Halloween Costume ideas 2015
July 2019

मा. इब्ने उमर (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘हृदयावरही गंज चढतो, ज्याप्रमाणे लोखंडाला पाण्याने गंज लागतो.’’ विचारले गेले की हृदयाला  लागलेला गंज दूर करणारी वस्तू कोणती? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हृदयाचा गंज अशाप्रकारे दूर होतो की माणसाने मृत्यूला अधिकाधिक स्मरणात राखावे आणि दूसरे हे  की कुरआनचे पठन करावे. (हदीस : मिश्कात)
भावार्थ- मृत्यूचे स्मरण करण्याचा अर्थ असा की माणसाने हा विचार करावा की जीवनाची ही संधी फक्त एकदाच लाभलेली संधी आहे. पुन्हा दुसऱ्यांदा कर्म करण्याची संधी लाभणार  नाही. कुरआन पठनाचा अर्थ, कुरआनातील शब्दांना योग्य ुच्चारांसह वाचणे, त्यात जे काही सांगितले गेले आहे, ते समजून घेणे व त्यास आचरणात आणणे. किंबहूना आणखी एका  अर्थाने येतो, म्हणजे हे की कुरआनचा प्रचार व प्रसार करावा. त्याला इतरांपर्यंत पोहोचवावे.

सदाचारपूर्ण वर्तन
मा. अबु ज़र ग़फ्फारी (र.) कथन करतात की, प्रेषित यांच्या सेवेत हजर होऊन मार्गदर्शनाची विनंती केली. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे भय बाळगून  सदाचारपूर्ण वर्तन अंगिकारा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण धर्मास आणि समस्त व्यवहारांना योग्य स्थितीत राखणारी आहे.’’ मी म्हणालो, आणखी काही सांगा. प्रेषित (स.) म्हणाले,  ‘‘स्वत:ला कुरआन पठण आणि प्रभावशाली अल्लाहच्या नाम:स्मरणाची सवय लावून घ्या. तेव्हा अल्लाह तुमचे आकाशात स्मरण करील आणि जीवनाच्या अंध:कारात तुमच्यासाठी  उजेडाचे काम देईल. (हदीस - मिश्कात)
भावार्थ- ‘‘अल्लाह स्मरण करील’’ याचा अर्थ अल्लाहला तुमचा विसर पडणार नाही. अल्लाह तुम्हाला आपल्या संरक्षणात राखील. अल्लाहचे स्मरण आणि कुरआन पठणाने  ईमानधारकाला प्रकाश प्राप्त होतो. जीवनाच्या अंध:कारात तो उचीत मार्ग प्राप्त करतो.

सर्वोत्तम सदका (दान)
मा. सराका बिन मालिक (र.) कथन करतात की, प्रषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘मी तुम्हाला सर्वोत्तम सदका (दान) कोणते ते सांगू? ती तुझी मुलगी होय. जी तुझ्या  जवळ फाठविली गेली आहे आणि तिला तुझ्याखेरीज दुसरा कोणी कमाविणारा, खाऊ घालणारा नाही.’’ (हदीस - इब्ने माजा) अर्थात अशी मुलगी जिच्या कुरुपतेमुळे किंवा एखाद्या  शारिरिक व्यंगदोषामुळे विवाह होत नाही किंवा विवाहानंतर तलाक (घटस्फोट) मिळाला. आणि तुमच्याखेरीज अन्य कोणी तिचे पोषण करणार नाही. तर अशा असहाय मुलीवर तुम्ही जे  काही खर्च कराल, तो अल्लाहच्या दृष्टीने सर्वोत्त सदका (दान) ठरेल.

विधवांना प्रेषितांचे सामीप्यमा. औफ बिन मालिक (र.) कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘मी (प्रेषितास) आणि करपलेल्या चेहऱ्याची (वैधव्याच्या संकटामुळे) स्त्री कयामतीच्या दिवशी या  दोन बोटाप्रमाणे असतील. (हे हदीस वचन कथन करताना, आपले मधले बोट आणि तर्जनीचे बोटाकेड इशारा केला). अर्थात ती स्त्री जिचा पती मृत्यू पावला आणि ती वांशिक प्रतिष्ठा  राखते ती स्वत: सौंदर्यवान ही आहे परंतु तिने आपल्या मृत पतीचा आपल्याखातीर स्वत:ला दुसरा निकाह करण्यापासून रोखून ठेवले.
भावार्थ- एखादी स्त्री विधवा झाली, पण त्याला लहान मुले असतील, लोक तिच्याशी विाह करण्यासही उत्सुक ही असतील परंतु ती आपल्या अनाथ मुलांच्या संगोपनाकरीता पुनर्विवाह न  करता, प्रतिष्ठा व सत्शीलतापूर्वक जीवन व्यतीत करते तर अशा स्त्रीला कयामतच्या दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे सामीप्य प्राप्त होईल.

(१३७) ज्यांनी श्रद्धा ठेवली, मग द्रोह केला, पुन्हा श्रद्धा ठेवली, पुन्हा द्रोह केला मग आपल्या विधर्मात (विद्रोहात) पुढे गेले१६८ तर अल्लाह त्यांना कस्रfप क्षमा करणार नाही. आणि  त्यांना कधी सरळ मार्गही दाखवणार नाही.
(१३८,१३९) आणि जे दांभिक ईमानधारकांना सोडून नाकारणाऱ्यांना आपला मित्र बनवितात, त्यांना ही शुभ सूचना द्या की त्यांच्याकरिता दु:खदायक शिक्षा तयार आहे. काय हे लोक  मानसन्मानाच्या इच्छेपायी त्यांच्याजवळ जातात?१६९ खरे पाहता मानसन्मान तर सर्वस्वी अल्लाहकरिताच आहे.
(१४०) अल्लाहने या ग्रंथात पूर्वीच तुम्हाला आदेश दिला आहे की जेथे तुम्ही ऐकाल की अल्लाहच्या वचनांविरूद्ध द्रोह केला जात आहे आणि त्यांची थट्टा केली जात आहे तेथे बसू नका,  जोपर्यंत ते लोक एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लागत नाहीत. आता जर तुम्ही असे करीत आहात तर तुम्हीदेखील त्या लोकांसारखे आहात.१७० खात्री बाळगा की अल्लाह दांभिकांना व  इन्कार करणाऱ्यांना नरकामध्ये एकत्र जमा करणारा आहे.
(१४१) हे दांभिक तुमच्या संबंधात प्रतीक्षा करीत आहेत (की उंट कोणत्या बाजूला बसतो). जर अल्लाहकडून विजय तुमचा झाला तर हे येऊन सांगतील की काय आम्ही तुमच्याबरोबर नव्हतो? जर इन्कारकरणाऱ्यांचा पारडे जड झाले तर त्यांना सांगतील की आम्ही तुमच्याविरूद्ध लढण्यास समर्थ नव्हतो काय, व तरीदेखील आम्ही तुम्हाला मुस्लिमांपासून वाचविले?१७१   बरे तर अल्लाहच तुमच्या आणि त्यांच्या मामल्याचा निर्णय कयामतच्या दिवशी करील आणि (त्या निर्णयात) अल्लाहने इन्कारकरणाऱ्यांसाठी मुस्लिमांवर वर्चस्व प्राप्त करण्याचा कोणताच वाव मुळीच ठेवला नाही.
(१४२) हे ढोंगी अल्लाहशी धोकेबाजी करीत आहेत, खरे पाहता तर अल्लाहनेच त्यांना फसवणुकीत टाकले आहे. जेव्हा हे नमाजसाठी उठतात तर आळसावलेले केवळ लोकांना  दर्शविण्यासाठी उठतात आणि अल्लाहचे क्वचितच स्मरण करतात.१७२ (१४३) कुफ्र आणि ईमान यांच्यामध्ये दोलायमान आहेत, धड या बाजूसही पूर्णत: नाहीत व धड पुरते त्या  बाजूसदेखील नाहीत. ज्याला अल्लाहने पथभ्रष्ट केले आहे त्यांच्याकरिता तुम्हाला कोणताही मार्ग सापडणार नाही.१७३


१६८) म्हणजे ते लोक ज्यांच्यासाठी धर्म म्हणजे चेष्टेचा विषय आहे. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे खेळणी आहे ज्याच्याशी ते आपल्या इच्छा-आकांक्षेने आणि विचाराने खेळत राहातात.  जेव्हा मनात लहर आली मुस्लिम बनले आणि जेव्हा दुसरी लहर आली तर विधर्मी बनून गेले. किंवा त्यांना मुस्लिम बनण्यात फायदा दिसू लागला तर त्वरित मुस्लिम बनून गेले.  कालांतराने दुसरीकडे मोठा स्वार्थ दिसू लागला तर त्याची पूजा करू लागले. अशा लोकांसाठी अल्लाहजवळ क्षमादान नाही की मार्गदर्शन. सांगितले गेले, ``मग आपल्या विधर्मात पुढे  गेले.'' याचा अर्थ आहे की एक मनुष्य विधर्मी बनून दुसऱ्यांनासुद्धा इस्लामपासून परावृत्त करतो. इस्लामविरुद्ध गुप्त् षड़यंत्र आणि जाहीररित्या उपायसुद्धा सांगत बसतो. आपले सामथ्र्य  यात खर्च करीत जातो की विधर्माचे वर्चस्व स्थापित व्हावे आणि इस्लामचा ध्वज झुकलेला राहावा. या नकारात (विधर्म) आणखी अधिक प्रगती आणि अपराधांवर अपराध करीत जाणे  आहे, याचा विनाश अत्यंत भयानक आहे.
१६९) अरबी भाषेत `इज्जत'चा व्यापक अर्थ होतो. मराठीत `इज्जत' म्हणजे मानसन्मान आणि आदर. अरबीमध्ये `इज्जत'चा अर्थ म्हणजे एखाद्याला उच्च् आणि सुरक्षित स्थान प्राप्त्  व्हावे जेणेकरून त्याची कोणीही हानी करू नये. दुसऱ्या शब्दांत इज्जत म्हणजे ``अशी प्रतिष्ठा ज्याला कोणीही नुकसान पोहोचवू शकत नाही.''
१७०) म्हणजे एक मनुष्य इस्लामचा दावा करतो आणि इस्लाम विरोधकांशी मिळून मिसळून जातो जेथे अल्लाहच्या आदेशाविरुद्ध कुफ्र (द्रोह) होतो, तिथे तो शांत मनाने अल्लाह आणि  पैगंबर मुहम्मद (स.) यांची चेष्टा होतांना ऐकतो. अशा स्थितीत त्या माणसात आणि विधर्मियात काहीच फरक राहात नाही. (ज्या आदेशाचा या आयतमध्ये उल्लेख आला आहे. ते  कुरआन, ६ : ६८ मध्ये उल्लेखित आहे.)
१७१) प्रत्येक युगात दांभिकांची ही विशेषता आहे. मुस्लिम होण्यामुळे जे लाभ प्राप्त् होऊ शकतात त्यांना तेव्हा हे दांभिक लोक तोंडी इस्लामचा स्वीकार करून आणि नाममात्र इस्लामचा  स्वीकार करून प्राप्त् करतात. नकार देणारे (विद्रोही - काफीर) बनण्यात जे लाभ आहेत त्यासाठी विरोधकांशी जाऊन मिळतात. त्यांना (विरोधकांना) हे दांभिक लोक (मुनाफिक) विश्वास  देतात की आम्ही `पक्षपाती मुस्लिम' नाही. आमची नावे मुस्लिमांसारखी जरुर आहेत परंतु आमची आवड आणि वचनबद्धता तुमच्याशी आहे. विचार, सभ्यता आणि आवडीच्या दृष्टीने  आम्ही सर्वस्वी तुमच्या बरोबर आहोत. इस्लाम विरोधात तुमच्या बरोबर आम्ही आहोत.
१७२) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात कोणी एखादा मनुष्य मुस्लिम समुदायाचा सदस्य समजला जात नसे जोपर्यंत तो नमाज नियमित अदा करणारा बनत नसे. ज्याप्रकारे   जगातील सर्व संस्था आणि पाट्र्या आपल्या सभा, संमेलन आणि मिटींगमध्ये जर एखादा सदस्य नियमित गैरहजर राहात असेल तर त्याची सदस्यता रद्द करतात. त्याचप्रकारे इस्लामी  समुदायाच्या एखाद्या सदस्याने सामुदायिक नमाज अदा न करणे त्या काळी पुरावा धरला जाई की त्याला इस्लामविषयी आवड राहिलेली नाही. तो सतत सामुदायिक नमाज  (जमातबरोबर) अदा करीत नसला तर त्याला मुस्लिम समजले जात नसे. म्हणून त्या काळी घोर दांभिकालासुद्धा पाच वेळा मस्जिदीत हजेरी द्यावी लागत असे कारण याशिवाय ते  मुस्लिम समुदायाचे सदस्य समजले जात नसत. म्हणून त्या दांभिकांना सच्चे ईमानधारकांपासून विलग करणारी गोष्ट होती ती म्हणजे सच्च्े ईमानधारक मनापासून मस्जिदीत येत असत. वेळेपूर्वी येऊन नमाजनंतर मशिदीत थांबत असत. त्यांच्या प्रत्येक कार्याने कळून येत असे की त्यांना नमाजशी ओढ आहे. याविरुद्ध अजानची आवाज ऐकून दांभिक खिन्न होत  असत आणि मोठ्या कष्टाने तो उठत असे. त्याच्या मस्जिदीकडे येण्याच्या पद्धतीने कळून येत असे की तो स्वत:हून नव्हे तर ढकलून आणला जात आहे. सामुदायिक नमाज संपल्यावर एखाद्या कैद्याला जशी सुटका मिळते आणि तो पळू लागतो तसा हा पळ काढीत असे. त्याच्या प्रत्येक कृतीने माहीत होत होते की त्याला अल्लाहच्या स्मरणात काहीच आवड नाही.
१७३) म्हणजे ज्याने अल्लाहची वाणी आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनचरित्राद्वारे मार्ग प्राप्त् केला नाही, सत्यापासून अतिदूर अशा व्यक्तीचा असत्याकडे झुकाव पाहून,  अल्लाह त्याला असत्याकडेच वळवितो. त्याच्या इच्छेमुळेच तसेच कृतीने तो असत्याकडे वळविला गेला आणि मार्गभ्रष्ट झाला. त्याच्यासाठी अल्लाहने मार्गदर्शनाचे द्वार बंद केले आणि  फक्त मार्गभ्रष्टतेचे मार्ग उघडले आहेत. अशा मनुष्याला सरळमार्ग दाखविणे कोणत्याही व्यक्तीच्या वाक्याबाहेरचे काम आहे.

फ्रित्झ लँग याचा ‘एम’ हा प्रसिद्ध सिनेमा १९३१ साली जर्मनीमध्ये प्रदर्शित झाला. मुले पळवून, त्यांचा लैंगिक छळ करून त्यांना ठार करणारा एक मनोरूग्ण खुनी, त्याचा शोध  लावण्यासाठी पोलीस आणि सराईत चोर, गुन्हेगार यांच्यातील हातमिळवणी, एकमेकांवर पाळत ठेवणारा, संशयग्रस्त समाज, ‘निष्पाप मुले’ हे प्रतीक, या सगळ्या शोकांतिकेला मुलांची  नीट काळजी न घेणाऱ्या आया कश्या कारणीभूत आहेत असा ‘मास हिस्टेरिया’ आणि त्याची परिणती उलगडून दाखवणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याचा काळ म्हणजे  १९२९ नंतरची जागतिक मंदी, जर्मनीमध्ये वाढती बेकारी, आर्थिक अरिष्ट, वायमार प्रजासत्ताकाची अखेर, हिटलर आणि नाझी यांच्या वाढत्या वर्चस्वाचा काळ. लँग याने थेट नाझी  विचारावर भाष्य केले नसले तरी त्याच्या सिनेमामध्ये असलेला झुंडशाही आणि तिच्या उगमाचा मानसिक आलेख नाझींना मानवणे शक्य नव्हते. त्यांनी सत्तेत आल्यावर या सिनेमावर  बंदी घातली. अखलाक ते तबरेज अन्सारी असा आपला सध्याचा प्रवास वारंवार ‘एम’ सिनेमाची आठवण करून देणारा आहे. ‘निष्पाप मुले’ याऐवजी ‘गोमाता’ एवढा बदल केला की  गोरक्षक, हिंदू सेना, पोलीस, चित्रपटगृहात, कोर्टात, रस्त्यावर, इंटरनेटवर झुंडीने हल्ले करणारा संशयग्रस्त समाज असे आपले वास्तव सिनेमापेक्षाही उग्र भडक आणि अंगावर येणारे  बनले आहे. केंद्रात दुसऱ्यांदा बहुमताने भाजपचे सरकार आल्याने हिंदुत्ववादी शक्तींमध्ये आपण देशात कुठेहीकाहीही करण्यास मोकळे आहोत, असा भलताच आत्मविश्वास आला आहे.  गेल्या वर्षी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने धर्माच्या नावाखाली जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी देशात केंद्र व राज्यांनी कायदा करावा, असे केंद्राला आदेश दिले होते. असे  आदेश देऊन एक वर्ष होत आहे पण झारखंडमधील व देशात इतर ठिकाणी झुंडशाहीच्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाकडे केंद्र व राज्य सरकारने केवळ दुर्लक्ष केलेले  नसून आम्हाला अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षिततेशी, त्यांच्या जगण्याशी, त्यांच्या असहायतेशी, वेदनेशी देणेघेणे नाही, असा सरकारचा एकूण पवित्रा आहे असे स्पष्टपणे  दिसते.  सरकार खरोखरीच जागरूक असते तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात गोरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी मंडळी  कसा धुमाकूळ घालत असल्याचा कलंक भारतावर लागला नसता. या अहवालावर भाजप सरकारनेही भारतात सर्व धर्माचे नागरिक सलोख्याने नांदत असल्याचे निर्लज्जपणाचे उत्तर  दिले. हे उत्तर देऊन काही तासच उलटले असतील की झारखंडमधील अंगावर शहारे आणणारी घटना घडली. अशा झुंडशाहीच्या घटना या मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील आहेत.  मागचा इतिहासही चांगला नाही. गेल्या पाच वर्षांच्या काळात झुंडशाहीच्या इतक्या घटना घडल्या आणि त्यावरून जनमत एवढे संतप्त झाले तरीही सरकारी यंत्रणा, सत्ताधारी नेते  ढिम्मपणे बसून आहेत. वास्तविक न्यायालयांनी कायदासुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणांना सुधारण्याचा आदेशवजा सल्ला देणे हेच आपली पोलीस यंत्रणा आतून किती किडलेली व  निष्क्रिय आहे हे दर्शवते. गेल्या चार-पाच वर्षांत जमावाकडून काही हत्या झाल्या तेव्हा पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती तर त्या रोखता आल्या असत्या. पण पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती हातातून गेली असे अनेकदा दिसून आले आहे. झारखंडमध्ये तबरेज अन्सारी या मुस्लिम युवकाची जमावाने जबर मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला.  पोलिसांना या घटनेतील भयावहताच लक्षात आली नाही. त्यांनी बेशुद्धावस्थेतील तबरेजला ताबडतोब वैद्यकीय उपचार कसे मिळतील यावर लक्ष द्यायला हवे होते. पण तबरेजला  न्यायालयीन कोठडीत ठेवले आणि त्याला ज्या वेळेत उपचारांची गरज होती ती वेळ निघून गेली होती. गेल्या वर्षी राजस्थानमध्ये गोहत्येच्या संशयावरून झालेल्या एकाच्या  हत्याप्रकरणात लोकसभेत आक्रमक चर्चा झाली होती. त्या वेळी झुंडशाहीवर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर केंद्र सरकारने दोन समित्या नेमल्या. या समित्यांचे पुढे काय झाले,  हे कुणालाच माहिती नाही. आपला समाज बहुसांस्कृतिक असल्याने तो सेक्युलर धाग्यांमध्येच एकत्र व संरक्षित राहू शकतो. त्याची बहुसांस्कृतिकता चिरडण्यासाठी धार्मिक अस्मितांना  बळ दिले जात असेल तर त्याला विरोध कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांनी केला पाहिजे. न्यायालये आदेश देऊ शकतात, पण कायदा राबवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्वोच्च  न्यायालयाने जमावाच्या हिंसक वर्तनावर सरकारचे कान धरले होते. पण सरकारच अशा घटनांवर आवर घालण्यात असमर्थ ठरत असल्याने आपल्या सामाजिक-राजकीय जीवनात  झुंडशाही ही अविभाज्य भाग बनली आहे. प्रामुख्याने मुस्लिम आणि मागासवर्गीय (एम) समाजाच्या विरोधात या झुंडशाहीचा आत्मविश्वास बळावला आहे. झुंडीत लपलेल्या गुंडांना जरब  बसेल अशी कारवाई व्हायला हवी. आजवरची जनआंदोलने ही प्रस्थापित व्यवस्थेविरोधात, अतिधनाढ्य भांडवलदारांविरोधात, भ्रराष्ट राजकारण्यांविरोधात उभारली गेली. मात्र, चालू  झुंडशाहीचे लक्ष्य गरीब, आदिवासी, अल्पसंख्याक झाल्याचे आजवरच्या घटनांनी अधोरेखित केले आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

इस्लामने प्रत्येक सक्षम स्त्री-पुरूषावर हजयात्रा अनिवार्य केली आहे. याचाच अर्थ हजयात्रा जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ते पूर्ण करणे सर्वांना बंधनकारक आहे. मात्र जर एखादी मुस्लिम वयस्क व्यक्ती (स्त्री अथवा पुरूष) वाहनात बसू शकत नाहीत, कारण तिच्यात तेवढी ताकद नाही, पण हजयात्रा तर करावयाची आहे. अशा वेळी त्या वयस्क व्यक्तीच्या वतीने तिच्या नातेवाईकाने हजयात्रा केली तर त्या वयस्क व्यक्तीच्या नावाने ’हजयात्रा कर्ज’ अदा होईल.
हजला जाणार्‍या स्त्री-पुरूषांची प्रार्थना ईश्‍वर स्वीकारतो. यामुळे हाजींना (हजला जाणारे) ईश्‍वराची प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून हाजींची रवानगी करताना त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ठ, मित्रमंडळी, परिवारातील, गल्लीतील, गावातील लोक विनंती करतात, ”आमच्या कल्याणासाठीसुद्धा अल्लाहकडे प्रार्थना करा.”
इस्लाम जगात शांतीचा मार्ग सांगणारा धर्म आहे. इस्लाममध्ये दाखल होण्यासाठी कोणाही स्त्री-पुरूषांवर बळजबरी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण  इस्लाम स्वीकारणे ही सामान्य बाब नाही. इस्लाम स्वीकारल्याने त्या धर्माची सर्व तत्त्वे अंगीकारायला हवीत.
स्त्रीने पुरूषांशी संबंध आल्यास त्यांच्याशी अगदी स्पष्ट आणि ठळक शब्दांत संवाद साधावा. समजा, आपण परपुरूषांशी बोलताना दबक्या आवाजात बोललो, आपल्या बोलण्यात लचक, मिठास असेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या घोड्याला लगाम घालणे कठीण होते व त्याचा विचार ना-ना तर्‍हेने, ना-ना मार्गाने थैमान घालतो व त्याच्या डोक्यात वाईट विचार आपोआपच काहूर घालतो.
शृंगाराचे प्रदर्शन आपल्या पतीशिवाय कोणासमोरही करू नका. घरी परपुरूष आला असता त्या वेळी घरातदेखील स्त्रीने परद्यात असावे. हे फक्त इस्लाम धर्मातच आहे असे नाही तर इतर धर्मांतही गोशा पद्धती प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांसाठी परदा हा अनिवार्य आहे. तसेच परपुरूषांशी नजरानजर करू नये. आपल्या दृष्टीचेे रक्षण करावे. त्याचबरोबर आपल्या लज्जास्थळाचेही रक्षण करावे. शरीराला तंग असणारे व तोकडे कपडे परिधान करू नयेत. नखशिखांत पोशाख परिधान करावा. जशी पुरूषांना आपले चारित्र्य सांभाळण्याची सूचना केलेली आहे तशी चारित्र्याच्या संरक्षणाची स्त्रियांना ताकीद केलेली आहे. स्त्रीने व्यभिचार आपल्यापासून कोसो (मैल) दूर ठेवावा. व्याभिचारी स्त्री इस्लाम धर्मात अत्यंत अप्रतिष्ठित समजली जाते. रस्त्यावरून चालत असतानादेखील तिने कसे चालावे याच्याही सूचना कुरआन देतो. स्त्रियांनी रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या एका बाजूने चालावे. समाजात वावरत असताना स्त्रियांनी चारदीचा एक पदर कायम आपल्या शरीरावर लटकवावा, कारण या स्त्रिया श्रद्धावान आहेत व त्यांना कोणीही त्रास देऊ नये. चादरीचा पदर आपल्या शरीरावर लटकावणे म्हणजे ती नीतीवान आहे याचा संकेत त्यातून लोकांना मिळतो आणि आपल्या शीलाचे व नजरेचे रक्षण केवळ त्या संकेतामुळे होते. चौदाशे वर्षापूर्वी इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी असे संकेत निर्माण केले, याची आज किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते याचे दर्शन होते. आज कोणत्याही लहानातलहान शहरापासून मोठ्यातमोठ्या शहरापर्यंत बघा. त्या ठिकाणी वावरताना मुली, महिला स्कार्फ आपल्या जवळ बाळगतात आणि  तो आपल्या चेहर्‍यावर बांधलेला असतो. याचे कारण शोधले तर हे निदर्शनात येते की धुळीपासून स्वतःच्या चेहर्‍याचे संरक्षण व्हावे, तसेच नाकाद्वारे सूक्ष्म जीवजंतू आपल्या शरीरात जाऊ नयेत ही वरकरणी स्वरूपाची त्यांची उत्तरे असतात. पण त्यामागची खरी कारणीमांसा पाहिली तर त्यांना तो स्कार्प वापरण्यामध्ये सुरक्षितता वाटते व रस्त्यावरील लोकही त्यांना त्रास देत नाहीत.
इस्लाममध्ये स्त्रियांनी चादरीचा पदर आपल्यावर अच्छादून ठेवण्यास सांगितले. ’हिजाब’ करण्याचा आदेश दिला. ’हिजाब’ म्हणजे एक प्रकारची मोठी चादर ज्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाऊ शकते. या चादरीचा वापराचा तात्विक लाभ अशा प्रकारे वर्णन करण्यात आला आहे की यामुळे ती पवित्रख्याली, सदाचारी आणि कुलीन स्त्री वाटते आणि त्यांना छेडण्याची व त्यांच्यावर हात घालण्याची कोणाची हिंमत नाही. ’हिजाब’च्या वापराबरोबरच ’गज्जेबसर’चा आदेश दिला आहे. ’गज्जेबसर’ म्हणजे आपली नजर खाली ठेवणे. बोलताना हळू लचकदार बोलू नये. याचा आधार पुढीलप्रमाणे,
”पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नीनो! तुम्ही सामान्य स्त्रियांप्रमाणे नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगणारे असाल तर हळू आवाजात बोलत जाऊ नका की विकृत हृदयाचा एखादा माणूस लालसेत पडेल तर स्पष्ट सरळ बोलणे बोला.”
इस्लाम धर्माने स्त्रीला दिलेल्या अधिकारांचा सन्मान करून ते अधिकार तिला मिळवून दिल्यास त्या समस्याच मुळात उद्भवणार नाहीत ज्यांचा संदर्भ देऊन संपूर्ण इस्लामी विधीलाच (शरियत) बदनाम करण्याचा व तिला बदलण्याचा आरडाओरडा करण्यात येतो. इस्लाम धर्माने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. तिला न्याय दिला, तिला मानवाधिकार दिले, मान-सन्मान दिला आणि समाजात सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. (इस्लाम सुरक्षित सावलीतली स्त्री या पुस्तकातील सर्व लेखमाला समाप्त झाले. सदर पुस्तक प्रा.ए.जी.पाटील यांनी लिहिले असून, ते आयएमपीटी,मुंबई ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील वापरलेले संदर्भ ग्रंथ - 1) इस्लामी समाज जीवन व्यवस्था आणि हुंडा प्रथा - उमर हयात खान गौरी, 2. स्त्री भ्रृणहत्या कारणे व उपाय- डॉ. रजीउल इस्लाम नदवी, 3. जीवनदर्शन - मुहम्मद युसूफ इस्लाही, 4. इस्लामी कुटुंब - सय्यद जलालुद्दीन उमरी, 5. स्त्री आणि इस्लाम - सय्यद जलालुद्दीन उमरी, 6. इस्लाम आणि स्त्री - मकबूल अहमद फलाही, 7. स्त्री आणि निसर्गनियम - सय्यद अबुल आला मौदूदी, 8. तलाक-समज गैरसमज - गुलाम रसूल देशमुख, 9. इस्लाम आणि मानवाधिकार - सय्यद अबुल आला मौदूदी, 10. इस्लाम आणि लैंगिक समानता - मु.मजहरूद्दीन सिद्दीकी, 11. सुखी कुटुंब - शेख मुहम्मद कारकुन्नु, 12. स्त्री-कुरआनच्या दृष्टिक्षेपात - शमीमा मोहसीन, 13. गोशा (पडदा) - सय्यद अबुल आला मौदूदी, 14. बहुपत्नित्व - सय्यद हामिद अली, 15. दांम्पत्यिक अधिकार - सय्यद अबुल आला मौदूदी, 16. अवैध दहेज व हुंडाप्रथा आणि इस्लाम - गुलाम रसूल देशमुख, 17. ध्येयपथ - जलील अहसन नदवी.).

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि त्याच्या विद्यार्थ्यांवर देशातील सर्व लोकांच्या विशेषतः मुस्लिम समुदायाच्या नजरा कायम टिकलेल्या असतात. या विद्यापीठाची आणि या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी महत्त्वाची राहिलेली आहे. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक ऐतिहासिक निर्णयामध्ये या विद्यापीठाने आणि येथील विद्यार्थ्यांनी केंद्रीय भूमिका बजावलेली आहे. आमच्यामधून पुढे आलेले अनेक शक्तीशाली आवाज येथूनच आलेले आहेत. महत्वाची आंदोलने येथूनच सुरू झालेली आहेत. प्रत्येक अडचणीच्या वेळेस मुस्लिमांना येथूनच मार्गदर्शन मिळालेले आहे.
आज जेव्हा भारतीय मुस्लिम एका ऐतिहासिक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रश्‍न उभी आहेत. अनेक आव्हाने आ वासून पुढे उभी ठाकलेली आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी मुस्लिमांची आशा तुमच्यावर टिकलेली आहे. मला आनंद आहे की, या विद्यापीठाची विद्यार्थी संघटना आपल्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल जागरूक आहे. मला आशा आहे, अशा नाजूक कालखंडातही ही संघटना आपली भूमिका योग्य पद्धतीने निभावेल. मला माहित आहे, येथील विद्यार्थी आपल्या जबाबदारीचे निर्वहन करण्यासाठी तयार आहेत. अल्लाह आपल्या ऐतिहासिक भूमिकेला कायम ठेवो. बदलत्या काळातही तुमची भूमिका योग्य प्रकारे निभावण्यासाठी अल्लाह तुमची मदत करो. आमीन.
’देशाचे बदलते वातावरण आणि मुसलमान’ हा आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे. आपण सर्व पाहतच आहोत, आपला देश बदलत आहे. कोणत्या-कोणत्या गोष्टी बदलत आहेत, यासंबंधी अनेक पैलूंनी भाषण करता येईल. तरीसुद्धा सर्वच पैलूंविषयी चर्चा करणे या ठिकाणी शक्य होणार नाही. फक्त दोन-तीन महत्त्वाचे पैलू मी तुमच्यासमोर उलगडून दाखविणार आहे. असे पैलू ज्यांनी आपल्या जीवनावर खोलवर परिणाम केलेला आहे. याच संदर्भात मी काही आवाहने करणार आहे.
मला असे वाटते की, याबद्दल कोणाचे मतभेद नसतील की, सर्वात मोठा बदल मागच्या काही वर्षात जो झालेला आहे आणि ज्याने देशाच्या सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि लोकांच्या विचारशक्तीला प्रभावित केलेले आहे. तो पैलू आहे आक्रमक जातीयवाद (अग्रेसिव्ह कम्युनॅलिझम). गेल्या काही वर्षांपासून जातीयवादी शक्तींनी वेगाने आपल्या देशात प्रगती केलेली आहे. देशातील राजकारण आणि सामाजिक परिस्थितीवर या लोकांचा मोठा परिणाम झालेला आहे. यांना मोठ्या प्रमाणात समाजामध्ये स्वीकृतीही मिळालेली आहे. समाजाच्या मूळ गाभ्यालाच यांनी प्रभावित केलेले आहे.
आक्रमक जातीयवादाचा आविष्कार पहिला मोठा बदल आहे. जो आपल्या देशात ठळकपणे दिसून येत आहे. याने देशाच्या सर्व भागावर प्रभाव टाकलेला आहे. समाजाच्या ठेवणीमध्ये बदल केलेला आहे. लोकांच्या वैचारिक शक्तीला प्रभावित केलेले आहे. देशासमोरील प्रश्‍न आणि परिस्थिती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोणावर सुद्धा परिणाम केलेला आहे. परिणामी देशामध्ये घृणेचे वातावरण पसरत आहे. सामाजिक विभाजन होत आहे. वेगवेगळ्या गटात समाज विभागला जात आहे. जात आणि पोटजात यांच्यातील पक्षपाताची भावना जी सुप्त अवस्थेत होती आपल्या देशाच्या घटने आणि घटनात्मक मुल्यांनी ज्या पक्षपाताला डोके वर काढू दिले नव्हते, जातीयवाद्यांच्या वर्चस्वामुळे ते सारे पक्षपात पुन्हा एकदा जागृत होत आहेत. जर या संकटाचा सामना वेळीच नाही केला गेला तर देशाच्या एकूण रचनेतच बदल घडून येईल. देशातील एकात्मता संकटात येईल. मुलभूत लोकशाही मुल्य संकटात येतील. मला असे वाटते की, हा पहिला बदल आहे जो समाजामध्ये होत आहे. ज्याची दखल घेणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे जेव्हा जातीयवादाचा प्रश्‍न येतो तेव्हा आपण फक्त राजकारणापुरता त्याच्यावर विचार करतो आणि राजकीय पातळीवरच त्याच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करीत  असतो. मला वाटते ही आपली सर्वात मोठी चूक आहे. जोपर्यंत आपण याला फक्त राजकीय प्रश्‍न समजू आणि फक्त निवडणुकींच्या वेळी त्याच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न करू तेव्हा खर्‍या अर्थाने आपण या प्रश्‍नाचा सामना करू शकणार नाही. जातीयवाद वास्तविक पाहता सामाजिक प्रश्‍न आहे. जातीयवादी आंदोलनाने आपले विचार समाजामध्ये खोलपणे रूजविलेले आहेत. राजकीय स्तरावर त्याचा फक्त परिणाम दिसून येतो. मुळात याचे उत्पादन समाजामधून होत असते. तुम्हाला जर जातीयवादाशी सामना करावयाचा असेल तर मुळात तुम्हाला सामाजिक स्तरावर तो करावा लागेल. समाजामध्ये त्याचा जो परिणाम होत आहे, त्याच्यावर लगाम लावावी लागेल.
या प्रश्‍नाची सोडवणूक अशा पद्धतीनेच करावी लागेल. या संदर्भात मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो. सर्वप्रथम आपण याच्याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहूया. जोपर्यंत आपण याच्याकडे सामाजिक समस्या म्हणून पाहण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण सामाजिक स्तरावर या समस्येशी दोन हात करण्यासाठी तयार होऊ शकणार नाही. माझ्या दृष्टीने हा पहिला प्रश्‍न आहे ज्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
देशात होत असलेला दूसरा बदल हा आर्थिक स्वरूपाचा आहे. मागच्या काही वर्षामध्ये आपल्या देशाने वेगात प्रगती केलेली आहे. देशातील शहरी भागाचा चेहराच बदलून गेला आहे. मात्र ही समस्येची एक बाजू आहे. समस्येची दूसरी बाजू ही आहे की, गेल्या 20-25 वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. दोन वर्षापूर्वीच क्रेडिट स्वीसच्या एका अहवालामध्ये म्हटले होते की, आर्थिक विषमतेच्या बाबतीत जगामध्ये दूसर्‍या क्रमांकाचा वाईट देश आपला देश आहे. ऑक्सफॉमचे अहवाल नियमित प्रकाशित होत असतात. ते जरी तुम्ही नियमितपणे वाचत असाल तर तुमच्या लक्षात आलेलेच असेल की, या अहवालातूनही ऑक्सफॉम ने म्हटलेले आहे की, देशात विषमतेची दरी रूंदावत चालली आहे. दरवर्षी आपल्या देशातील गरीब जनतेची संपत्ती कमी होत आहे आणि श्रीमंत लोकांची संपत्ती वाढत आहे. दोघांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. गेल्या पाच वर्षात हे अंतर अधिकच वाढलेले आहे. संपत्ती मोठ्या प्रमाणात गरीबांच्या हातातून निघून श्रीमंतांच्या हातात एकवटली जात आहे. याचे जबरदस्त वाईट परिणाम आपल्या देशावर पडत आहेत. एकीकडे आपला देश तीसरी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. तर दूसरीकडे मानवी उन्नतीचा निर्देशांक (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) अनुसार आपल्या देशाचा क्रमांक 134 वा आहे. ही एक विचित्र स्थिती आहे. मानवीय उन्नतीच्या दृष्टीकोणाने पाहिले तर आपला समावेश जगातील वाईट देशांमध्ये होतो. 2008 सालच्या फोबर्सच्या यादीमध्ये जगातील पहिल्या 10 श्रीमंत लोकांच्या यादीत चार भारतीय होते. एवढी मोठी संख्या युरोपातील कुठल्याही देशाची किंवा जपान सारख्या प्रगतीशील देशाचीही नव्हती. मात्र दुसरीकडे जगातील जी सर्वात गरीबातील गरीब लोकसंख्या आहे त्यातील अर्धी लोकसंख्या भारतीय आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात महागडे रहिवाशी घर मुंबईत आहे आणि त्याच शहरात जगातील सर्वात मोठी झोपडपट्टीपण आहे. हा जो विरोधाभास आहे. त्याचा प्रवास काळानुरूप वाईटातून अति वाईटाकडे होत आहे. हा दूसरा बदल आहे जो आपल्या देशात होत आहे.
तिसरा बदल वरील दोन बदलांचा परिणाम आहे ज्याला मी वर्गव्यवस्थेचे नाव देतोय. आपला देश वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या समुहाचा देश आहे. हे समूह धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, शहरांच्या नावावर, ग्रामीण क्षेत्रांच्या नावावर, आर्थिक परिस्थितीच्या नावावर अशा अनेक नावावर बनलेला आहे. फ्रेंच समाजशास्त्री फ्रान्ट्स फिनोने यांनी या संदर्भात एक रोचक असे विवेचन केलेले आहे. अत्याचारींच्या मानसिकतेवर चर्चा करत असताना तो म्हणतो अत्याचारी माणसाची मानसिकता अशी असते की, तो समाजाकडे विभाजित दृष्टीने पाहत असतो आणि प्रत्येक समाज घटकाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. झोन ऑफ बीईंग (अस्तित्वात असलेला समूह) आणि झोन ऑफ नॉन बीईंग (अस्तित्वात नसलेला समूह) अशा दोन विभागात अत्याचारी लोक समाजाची विभागणी करतात. स्वतःच्या समाज घटकाकडे हे अत्याचारी लोक अस्तित्वात असलेला घटक म्हणून पाहतात आणि त्यांना काही त्रास झाल्यास अशा लोकांना वेदना होतात. त्यांच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या समाज घटकाला जेव्हा त्रास होतो तेव्हा त्यांना वेदना होत नाहीत. या घटकातील लोक त्यांना जनावरासारखे वाटतात. याप्रमाणे जनावरांना त्रास झाल्यास त्यांना वेदना होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या समाजघटकांना त्रास झाल्यास त्यांना त्याच्या वेदना कळत नाहीत. कुरआनमध्येही यासंबंधी म्हटलेले आहे की, ”सत्य हे आहे की, फिरौनने जमीनीवर अत्याचार केले आणि जमिनीवर राहणार्‍या लोकांची दोन गटामध्ये विभागणी केली. एका गटाला तो अपमानित करत असे.त्या गटामध्ये जन्माला येणार्‍या मुलांची तो हत्या करत असे आणि जन्माला येणार्‍या मुलींना तो जीवंत राहू देत असे. म्हणूनच तो अत्याचारी होता.”
मित्रांनों! जो काही बदल या ठिकाणी मी नमूद केलेला आहे तो असाच आहे. काही लोकांना वाटते की, त्यांचा समाज हाच फक्त अस्तित्वात असलेला समूह आहे. बाकीच्यांचे काही अस्तित्वच नाही, ते झोन ऑफ नॉन बीईंग मधले लोक आहेत. कुठल्याशा सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांच्या संबंधात काम करणारी सुंदर कपडे घातलेल्या मुली सोबत जर अत्याचार होत असतील तर त्या घटनेनंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आक्रोश होतो. समाज माध्यम ओरडायला लागतात. माध्यमांमध्ये वादळ येते. मात्र उत्तर प्रदेशातील खेड्यापाड्यात, बिहारच्या ग्रामीण भागात, कुठल्याशा गरीब दलित मुलीवर अत्याचार होतात, तेव्हा सगळे गप्प असतात. कारण स्पष्ट आहे. आपल्या देशातील सुशिक्षित वर्ग आपल्याच गटाशी संबंधित असलेल्या सुंदर मध्यमवर्गीय मुलीला आपली मुलगी समजतो. तिच्या अस्तित्वासंबंधी तो संवेदनशील असतो. म्हणून तिला झालेला त्रास ते सहन करू शकत नाहीत. मात्र ग्रामीण भागातील गरीब, दलित मुलगी ही त्यांच्या गटातील नसल्यामुळे तिच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना वेदना होत नाहीत. आता तर आतंकवादासारख्या गंभीर विषयालाही झोन ऑफ बीईंग आणि झोन ऑफ नॉन बीईंग अशा गटांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे. आपल्या गटातील आतंकवादी हे प्रिय तर दूसर्‍या गटातील आतंकवादी हे अप्रीय अशी ही मांडणी करण्यात आलेली आहे. देशाला अशा गटातटात विभाजित करून त्यांच्याकडे पाहणे आणि आपल्या गटांतील लोकांकडे सहानुभूतीने पाहणे, सर्व सहानुभूती आपल्याच गटातील लोकांपर्यंत मर्यादित ठेवणे, नॉन बीईंग म्हणजे दुसर्‍या गटातील माणसांना माणसं न समजणे ही फार मोठी अनैतिकता आहे. वास्तविक पाहता हे एक राष्ट्रीय संकट आहे. वेळीच याला प्रतिबंध घातला गेला नाही तर लवकरच ही एक राष्ट्रीय समस्या बनून जाईल.
येणेप्रमाणे देशाची तीन गटात झालेली विभागणी संबंधित विवेचन मी आपल्यासमोर केलेले आहे. आणि ही समस्या आपल्या देशाला कमकुवत बनवत आहे. आणि देशाला वेगाने भूतकाळात नेत आहे. याच्यावर नियंत्रण मिळवले नाही गेले तर आपल्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी क्षमता या गटातटांच्या विभागणीमध्ये आहे.
मूळ प्रश्‍न असा आहे की, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवे? मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी काय आहे? अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या साहसी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी काय आहे?

- एम.आय.शेख
(सदर भाषणाचा उर्वरित भाग पुढील अंकी.)(सदर भाषण उर्दू सा. दावतमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याचा मराठी अनुवाद बशीर शेख, एम.आय.शेख यांनी केला आहे.)

फारच कमी वयात, कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अभिनेत्री ज़ायरा वसीम हीने सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट टाकून आपण चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं जाहिर केलंय. त्यामुळे सर्वत्र चर्चांना जे उधान आलंय त्यावरून वाटतंय की तिच्या या पोस्टमुळे अख्खी चित्रपटसृष्टी हादरली की काय, असा भास होतोय.
वास्तविक पाहता ज़ायराचा विद्रोह नेमका कशाविरूद्ध आहे, हे समजून घेतले पाहिजे. तीच्या पोस्टमध्ये चित्रपटात अभिनय करणे इस्लामनुसार हराम असल्याचा कुठेच उल्लेख नाहिये. तर चित्रपटसृष्टीत वावरतांना एक इस्लामनिष्ठ म्हणून ती स्वतःहून मानत असलेली पैगंबरी मुल्यांना पदोपदी मुरड घालावी लागत होती आणि त्यामुळे तीची घुसमट होत असल्याचं तिच्या पोस्टमधून स्पष्ट होते. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यासाठी तीची पूर्ण पोस्ट वाचली पाहिजे. त्यात मागील पाच वर्षांपासून तीचा कुरआन व प्रेषित वचन (हदिस) च्या तीने स्वतःहून केलेला अभ्यास, त्यातील नीतीमुल्ये व नितीमत्ता आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या विद्यमान ’कास्टिंग काऊच’ व ’मी टू’ सारख्या पॉर्नसुलभ संस्कृतीच्या विसंगतीत तिच्या मनात झालेल्या वैचारिक द्वंद व मन्वंतराचं फलीत म्हणजे तीने घेतलेला हा निर्णय असल्याचं स्पष्ट होते. ती काय कोणत्या मौलवीची मुलगी नाही की, ती मदरश्यात शिकलेली नाही. म्हणून तिच्यावर दबाव येतोय हा आरोप हा पूर्वग्रहदुषित आहे.
मूळात तीने फक्त फिल्म इंडस्ट्री सोडून दिली असती तर कुणाला काही वाटलं नसतं. पण इथल्या नागड्या फिल्मी संस्कृतीविरूद्ध तिने इस्लामी पवित्र नितिमत्तेने प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितल्याने काही छुप्या इस्लामद्वेष्ट्यांचा जळफळाट झाला आहे. वास्तविक पाहता इराण, इजिप्त, तुर्कस्तानातही मुस्लिम महिला तिथल्या इस्लामी चित्रपटात काम करतात. इतकंच नव्हे तर चक्क काही इस्लामी संघटनांनी काही शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत.  तलाक : कुसूर किसका, मूक्ती या हिंदी शॉर्ट मुव्हीज़ जमाअत ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेशने बनवल्या आहेत. तर केरळमधील याच संघटनेने बनवलेला मल्याळी चित्रपट आयलवासी हा चक्क तिथल्या टॉकीज़मध्ये चालला. अनेक इस्लामनिष्ठ संस्थांनी जणू एक समांतर अशी फिल्म इंडस्ट्री बनवली आहे. याला तुम्ही इमानोवूड म्हणू शकता. पण तिथे हिंदी चित्रपटसृष्टीसारखं कास्टींग काऊच, मी टू सारखं लियोनी वातावरण नसते. म्हणून इस्लामवर राग काढण्यापेक्षा इथल्या चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या विकृति नष्ट करण्यावर विचार झाला पाहिजे. अन्यथा अशा अनेक ज़ायरा एक एक करून निघून जातील, आणि ही इंडस्ट्री फक्त पॉर्न इंडस्ट्री म्हणूनच उरेल कदाचित!
विनोद खन्ना, कादर खान, भय्यु महाराज या लोकांनीही चंदेरी दुनियेतून सन्यास घेतला होता. त्यामागेही अध्यात्मिक धार्मिकच कारण होते. कादर खाननेही नंतर कुरआनाच्या सीडीज़ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. पण पुरूषी मानसिकता असलेल्या मनुवाद्यांना फक्त महिलांनीच असं करावं, तसं करावं असले सल्ले देण्याची हौस. ती नेहमी दबावातच निर्णय घेते, तीला अक्कलच नसते अशी पुरोगामीत्वाच्या सोवळ्यात लपलेली छुपी पुरूषप्रधान मानसिकता आता चव्हाट्यावर येतेय. आधी तीचे अकाऊंट हॅक झाल्याची अफवा  उडवली पण नंतर स्वतः तीनेच त्याचे खंडण करून तो लेख तीने स्वतःच लिहिल्याचे स्पष्ट केल्यावर इस्लामद्वेष्टे तोंडघशी पडल्यावर आता अतिरेक्यांच्या दबावाचं नाटक सुरू केलंय.
दबाव टाकून अतिरेक्यांचा काय फायदा होणार आहे? ती काय इस्लामविरोधी चित्रपटात काम करत नव्हती की ज़रीन खान किंवा काश्मिरी आलीया भट सारखी उत्तान दृश्येही करत नव्हती की जेणेकरून मुस्लिम समाजाची बदनामी करत असल्याने तीला अतिरेकी धमकावण्याची शक्यता सांगावी. ती सुरूवातीपासूनच हळूहळू कुरआनाकडे आकर्षित झाल्याचे तिच्या मुलाखतींवरून स्पष्ट होते.
दबावाखालीच तीने असे केले असेल हे पूर्वग्रहदुषित होण्याचे द्योतक आहे. दबावाखाली कुणी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ कुणी कुरआन व प्रेषितांच्या वचनांचे इतके दाखले दिले नसते. पण इस्लामचे पावित्र्य आणि मनुवादी नट्यांचा नागडेपणा उघडं पाडणार्‍या तिच्या या निर्णयामुळे मनुवाद्यांचा हा अपप्रचार देखील तीला अप्रत्यक्ष धमकी तर नाही ना?
मूळ दुखणे हे आहे की, ती चूपचाप निघून गेली असती तर काही इस्लामद्वेष्ट्यांचं इतकं पित्त खवळलं नसतं, पण तीने अख्ख्या चित्रपटसृष्टीतील आंबटशौकिनांचं सोवळं टरटरा फाडल्यामुळेच सर्वत्र जळफळाट होतोय.
आश्‍चर्य याचं वाटतं की, अनेक पुरोगामी बहुजनही ज़ायराचा विरोध करतांना दिसतात.
बहुजनांनो, डॉ. बाबासाहेबांची मिलिंद संस्था आपण चालविण्यास तयार असल्याचं दिलीप कुमारनं सांगितल्यावर ’तुझ्यासारख्या नाच्याला मी माझी संस्था देणार नाही’ असं बाबासाहेबांनी खडसावून सांगितलं आणि चित्रपटसृष्टीतील आधुनिकतेच्या नावावर होणार्‍या अश्‍लीलतेवर सडकून टिका केली. आम्रपाली या नर्तकीनेही नाचगाणं सोडून आपलं संपूर्ण आयुष्य उपासिका म्हणून धम्मकार्याला वाहून घेतलं. छत्रपती शिवरायांनीही मोहिमेवर असतांना सैनिकांना सोबत नाचगाणं करणार्‍या कलावंतींना नेण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ही नाचण्या बिचण्याची बुधवार पेठेतली संस्कृती आपण मूलनिवासींची नाही. अशी संस्कृती सोडून एखादी मूलनिवासी ज़ायेरा वसीम पैगंबरांच्या समतेशी आपली निष्ठा व्यक्त करून आपलं पुढील आयुष्य प्रेषितांनी सांगितलेल्या समताधिष्ठित व्यवस्थेनुसार घालवणार असेल तर त्याला किमान आपल्या मूलनिवासी पुरोगामींनी तरी विरोध करू नये. नाचगाण्याची संस्कृती मानणार्‍या सनातन्यांचा जळफळाट एक समजू शकतो. म्हणून बहुजनांनो, नाचणं बंद, वाचणं सुरू करा!
आज गरज आहे नवीन पीढीला उपयुक्त अशा नितिमत्तेची शिकवण देणार्‍या चित्रपटांची. हे नीतीमान चित्रपट बनवतांनाही नितीमत्ता बाळगली गेली पाहिजे. नाहितर नीतीमान चित्रपटांच्या पडद्यामागेही बरंच काही अनैतिक असं चालतं, ते नको. आपलं ज्या तत्वांशी इमान राखलं आहे त्या नैतिक तत्वांशी, ग्रंथांशी, ईश्‍वरी मार्गदर्शनाशी जरादेखील तडजोड न करता,  नैतिकतेच्या चाकोरीत फक्त महिलाच नव्हे तर पुरूषांनीही राहून एक सकस अशी निर्मीती करण्याची गरज आहे.
प्रत्येक सकारात्मक क्षेत्रात प्रत्येक समाजाला अनुकूल वातावरण मिळायला पाहिजे, ही एका उदार लोकशाहीची निकड आहे. जसं स्कॉटलँड पोलीसने मुस्लिम महिलांना खाकी रंगाचा स्कार्फ आणि बुरखा नेसण्याची परवानगी दिली आहे. तेंव्हा मोठ्या संख्येने मुस्लिम महिला त्यात सहभागी होत आहेत. इराणमध्ये बुरखा नेसून महिला अनेक खेळ खेळतात आणी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावालौकिक मिळवतात. तिथे बुरखा नेसून विमानेही उडवतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
सांगायचं तात्पर्य हे की, असं मुस्लिम-फ्रेंडली वातावरण जर प्रत्येक क्षेत्रात निर्माण केलं गेलं तर मुस्लिम महिलाही या क्षेत्रात पुढे येतील. नाहीतर मी टू , मी टू म्हणत इतर मॉडर्न महिलाही या क्षेत्रापासून दूर जातील, हे लक्षात घ्या.
स्त्रीसुलभ, नैतिकतासुलभ इमानसुलभ वातावरण निर्माण झाले तर अशा अनेक ज़ायरा पुन्हा या नवीन नैतिक चित्रपटसृष्टीत, बॉलीवूड नव्हे तर ’मोरॅलीवूड’मध्ये पुन्हा पदार्पण करतील इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह !

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या साहसी विद्यार्थ्यांची जबाबदारी काय आहे?


आपण सर्व मुस्लिम आहोत, इस्लामवर आपला विश्‍वास आहे. आपला याच्यावरही विश्‍वास आहे की, मानवी जीवनाच्या गुंतागुंतीचे सगळे प्रश्‍न इस्लामी शिक्षणाच्या माध्यमातूनच सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे आपली मुलभूत जबाबदारी ही आहे की, इस्लामी मुल्यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण शक्ती व हिमतीने करावा. आपल्या प्रयत्नांमध्ये उत्साह आणि धाडस असणे गरजेचे आहे. आपले म्हणणे पूर्ण ताकदीनिशी देशाच्या नागरिकांसमोर मांडायला हवे. त्यांना सांगायला हवे की, तुम्ही-आम्ही सर्व एका ईश्‍वराचे उपासक आहोत. एकाच शक्तीने तुम्हा-आम्हाला जन्म दिलेला आहे. झोन ऑफ बिईंग आणि झोन ऑफ नॉनबीईंग मधील माणसांची विभागणी ही अनैसर्गिक आहे. तुम्ही सर्व एकाच आई आणि वडिलाची लेकरे आहात. आपसात बहीण, भाऊ आहात. दलित स्त्री सुद्धा माझी बहीण आहे. जंगलात राहणारे आदिवासी सुद्धा माझे भाऊ आहेत. पूर्वोत्तर भारतात राहणारे आणि पश्‍चिम भारतात राहणारे सुद्धा माझे भाऊ आहेत. प्रत्येक माणूस मग तो कोणत्याही धर्माचा असो आदम (अलै.) आणि हव्वा (अलै.) यांची संतान आहे. त्यांचे दुःख माझे दुःख आहे. त्याची प्रगती माझी प्रगती आहे. तो कमकुवत झाला तर मी कमकुवत झाल्यासारखे आहे. ही संवेदना एका ईश्‍वराला मानणारे आपल्या मनात ठेवतात व ती जनमाणसापर्यंत पोहोचवू शकतात. देशाच्या सद्याच्या परिस्थितीमध्ये तुमची ही जबाबदारी अनेक पटीने वाढलेली आहे.
सद्याच्या विपरित परिस्थितीमध्ये इस्लामचा संदेश पोहोचविण्याची एक संधी लपलेली आहे. सद्याचे वातावरण हे अनैसर्गिक वातावरण आहे. जातीयवाद ही पूर्णतः अनैसर्गिक गोष्ट आहे. लोकांची गटातटामध्ये विभागणी करणे आणि त्यांच्यात विष पेरणी करणे ही एक अनैसर्गिक अवस्था आहे. सकृतदर्शनी ही स्थिती वेगाने प्रगती करताना दिसते मात्र मानवीय प्रवृत्ती उशीरापर्यंत याला सहन करू शकत नाही. काही दिवसातच मानवी प्रवृत्ती यापासून विटून जाईल. त्यांच्यात या जातीय परिस्थितीबद्दल घृणा निर्माण होईल. तसेच ही आर्थिक विषमता सुद्धा अनैसर्गिक आहे. ही पण फार दिवस मजबूत राहू शकणार नाही. या वर्गांमध्ये माणसाची वर्गवारी होणे अनैसर्गिक आहे. ही पण जास्त दिवस चालू शकणार नाही. अनैसर्गिक प्रवृत्ती जेव्हा फोफावते तेव्हा तर नैसर्गिक धर्माला फोफावण्याची संधी मिळते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा ज्या काळात जन्म झाला तो काळ असा होता जेव्हा मानवता आत्महत्या करण्यास पूर्णपणे सज्ज होती. जगात सर्वत्र अत्याचार, अन्याय आणि भेदभाव शिखरावर पोहोचलेला होता. जेव्हा अशी परिस्थिती उत्पन्न झाली तेव्हा इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची सोय झाली. देशातील सद्याची परिस्थिती सकृतदर्शनी आपल्याला आव्हानात्मक जरी वाटत असली तरी इस्लामचा संदेश पोहोचविण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. 
पाच वर्षापूर्वी देशाच्या जनतेने मोठ्या आशेने या लोकांची निवड केली होती. त्यामुळे सत्ताबदल झाला होता. नवीन सरकार आले होते. परंतु, आज परिस्थिती अशी आहे की, निराशा सगळ्या देशात पसरलेली आहे. या सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट होईल, अशी आशा निर्माण झाली होती. अन्यायसुद्धा समाप्त होईल अशी आशा लोकांनी केली होती. मात्र झाले भलतेच. अन्याय वाढला. देशाची प्रगती होईल याची खात्री होती. मात्र देशाची प्रगती खुंटलेली आहे. एवढेच नव्हे तर ती रसातळाला जात आहे. जेव्हा मोठ्या आशा आकांक्षा धाराशाही होतात तेव्हा त्यातून येणारी निराशासुद्धा मोठी असते. मग माणसं नवीन वाटा शोधण्यासाठी विवश होऊन जातात. नवीन दृष्टीकोणाची चाचपणी केली जाते. इस्लामचा संदेश पोहोचविण्याची याच्यापेक्षा चांगली संधी दुसरी कोणती असेल? 

क्रमशः

हल्ली मौसम बदलत नाहीत, मौसमासारखे
फितुरल्या पक्षांची कशी घ्यावी नोंद ?
सारे पहायचे, ऐकायचे की
डोळे उघडून सताड, बंद करून घ्यावे तोंड !

मुके-मुके राहून किमान चालवित रहावी लेखणी... मांडत रहावी जमेल तशी माणूसपणाची कहाणी. माणूसपणाच्या शहाण्या कहाण्या काही आठवड्यांपासून सगळीकडून उगवून वर येतायेत. मॉबलिंचिंगच्या निमित्ताने होणारे मोर्चे-बिर्चे, आंदोलकांच्या प्रामाणिक भूमिका, न्यायमागण्या... गावागावातला सहिष्णू सूर पुन्हा जागा होतोय... उशिरा जागलेल्यांनी आंदोलकांना रस्त्यावर लढणार्‍यांना शुभेच्छा देत, नेतेपणाच्या पदव्या बहाल करण्यात धन्यता मानली आहे. नव्या प्रश्‍नांचा सातत्याने भडीमार आक्रमण करतोय. माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटातला भूलभूलैय्या चकवा देतोय. आपण अजून चकव्यात बहुतेक!!
केतकी चितळेच्या धाडसी व्हीडीओवरून सगळ्या चिकित्सा संपवून थोर विचारवंत शांत झालेत. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येनंतरच वादळ शमलय. जायरा वसीमच्या खर्‍या (?) सीनेमा लाईन त्याग करण्याच्या गोष्टीला ऊधाण आलंय. तबरेेजला चोरच माणून ’हवा’ तेवढाच व्हीडीओ व्हायरल होतोय. पहूलखाँच्या मुलावरच चार्जशिट दाखल केली जातेय. गावागावात गौशाला उभारल्या जाताहेत. सगळाच मीडिया पाऊस पुरासारखा याच बातम्यांनी भिजून ओसंडतोय. आमीर खानच्या अ‍ॅम्बेसिडरपणाने शिवार जलयुक्त होताहेत.
अवेळी उशिरा पडतोय पाऊस भरपूर आणि सलग पेरणी सुरूय मुस्लिम द्वेषाची रितसर पिकं तरारून  येईलवर जहरमय गच्च लगडून. उद्या कदाचित कापली जातील पोरं कशाच्याही नावावर ’मुस्लिम’ असल्याच्या केवळ कारणावरून. त्यांनी गोंधळ बरकरार ठेवलाय. भुलून जाताहेत सर्वजण. तलाकवरच्या भल्या मोठ्या प्रश्‍नचिन्हाला द्यावं उत्तर की खोदत जावा इतिहास धर्म वगैरे किंवा लिंचिंगविरूद्ध ओरडाव जोराने रस्त्यावस्त्यांतून तर बेरोजगारीच्या प्रश्‍नावर भूत डोलू लागते सर्वत्र.
वाचताना जरी अवघड होत असेल काही समजणं तर केवळ दोन मिनीटे डोळे बंद करून दिवसभरातलं काहीही आठवा. एकतर सर्वत्र मुस्लिम प्रश्‍नांसाठीचा भ्रम दिसेल किंवा सरकारी उदात्तीकरणाच्या जाहिराती. 13 टक्के आरक्षणाने अभिनंदनाच्या वर्षावात आनंदित असणारा समाज बहुल तर पाच टक्क्यासाठी टक्केवारीच्या लाळघोटीत अडकलेला मुस्लिमांचा प्रश्‍न. बहुजनीपदराची उब होत समानतेचा पाढा बडबडणार्‍याला कोरस देणारे असे कितीजण? आर्टिकल 15 च्या निमित्ताने मुल्यात्मक चिकित्सा आणि शाब्दीक बडेजावपणा पण प्रत्यक्ष अन्यायाच्या वेळी, झगडण्यासाठी साथीला कोण?
मध्येच पर्यावरण रक्षणासाठीच्या 31 कोटी वृक्षारोपणाचा संकल्प आणि या हिरवाईतही भगव्या जर्सी घालून हारलेली मॅचची रंगीत चिकित्सा.
एवढं कसं काय एकाचवेळी ठरवून घडवलं जातं? आणि सगळ्यातून ’जात’मात्र सुटतासुटत नाही. भाषा, सौंदर्य, कला, साहित्य याही संवेदनाच्या भरवी क्षेत्रामध्ये धर्म-जात मानसिकतेच्या भक्कम जागा तयार झाल्या आहेत.
पावलोपावली, क्षणोक्षणी उन्मादाला सहनशीलतेचा सोज्वळ सनातनी मुखौटा चढवून पेश केलं जातंय. सत्ताधारी पक्षाच्या महिलानेत्या गलीच्छ शब्दांतून मुस्लिमांना धडा शिकवायचे अती हिंदूत्ववादी फंडे सांगते, आणि नाही  होत कसलीच कारवाई. जीवंत आहे लोकशाही, सेपरेट करून जात समुहाला. समांतर अशा अनेक प्रवाहांचे गुपचुप, कधी उघड काम सुरूय ध्रुवीकरण करण्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत. फॅसिझम वगैरे समकालीन चेहरा खूप सोज्वळ आहे. प्रत्येकांच्या नेणीवेतून तो ठळक होतोय. निवडणूक पूर्व आणि नंतर अशा सर्वच पक्षांच्या प्रचारांची भाषणबाजी लक्षात घेतली तरी ढोबळपणे काय समोर आहे, हे पटकन् लक्षात येतय.
दुःख जास्त याचं की भौतिक सुखाच्या गोष्टींप्रती वाढलेली श्रद्धा, एकूण माणूसघाणी नवश्रीमंती यातून सामान्य गरीबाची चेष्टाच होत आहे. समभावाच्या पातळीवर आर्थिक प्रबलता, पद, प्रतिष्ठा यांची शिरजोरी वरचढ आहे. सेक्युलॅरीझम सारख्या गोंडस शब्द जातीधर्मनिहाय उच्चभ्रू लोकांपर्यंत मस्त सिमित आहे. आडनावावरूनच केवळ मनुष्यबळ, पाठीशी उभ्या राहणार्‍या सामाजिक जातीसंघ संघटना यांची तुल्यता ओळखली जाते. अगदी वेचून निवडून ठेचायचे तर तुकड्यांनी शोकगीताच्या ओळी गायलाच हव्यात मोठ्या आवाजात एकट्याने. याच्यात समसमजावे आवाज मिसळत राहतीलच. शमिमा अख्तरचे पसायदान गायन ऐकताना, मोहम्मद रफीची जादू अगदी गडद होत जाते. बिस्मीलांची शहनाई किंवा तबल्याचा नाद नदीभरून वाहत राहतो जाणीवांच्या समुद्रापर्यंत.
जायराच्या कथित निर्णयाचे मतमतांतर मांडतानाही विनोदखन्ना ओशोमय आठवतात. नशिल्या केसेसमधून सुटलेली ममता कुलकर्णी साध्वी होण्याचा निर्णय घेते, त्याचं ही हसू येतंय. या सगळ्या उन्मादी वेळखाऊ उपद्रवी चर्चापेक्षा भिंती कोसळून गाडल्या गेलेल्या मजूर कामगारांच्या करून मृत्यूवर रडू यावं... डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देताघेताना डॉ.कफिल अहमदला सलाम करावं. सगळ्या कचाट्यातून सुटून जावं, धडपडत उभं रहावं. पावसाच्या एका थेंबाइतकी का असेना डोळ्यांतली ओल जीवंत रहावी. ओलाव्याची हिरवळ बहरून संवेदनाचा लळा लगावा.
हर जुर्म पे उठती है, उंगलीयाँ मेरी तरफ
क्या मेरे सिवा शहर में मासूम हैं सारे..??


- साहिल शेख
9923030668

पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लामच्या प्रगटनाच्या वेळी समाजामधील अनिष्ठ रूढी, परंम्परा, अनेकेश्वरवादी, अंधश्रद्धा, मूर्तिपूजेच्या विरोधात कार्य करीत असताना प्रचंड वाईट  प्रतिक्रिया समाजात व्यक्त होत होत्या आणि त्यावर मात करीत असताना मोठा त्रास पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांना झाला. पण त्यांनी धर्माचे कार्य सोडले नाही. या कार्यात अनेक लोकांनी सहभाग नोंदविला व ते कार्य चालू ठेवले. या कार्यात पुरूषांप्रमाणेच स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. शहीददेखील अनेक झाले. अम्मारची आई सुमैय्या (रजि.) इस्लामच्या  कार्यात शहीद होणाऱ्यांत प्रथमस्थानी होत्या. मागील विवरणावरून हे ध्यानी येते की धार्मिक कार्यात पुरूषांच्या बरोबर स्त्रियांचेही योगदान आहे.
कोणत्याही प्राण्याला जिवंत राहण्यासाठी जसे प्राणवायूची गरज असते तसे धर्माच्या कार्यात उपासनेला स्थान आहे. म्हणजे आपण जसे प्राणवायूशिवाय जिवंत राहू शकत नाही तसे  उपासनेशिवाय धर्माची उभारणी होत नाही आणि धर्म टिकावही धरत नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची आचारसंहिता आणि याच आचारसंहितेचे पालन करणे म्हणजे धर्माची ईश्वराची  उपासना करणे होय. प्रामाणिकपणे ईश्वराची केलेली उपासना ही ईश्वराच्या जवळ नेते. ईश्वराची उपासना जर निष्काळजीपणे खंडितपणे, केव्हातरी (सवडीनुसार) केल्यास ईश्वर आणि  भक्त यांच्यातील संबंध निर्बल होतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सर्वच्या सर्व पत्नी ईश्वराची प्रामाणिकपणे उपासना करणाऱ्यांमध्ये उल्लेखनीय आहेत. प्रत्येक स्त्री व पुरूषाने ईश्वराचे  भय बाळगून त्याची आराधना-उपासना केली पाहिजे. उपासनेत नमाजला अनन्यसाधारण महत्व आहे. नमाज अदा करताना काही नियम काटेकोरपणे पाळले जावेत. उदा. नमाज  निश्चित वेळेतच पढली जावी. आपली नमाज अवेळी होणार नाही याची काळजी घ्यावी. मग तो पुरूष असेल अथवा स्त्री. जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये स्त्रियांनी सामील झालेच  पाहिजे असे बंधन नाही. त्यांनी आपल्या सोयीनुसार घरी नमाज अदा करावी. नमाज सामुदायिक पठणावर जे लाभ होतात, ते एकट्याने नमाज अदा केल्याने होत नाहीत. म्हणून   स्त्रियांना जमाअतसह नमाज अदा करण्यापासून वंचित ठेवलेले नाही म्हणजेच स्त्रिया सामुदायिक नमाजसाठी मस्जिदमध्ये जाऊ शकतात. आज स्त्रियांच्या मस्जिदमध्ये येण्या- जाण्याबाबत प्रचंड संदेह निर्माण झाले आहेत, ते केवळ धार्मिक ज्ञानाच्या अभावाने.
मस्जिदमध्ये जाण्यासाठी जर परिस्थिती अनुकूल असेल व कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल तर स्त्रिया जाऊ शकतात. कोणताही पुरूष मग तो पिता, पती, पुत्र कोणीही असो तो  आपली मुलगी, पत्नी, आई कोणालाही मशिदमध्ये जाण्यास परवानगी मागितली तर तिला मनाई करू शकत नाही म्हणून काही मशिदमध्ये स्त्रियांसाठी काही जागा राखीव ठेवली आहे.  एवढेच नाही तर नमाज संपल्यावर स्त्रियांनी मशिदबाहेर अगोदर पडावे व नंतर पुरूषांनी बाहेर यावे. स्त्रियांना मशिदमध्ये येण्यास काहीही हरकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यांनी  (सवलतीसाठी) नमाज घरीच अदा करणे जास्त उत्तम, असेही कथन आहे. एवढेच नाही तर पैगंबरांनी विशेष नामस्मरणाचादेखील उपदेश केला आहे. उदा. दिवसभर काम-धंदा, नोकरी,  कष्ट, मेहनत, कार्य करून रात्री थकवा आलेला असतो, तेव्हा आपण 33 वेळा ’सुबहानल्ला’, 33 वेळा अलहम्दुलिल्लाह व 34 वेळा अल्लाहु अकबर हा जप जपून नामस्मरण करा.   त्याचबरोबर दैनंदिन जीवन जगताना जेव्हा एखादी सुंदर, चांगली, सुरेख, उत्तम वस्तू वा बाब निदर्शनास आली तर मुखातून ’सुबहानल्लाह’ उच्चारून कृतज्ञता व्यक्त करा. अर्थात हे  सर्व निर्माण करणारा ईश्वर यापेक्षा कितीतरी चांगला आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, कितीतरी चांगली आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, विहंगम  दिसली तर आपण ’अल्लाहु अकबर’ उच्चारून हे सर्व निर्माण करणारा याच्यापेक्षा परमेश्वर मोठा आहे की कृतज्ञता व्यक्त करावी, तीही समस्त स्त्री-पुरूषांनी. ईश्वराच्या या उपासनेने  व्यक्तीच्या बळात व कार्यशक्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होते व आपल्यामध्ये चांगुलपणा आपोआप निर्माण होतो. या नामस्मरणावर विश्वास ठेवला तर अल्लाह आपले रक्षण करतो,  म्हणून व्यक्तीने मग ईश्वराचे स्तवन कितीही केले तरी ते कमीच आहे.
इस्लाममध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजा म्हणजे केवळ अन्नपाण्याशिवाय विशिष्ठ कालावधीपर्यंत उपाशीपोटी राहणे नाही तर शरीराच्या असंख्य अवयवांचाही रोजा  असतो. उदा. जीभ, डोळे, हात, कान, पाय, नाक अशा अनेक अवयवांचा रोजा असतो. वाईट बोलू नये, कोणाची चहाडी-चुगली करू नये, शिव्या-शाप देऊ नये, हा जिभेचा रोजा आहे.   डोळ्यांनी वाईट कृत्य पाहू नये, तर कानांनी चांगलेच ऐकावे, हाताने परोपकाराचे कार्य करावे, लाचलुचपत घेणे-देणे करू नये. असे अनेक प्रकारचे रोजे आहेत. त्याविषयी आपणास  सविस्तर ज्ञात आहेच. रोजा वर्षाच्या बारापैकी एक पवित्र महिना ’रमजान’मध्ये पकडला जातो. रोजा सर्वांना (स्त्री-पुरूष) अनिवार्य आहे. रोजा केवळ ईश्वराची आराधना म्हणून पकडला  जात नाही तर वर्षातील उर्वरित अकरा महिने (रमजान वगळून) समाजात आपण कसे जगावे याचे प्रशिक्षण आहे. इस्लामने सदाचारी जीवन जगण्यासाठी वर्षातून एकदा एक महिन्याची  रोजारूपी परीक्षा ठेवी आहे. प्रत्येक स्त्री-पुरूष जाणते झाल्यापासून रोजा अनिवार्य आहे. या उपवासात फक्त आणि फक्त गरोदर महिलेस सूट आहे. तसेच एखादी वयस्कर स्त्री असेल  आणि तिच्यात रोजा धरण्याएवढीही ताकद नसेल तर मात्र त्यापासून तिला सूट मिळू शकते. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरूष) जर ऐन रमजान महिना चालू असताना आजारी पडली व  ती रोजे नाही धरू शकली तर तिने ईद झाल्यानंतर आपले चुकलेले रोजे पुन्हा कधीही करायचे, ही अनिवार्यता आहे. रमजानच्या रोजाप्रमाणेच नफील (अतिरिक्त) रोजे ही धरले जातात.  नफील रोजे हे अनिवार्य नाहीत तर ते अनुयायांच्या मर्जीचे आहेत. ते रमजान वगळता उर्वरित अकरा महिन्यांत केव्हाही केले जाऊ शकतात. हे रोजेदेखील रमजानच्या रोजाप्रमाणेच  पवित्र असतात.

इस्लाममध्ये दानधर्म
अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास महत्व दिले आहे. पवित्र कुरआनमध्ये नमाज व रोजानंतर अल्लाहच्या मार्गातील खर्च-जकात (अडीच टक्के) याला महत्व देण्यात आले आहे. जकात  हे इस्लाममधील कायदेशीर तत्व आहे. ज्याप्रमाणे नमाज पढत असताना अनुयायाचे मन, मनगट, मस्तक, मनका, मान, हृदय, तसेच शरीराचे सर्व अवयव अंगप्रत्यांग ईश्वरासमोर  नतमस्तक आहे. त्यांच्यावर ईश्वराचाच अधिकार आहे. कारण ईश्वराने आपणास ते बहाल केले आहे. तसेच आपल्याजवळ असणारी संपत्ती, पैसा, सोने, मौल्यवान वस्तू याचीही  निर्मिती अल्लाहनेच केली आहे. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या मालमत्तेवरील अडीच टक्के रक्कम दानधर्माच्या कार्यात (जकात) खर्च केलीच पाहिजे. त्यामुळे ही मालमत्ता आपली  नाही ती ईश्वराची आहे असा तो अनुयायी समजतो. अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या अनुयायांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे, ’’निःसंशय दानधर्म करणारे  पुरूष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि अशा अनेक बाबींचा विचार करून विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिल्याचे हदीसमध्ये जाणवते.
इस्लाम सांगतो की आपल्याजवळ जे आहे त्यातील उदरनिर्वाहासाठी खर्च करून जे शिल्लक राहते ते गरीबांना वाटा. जे तुम्ही इतरांना वाटाल तेच तुमच्या नावावर शिल्लक राहणार  आहे. याचा दाखला आपणास पुढील प्रसंगातून मिळतो.
माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ’’आम्ही एकदा बकरी कापली आणि वाटून टाकली.’’ पैगंबरांनी विचारणा केली, ’’त्यापैकी काही शिल्लक आहे का?’’ ’’केवळ फरा उरलेला आहे.’’  माननीय आएशा (रजि.) म्हणाल्या. पैगंबर म्हणाले, ’’असे म्हणा, फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’
याचा मतितार्थ, आपल्याजवळील असणारे आपल्या गरजा भागवून उरलेले इतरांसाठी द्या. आपण जे स्वतःसाठी शिल्लक राखून ठेवतो ते आपल्यासाठी राहत नाही तर आपण जे  इतरांसाठी खर्च केले आहे. इतरांना वाटले आहे; तेच आपल्यासाठी पुण्यकर्मात शिल्लक राहते. व्यक्ती जे दानधर्म करते तेच त्याच्यासाठी राहते आणि ते पुण्य वाया जात नाही. वाया  जाते ते जे आपण खाऊन-पिऊन संपवतो. ज्याप्रमाणे श्रीमंत दानधर्म करतात, त्यांच्यासारखे दानधर्म आपण करू शकत नाही ही भावना गरिबांची असते. त्यावेळी त्यांना उद्देशून पैगंबर  उपदेश करतात,
’’दान लहानात लहान वस्तुचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की गरजूची खरी गरज पूर्ण होत नसेल, पण प्रसंगी त्याला आधार मिळू शकतो.’’
माननीय आएशा (रजि.) यांनी सांगितले, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ’’खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे तो उपयोगी पडतो त्याप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’
दान किती लहान आणि किती मोठे याला किंमत नाही, तर दान देऊन दुसऱ्याची गरज भागविण्याचा विचार किंमतीचा. आपल्या नरकयातना थांबवण्यासाठी किंवा नरकापासून दूर   राहण्यासाठी दानधर्म महत्त्वाचा. दानधर्म न करणे ही एक प्रकारची विकृती आहे. समजा, आपण उपाशी असताना जेवण करणे ही ’प्रवृत्ती’, तर आपण पोटभर खाल्लेले असतानाही  पुन्हा खाणे ही ’विकृती’ आहे आणि आपण उपाशी असताना आपल्या भाकरीतील आर्धी भाकरी दुसऱ्याला देणे ही ’संस्कृती’ आहे. म्हणजेच जे आपण खातो ते संपून जाते आणि जे  आपण देतो ते आपल्यामागे शिल्लक राहते. स्त्रियांना उद्देशून पैगंबर सांगतात, ’’याचकाला दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका.’’ घरात काहीही नसेल तर करपलेले अन्न का असेना  त्याला द्या. दानधर्म केल्याने अल्लाहकडून त्याचा दुप्पट मोबदला मिळतो. आपण आपल्या कमाईतील रक्कम जशी बाहेरच्या व्यक्तीवर खर्च करतो तशी घरातील व्यक्तीवर खर्च  केल्यानेही पुण्यप्राप्ती होते. पैगंबर एकेठिकाणी म्हणतात (माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन),
’’ हे मुस्लिम स्त्रियांनो, तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये, जरी शेळीची खुर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’
तात्पर्य असे की प्रत्येक मुस्लिम स्त्रीने आपल्या शक्तीनुरूप आपल्या शेजारणीला मदत केलीच पहिजे. इस्लामने दानधर्म करणे हे धार्मिक कार्य संबोधले आहे. दानमर्ध करून आपण  आपल्या स्वतःसाठी स्वर्गाची दारे खुली करून घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यातील दानधर्मातून स्वर्गात प्रवेश करू शकतो. जी स्त्री पाचवेळा नमाज पढते, ईश्वराची आराधननाम  स्मरण करते, आपल्या पतीची आज्ञा पाळते ती स्वर्गाच्या ज्या द्वारातून जाऊ इच्छील तिला प्रवेश मिळेल. इस्लाम ज्या स्तंभावर उभारलेला आहे त्यापैकी एक आधारस्तंभ म्हणजे  हज होय. ’हज’ विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. हजबरोबरच (हज्जच्या वेळेव्यतिरिक्त) ’उमरा’मध्येही जवळजवळ हजसारखेच विधी अदा  करण्यात येतात. हज आणि उमरा याची प्रचंड मोठी महानता आहे. हजयात्रा इस्लामच्या जीवनातील सर्वात शेवटचे व सर्वात उच्च असे धार्मिक कार्य संबोधले आहे. प्रत्येक मुस्लिम  स्त्री-पुरूषाच्या जीवनाचे हजयात्रा एक अत्यंत पवित्र ध्येय समजले आहे. हजची यात्रा म्हणजे जिहाद (धर्मयुद्ध) होय. यावरून माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना  विचारले,’’ आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ पैगंबरांनी सांगितले, ’’तुम्हा स्त्रियांसाठी सर्वात चांगला व सुंदर जिहाद ’हज्जे-मबरूर’ (स्वीकृत हज) आहे.’’  इस्लामने इतर समाजव्यवस्थेप्रमाणे अथवा धर्मव्यवस्थेप्रमाणे स्त्री-पुरूष असा मतभेद करून दोघांसाठी वेगवेगळी आचारसंहिता बनविली नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांबरोबर स्त्रियांना मान- सन्मान दिला व जीवन जगण्याची एकच आचारसंहिता बनविली. हजयात्रा जेवढी पुरूषांच्या जीवनात महत्त्वाची सांगितली तेवढीच स्त्रियांनादेखील महत्त्वाची आहे. हजयात्रा अल्लाहच्या  काबागृहाची यात्रा स्त्रियांसाठी सर्वांत सुंदर जिहाद आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी जेव्हा अंतिम हजयात्रा (हज्जतुलविदाअ) केली, तेव्हा त्यांच्याबरोबर दहा हजार सोबतीही होते.  एवढेच नव्हेतर त्या महिला सोबतींमध्ये आजारी, गर्भवती व मुलेबाळे असणाऱ्या महिलांचाही समावेश होता. जी स्त्री आपल्या लहान मुलाची हजयात्रा करवून घेईल, तेव्हा त्याचे पुण्य  नक्कीच तिच्या पदरात पडणार आहे. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे याचा आदेश दिला आहे. हजयात्रा स्वतःही करता येते व ती मजबूरी  असेल तर दुसऱ्याकडूनही करवून घेता येते. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, जुहैना टोळीची एक स्त्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाली, ’’माझ्या आईने हजला जाण्यास नवस केला होता, परंतु हजयात्रा करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, तर तिच्या वतीने मी हजयात्रा करू शकते का?’’ यावर पैगंबरानी सांगितले, ’’तिच्यातर्फे तुम्ही हजयात्रा करू शकता. जर तुमच्या आईवर कर्ज असते तर तुम्ही ते अदा केले नसते का? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे. त्याचे कर्ज अदा केले जावे.’’- (’इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री’ इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबईने प्रकाशित केले आहे. त्यातील हे लेख. ज्या वाचकांना लेखकाशी भेटण्याची इच्छा आहे त्यांनी 8030273038 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विदेशी व देशी माध्यमांनी भारतातील अल्पसंख्याकांबद्दल विशेषत: मुस्लिमाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांची धास्ती तशी रास्त होती. ही भिती  भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील वादग्रस्त कार्यकाळाशी संलग्न होऊन आलेली होती. विजयानंतर मोदी सरकारवर अवघ्या जगाची नजर लागली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी  आपल्या पहिल्या भाषणातच अल्पसंख्याक समुदायाच्या हिताच्या रक्षणाची हमी दिली आणि जगाचे लक्ष आपल्याकडे वळवून घेतले. मुसलमानांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मागचे सरकार  काळवंडले होते, त्यांना चुचकारण्याची भूमिका मोदींनी घेतली होती.
२०१४ साली मोदींनी संसदेत पंतप्रधान म्हणून आपलं पहिलं-वहिलं भाषण दिलं. त्या वेळी त्यांनी अल्पसंख्यांकाना विकास प्रक्रियेत मागे ठेवता येणार नाही, असे म्हणत मुस्लिमांबद्दल  सहानुभूती दर्शवली होती. मदरसा शिक्षण पद्धतीत आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी या भाषणात केला होता. तसं पाहिलं तर मोदींच्या आताच्या व पूर्वीच्या भाषणात फारसा वेगळेपणा आढळत नाही. पंतप्रधान  म्हणून पहिलं भाषण असल्याने साहजिकच दोन्ही वेळी जागतिक मीडियाचं लक्ष मोदींकडे लागलं होतं. त्यामुळे त्यांनी अतिशय विचारपूर्वक दोन्ही  वेळा भाषणे दिली. २०१४ नंतर भारतीय मुसलमानांसोबत काय झालं हे अवघ्या जगाला माहीत आहे. त्याची पुन्हा उजळणी नको. कारण कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच  होणार. त्यातून नवनिर्मिती शक्य नाही. त्यामुळे ‘बीती बातों को भुलाकर नवी पहाट शोधू या.’ या उक्तीप्रमाणे मोदींच्या या घोषणेकडे मुस्लिम समुदाय पाहात आहे. पंतप्रधान मोदींनी  एकापाठोपाठ एक अशा मुस्लिमांच्या कल्याणासाठी योजना जाहीर केल्या. त्यात मुस्लिम विद्याथ्र्यासाठी ५ कोटींची स्कॉलरशीप, मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना आणि  मदरशांचे आधुनिकीकरण होतं.
भाजपविरोधी राजकीय पक्ष याला ‘मुस्लिमांचा अनुनय’ म्हणून त्याविरोधात प्रचार करणार नाहीत. त्यामुळे यंदा या योजना शेवटच्या थरापर्यंत जातील अशी आशा बाळगण्यास हरकत  नाही. प्रथमदर्शनी सरकार मुस्लिमांसाठीच्या वरील योजनाबद्दल अभिनंदनास पात्र आहे. गेल्या पाच वर्षांतील मुस्लिमांच्या सामाजिक सुरक्षेवर घाला घालणाऱ्या भाजपकडून उशीरा का  होईना मुस्लिमांच्या संविधानिक अधिकारासाठी कल्याणकारी उपक्रम सुरू केलेला आहे. पण हा विश्वासघात ठरू नये अशी अपेक्षा तुर्तास करता येईल.
वास्तविक, या योजना नव्या वाटतील पण खरे सांगायचे झाल्यास त्या जुन्याच आहेत. २०१४ साली सत्तेवर येताच भाजप सरकारने मदरसा आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात तब्बल  १०० कोटींची तरतूद केली. दुसरीकडे २०१८ साली सरकारने पदवीधर मुस्लिम मुलींच्या लग्नासाठी ५१ हजार रुपयांची भेट म्हणून ‘शगुन योजना’ सुरू केली होती. दोन्ही तरतुदी कागदी  घोषणातून बाहेर आल्या नाहीत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मदरसा शिक्षकांनी थकित वेतनासाठी आंदोलन केलं होतं. (आठ दिवसांपूर्वी पुन्हा याच मागणीसाठी दिल्लीत  आंदोलन झालेलं आहे.) गेल्या अडीच वर्षांपासून कुठलेही वेतन मिळाले नसल्याचा आरोप या वेळी आंदोलकांनी केला होता. तर दुसरीकडे शगुन योजनेचे काय झालं कुणालाही माहीत  नाही. सुधारणांची गरज २००५ मध्ये यूपीए सरकारच्या काळात मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षाणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी न्या. राजेंद्र सच्चर आयोगाची स्थापना  झाली. वर्षभरात समितीने आपला रिपोर्ट सरकारला सादर केला. मुस्लिमांची सामाजिक अवस्था दलितांपेक्षा वाईट असल्याचे निरीक्षण अहवालातून नोंदवण्यात आलं. त्यानंतर तत्कालीन  पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एका बैठकीत देशाच्या प्रगतीवर मुसलमानांचा हक्क आहे. त्यांच्या प्रगतीसाठी नावीन्यपूर्ण योजना आखल्या पाहिजेत, असा सुतोवाच केला. सरकारच्या या  घोषणेनंतर दिल्लीत भाजपची बैठक झाली. बैठकीतून बाहेर पडताच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकार मुस्लिमांचा अनुनय करत आहे, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही, अशी घोषणा करत त्यांनी सरकारच्या निवेदनावर हल्ला चढवला. परिणामी, सरकार बिचकले आणि अल्पसंख्याकांच्या प्रगतीची आशा मावळली. आयोगाच्या शिफारशी फायलीत अडकून पडल्या.
तत्पूर्वी २००६ मध्ये सरकारने अल्पसंख्याकांच्या  कल्याणासाठी १५ सूत्री कार्यक्रम तयार करून तो लागू करण्याची घोषणा केली. त्यानुसार सरकारकडून मदरसा आधुनिकीकरणाची  प्रक्रिया सुरू झाली. मदरशांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडून त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याची ही योजना होती. यातून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर आणि आधुनिक  तंत्रज्ञानाचे शिक्षण तसंच मदरसा शिक्षकांना मानधन मिळणार होतं. सुरुवातीला अनेक धार्मिक संघटनांनी या योजनेला विरोध केला.
आधुनिकीकरणातून सरकार धार्मिक शिक्षणात हस्तक्षेप करू पहात आहे, असा आरोप देवबंद पीठासारख्या संस्थेनेदेखील केला. मात्र, अनेक बुद्धिवादी व संघटनांनी या योजनेचे स्वागत  केलं. केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्यामुळे आर्थिक हलाखीत सुरू असलेल्या मदरशांचे अनेक प्रश्न सुटणार होते. तसंच पारंपरिक शिक्षण प्रणाली बाजूला होऊन आधुनिक व व्यावसायिक  दृष्टिकोन विकसित करणारी शिक्षणप्रणालीचा संचार त्यात होणार होता. हळूहळू करत काही मदरशांनी सरकारचे धोरण स्वीकारले. केंद्र सरकारकडे नोंदणी केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षकांना १२ हजार, तर ग्रॅज्युएट शिक्षकांना ६ हजार प्रतिमाह मानधन देण्यात आले. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षणासाठी लागणारे साहित्यदेखील सरकारकडून पुरवण्यात आले. गेल्या  १५ वर्षांत ‘मदरसा आधुनिकीकरण’ योजना एक महत्वाचा टप्पा ठरली आहे. योजनेमुळे मदरशांमध्ये व्यावसायिक व तंत्रज्ञानाचं शिक्षण सुरू झालं. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना  रोजगाराची दारे खुली झाली आहेत. पण जागतिक पातळीवर सुरू असलेल्या स्पर्धेला मात्र ही शिक्षणप्रणाली कुठेच तोंड देऊ शकली नाही. मुळात, मदरशांमधील पारंपरिक धाटणीची  शिक्षण प्रणाली बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु धर्मपीठाने ही मागणी नाकारत तीच शिक्षण प्रणाली सुरू ठेवली त्यामुळे मदरशांना संशयाने पाहिले जाऊ  लागले. भाजप व संघ परिवाराने मदरशांना नाहक बदनाम केले. त्यातून सर्वसामान्यांमध्ये मदरशांबद्दल अनामिक भीती तयार झालेली आहे. ज्यात कुठलीच तथ्यता नाही, असा अहवाल  भाजप सरकारने २०१४ मध्येच दिलेला आहे.
मदरसा स्थापनेची गरज १८३६ मध्ये इंग्रजांनी  मॅकालेची शिक्षणपद्धती लागू केल्यानंतर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये चलबिचल सुरू झाली. सांस्कृतिक आस्मितेसाठी दोन्ही समुदायात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला. हा काळ भारतीय राजकारणात खूप अस्वस्थतेचा होता. ब्रिटिशविरोधाची ठिगणी पडायला सुरुवात झाली. उलेमांनी ब्रिटिशांची सत्ता नाकारत बंड केले.  ब्रिटिशांनी हा १८५७चा उठाव रक्तरंजित हिंसा घडवून मोडून काढला होता. दिल्ली-उत्तरप्रदेश प्रातांत अनेक उलेमांना फासावर लटकवण्यात आले. अशा घटनांनी देशभरात हाहाकार  माजत होता. त्यातून सर्वांनी एकत्र यावे, असा विचार मांडण्यात येऊन छोट्याछोट्या शिक्षण संस्थाची पुणर्बांधणी सुरू झाली. ब्रिटिशांच्या वरदहस्त असलेल्या मिशिनरीच्या प्रचाराची भीती सतावत होती. आपली धार्मिक ओळख नष्ट होऊ नये, याची धास्ती धर्मवाद्यांना वाटू लागली. त्यातूनच ३० मे १८८६ला हाजी आबिद हुसैन व मौलाना ़कासिम नानौतवी यांनी  ‘दारुल उलूम देवबंद’ नावाशी धार्मिक शिक्षण संस्था सुरू केली. आज ते ‘देवबंद विद्यापीठ’ म्हणून ओळखलं जातं. हे विद्यापीठ इजिप्तमधील ‘अझहर विद्यापीठा’नंतर जगातील सर्वात  मोठे धार्मिक विद्यापीठ आहे. ‘मदरसा’ हा अरबी भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ ‘शिक्षणाचं केंद्र’ असा होतो. प्रत्यक्षात हे मदरसे तीन विभागात मोडतात. प्राथमिक शिक्षण देणाऱ्या  मदरशांना ‘मकतब’ असे म्हणतात. इथे इस्लाम धर्माची मूलभूत ओळख, अरबी भाषेचे ज्ञान दिले जाते. मध्यम श्रेणीच्या मदरशात ‘कुरआन’ आणि त्याची व्याख्या, हदीस इत्यादी शिकवले जातात. यापुढे उच्च शिक्षण ज्यास ‘मदरसा आलिया’ म्हणतात. हे पदवी आणि पदव्युत्तर समकक्ष असतात. मदरसा अभ्यासक्रमाला ‘दर्से-निजामिया’ म्हटलं जातं. याची रचना  अठराव्या शतकात ‘मुल्ला निजामी’ नावाच्या प्रसिद्ध विद्वानाने केली होती. मदरसा शिक्षण  पद्धतीत प्रमुख्याने पुढील विषय शिकवले जातात. अख्लियत (शिष्टाचार), इल्मेहिसाब  (संख्याशास्त्र), बहिखात (व्यवहार), फेन जराअत (कृषि), इल्मे हिंदसा (गणितशास्त्र), माशियात (अर्थशास्त्र), इल्महय्यत (खगोलशास्त्र), मन्तिक (तर्वâशास्त्र), तारीख (इतिहास), व्याकरणशास्त्र, चिकित्सा, अलजेब्रा, फने इंतजामी, मुल्की असे विषय अभ्यासले जात. या मदरशांतून तज्ज्ञ इंजिनिअर, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, डॉक्टर, इतिहासकार,  साहित्यिक, लेखक, विचारवंत तयार झाले. प्राचीन काळी अरबांनी याच ज्ञानाच्या जोरावर जगाला ज्ञानी बनवलं. भारतात राजा राममोहन रॉय, बाबू राजेंद्र प्रसाद, सर सय्यद अहमद  खान, मौलाना आझाद, मौलाना शिबली, जाकिर हुसेन आदी विचारवंत व समाजसुधारक मदरसा शिक्षण पद्धतीतून बाहेर पडलेले विद्वान होते. परंतु नंतरच्या काळात संसाधनाची  कमतरता असल्यामुळे मदरशांनी केवळ धार्मिक शिक्षण देणे सुरू केलं. या मदरशांत प्रामुख्याने इस्लामी तत्त्वज्ञान, कुरआन, हदीस, कुरआनच्या वचनांवर (अयात) भाष्य मदरसा  शिक्षणात अभ्यासणे सुरू झालं. अशा मदरशांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा असल्यामुळे त्याची लोकप्रियता अल्पावधीत वाढली. फाळणीनंतर निराधारांना आश्रय देण्याचं काम या  मदरशांनी केले. अशा पद्धतीने सामाजिक गरज म्हणून या मदरशांकडे पाहिलं गेलं. ही वृत्ती आजपर्यंत कायम आहे.

बदलांची गरज
आज ही परिस्थिती पूर्णत बदलेली आहे. गरीब आर्थिक मागास घटकांतील मुलं या मदरशांमध्ये शिकवणीसाठी पाठविले जातात. श्रीमंत घरातली मुले इंग्रजी शाळेत जातात. मुलांची  राहण्याची व खाण्याची सोय होईल म्हणून गरीब पालक आपल्या लहान मुलांना मदरशांमध्ये पाठवतात. ५-७ वर्षे मदरसा शिक्षण घेऊन विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो, त्या वेळी तो  जगातील अजस्र स्पर्धेशी मुकाबला करू शकत नाही. परिणामी त्याचे धार्मिक शिक्षण जगाशी सामना करताना अपुरे पडते. शेवटी तो पोटापाण्यासाठी पडेल ते काम स्वीकारतो. मदरसा  आधुनिकीकरणामुळे या पारंपरिक शिक्षणपद्धतीला नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे. व्यावसायिक शिक्षण सुरू झाल्याने किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला चालना मिळाली  आहे. कॉम्प्युटर, टेलरिंग, काशिदकारी, टायपिंग, काही प्रमाणात यंत्रकाम मदरशांमध्ये सुरू झाले. पण अशा प्रकारचे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या मदरशांची संख्या खूप कमी आहे.  बहुतेक मदरसे धार्मिक शिक्षणावर भेर देतात. त्यातून विद्यार्थ्यांना अल्प उत्पन्न गटातील रोजगार मिळणेही जिकीरीचे असते. त्यामुळे मदरशांची पारंपरिक शिक्षणप्रणाली बदलण्याची 
मागणी सुरू आहे.
देशातील एकूण मदरशांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. पण ही संख्या २५ हजारांपेक्षा जास्त मानली जाते. भारतातले काही मदरसे आमूलाग्र पद्धतीने बदलले आहेत. काही मदरसे  स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र चालवित आहेत. तर काहींनी एमबीए, मेडिकलसारखे उच्च पातळीवरील व्यावसायिक शिक्षण सुरु केले आहे. महाराष्ट्रातील अक्कलकुव्वामधील  कॅम्पसमध्ये कॉमर्स, विज्ञानपासून ते फार्मसीपर्यंत उच्चशिक्षण दिलं जातं. पण हा विकास संथ गतीने सुरू आहे. शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना प्रचंड संसाधने जवळ बाळगून  असलेली हे मदरसे व्यावसायिकदृष्ट्या बदलण्याची गरज आहे. आज बहुतेक मदरसे धार्मिक शिक्षणापुरते बंदिस्त झाले आहेत. ज्यातून धर्मतत्त्वज्ञानासारखे मूल्यशिक्षण मिळते पण  रोजगाराची साधने नाहीत. मूल्यशिक्षणातून नैतिकता जोपासली जाते पण रोजगारासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणच महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आज बदलत्या काळात  मुस्लिम समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वत:हून मदरसा शिक्षण प्रणालीत रोजगार देणारे शिक्षण सुरू करण्यावर  भर द्यावा. सरकारही अशा मदरशांना समांतर पातळीवर शाळा व कॉलेज म्हणून विकसित करू शकते. त्यासाठी नवीन संसाधने निर्मिती करण्याची गरज सरकारला पडणार नाही.
(लेखकाच्या ब्लॉगवरून)

३) बोअरवेल लहानपणी आम्ही एक गोष्ट ऐकली होती एका म्हातारीची, जी लोभापायी रोज तिला सोन्याचे अंडे देणाऱ्या आपल्या कोंबडीला एकदाच सर्व अंडी मिळविण्याच्या वेडसर  हेतूने कापून टाकते. दर काही फुटांवर बोअरवेलचे ड्रिलिंग करणारांचे अकलेचे तारे तुटलेल्या अशाच लोभी म्हातारीचे उदाहरण आहे. इतर देशांत बोअरवेल ड्रिलिंग एक कठीण कार्यप्रणाली  आहे तर भारतात त्यासाठी फक्त एक फोन कॉलची गरज आहे. एका कॉलवर जमीन फाडण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा दहा-दहा पैलवानांसोबत येऊन पोहोचतो. आता आपली मर्जी की आग  उफाळून येईपर्यंत का होईना आपले खोदकाम चालू ठेवा. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन वर्षापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने नोंद घेतली आणि प्रशासनाला हुकूम दिला की ग्राउंड  वॉटर इतिहास जमा होण्यापूर्वी प्रशासन कठोर कायदे बनवील आणि त्याची कडक अंमलबजावणी करील. बोअरवेल जमिनीमध्ये आत जाऊन स्ट्रॉसारखे रास्त पाणी खेचायला सुरुवात  करतात. परिणामी या भूजलापासून पाणीमय नवचैतन्य मिळवणारा जमिनीतील सछिद्र भाग सुकत चालले आहे. जेव्हा बोअरवेलच्या एका छिद्रचे पाणी सुकते तेव्हा ही हुशार अक्कल  आणखी ड्रिलिंग करण्यास प्रवृत्त करते आणि तेच घडते जे उच्च न्यायालयाने अनुमान लावला आहे. तामिलनाडूचे शहर तिरुचंगोड बोअरवेल इंडस्ट्रीजचे मुख्य केंद्र आहे, येथे बोअरवेल  ड्रिलिंगसाठी ४००० मोठे रिगस् (मशीनयुक्त ट्रक) आहेत जे भारतभर फिरून फिरून जमिनीची चाळणी करतात आणि प्रत्येक वर्षी अशा रिगस्मध्ये ५०० ते १००० नवीन रिगस्ची भर  पडते. एक कोटी रुपयांचे हे ड्रिलिंग रिगस् ३ ते ४ वर्षात आपली मूळ किंमत वसूल करून पुढील १० वर्षासाठी नफा देत राहातात. एक रिगस् इतर राज्यात सरासरी २०० ड्रिल करतात  तर महाराष्ट्रात हे प्रमाण ५०० इतके आहे. इकॉनमिक टाइम्सनुसार मराठवाड्यात दरमहिन्यात १०००० बोअरवेल खणल्या जातात. बोअरवेल आणि त्यांच्या पर्यावरणीय विध्वंसक  कार्यवाहीबद्द्ल जागरूकता, स्पष्ट कायदे, नियंत्रण आणि यांची अंमलबजावणी या सर्वांची आज अत्यंत गरज आहे. बोअरवेलच्या ड्रिलिंगला पुण्यप्राप्तीचे मोठे माध्यम म्हणूनदेखील  मान्यता आहे आणि अशा शुभ चिंतकांची पण काही कमी नाही जे धार्मिक स्थळांच्या एका बोअरवर संतुष्ट न होता आणखी दोनचार ड्रिलिंगचा आग्रह करतात. तरी हे पण सत्य आहे  की सामाजिक पातळीवर कठोर निर्णय घेतल्याशिवाय वैयक्तिक पातळीवर बोअरवेलवर नियंत्रण शक्य होणार नाही, पण केरळसारखे जनतेच्या सहभागातून बोअरवेलच्या पर्यावरणीय  समस्येतून मुक्ती सहज शक्य आहे.

४) सामंजस्याची कमतरता
वरील मुद्द्याऐवजी आणखी सुद्धा अनेक कारणे असू शकतात पण सामाजिक सामंजस्याची ढासळण हा प्रमुख कारण म्हणुन समोर येतो. पूर्वी अशा भयंकर दुष्काळाची तीव््राता  नसताना देखील सामाजिक शिकवण कशी मोलाची होती की, एकदा पैगंबर मुहम्मद (स.) आपले अनुयायी सऊद (रजि.) यांना वुजू (नमाजपूर्वी हातपाय धुणे) करताना पाण्याचा जास्त  वापर करताना पाहून विचारतात की, ‘हे सऊद हे काय वायफळ खर्च (अत्याचार) आहे?’ ह़जरत सऊद म्हणतात, ‘हे पैगंबर (स.), काय वुजूमध्ये पण पाणी वायफळ खर्च होण्याचा  अंदाज आहे?’ यावर पैगंबर मुहम्मद (स.) उत्तरतात की, ‘होय जर का तुम्ही वाहणाऱ्या नदीच्या काठावर का बसलेले असला तरी पाणी कमी वापरा.’ (हदीस : मसनद अहमद बिन  जंबल, इब्ने माजा)
दुर्दैव असे की सर्वात मोठ्या लोकशाही देशात साक्षर नागरिकांच्या बहुसंख्येला हे माहितच नाही की त्यांच्या हक्काच्या संसाधनासोबत काय दुष्कृत्य होत आहेत. त्यात भर म्हणजे  विकाऊ मीडियाच्या चक्रव्यूह आणि सांप्रदायिकतेच्या बनावटी दंगलीने लोकांना हिंस्र बनविण्याचे काम केले आहे. केरळमधील सॉलिडेटरी यूथ मूवमेंट आणि इतर सामाजिक संघटनांनी  मिळून प्लाची माडा येथे जिवंत व जागृत चळवळीचे उदाहरण नोंदविले आहे. कोकाकोलाने नेहमीप्रमाणे आपल्या प्लांटच्या जमिनीला बेताज राजा मानून बोअरवेल ड्रिलिंगची सिरी़ज सुरु  केली तेव्हा जागृत आणि बुद्धिमान लोकांनी यावर विरोध दर्शविला, हा विरोध सामाजिक विरोध बनायला वेळ नाही लागली, मग चळवळीने असा जोर पकडला की बीबीसीच्या फेस द  फॅक्ट चा मथळा बनून गेला. पाणी संसाधनाचा गैरवापर व जनतेच्या हिताला तडा पोहोचविण्याची तक्रार घेऊन जनतेने या प्लांटचा रस्ता अडवून ठेवला, ही चळवळ अशी उभी राहिली  की जगभरातून लोक याच्या पाठिंब्यासाठी उतरले, प्लाची माडा येथे ६ दिवसीय इंटरनॅशनल वॉटर कॉन्फरन्स झाली, ज्यात ठळकपणे डिक्लेरेशन जारी केले
गेले ---
"water is not a private property, not a commodity" but a common resource and a fundamental right."एवढेच नव्हे तर येथे सर्व जनतेचा सामूहिक निर्णय आहे की कोणी बोअरवेल नाही खोदणार,  बोअरवेलऐवजी विहिरीतून पाण्याची गरज भागविली जाईल जे एक फायद्याचे काम ठरेल. मुंबईचे वृद्ध नागरिक 'आबेद सुरती' यांनी गळत्या पाण्याने होणाऱ्या लाखो लिटर पाण्याची  चिंता वाटली. यावरच ते थांबले नाही तर त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले, आज येथील रहिवाशी, हॉटेल, अपार्टमेंट,धार्मिक स्थळे, ऑफिस थेंब थेंब वाचवणे आपले  नैतिक कर्तव्य समजतात.
महाराष्ट्र यशस्वी सामाजिक व राजकीय चळवळीचे माहेरघर आहे, येथील चळवळी सामाजिक रूप धारण करतात याचे अनेक दाखले आपनास मिळू शकतात. दुष्काळी परिस्थितीला  कारणीभूत घटकांविरुद्ध सुद्धा सामाजिक जागरूकता व चळवळ एक महत्त्वपूर्ण गरज आहे. राज्याच्या जनतेने काही वर्षापूर्वीच आइ पी एल सारख्या बलाढ्य कॉर्पोरेट लॉबीला डिस्ट्रीक्ट  कोर्ट ते सुप्रीम कोर्टपर्यंत खेचून खेचून धूळ चारली होती. ऐन दुष्काळी परिस्थितीत लाखो लिटर वाया घालवून पाहणाऱ्या आई पी एल ला महाराष्ट्रातून काढता पाय घ्यावा लागला. जेव्हा  आई पी एल चे बलाढ्य धनवान व राजकीय आशीर्वाद प्राप्त झालेल्यांना संवैधानिक बळावर झुकवले जाऊ शकते तर अल्कोहोल, दारू आणि साखरेच्या उत्पादनकत्र्याना मानवी  समस्येच्या तत्त्वावर कन्विंस का नाही करू शकत? प्लाची माडा चळवळीने सुद्धा प्रशासनाला कोकसारख्या प्लांटचा लायसेन्स स्थगित करून प्लांटला पलायन करण्यास मजबूर केले  होते. दुसरीकडे दरवर्षी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लाखो दयनीय गरीब लोकांच्या स्थालांतर, व थेंब थेंब पाणी जमा करण्यात तारेवरची कसरत करणारी जनता यावर काय  राजकारण्यांना आपण प्रश्न विचारू शकत नाही की यांच्या रक्ताने दारूची पैदास करण्याची परवानगी तुम्हाला कोणत्या कायद्याने दिली? लवकरच यावर जर का ठोस निर्णय घेतले गेले  तर ‘महाराष्ट्राला चार नद्यांची देणगी’ बनायला वेळ लागणार नाही.

-सय्यद शुजातुल्लाह हुसैनी
भाषांतर : मोहसीन खान


अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने जमाअत-ए-इस्लामी हिंदचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांच्या सत्कारार्थ 21 एप्रिल 2019 रोजी  विद्यापीठाच्या ऐतिहासिक अशा ऑस्ट्रेची हॉलमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला होता. उत्तरादाखल अमीरे जमाअत यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद या ठिकाणी वाचकांच्या  सेवेत सादर करीत आहोत.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि त्याच्या विद्यार्थ्यांवर देशातील सर्व लोकांच्या विशेषतः मुस्लिम समुदायाच्या नजरा कायम टिकलेल्या असतात. या विद्यापीठाची आणि या  विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी महत्त्वाची राहिलेली आहे. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक ऐतिहासिक निर्णयामध्ये या विद्यापीठाने आणि येथील विद्यार्थ्यांनी केंद्रीय भूमिका  बजावलेली आहे. आमच्यामधून पुढे आलेले अनेक शक्तीशाली आवाज येथूनच आलेले आहेत. महत्वाची आंदोलने येथूनच सुरू झालेली आहेत. प्रत्येक अडचणीच्या वेळेस मुस्लिमांना  येथूनच मार्गदर्शन मिळालेले आहे.
आज जेव्हा भारतीय मुस्लिम एका ऐतिहासिक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभी आहेत. अनेक आव्हाने आ वासून पुढे उभी ठाकलेली आहेत.  त्यांना सामोरे जाण्यासाठी मुस्लिमांची आशा तुमच्यावर टिकलेली आहे. मला आनंद आहे की, या विद्यापीठाची विद्यार्थी संघटना आपल्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल जागरूक आहे. मला  आशा आहे, अशा नाजूक कालखंडातही ही संघटना आपली भूमिका योग्य पद्धतीने निभावेल. मला माहित आहे, येथील विद्यार्थी आपल्या जबाबदारीचे निर्वहन करण्यासाठी तयार आहेत.  अल्लाह आपल्या ऐतिहासिक भूमिकेला कायम ठेवो. बदलत्या काळातही तुमची भूमिका योग्य प्रकारे निभावण्यासाठी अल्लाह तुमची मदत करो. आमीन.
’देशाचे बदलते वातावरण आणि मुसलमान’ हा आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे. आपण सर्व पाहतच आहोत, आपला देश बदलत आहे. कोणत्या-कोणत्या गोष्टी बदलत आहेत,   यासंबंधी अनेक पैलूंनी भाषण करता येईल. तरीसुद्धा सर्वच पैलूंविषयी चर्चा करणे या ठिकाणी शक्य होणार नाही. फक्त दोनतीन महत्त्वाचे पैलू मी तुमच्यासमोर उलगडून दाखविणार  आहे. असे पैलू ज्यांनी आपल्या जीवनावर खोलवर परिणाम केलेला आहे. याच संदर्भात मी काही आवाहने करणार आहे.
मला असे वाटते की, याबद्दल कोणाचे मतभेद नसतील की, सर्वात मोठा बदल मागच्या काही वर्षात जो झालेला आहे आणि ज्याने देशाच्या सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि लोकांच्या विचारशक्तीला प्रभावित केलेले आहे. तो पैलू आहे आक्रमक जातीयवाद (अग्रेसिव्ह कम्युनॅलिझम). गेल्या काही वर्षांपासून जातीयवादी शक्तींनी वेगाने आपल्या देशात प्रगती  केलेली आहे. देशातील राजकारण आणि सामाजिक परिस्थितीवर या लोकांचा मोठा परिणाम झालेला आहे. यांना मोठ्या प्रमाणात समाजामध्ये स्वीकृतीही मिळालेली आहे. समाजाच्या  मूळ गाभ्यालाच यांनी प्रभावित केलेले आहे.
आक्रमक जातीयवादाचा आविष्कार पहिला मोठा बदल आहे. जो आपल्या देशात ठळकपणे दिसून येत आहे. याने देशाच्या सर्व भागावर प्रभाव टाकलेला आहे. समाजाच्या ठेवणीमध्ये  बदल केलेला आहे. लोकांच्या वैचारिक शक्तीला प्रभावित केलेले आहे. देशासमोरील प्रश्न आणि परिस्थिती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोणावर सुद्धा परिणाम केलेला आहे. परिणामी  देशामध्ये घृणेचे वातावरण पसरत आहे. सामाजिक विभाजन होत आहे. वेगवेगळ्या गटात समाज विभागला जात आहे. जात आणि पोटजात यांच्यातील पक्षपाताची भावना जी सुप्त  अवस्थेत होती आपल्या देशाच्या घटने आणि घटनात्मक मुल्यांनी ज्या पक्षपाताला डोके वर काढू दिले नव्हते, जातीयवाद्यांच्या वर्चस्वामुळे ते सारे पक्षपात पुन्हा एकदा जागृत होत  आहेत. जर या संकटाचा सामना वेळीच नाही केला गेला तर देशाच्या एकूण रचनेतच बदल घडून येईल. देशातील एकात्मता संकटात येईल. मुलभूत लोकशाही मुल्य संकटात येतील.  मला असे वाटते की, हा पहिला बदल आहे जो समाजामध्ये होत आहे. ज्याची दखल घेणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे जेव्हा जातीयवादाचा प्रश्न येतो तेव्हा आपण फक्त राजकारणापुरता त्याच्यावर विचार करतो आणि राजकीय पातळीवरच त्याच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करीत  असतो. मला वाटते ही आपली सर्वात मोठी चूक आहे. जोपर्यंत आपण याला फक्त राजकीय प्रश्न समजू आणि फक्त निवडणुकींच्या वेळी त्याच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न करू  तेव्हा खऱ्या अर्थाने आपण या प्रश्नाचा सामना करू शकणार नाही. जातीयवाद वास्तविक पाहता सामाजिक प्रश्न आहे. जातीयवादी आंदोलनाने आपले विचार समाजामध्ये खोलपणे  रूजविलेले आहेत. राजकीय स्तरावर त्याचा फक्त परिणाम दिसून येतो. मुळात याचे उत्पादन समाजामधून होत असते. तुम्हाला जर जातीयवादाशी सामना करावयाचा असेल तर मुळात  तुम्हाला सामाजिक स्तरावर तो करावा लागेल. समाजामध्ये त्याचा जो परिणाम होत आहे, त्याच्यावर लगाम लावावी लागेल.
या प्रश्नाची सोडवणूक अशा पद्धतीनेच करावी लागेल. या संदर्भात मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो. सर्वप्रथम आपण याच्याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहूया.  जोपर्यंत आपण याच्याकडे सामाजिक समस्या म्हणून पाहण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण सामाजिक स्तरावर या समस्येशी दोन हात करण्यासाठी तयार होऊ शकणार नाही.  माझ्या दृष्टीने हा पहिला प्रश्न आहे ज्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
देशात होत असलेला दूसरा बदल हा आर्थिक स्वरूपाचा आहे. मागच्या काही वर्षामध्ये आपल्या देशाने वेगात  प्रगती केलेली आहे. देशातील शहरी भागाचा चेहराच बदलून गेला आहे. मात्र ही समस्येची एक बाजू आहे. समस्येची दूसरी बाजू ही आहे की, गेल्या 20- 25 वर्षात मोठ्या प्रमाणात  आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. दोन वर्षापूर्वीच क्रेडिट स्वीसच्या एका अहवालामध्ये म्हटले होते की, आर्थिक विषमतेच्या बाबतीत जगामध्ये दूसऱ्या क्रमांकाचा वाईट देश आपला  देश आहे. ऑक्सफॉमचे अहवाल नियमित प्रकाशित होत  असतात. ते  जरी तुम्ही नियमितपणे वाचत असाल तर तुमच्या लक्षात आलेलेच असेल की, या अहवालातूनही ऑक्सफॉम ने म्हटलेले आहे की, देशात विषमतेची दरी रूंदावत चालली आहे. दरवर्षी  आपल्या देशातील गरीब जनतेची संपत्ती कमी होत आहे आणि श्रीमंत लोकांची संपत्ती वाढत आहे. दोघांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. गेल्या पाच वर्षात हे अंतर  अधिकच वाढलेले आहे. संपत्ती मोठ्या प्रमाणात गरीबांच्या हातातून निघून श्रीमंतांच्या हातात एकवटली जात आहे. याचे जबरदस्त वाईट परिणाम आपल्या देशावर पडत आहेत.  एकीकडे आपला देश तीसरी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. तर दूसरीकडे मानवी उन्नतीचा निर्देशांक (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) अनुसार आपल्या देशाचा क्रमांक 134 वा  आहे. ही एक विचित्र स्थिती आहे. मानवीय उन्नतीच्या दृष्टीकोणाने पाहिले तर आपला समावेश जगातील वाईट देशांमध्ये होतो. 2008 सालच्या फोबर्सच्या यादीमध्ये जगातील पहिल्या 10 श्रीमंत लोकांच्या यादीत चार भारतीय होते. एवढी मोठी संख्या युरोपातील कुठल्याही देशाची किंवा जपान सारख्या प्रगतीशील देशाचीही नव्हती. मात्र दुसरीकडे जगातील जी सर्वात गरीबातील गरीब लोकसंख्या आहे त्यातील अर्धी लोकसंख्या भारतीय आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात महागडे रहिवाशी घर मुंबईत आहे आणि त्याच शहरात जगातील सर्वात मोठी झोपडपट्टीपण आहे. हा जो विरोधाभास आहे. त्याचा प्रवास काळानुरूप वाईटातून अति वाईटाकडे होत आहे. हा दूसरा बदल आहे जो आपल्या देशात होत आहे.  तिसरा बदल वरील दोन बदलांचा परिणाम आहे ज्याला मी वर्गव्यवस्थेचे नाव देतोय. आपला देश वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या समुहाचा देश आहे. हे समूह धर्माच्या नावावर, जातीच्या  नावावर, शहरांच्या नावावर, ग्रामीण क्षेत्रांच्या नावावर, आर्थिक परिस्थितीच्या नावावर अशा अनेक नावावर बनलेला आहे.
फ्रेंच समाजशास्त्री फ्रान्ट्स फिनोने यांनी या संदर्भात एक रोचक असे विवेचन केलेले आहे. अत्याचारींच्या मानसिकतेवर चर्चा करत असताना तो म्हणतो अत्याचारी माणसाची मानसिकता अशी असते की, तो समाजाकडे विभाजित दृष्टीने पाहत असतो आणि प्रत्येक समाज घटकाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. झोन ऑफ बीईंग (अस्तित्वात असलेला समूह) आणि झोन ऑफ नॉन बीईंग (अस्तित्वात नसलेला समूह) अशा दोन विभागात अत्याचारी लोक समाजाची विभागणी करतात. स्वतःच्या समाज घटकाकडे हे अत्याचारी   लोक अस्तित्वात असलेला घटक म्हणून पाहतात आणि त्यांना काही त्रास झाल्यास अशा लोकांना वेदना होतात. त्यांच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या समाज घटकाला जेव्हा त्रास होतो  तेव्हा त्यांना वेदना होत नाहीत. या घटकातील लोक त्यांना जनावरासारखे वाटतात. याप्रमाणे जनावरांना त्रास झाल्यास त्यांना वेदना होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखी अस्तित्वात  नसलेल्या समाजघटकांना त्रास झाल्यास त्यांना त्याच्या वेदना कळत नाहीत. कुरआनमध्येही यासंबंधी म्हटलेले आहे की, ’’सत्य हे आहे की, फिरौनने जमीनीवर अत्याचार केले  आणि  जमिनीवर राहणाऱ्या लोकांची दोन गटामध्ये विभागणी केली. एका गटाला तो अपमानित करत असे.त्या गटामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांची तो हत्या करत असे आणि जन्माला येणाऱ्या   मुलींना तो जीवंत राहू देत असे. म्हणूनच तो अत्याचारी होता.’’
मित्रांनों! जो काही बदल या ठिकाणी मी नमूद केलेला आहे तो असाच आहे. काही लोकांना वाटते की, त्यांचा समाज हाच फक्त अस्तित्वात असलेला समूह आहे. बाकीच्यांचे काही  अस्तित्वच नाही, ते झोन ऑफ नॉन बीईंग मधले लोक आहेत. कुठल्याशा सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांच्या संबंधात काम करणारी सुंदर कपडे घातलेल्या मुली सोबत जर अत्याचार  होत असतील तर त्या घटनेनंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आक्रोश होतो. समाज माध्यम ओरडायला लागतात. माध्यमांमध्ये वादळ येते. मात्र उत्तर प्रदेशातील खेड्यापाड्यात, बिहारच्या  ग्रामीण भागात, कुठल्याशा गरीब दलित मुलीवर अत्याचार होतात, तेव्हा सगळे गप्प असतात. कारण स्पष्ट आहे. आपल्या देशातील सुशिक्षित वर्ग आपल्याच गटाशी संबंधित असलेल्या  सुंदर मध्यमवर्गीय मुलीला आपली मुलगी समजतो. तिच्या अस्तित्वासंबंधी तो संवेदनशील असतो. म्हणून तिला झालेला त्रास ते सहन करू शकत नाहीत. मात्र ग्रामीण भागातील गरीब,   दलित मुलगी ही त्यांच्या गटातील नसल्यामुळे तिच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना वेदना होत नाहीत. आता तर आतंकवादासारख्या गंभीर विषयालाही झोन ऑफ बीईंग आणि झोन  ऑफ नॉन बीईंग अशा गटांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे. आपल्या गटातील आतंकवादी हे प्रिय तर दूसऱ्या गटातील आतंकवादी हे अप्रीय अशी ही मांडणी करण्यात आलेली  आहे. देशाला अशा गटातटात विभाजित करून त्यांच्याकडे पाहणे आणि आपल्या गटांतील लोकांकडे सहानुभूतीने पाहणे, सर्व सहानुभूती आपल्याच गटातील लोकांपर्यंत मर्यादित ठेवणे,  नॉन बीईंग म्हणजे दुसऱ्या गटातील माणसांना माणसं न समजणे ही फार मोठी अनैतिकता आहे. वास्तविक पाहता हे एक राष्ट्रीय संकट आहे. वेळीच याला प्रतिबंध घातला गेला नाही  तर लवकरच ही एक राष्ट्रीय समस्या बनून जाईल.
येणेप्रमाणे देशाची तीन गटात झालेली विभागणी संबंधित विवेचन मी आपल्यासमोर केलेले आहे. आणि ही समस्या आपल्या देशाला कमकुवत बनवत आहे. आणि देशाला वेगाने  भूतकाळात नेत आहे. याच्यावर नियंत्रण मिळवले नाही गेले तर आपल्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी क्षमता या गटातटांच्या विभागणीमध्ये आहे. मूळ प्रश्न  असा आहे की, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवे? मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी काय आहे? अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या साहसी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची  जबाबदारी काय आहे?

(सदर भाषणाचा उर्वरित भाग पुढील अंकी.)
(सदर भाषण उर्दू सा. दावतमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याचा मराठी अनुवाद बशीर शेख, एम.आय. शेख यांनी केला आहे.)

जात व्यवहारातून जाते, मनातून नाही पण अलिकडच्या दोन दशकांत तीव्रपणे ‘जात’ अस्मितेच्या टोकदार जंगलाची वाढ होत आहे जातीचा वणवा स्वत:सकट पेटवून देतोय सगळच  चांगल-वाईट. जात गेलीच नाही जात अधिक स्थिर, मजबूत, घट्ट झालीय. जातीच्या जाणीवांचा ढीग रोज उपसून वर आणला जातोय. धर्मांच्या भडक भिंती उभारून मानवकल्याणाची  केवळ मूर्ख कल्पनाच केली जातेय. घसा फोडून ओरडणाऱ्या, परिवर्तनाच्या वाटा धुंडाळणाऱ्या, माणुसकीची विवेकी बोली बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. शालेय  पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानांपासून ‘आम्ही भारतीय’ म्हणवणाऱ्या हरेक नागरिकांच्या भारतीय अस्मितेला संघी सत्तेचा राष्ट्रवाद घट्ट चिकटलाय. संताप, उद्वीग्णता, भयाच्या  सिमापार आता नैराश्याच्या काळाचे गडद सावट सर्वसामान्यांवर पसरले ‘उघड बोलेल तो गोळी खाईल’चा दहशती राष्ट्रवाद सरळ बिनधास्त झालाय. राष्ट्रीयसणांच्या, क्रिकेट कॅचच्या  दिवशी उफाळून येणारी मौसमी देशभक्ती भय निर्माण करणारी ठरायची पूर्वी आता मरण देणारी ठरतेय.
झपाट्याने बदलणारा काळ, आधुनिकतेचा प्रचंड वेग, जगण्याच्या अखंड धडपडीत, स्वतंत्र देशाचा नागरिक गुलाम झालाय. होय, आपण गुलाम आहोत आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत अपडेट  केला गेलाय पक्क्या सॉफ्टवेअरने. मानवी भावभावनांचा लंपट व्यवहार गुंतागुंतीचा करताहेत लोकशाहीचे सगळेच खांब ! भासमय डीजीटली सुखाचा जादूई सहवास देत माथी बिघडवली  गेलीत अख्ख्या पिढीची सांस्कृतीक कला, शिक्षण, उद्योग व्यवसाय समाज आणि राजकारणाच्या प्रत्येक कोपऱ्यात हताश नागरिकता आणि भयाण भविष्याच्या खुणा गडद झाल्यात  प्रतिक-प्रतिमांच्या उदात्तीकरणाच्यासोबत खोट्यालाच खरेपणाची मॅजिकल झालर विकला गेलाय. द्वेषघृणा, प्रतिज्ञेतला देशबांधव, संपलाय आता आपल्या अस्मितेच्या गौरवगाथा नव्याने  पाडून-मांडून, वाद चर्चेने नव्हे तर रक्त सांडूनच मिरवता येतात ही नवी पद्धत रूढ होतेय. रक्त सांडल जातंय. जीव संपवले जाताहेत चटके दिले जाताहेत, भर चौकात बांधून मारले जातेय.
‘आपला नव्हे’ या भावनेतून नैराश्याच्या उर्जेचा डोस द्वीगुणीत करून कापलं - जाळलं जातंय एकमेकाला. विवेकी चांगलं वगैरे म्हणत ओरडणाऱ्यांचा आवाज सिलेक्टीव्ह झालाय.   भूमिकांचा पसारा झालाय. तत्वांचा, बाजार नितीमुल्य, मानवता निर्वस्त्र झालीय. आपण काहीजण प्रतिक्रिया देतोय. स्वत:च अस्तित्व सांभाळून, प्रसंगी ‘जगणंपणाला’ लावून झगडताहेत.  हा संघर्षपण अस्तित्वांच्या कप्पेबाजीत फुटकळ झालाय. वेचक वेधक आपला जातधर्म फायद्याचे तेवढेच बघायचे या विचारवंती अट्टाहासाने मृतवत झालेल्या सवयीचा निषेध, लढाईचा  हा डाव रडीचा आहे शेवटी काय देश म्हणजे तरी? दगड, पाणी, नद्या, राज्य, जंगल एवढंच की, त्यातली माणसं?
कट्टरवादाचे बाळकडू पाजून / पिऊन निर्माण झालेली कडवट पिढी केवळ हिंसेच्या शस्त्रांची भाषा दृढ करताहेत होय. हिंसा झालीय तबरेजची! डॉ पायलची, यादी वाढवत पुन्हा-पुन्हा तेच  वेदनेचं काव्य मांडायची लाज वाटू लागली आहे सगळ्या चांगल्या माणसांवर विेशास संपून गेलाय. उरली आहे शिल्लक भिती किंवा गुलामीच्या सवयीची प्रॅक्टीस. शेजाऱ्यांवर प्रेम न  करणारी शहाणीसुरती मंडळी रचताहेत निषेधाचे करूणकाव्य. उपाशीपोटाला भाकर न देणारे हात उभे राहताहेत आखलेल्या स्वार्थी छावण्यात नाटकी मुलाला देऊन गायीली जाताहेत मानवतेची सुरेल गाणी... खरंतर कुणालाच, कशासाठी उठायची, पेटायची गरज वाटत नाही मी सुरक्षित आहे, बस्स !
मारणारे कोण होते? यापेक्षा मरणारा ‘आपला’ नव्हता ठीक ! मग बघू नंतरची घाणेरडी मानसिकता तीचा मंगल उदो! जल, जीवन, जंगल, पाऊस, दुष्काळता, यांची चर्चा नाही होत आता  केवळ टाईमपासी मनोरंजनातून शमवली जातीय तात्पुरत्या सामाजिकतेची भूक. बीगबॉसच्या घरातून कोण हाकलंल गेलं यावर हॅशटॅग वादळ पसरेल पण ‘भट’ नावाचा प्रामाणिक  माणूस डांबला जातोय. व्यवस्थेकडून चर्चा होत नाही क्रीकेटच्या कॉमेंट्रीतून रंगत जातेय संमोहीमी, नटनट्यांच्या खासदार, आमदारांच्या पोरापोरीची लग्न, लफडी- भानगडी चविष्ट होतात  पायल मरतेय त्यात इंटरेस्ट नाही वाटत आपल्याला जयभिम म्हणायचं नाही, म्हणून मारला गेलेला पोचिराम कांबळे ते ‘जय श्रीराम’ म्हणून ठेचला गेलेला तबरेज धर्मजात जाणीवा  अंत नाही उदय होतोय लख्खपणे... कागद कॅन्व्हास मेंदू रिकामे ठेवा द्वेषजहरचे मदांध जमलेत बरसतील तर मानवतेचा दुष्काळच असेल सभोवार. होय.
पुढे यादी वाढतच जाईल सॉफ्टवेअर पक्क आहे आणि अ‍ॅन्टीव्हायरस आपण नकली, तोकडे, तात्पुरते सुद्धा नाही बाहेर पाऊस पडतोय. पाऊस समृद्धी देईल भितीचे सावट मात्र गडदच आहे  आम्ही तबरेज होतोय. ते तज्ञ तरबेज होतायत,
‘‘मसला ये नहीं है के दर्द कितना है,
मुद्दा ये है की परवाह किसको है !’’

- साहिल शेख
9923030668

एक शजर ऐसा मोहब्बत का लगाया जाए
जिसका हमसाये के आंगन में भी साया जाए
जून 2019 रोजी 24 वर्षीय तबरेज अन्सारीची झारखंडमध्ये झुंडीकडून झालेली हत्या ही 18 वी हत्या होती. या हत्येपूर्वी मजलूम अन्सारी, इम्तियाज खान, यांची 18 मार्च 2016 रोजी,  तर लेतहार जिल्ह्यात शेख हलीम, सिराज खान, मुहम्मद सज्जाद, शेख नईम, गौरव वर्मा, विकास वर्मा, गणेश गुप्ता, रामचंद्र देवी यांची 18 मे 2017 रोजी पूर्व सिंगभूम जिल्ह्यात,  तर अलिमोद्दीन अन्सारी याची 27 जून 2017 रोजी रामगड येथे, तर रमेश मिंझ (ख्रिश्चन) याची ऑगस्ट 2017 रोजी गृहवा येथे, तर चिरागुद्दीन, मुर्तूजा अन्सारी यांची 13 जून 2018  रोजी गोड्डा येथे, तर बबलू मुशहर (दलित) याची 6 सप्टेबर 2018 रोजी पलामू येथे, तर वकील खान याची 12 मार्च 2019 रोजी पलामू येथे, तर प्रकाश लकडा (ख्रिश्चन) याची 10  एप्रिल 2019 रोजी गुमला येथे झुंडीद्वारे हत्या करण्यात आल्या होत्या. एवढ्या हत्या पाहता झारखंड ही मॉबलिंचिंगची राजधानी होऊ पाहते की काय अशी रास्त शंका निर्माण होते.
17 व्या लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांसमोर भाषण देण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राज्यघटनेच्या लिखित प्रतीला नमन करून घोषणा केली होती की,  ’सबका साथ सबका विकास और सबका विश्वास’. त्यांनी वरील शब्दात देशाला आश्वस्त करत आपल्या सरकारची वाटचाल भविष्यात कोणत्या दिशेने होईल हे स्पष्ट केले होते. तरी  परंतू त्यांच्या भाषणानंतर हरियाणा, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये मुस्लिमांवर हल्ले सुरूच राहिले. त्यातल्या त्यात मागच्या काही दिवसात गुरूग्राममध्ये मोहम्मद बरकत याच्यवर तर  दिल्लीमध्ये मोहम्मद मोमीन याच्यावर तर कलकत्यामध्ये शाहरूख हलदार याच्यावर प्राणघातक हल्ले करून त्यांना बळजबरीने ’जय श्रीराम’चे नारे देण्यासाठी भाग पाडण्यात आले. तबरेज अन्सारीच्या झुंडीने केलेल्या हत्त्येनंतर, पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे साधलेल्या, ’चुप्पी’नंतर, भारतीय मुस्लिम समाज हा अत्यंत व्यथित झालेला आहे. त्याला सुचत नाहीये की  काय करावे व काय करू नये? एकीकडे देशाचे संविधान व दस्तुरखुद्द पंतप्रधान त्यांच्या जीवीत राहण्याच्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली होणार नाही, याची ग्वाही देत आहेत तर  दुसरीकडे एकानंतर एक मुस्लिमांना मारहाण व त्यांच्या हत्या होत आहेत. अशा परिस्थितीत भांबावलेल्या मुस्लिम समाजातून एक प्रश्न केला जातोय की, या मॉबलिंचिंगवर काय  उपाय आहे का नाही? माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. व हा उपाय 30 डिसेंबर 1946 रोजी त्या काळातील अखंड भारताच्या सियाकलकोट शहराच्या गुरदासपूर येथे लाहोर  आयुक्तालयातील जमाअत-एइस्लामीच्या सभेमध्ये सुचविण्यात आलेला होता. जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी तो उपाय सूचविलेला होता. तो  त्या काळात जेवढा ’रिलेव्हंट’ होता आजही तेवढाच रिलेव्हंट आहे. त्यांनी मुस्लिमांच्या एका विशाल जनसमुदायाशी संवाद साधताना जे ऐतिहासिक भाषण केले होते, त्याला दिल्लीच्या  मर्कजी मक्तबा या प्रकाशन संस्थेने पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित करून वाचकांसमोर आणलेले आहे.
’शहादत-ए-हक’ नावाच्या अवघ्या 36 पानाच्या या पुस्तिकेची किमत फक्त 14 रूपये असून, आजपावेतो या पुस्तिकेच्या लाखो प्रती खपलेल्या आहेत तर लाखो मुस्लिमांच्या विचारांना या पुस्तिकेने सकारात्मक दिशा देण्याचे काम केलेले आहे. मला विश्वास आहे या पुस्तिकेमध्ये जर का गांभीर्याने विचार केला गेला तर मॉबलिंचिंगच नव्हे तर जातीय दंगलीसुद्धा  रोखण्यामध्ये मदत मिळेल. प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशी ही पुस्तिका आहे. त्यासाठी फारसे कष्ट घेण्याची गरज नाही. आपल्या जवळच्या जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात  जावून आपण ही पुस्तिका घेवू शकता. आता हे पाहू की, असा कोणता उपाय आहे जो या पुस्तिकेमध्ये सुचविण्यात आलेला आहे? मुळात मुस्लिम समाज हा कुठल्याही देशाचा,  कुठल्याही वंशाचा किंवा कुठल्याही रंगाचा असा विशिष्ट समाज नाही. तो प्रत्येक देशाच्या, प्रत्येक वंशाच्या आणि प्रत्येक रंगाच्या लोकांचा समाज आहे. या अर्थाने तो एक जागतिक  समाज (ग्लोबल कम्युनिटी) आहे. या समाजाला जगामध्ये उभे करण्यात मागचा ईश्वरीय उद्देश कुरआनमध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला असल्याचे मौलानांचे विश्लेषण आहे.
1. ’’ आणि अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगांतील लोकांवर तुम्ही साक्ष व्हा आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’(संदर्भ : सुरह बकरा  आयत नं. 143).
2. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख  व्हाल. न्याय करा. हे ईशपरायणतेपासून अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’ (सुरे  अलमायदा आयत नं. 8).
3. ’’त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल की ज्याने ती साक्ष लपविली जी अल्लाहकडून त्याच्याकडे आली होती आणि अल्लाह अनभिज्ञ नाही.’’ (सुरे अलबकरा आयत नं.  140)
वर नमूद तिन्ही आयातींचा हवाला देऊन मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी मुस्लिमांवर खरी-खरी साक्ष देण्याची जी ईश्वरीय जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्याबद्दल  सविस्तर असे विवेचन केलेले आहे. यामध्ये ’साक्ष’ हा शब्द पुन्हा-पुन्हा आलेला आहे. ही साक्ष कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर असे की, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अल्लाहने  जे काही मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन जसेच्या तसे त्या लोकांपर्यंत पोहोचविणे ज्यांना ते माहित नाही. आणि ही साक्ष देणे प्रत्येक पैगंबराचे कर्तव्य राहिलेले आहे. याच कामासाठी प्रेषितांना पाठविण्यात आले होते. यावरून या कामाचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येईल.
कुरआनमध्ये अशा अनेक लोकसमुहांचा नावानीशी उल्लेख आहे ज्यांनी ही साक्ष दिलेली नाही तेव्हा ते नष्ट झाले आहेत. विशेष करून बनी इसराईल (ज्यू) बद्दल कुरआनमध्ये स्पष्ट  म्हटलेले आहे की, त्यांनी ईश्वरीय मार्गदर्शनाची साक्ष जगासमोर दिली नाही. म्हणून त्यांना दंडित करण्यात आले. या संदर्भात स्वतः कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’सरतेशेवटी इतकी  पाळी आली की त्यांच्यावर अपमान, अधोगती व दुर्दशा ओढवली. आणि ते अल्लाहच्या कोपाने वेढले गेले. हा परिणाम यामुळेच झाला की, अल्लाहच्या संकेताशी ते द्रोह करू लागले. हे  ह्यामुळेच घडले की त्यांनी अवज्ञा केली आणि शरिअत कायद्याचे वारंवार उल्लंघन केले.’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.61)
थोडक्यात सांगायचे म्हणजे मुस्लिम समाज हा अल्लाहने त्याच्या प्रेषित (सल्ल.) मार्फत जे मार्गदर्शन जगातील समस्त माणवांसाठी अवतरित केले त्याची साक्ष जगाला पटविण्यासाठी  जन्माला घातलेला आहे. ही ऐतिहासिक जबाबदारी अल्लाहने जागतिक मुस्लिम समाजावर टाकलेली आहे. दुर्दैवाने हा समाज ती जबाबदारी पूर्ण करत नाहीये म्हणून त्याला अशा  प्रकारची प्रताडना सहन करावी लागत आहे जी बनी इस्राईल व इतर विद्रोही समाजांना करावी लागली होती.
पुढे मौलाना म्हणतात, की ही साक्ष मुस्लिमांनी मुस्लिमेत्तरांसमोर दोन प्रकारे ठेवावी.
1. माध्यमांद्वारे तर 2. स्वतःच्या वर्तनाने. मात्र बहुतेक मुस्लिमांची वागणूक ही नेमकी उलट आहे. ते अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ इतरांनाही देत नाहीत व स्वतःही घेत  नाहीत. गाफील मुस्लिम समाज हा इस्लामच्या प्रगतीमध्ये अडथळा बनलेला आहे. मौलाना म्हणतात, बनी इस्राईल हे काही अल्लाहचे शत्रू नव्हते किंवा मुस्लिम अल्लाहचे नातेवाईक  नाहीत की त्यांच्यावर कर्तव्य न करताही दया दाखविली जाईल. मुळात जी साक्ष त्यांना द्यायला हवी ती तर ते देतच नाहीत उलट त्याच्या (इस्लामी मुल्यांच्या) विरूद्ध साक्ष देत  आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी इस्लामने करण्यापासून प्रतिबंध केलेला आहे मात्र मुस्लिमांनी केलेली नाही.
भारतीय मुस्लिमांपुरते बोलायचे झाल्यास इस्लामने निषिद्ध केलेल्या संगीतापासून व्याजापर्यंत सगळ्याच गोष्टी बहुसंख्य मुस्लिमांनी स्वतःवर हलाल करून घेतलेल्या आहेत. बहुसंख्य  मुस्लिमांनी कुरआन समजून वाचलेला नाही. त्यामुळे त्यांचे वर्तन कुरआनला अनुसरून नाही. म्हणजेच ते आपल्या वाणी आणि वर्तनाने कुरआनची साक्ष मुस्लिम्मेतरांसमोर देत नाहीत.  म्हणून त्यांना अशा प्रताडनेला सामोरे जावे लागत आहे. एका लेखामध्ये मौलानांनी दिलेल्या भाषणातील सर्वच मुद्यांशी न्याय करता येणे शक्य नाही. या ठिकाणी मी फक्त त्या  पुस्तिकेमधील केंद्रीय विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. सविस्तर विवेचन समजून घेण्यासाठी वाचकांना पुनःश्च नम्र विनंती आहे की, त्यांनी सदरची पुस्तिका स्वतः हस्तगत करून  अत्यंत गंभीरपणे वाचावी. असे झाल्यास त्यांच्या वर्तनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होईल आणि परिणामी ते सुरक्षित व सुखी जीवन जगू शकतील. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना  करतो की, ’’हे अल्लाह! आम्हा सर्वांना आपल्या वाणी आणि वर्तनाने इस्लामची साक्ष देण्याची समज दे.’’ आमीन.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget