Halloween Costume ideas 2015

तिसऱ्यांदा पुन्हा आघाडी


देशातील लोकसभा निवडणुका अजून लांब असल्या तरी विरोधी पक्षांनी आतापासूनच मोर्चोबांधणीला सुरुवात केली ही चांगली बाब आहे. गेली सात वर्षे चाललेला देशाचा कारभार आम नागरिकांपासून राजकारणी, विचारवंत, पत्रकार मंडळी सर्वांनीच पाहिला आहे. भारत देशोधडीला लागला असतानाही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना याची तिळमात्र देखील चिंता नाही, हीच सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. देशात जे काही घडत आहे त्याला विविध कारणे असू शकतील. कोरोनामुळे आर्थिक स्थिती कशी खालावली याला कुणी जबाबदार नसले तरी जे काही घडत आहे त्यावर मात करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही मोठी चिंता! सध्याच्या सरकारला नेमके काय हवे आहे हे जनतेसमोर येत नाही. त्यांच्या मनात देश कोणत्या पातळीपर्यंत पोलोचवायचा आहे हे ते सांगत नाहीत. त्यांचा खरा अजेंडा काय हे कळू देत नाहीत. म्हणून नागरिक आणि त्याचबरोबर इतर पक्ष आणि विचारवंत, कायदेतज्ज्ञ, पत्रकार वगैरे यावर विचारविनिमय करण्यासाठी शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जमले होते. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंच याद्वारे सभेचे आयोजन केले गेले. सुरवाताली आगामी निवडणुकांविषयी कोणती रणनीती आखली गेली नसली तरी असा विचार या देशाच्या राजकीय आणि वैचारिक शक्तींनी केला ही महत्ताची गोष्ट आहे.

या बैठकीत इतर विरोधी पक्ष सपा, आप, लोकदल वगैरे आठ पक्षांना निमंत्रण दिले गेले होते. यात काँग्रेसला वगळण्यात आले हा सध्याच्या रणनीतीचा भाग असावा कारण प्रत्येकाला माहीत आहे की देशात जर दुसरी आघाडी निर्माण करायची असेल तर काँग्रेसला वगळून चालणार नाही, तसे केल्यास ही दुसरी नव्हे तर तिसरी आघाडी होईल. आणि भूतकाळात तिसऱ्या आघाडीचे राजकारण यशस्वी झाले ले खरे असले तरी काँग्रेस पक्ष आधी बाहेरून पाठिंबा देते नंतर तो पाठिंबा काढून पहिल्या आघाडीची वाट मोकळी करत असतो, हा त्या पक्षाचा इतिहास आहे. याचे कारण नेहरू-गांधी वगळता उर्वरित काँग्रेस पक्षाची वैचारिक बांधिलकी संघाशी आहे. म्हणून काँग्रेसला बाहेर ठेवणे म्हणजे सुरुवातीला धोका पत्करण्यासारखे आहे. शिवाय इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची स्थिती आजदेखील बरी आहे. सर्वांत जास्त खासदार आणि प्रांतीय विधानसभा त्याच्याकडे आहेत.

लोक म्हणतील म्हणजे विरोधी, शरद पवार यांची पंतप्रधान व्हायची संधी दोन वेळा हुकल्याने ते पंतप्रधान होण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्नात आहेत. ही जरी वास्तविकता असली तरी देशात आजच्या घडीला पवारांसारकखा दुसरा कोणताही नेता पंतप्रधान होण्याच्या लायकीचा नाही आणि दुसरे असे की कोणता नेता देशभरात असा असेल ज्याला पंतप्रधान होणे आवडणार नाही?

खरे पाहता शरद पवारांची मोठी चूक १९९८ सालीच झाली, जेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादीची स्थापना केली होती. ते कितीही दूरदर्शी असले तरी १९९८ नंतरची देशातील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे हे त्यांना कळाले नव्हते. ते भाजपकडून सोनिया गांधी यांच्या घराणेशाही आणि परदेशी मूळच्या राजकारणाला बळी पडले. त्यांना हे दिसले नव्हते की काँग्रेस पक्षात देशपातळीवरचा एकही नेता असा नव्हता जो पंतप्रधानपदाच्या लायकीचा असावा. त्यांनी पक्ष सोडला. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह रावांना पंतप्रधान करण्यात आले, त्या वेळी पवार काँग्रेसमध्ये होते. नरसिंह रावांना त्यांचे आव्हान नको होते. म्हणून त्यांनी पवारांना महाराष्ट्रात पाठवून दिले होते. पण नरसिंह रावांनंतर शरद पवारांना पंतप्रधान होता आले असते. त्यांनी अशा वेळी पक्ष सोडला जेव्हा काँग्रेस पक्षाला २००९ च्या निवडणुकीत यश मिळाले खरे पण पंतप्रधानपदासाठी त्या पक्षाला मनमोहन सिंग यांची निवड करावी लागली होती. या काळात जर ते काँग्रेस पक्षात असते तर त्यांना नक्कीच पंतप्रधानपदी बसवण्याव्यतिरिक्त काँग्रेसकडे पर्याय नव्हता.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget