Halloween Costume ideas 2015

अमली पदार्थांच्या व्यसनाधीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी वृत्ती


दरवर्षी 26 जून रोजी “ड्रग गैरवर्तन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन” 1987 पासून जनजागृती म्हणून साजरा केला जातो, या 2021 वर्षाची थीम आहे "औषधांवर तथ्य सामायिक करा, जीव वाचवा". याचे उद्दिष्ट चुकीची माहिती विरूद्ध लढा आणि औषधांवरील तथ्ये सामायिकरणास प्रोत्साहित करणे आहे, म्हणजेच आरोग्यासंबंधी जोखीम आणि निराकरण, जागतिक पातळीवर औषधांची समस्या सोडविण्यासाठी, पुरावा-आधारित प्रतिबंध, उपचार आणि काळजी घेईपर्यंत सर्व आवश्यक घटक असतात, जे मौल्यवान जीव वाचवू शकेल. 2020 च्या जागतिक औषध अहवालानुसार 2018 मध्ये जगभरातील सुमारे 269 दशलक्ष लोकांनी ड्रग्स वापरली, जे 2009 च्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे, तर 35.6 दशलक्षाहून अधिक लोक ड्रग वापराच्या विकारांनी ग्रस्त आहेत. अहवालात म्हटले आहे की वाढती बेरोजगारी आणि कोरोना साथीच्या आजारामुळे गरीब लोकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गेल्या दशकात अमली पदार्थ आणि संबंधित विकारांमुळे मृत्यूच्या संख्येत 71 टक्के वाढ झाली आहे. आपल्या देशात मादक पदार्थांची तस्करी सर्रासपणे सुरू आहे. आत्ताच 23 जून 2021 रोजी जम्मू-काश्मीर मधे सीमा सुरक्षा दलांनी कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक पाकिस्तानी मादक पदार्थ तस्कराला मारले, त्याच्याकडून 135 कोटी रुपयांची हेरॉईन जप्त करण्यात आली. 

समाजात आजकाल किशोरवयीन मुले ड्रग्जकडे अधिक आकर्षित होतांनी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा आलेखही सतत वाढताना दिसून येतो. मुले पटकन उग्र होतात, आकर्षित होतात, हट्टीपणा करतात, सर्व काही द्रुतपणे मिळवण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक मुले, महान समाज सुधारकांना किंवा क्रांतिकारक शहीद ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे किंवा कठोर मेहनत घेऊन देशासाठी गौरव घडवून आणणाऱ्या महान बौद्धिक व्यक्तिमत्त्वांना आदर्श म्हणून नव्हे तर चित्रपट, फॅशनमधील कलाकारांना आणि दबंगई करणाऱ्या लोकांना त्यांचे रोल मॉडेल मानतात आणि त्यांना जसे दिसते, तसेच व्हायचे असते, यासाठी मग त्यांना शॉर्टकट मार्ग जरी घ्यावा लागला तरी बरं. सिगारेट तंबाखू हुक्का आणि अल्कोहोलपासून नशा सुरू होवून समोर गांजा, ड्रग्स, हेरोइन, अफू, चरस चा दिशेने पुढे जातात. नंतर आम्ल पदार्थाची तल्लफ अशा प्रकारे वाढतच जाते. महागडे छंद, फॅशन, देखावा, शॉर्टकटमध्ये पैसे कमवायची इच्छा, स्वत:चा दबदबा दाखवण्यासाठी आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी ही किशोरवयीन मुले गंभीर गुन्हे करतात. अनेकदा लोक लहान मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात, परंतु काहीवेळा ही चूक पुढे जाऊन मोठ्या अपघाताचे रूप धारण करते.

मुंबईतील धक्कादायक शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण आणि निर्भया प्रकरण, दिल्ली - कड़कड़डूमा कोर्टात गोळीबार प्रकरणात अटक केलेले चार आरोपी अल्पवयीन असल्याचे आढळले, मुंबई हल्ला - कसाबने स्वत: ला नाबालिग म्हटले होते, कानपूरमध्ये एका किशोरवयीन मुलाने दहा वर्षांच्या निरागस बालकाचा गळा कापून त्याचा मृत्यूदेह जंगलात फेकला, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांत खंडणीसाठी अल्पवयीन मुलांचे अपहरण आणि हत्या करण्यात बाल गुन्हेगार गुंतले असल्याचे आढळले. देशातील अशा शेकडो गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे, प्रत्येक शहरात आणि मोठ्या महानगरांमध्ये, बाल अपराधी हे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये दिसतात. बाल अपराधी, गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देणे आणि मजा-मस्तीचे आयुष्य जगण्यासाठी, नशा केल्यानंतर ते चुकीच्या मार्गावर जातात. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. बाल गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्यात चित्रपट, टिवी, विशेषतः मोबाइलच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. असंख्य लोक, लहान ते मोठे, सोशल मीडियाचे व्यसनी झाले आहेत, त्यामुळे रोज त्यांचा घरी तणावाचे वातावरण देखील असते, नुकत्याच झालेल्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींनी कबूल केले आहे की सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेब सिरीज पाहून त्यांना गुन्हा करण्याचे मार्ग कळले आहेत.

मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत :-

भारतीय शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय तर्फे वर्ष 2018 मधील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशात 10 ते 17 वर्षाचा वयोगटातील तब्बल 1.48 कोटी मुले व्यसन करतात. व्हाइटनर, पंचर सोल्यूशन, कफ सिरप, पेट्रोल, थिनर, सनफिक्स बॉन्ड फिक्स यासारख्या हानिकारक तीक्ष्ण रासायनिक ज्वलनशील पदार्थांचा वास घेवून नशा करणाऱ्या मुलांची संख्या 50 लाख आहे आणि 20 लाख मुले भांग, 30 लाख मुलं दारू, तर 40 लाख मुलं अफीमचा नशा करतात. सिगारेट, तंबाखू, ड्रग्स सह इंजेक्शन व इतर पदार्थांचा नशा ही मोठ्या प्रमाणावर करतात. ही मुले रेल्वे स्थानक, बसस्थानक, झोपडपट्टी, निर्जन भागात, सार्वजनिक उद्यान अशा ठिकाणी गटांमध्ये मिळून नशा करताना आढळतात. लहान मुलापर्यंत हे जीवघेणे नशेचे विष सहज उपलब्धता ही सर्वात मोठी समस्या आहे. 2016 मध्ये दिल्ली सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशाच्या राजधानीत 70 हजार मुले अमली पदार्थांच्या आहारी असल्याचे आढळले. आज कोरोना काळात, नशा करण्यासाठी अल्कोहोल आधारित हैंड सेनेटिझर प्यायचे व्यसन लागत आहे, असे अनेक प्रकरण समोर आलेत, ज्यामध्ये सेनेटिझरचे प्राशन करणारी व्यसनी व्यक्ती मृत्युमुखी पडली आहेत.

नशेमुळे गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ :-

क्राइम ब्युरोच्या नोंदीनुसार मोठ्या प्रमाणात गुन्हे, खून, दरोडा, अपहरण इतर सर्व प्रकारच्या गुन्हांमध्ये नशेचे प्रमाण 73.5% आणि बलात्कार सारख्या जघन्य गुन्ह्यात हे 87% टक्के पर्यंत आहे. देशातील वाढत्या गुन्हेगारी, गंभीर आजार आणि हिंसाचारामध्येही नशेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नशेमुळे या लहान निर्दोषांचे बालपण उध्वस्त होत आहे, तसेच यांचात बालगुन्हेगारी, आजारपण देखील फार वाढते. मुलांचा मानसिक विकास नशेच्या तावडीत थांबून जातो. नशेत माणसाचा स्वतावर नियंत्रण नसते आणि नकारात्मक विचार वेगाने वाढतात. पैशासाठी मुले खोटे बोलायला लागतात, जबाबदारी पासून दूर पडतात आणि नशेकरीता मोबाईल, पर्स, चेन स्नॅचिंग, वाहने चोरी सारखे गुन्हे करतात आणि ते मोठे होवून गंभीर गुन्हे करायला लागतात. अशाप्रकारे, आपल्या समाजात एक नवीन गुन्हेगारी साम्राज्य सुरू व्हायला लागते. आजकाल ही किशोरवयीन मुले मोठ्या गुन्ह्यात खूपच सक्रिय दिसत आहेत. आपण दररोज अशा बातम्या पाहतो आणि वाचतोच. कित्येकदा आपल्याला विश्वास सुदधा बसत नाही की ही ऐवढी लहान-लहान मुले माणुसकीला काळीमा फासणारी घाण कृत्य कशी काय करू करतात? पण हे कटु सत्य आहे. कधी-कधी लोक या मुलांना चोरी करताना पकडतात आणि त्यांना थोडेसे रागाहून, थापड़ मारून सोडून देतात, परंतु मुळात त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा किंवा सुधरविण्याचा प्रयत्न होतांना दिसतच नाही. ही मुले आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत. जर आपण आज त्यांचे अस्तित्व व्यवस्थापित केले नाही तर आपण त्यांना भविष्यातील आधारस्तंभ कसे म्हणावे?

किशोरवयीन गुन्हेगारी वाढण्याची कारणे 

समाजाच्या परिस्थितीमुळे देखील मुलांना गुन्हेगारीच्या जगात जाण्यास भाग पाडले जाते. जर आपण महानगरांबद्दल बोललो तर रोजगाराच्या बाबतीत लोकांचे स्थलांतर, वाईट शेजार, वाईट लोकांची संगत, संस्करांचा अभाव, घरात असंतोषाचे वातावरण, पालक मुलांची काळजी घेण्याऐवजी कामात व्यस्त, कुटुंबात ज्येष्ठांची कमतरता जी पालकांच्या मागे मुलांची काळजी घेऊ शकतात आणि बदलत्या तांत्रिक युगात मोबाईल-टीव्हीच्या माध्यमातून अवांछित गोष्टींपर्यंत सहज प्रवेश, ही अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे मुलांना गुन्हेगारीची संधी मिळते. पालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि इतर काही लोकांच्या चुकीच्या हेतूमुळे मुले ड्रग्सची लागण करतात. एकदा व्यसनाधीन झाले की, ते अंमली पदार्थांच्या लालसेपोटी चोरीसारखे गुन्हे करण्यास सुरवात करतात. त्यानंतर त्यांचे गंभीर गुन्हे करण्याची शक्यताही वाढते. या परिस्थितीच अशा बनतात की ज्या वयात त्यांच्या हातात पेन्सिल, पेन आणि ब्रशेस असावेत, त्याच वयात त्यांना चाकू, कुलूप तोडण्यासाठीची साधने आणि ड्रग्सची इंजेक्शन्स मिळाली.

आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी 

जर काही चुकत असेल तर ते त्वरीत थांबविणे आणि त्यास सुधारणे हेच सर्वात मोठे शहाणपण आहे, अन्यथा ही पुढे जावून एक अतिशय त्रासदायक समस्या बनू शकते आणि त्यानंतर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही, व्यसनापासून मुक्त होण्यासाठी राष्ट्रीय टोल फ्री व्यसनमुक्ती हेल्पलाईन नंबर 1800-11-0031 वर संपर्क साधावे. मुलांचे अंमली पदार्थांचे गैरवर्तन आणि वाढत्या बाल अपराधांसाठी सर्वात जास्त जबाबदार त्या मुलांचे पालक असतात, जे आपल्या मुलांना वेळेवर नियंत्रित करू शकत नाहीत, चांगले संस्कार देत नाहीत, पालनपोषण, वागणून, चांगले-वाईटाची शिकवण देत नाहीत आणि ही मुले हळू-हळू समाजासाठी प्राणघातक समस्येच्या रूपाने वाढतात. आपली मुलं आपली जबाबदारी आहेत, आपल्या निष्काळजीपणाने मुलं बिगडतात आणि याची शिक्षा संपूर्ण समाजाला भोगावी लागते. मुले ही देशाचे भविष्य, मौल्यवान राष्ट्रीय वारसा आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांच्या खांद्यावर, देश आणि कुटुंबाच्या भविष्यासाची मोठी जबाबदारी असेल. म्हणून सरकार, समाज, पालक, दक्ष नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे की आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वस्थ सुखरूप सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात वाढण्यास संधी देऊ, जेणेकरून ते देशाचे जबाबदार नागरिक म्हणून शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या बुद्धिमान आणि नैतिकदृष्ट्या सद्गुणी होवून त्यांच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे बजावण्यास सक्षम होतील.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget