नागपूर (डॉ. रशीद)
हज यात्रेपूर्वी शुद्ध मनाने आतापावेतो केलेल्या सर्व गुन्ह्यांची माफी अल्लाहकडे मागावी. हजला जाण्यापूर्वी कोणाचा हक्क अदा करावयाचा असल्यास तो अदा करून टाकावा. कोणाची काही चीज वस्तू अमानत असेल तर ती ज्याची त्याला परत करून टाकावी आणि हे सर्व झाल्यानंतर स्वतःच्या हलाल संपत्तीतून हज करावे. असे नाही झाले तर केलेला हज वाया जाईल, अल्लाहकडे तो हज कदापी स्वीकार्ह होणार नाही. एवढेच नव्हे तर शिर्क (अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही ईश समजणे), बहुदेववाद इत्यादीपासून स्वतः ला वाचविणे जरूरी आहे. नसता सर्व पुण्यकर्म वाया जातील, असे मत सुमैया समरीन यांनी हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसमोर व्यक्त केले.
त्या नागपूरच्या जाफर नगर टीचर्स कॉलनीमधील मर्कज मस्जीदच्या सभागृहामध्ये जमाअते इस्लामी हिंद नागपूर पश्चिमच्या महिला विभागाद्वारे आयोजित हज यात्रेवर जाणाऱ्या संमेलनात बोलत होत्या. जेबा खान यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment