Halloween Costume ideas 2015

आंतरराष्ट्रीय लुटारू


सरतेशेवटी अमेरिकेच्या अफगाण कमांडोच्या लष्करप्रमुखानं आपल्या पदाचा प्रतिकात्मक राजीनामा दिल्याने गेली २० वर्षे चाललेल्या अफगाण विरूद्ध अमेरिका आणि जगभरातील सैन्य या युद्धाचा रीतसर अंत झाला. अमेरिकेला पराभव पत्करावा लागला. तालिबानने आपली भूमी परत घेतली. पण जगभरचे लोक हवालदिल आहेत. आता काय होणार? म्हणजे संपूर्ण जगाने अमेरिकेला आपले रखवालदार नेमले होते की काय, असा प्रश्न पडतो. अमेरिकेला पुढे करून सारे युरोपियन देश अरब-अफगाणिस्तानची दाणादाण केली होती, करत आहेत आणि यापुढेही ते करू पाहातात. म्हणूनच त्यांना अमेरिकेने युद्ध हरल्याचे दुःख आहे, असे वाटते.

याआधी अमेरिकेने व्हिएतनामवर हल्ला केला. त्या देशावर लादलेल्या युद्धात हजारो नागरिकांची कत्तल करण्यात आली आणि शेवटी तेथेही पराभव पत्करून परत जावे लागले होते. इराककडे जैविक शस्त्रास्त्रे असल्याचा खोटा आरोप करीत त्याची नासधूस केली. १० लाख इराकींना ठार केले. यामध्ये मोठ्या संख्येने लहान मुले होती ज्यांना अजून माहीत नव्हते की ते इराकी आहेत. अब्जावधी डॉलरची इराकींची संपत्ती लुटली, इराकच्या मालकीचे अब्जावधीचे कच्चे तेल काढून विकले. ९/११ च्या घटनेशी आणि अल-कायदाशी इराकचा काहीएक संबंध नसताना खोटे आरोप केले गेले. माध्यमांद्वारे ते जगभर प्रसारित करण्यात आले.

हेच सर्व त्यांनी अफगाणिस्थानात केले. लाखाहून अधिक लोकांची हत्या केली. इराकवर निर्बंध लावून तेथील जनतेला औषधाविना मरण पत्करावे लागले. तसेच काही अफगाणिस्थानमध्ये केले गेले. त्या आधी व्हिएतनाममध्ये करण्यात आले. आजदेखील सीरियाची नासधूस चालूच आहे. त्या देशाला जगाच्या नकाशावरूनच जणू काढून टाकले आहे. सउदीअरेबियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून येमेनमधील निष्पाप लोकांची हत्या सर्रास चालू आहे. इरानवर कित्येक वर्षांपासून निर्बंध लादलेले आहेत. त्याच अमेरिकेला दरोडेखोर, लुटारू, हत्याऱ्याला जगातले युरोपियन देश आणि इतर काही राष्ट्रे अफगाणिस्थानातून जाऊ नये असे म्हणतात. अमेरिकेने हे हत्यांचे, लुटण्याचे तांडव त्यांच्या देशामध्ये माजवले असते तर अमेरिकेचे नक्की स्वरूप काय आहे हे त्यांना कळले असते.

अमेरिकेला हे सारे का करायचे आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या देशात शस्त्रास्त्रांचे कारखाने रात्रंदिवस चालू आहेत. या कारखान्यांकडून लाखो लोकांना रोजगार मिळावा, जगण्याची, ऐश्वर्य-वैभवाची साधने मिळावीत आणि याच कारखान्यांकडून जगभरातील निष्पाप लोकांच्या कत्तलीसाठी शस्त्रे प्राप्त व्हावीत, हा अमेरिकेचा खरा चेहरा आहे. आधुनिक सभ्यता, संस्कृती आणि मानवाधिकारांचा मुखवटा धारण करणारे हेच राष्ट्र कोट्यवधी आफ्रिकन निग्रोंना जहाजात डांबून आणत आणि त्यांचा बाजार थाटत असत. जनावरांशी देखील जसा व्यवहार केला जात नाही तसा व्यवहार त्यांच्यावर करत होते.

कोणत्याही राष्ट्रावर जेव्हा अमेरिका हल्ला करते तेव्हा ते युद्ध जिंकणे हा त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा हेतू असतो. त्याचे मुख्य उद्दिष्ट त्या देशाला इतके उद्ध्वस्त करण्याचे असते की पुढची पन्नास वर्षे त्याने वर येऊ नये, हे असते आणि तिसरे उद्दिष्ट अमेरिकी सैन्यांना सहलीवर पाठवायचे असते. ज्या बग्राम विमानतळावर अमेरिकेने छावणी उभारली होती ते एक छोट्याशा शहरासारखे नव्हे तर न्यूयॉर्क, पॅरिससारखे ऐश्वर्यसंपन्न शहर होते. मोठमोठे शॉपिंग मॉल, थिएटर, नाट्यगृह, हजारो वाहने आणि संपूर्ण शहर एअरकंडिशण्ड होते. इतक्या सोयीसुविधांयुक्त छावणीत राहाणारे सैन्य अफगाणिस्थानच्या लढवय्यांशी जिंकूच शकत नव्हते. त्यांच्याकडे कोणत्या सुविधाच सोडा अमेरिकी सैन्याच्या तोडीची शस्त्रेदेखील नव्हती. पण अमेरिकेला माघारी लावणे हे त्यांचे दृढ उद्दिष्ट होते, म्हणून ते जिंकले!

- सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget