राजकारणाचा पॅटर्न 2014 पासून बदललेला आहे. भावनेभोवती राजकारणाची गणिते फिरविली जात आहेत. धर्म, जात, पंथ आणि आरक्षण या विचारांवर लोकांना अधिक मानसिक गुलाम केले जात असल्यामुळे मुलभूत गरजेच्या मुद्यांवर राजकारणी सोयीने बोलत असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या उभारणीत शासकीय संस्थांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्याच संस्थांना खालसा केले जात असल्याने देशाचे भविष्य उद्योगपतींच्या दावणीला बांधले जाणार एवढे मात्र नक्की.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे गणित आमचे असल्याचे राजकारणी बोलून दाखवितात. मात्र प्रत्यक्षात 20 टक्के समाजकारण आणि 80 टक्के राजकारण सुरू आहे. त्यासाठी आरक्षणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे, हे पुढे दर्शवून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पॅटर्न सुरू आहे. त्यामुळे देशाचे राजकारण यापुढे मुलभूत मुद्यांवर न होता भावनिक मुद्यांवर असेच सुरू राहिले तर येणाऱ्या काळात अधोगतीशिवाय काहीच हाती लागणार नाही. आरक्षणाच्या भाऊगर्दीत मुस्लिम आरक्षणाचे घोडे पेंड खात आहे, एवढे मात्र खरे.
-‘कलमवाला‘
Post a Comment