअते इस्लामी हिंदने निधीसोबत आपले स्वयंसेवकही राहत काम करण्यास पाठविले. तसेच आयडियएल रिलीफ विंग आणि मेडिकल सर्व्हीसेस आपली सेवा बजावत आहे. जीवनावश्यक वस्तू, जनावरांसाठी चारा आणि  रूग्णांसाठी मोफत औषधांची सोयही यामार्फत केली जात आहे.
शासनाचे वराती मागून निघालेले घोडे आणि जमावबंदी आदेशामुळे नागरिक आणि विरोधी पक्ष चांगलेच संतापले आहेत. राज्य सरकारला पूरपरिस्थिती हाताळण्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. सरकारच्या आपत्ती विभागापेक्षा राज्यभरातील सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी मैदानात उतरून मोठे काम केले. सरकारच्या एनडीआरएफ आणि अन्य संस्थाचेही  पुरग्रस्तांना व्यवस्थित ठिकाणी पोहोचविण्याचे कार्य वाखाणे जोगे होते. मात्र सरकारने सुरूवातीलाच पूरपरिस्थिती आढावा घेऊन काम सुरू केले असते तर नुकसानीचे हे दिवस पहावयास  मिळाले नसते.

पूरग्रस्तांसाठी विशेष प्रार्थना
सोमवारी ईद उल अजहा साजरी झाली. यावेळी राज्यभरातील प्रत्येक ईदगाह मैदान, मस्जिदमध्ये पूरग्रस्तांसाठी दुआ करण्यात आली. ऐ अल्लाह पूरग्रस्तांना धैर्य दे, त्यांची मदद करण्याची सर्वांना प्रेरणा दे. तूच तर आहेस ज्याच्याकडे सर्वच आस लावून पाहतात. तात्काळ पूरपरिस्थिती हटव आणि नैराश्य झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटू दे. अनेकांचे  यामध्ये जीव गेले. त्यांच्या परिजनांना धैर्य दे, शेकडो जनावरांचे प्राण गेले. त्या पशुपालकांच्या मालकांना आर्थिक मदत आणि धैर्य, लाखो हेक्टर्सवरील शेती बाधित झाली आहे. त्या  शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळू दे आदी प्रार्थना करतेवेळी वेळी नागरिक व उलेमांना अश्रू रोखता आले नाहीत. 

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget