जर आपल्याला कोणी विचारले आपण कोण तर आपण काय कराल? पटकन स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव सांगून मोकळे व्हाल. हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर विचारण्यात आला तर आपण आपल्या संपूर्ण नावासोबत आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव ही सांगाल. हाच प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला गेला तर? मग अगोदर आपल्या राष्ट्राचं नाव, मग राज्य, जिल्हा, तालुका गाव असे सांगण्यात येईल. आहे ना बरोबर? पण एवढीच का आपली ओळख? अधिकतर लोकांचे उत्तर होय जरी असले आणि ते बरोबर जरी असले तरी आपली खरी ओळख यापेक्षा कितीतरी महान आहे पण ती समजून घेण्यासाठी आपले डोके, आपले विचार खूप प्रगल्भ असले पाहिजेत. अनप्रेज्युडाईजचा अर्थ माहित आहे का? नाही. काही हरकत नाही, मलाही माहीत नव्हते. होमियोपॅथीक डॉ्नटर होण्याआधी पण होमियोपॅथीक डॉ्नटर व्हायला महत्त्वाची अट हिच की डॉ्नटरने अनप्रेज्युडाईस असायला पाहिजे. म्हणजेच त्याचे डोके अगदी कोरे पाहिजे. यात कुठल्याही पूर्वगृहांना जागा नसावी. आपले डोके आणि विचार अगदी स्वच्छ आणि निर्मळ असावेत.
च्छ भारत अभियाना अंतर्गत काही प्रमाणात आपले, घर परिसर स्वच्छ झाल्यासारखा दिसते पण आपल्या मनात असलेली शत्रुत्वाची, द्वेषाची, छल, कपटाची घाण काढून टाकण्यास मात्र हे अभियान यशस्वी झाल्यासारखे दिसत नाही. आपण म्हणणार त्याचा उद्देश तर फक्त डोळ्यांनी दिसणारी घाण दूर करणे हाच होता. होय! पण मनातली न दिसणाऱ्या घाणीपासून ही मुक्ती मिळवण्यासाठी ’’स्वच्छ मन’’ अभियान राबवावे लागेल की काय? आणि राबवून ही ते कितपत यशस्वी होईल सांगता येत नाही, असो. आपण निघालो होतो आपल्याच शोधात आणि आपली ओळख निश्चित करणे हे खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी माणसाने स्वच्छ डोके आणि निर्मळ मन ठेवूनच आगेकूच करायला हवी. चला मग आपण आपल्यालाच शोधूया. अगदी कोरं डोकं आणि मन ठेवून.
आपण म्हणजे तो, ती, तू, मी, स्त्री, पुरूष, लहान, थोर, काळे, गोरे इत्यादी. कोणत्याही देशात राहणारे, कोणतीही भाषा बोलणारे, कोणतेही धर्म पाळणारे, कोणतेही आचार विचार ठेवणारे, कोणतीही संस्कृती बाळगणारे, कोणत्याही पदावर विराजमान आपण म्हणजे आपणच. आनंदीत असो की रागीट, प्रसन्न प्रेमळ असो की तुसडेे, चांगले असो की वाईट आपण म्हणजे अगदी आपणच.
आपण आपल्या शोधात निघालं की आपल्याला कळेल की आपण नेमके कोण?
काहींना वाटत असेल आपण म्हणजे फक्त आत्मा, काहींच्या मते आपण म्हणजे शरीर, तर अनेकांना वाटत असेल आपण म्हणजे आत्मा आणि शरीर.
आपण आपले डोळे बंद करा. लांब-लांब श्वास घ्या आणि फक्त 11 पर्यंत मोजा कसं वाटते? डोळे बंद केल्यास श्वासाचा आवाज येतो, एक चांगली फिलिंग येते जास्त मोजले की स्ट्रेस (नाग) ही कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला वाटते की आपण एक आत्मा आहोत. आपला शरीर गायब झाल्यासारखं वाटते. पण एक मजेशीर तथ्य मला आढळून आले की आत्मा ही अंधळी आहे ती शरीराला बघू शकत नाही, शरीर बघायला तिला ’’डोळे’’ नावाचे साधनाची गरज भासते आणि डोळे हे सर्व काही बघू शकतात, त्यांचे काम ही शरीरात असलेल्या आत्म्यामुळेच चालते पण आपल्या शरीरात वास्तव्यात असलेल्या आत्म्याला ते पाहू शकत नाहीत. म्हणजेच डोळे हे डोळे असून ही आंधळे, आहेना गंमत! पण थोड थांबा, या डोळ्यांना डोळसपणा येतो ते मरताना. प्रत्येक व्यक्ती आपल्या आत्म्याला शरीर सोडून जाताना बघूू शकतो. ते कसे? आपली आत्मा ही डोळ्यांवाटे जाते म्हणून मेल्यानंतर ही डोळे उघडेच राहतात त्यांना बंद करणारी आत्मा निघून गेलेली असते म्हणून दुसऱ्या व्यक्तींना डोळे झापावे लागतात.
आपण म्हणजे सुंदर शरीर आणि सुंदर आत्मा, स्वच्छ शरीर, स्वच्छ मन आणि स्वच्छ आत्मा. आपण म्हणजे परमेश्वराची अतिउत्तम निर्मिती होय. आपला ईश्वर, परमेश्वर एक म्हणूनच सगळे सारखे. वेगवेगळे ईश्वर असते तर निर्मितीत फरक पडला असता. एकच भाजी एकसारखेच घटक टाकून बनविलेली असली तरी ती वेगवेगळ्या व्यक्तींनी तयार केल्यामुळे चव वेगळी लागते. मग जर ईश्वर वेगळे असते तर आपण ही वेगळे असतो. आपण सगळे एक. मग आपला ईश्वर ही एक मानायला हरकत नाही. ईश्वराने तर आपली एक जात बनविली. ती म्हणजे ’मानव जात’ पण आपण मानवजातीला अनेक जातींमध्ये विभाजीत केलेले आहे.
कोणी कावळा जर स्वतःला हंस समजत असेल तर तो हंस होणार का? त्यांचे स्वतःला हंस समजून दुसऱ्या कावळ्यांना तुच्छ समजने बरोबर आहे का? नाही ना. पण स्वतःला मानव म्हणणाऱ्या प्राण्यांच्या जातीत हे सगळे चालले आहे आणि खूप लोक याला बरोबर ही मानतात. पण एक मानव दुसऱ्या मानवापेक्षा श्रेष्ठ कसा असू शकतो? आणि जन्मतः एक मानव दुसऱ्या मानवापेक्षा तुच्छ कसा असू शकतो. माणसात श्रेष्ठता निर्माण करणारी एकच अट म्हणजे ’इशभय’ (तकवा) जो व्यक्ती ईशभय बाळगून वाईट कर्म करत नाही, वाईट गोष्टींपासून लांंब राहतो तो तर एक वाईट माणसापेक्षा निःसंदेह श्रेष्ठ असणार परंतू (ईशभय न बाळगणाऱ्या) जन्मतः कोणी कोणापासून श्रेष्ठ नाही.
आपल्याला सर्वात धोकादायक खेळ कोणता हे माहीत आहे का?
बॉक्सिंगला धोकादायक खेळ समजला गेला. पण आजच्या युगात समुद्रात सर्फिंग करणे, लहरींवर खेळणे, आईस-ब्रोकरी वगैरे खेळांना धोकादायक म्हणता येते. एवढेच नव्हे तर ब्लू व्हेल आणि फायर फेअरी गेम्स ही सोशल मीडियातली धोकादायक खेळ, बुल फायटींग म्हणजे सांडला दारू पाजवून माणसांशी झुंज लावून देणे हे ही एक धोकादायक खेळ, पण लोक पैश्यासाठी आपल्या प्राणाची चिंता करत नाही आणि खुशाल हे खेळ खेळतात. आपल्या भारतात बिनपैश्याचा एक रोमांचक खेळ खेळला जातो. ज्याचे नाव माहित आहे का? यात दरवर्षी कितीतरी लोकांचे जीव जातोय. होय तो खेळ आहे हिंदू - मुस्लिम खेळ. या खेळाची सुरूवात इंग्रजांनी केली.
इंग्रजांच्या भारतातील पदार्पणापूर्वी भारतावर मुस्लिम शासक शासन करत होते. मुसलमान शासकांच्या हजार बाराशे वर्षाच्या कालावधीत जनता गुण्यागोविंदाने राहत होती. कोणीही राजांच्या दरबारात आपले प्रश्न घेऊन जात असे आणि त्याला पटकन न्यायही मिळत असे. फक्त हिंदू - मुुस्लिम नव्हे तर प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्मावर चालायचे स्वातंत्र्य होते. लोक एकमेकांचेच नव्हे तर एकमेकांच्या धर्माचाही आदर करत होते. एकमेकांना मान-सन्मान देत होते. कारण इस्लाम मध्ये 1400 वर्षापूर्वीच डेमोक्रेसी (लोकतंत्र) शिकविली गेली होती. वर्णवाद, जातीयवादाला इस्लाममध्ये थारा नाही. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी फोडा आणि राज्य करा या योजनेअंतर्गत हिंदू-मुस्लिमांच्या निरागस मनात शत्रुत्वाचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला. सुरूवातील त्यांना यश आले नाही. कारण आपले पूर्वज खूप हुशार होते. कच्च्या कानांचे नव्हते. त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही उलट सुशिक्षित इंग्रजांना त्यांनी हाकलून लावले.
इंग्रज माघार घेऊन भारत सोडून गेले पण आजही ते अस्वस्थ आहे. त्यांना बघू नाही वाटत भारतात हिंदू - मुस्लिम मिळून राहिलेले. त्यांना हाकाललेल्या बेइज्जतीचा बदला ते आजही घेतात. तेच इंग्रज तीच पॉलिसी डिव्हाईड अँड रूल पण आज अमेरिकेत बसून ते हे खेळ खेळताहेत. आणि आजचली आपली पिढी कच्च्या कानाची त्यांच्यावर विश्वास करून एकमेकांना शत्रू मनायला तयार. इंग्रज हे इस्लामचे विरोधक त्यांनी भारतातल्या हिंदूंना भडकविले कि इस्लाम तलवारीच्या जोरावर पसरलेला आहे. पण हा एक निव्वळ गैरसमज आहे. असे असते तर भारतात एकही व्यक्ती दुसऱ्या धर्माची राहिली नसती. भारतातले सर्व लोक मुसलमान झाले असते. भारत एक मुस्लिम राष्ट्र झाला असता पण असे नाही. मुस्लिम शासकांचे चारित्र्य आणि इस्लामची शिकवण आणि अवलियांची करामत बघून काही लोकांनी इस्लामचा स्वीकार केला. मुस्लिम शासनकर्त्यांच्या काळात तलवारीचा वापर केला गेला असता तर मुसलमान अल्पसंख्यांक राहिले असते का? असो.
स्वतःला सुपरवापर म्हणणाऱ्या अमेरिकेला आजही भिती आहे की भारत सुपरपॉवर बनले तर माझे काय? थोडं डोकं लावा. आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतीय लोकांचा मोठा वाटा आहे त्याला सुपरपॉवर बनविण्यात. तो आपले टॅलेंटेड, जिनिअस तरूणांना जास्त पगार, ऐश्वर्यपूर्ण जीवनाचे आमिष दाखवून आपले टॅलेंट हायजॅक करत आहे. आपल्या तरूणांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. हुशार विद्यार्थ्यांचे स्वप्न हे अमेरिका जाणे असते. ग्रीन कार्ड होल्डर बनन असते आपण कळत न कळत, आज ही त्यांच्या-(उर्वरित पान 7 वर)
गुलामगिरीत आहोत. हिच संपदा भारतात राहिली असती तर आपला भारत महासत्ता नसता का झाला? आता खूप झाले, बस्स करा ना आता! सोडून द्या हे धोकादायक खेळ. आपण कुठवर हे हिंदू-मुस्लिमाचे कुरूप आणि लाजिरवाणे खेळ खेळत राहणार? आता तर याचे आणखीन एक भीषण आणि निर्दयी रूप ’’ मॉब लिंचींग’’च्या स्वरूपात समोर आलेले आहे. मॉब लिंचींगमध्ये मेलेल्या माणसाला मोक्ष जरी प्राप्त होत असला तरी मॉबलिंचींग करणाऱ्यांना नरकाशिवाय काय भेटणार?
मग आपण आपले पूर्वजांसारखे शहाणे होणे गरजेचे आहे. भारतीय मुसलमान हे साधे भोळे आहेत. त्यांच्या मनात कधी ही काही वाईट येत नाही. कोरोना काळातही ते सर्वधर्मांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढे आलेले आहेत. कोरोनाच्या भितीपायी अनेक ठिकाणी बेवारस सोडण्यात आलेल्या अन्य धर्मीय प्रेतांचे अंत्यविधी मुस्लिमांनी पार पडले. सर्वांना स्वखर्चाने ऑक्सिजन पुरवठा केला. आजही खाडीच्या देशांत सर्व धर्मांना खूप मान सम्मान दिला जातो.
मग पूरे आता आपल्याला सायंस टे्ननॉलॉजीमध्ये पुढे जायचे आहे. आपल्या देशाला सुपरपॉवर बनवायचे आहे मग हे घाण खेळ सोडण्यातच आपले भले आहे. अन्यथा आपली प्रगती ही विरूद्ध दिशेत (आपोजिट डायरे्नशन) मध्ये होईल. म्हणजे अधोगती होईल. आपल्या देशाला उन्नतीकडे नेऊया उज्ज्वल भविष्य आपल्या पुढच्या पिढीला देऊया.
अरे आपण कोण? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे राहिले ना. आपण खरं तर एकच ओळखधारक व काहीही असो, गाव, तालुका जिल्हा, राज्य, राष्ट्र कोणते ही असो आपण फक्त ईश्वराचे प्रतिनिधी (खलीफा) हीच आपली ओळख. प्रतिनिधीला स्वामीने दिलेल्या आदेशांचेच पालन करावे लागते मग आपण सगळ्यांनी त्याच्या आदेशाचे पालन करून त्याला ओळखून, स्वतःला ओळखून. प्रेषित सल्ल.यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूया. खूप सुंदर आणि अतिशय प्रेमळ मार्ग आहे हा. ’’एकमेकांवर प्रेम करू देशाला प्रगतीकडे नेऊ’’. ईश्वराचे प्रतिनिधी व्हा, शैतानाचे नाही.
अल्लाहकडे हीच प्रार्थना ’’आम्ही सर्व भारतवासियांच्या मनात प्रेम निर्माण कर, आम्हा सगळ्यांवर कृपा कर आणि आमच्या भारताला प्रगतीचा उच्चांक गाठू दे. (आमीन.)
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
Post a Comment