Halloween Costume ideas 2015

दहशतवादी कोण? का आणि कसे?

दहशतवादी कोण आहे? काय हे एखादी वळवळ किंवा दृष्टिकोनाचे नामाभिधान आहे? अथवा एखाद्या व्यक्ती अगर संघटनेचे? परंतु आजच्या काळातील ज्वलंत महत्त्वाचा विषय आहे.  या विषयावर कित्येक वर्षे विचार केल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघदेखील त्याची व्याख्या निर्धारित करण्यास असमर्थ आहे. जी परिभाषा ते ठरवितात त्याच्या परिघात विद्यमान महाशक्ती  येते. कारण यूनो या महाशक्तीची प्रातिनिधिक सभा आहे. म्हणून त्यांच्या इच्छेनुसार इस्लामी जनसमुदायास लक्ष्य बनविले गेले आणि दहशतवादाचे सुलभ नाव इस्लामी दहशतवाद  शोधून काढण्यात आले, जेणेकरून अफगाणिस्तान, इराक आदींवर आक्रमणाचे कारण उपलब्ध व्हावे. अशा प्रकारे आजच्या काळातील सर्वांत मोठ्या दहशतवादी अमेरिकेने स्वत:च्या  युद्धपिपासू उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी या मुस्लिम देशांत सर्वनाश व विध्वंस माजवला असून तिथे लयलूट अन् मानवी संहारास स्वत:साठी उचित ठरविले.
अशाच तऱ्हेने पॅलेस्टीनमध्ये अरबांचा नरसंहार इस्राईल करीत आहे. ज्यास अमेरिकेनंतर द्वितीय दहशतवादी सुद्धा संबोधले जाऊ शकते. जर्मनीत हिटलरने यहुदींची सार्वजनिक हत्या  (जे होलोकास्टच्या नावाने सर्वश्रुत आहे) त्याचा बदला ते अरबांशी घेत आहेत.
हिटलरने जे वर्तन याच्यासोबत केले होते त्यापेक्षा निकृष्ट वागणूक ते पॅलेस्टीनमध्ये अरबांबरोबर करीत आहेत. कारण इस्राईल जर्मनीकडून बदला घेऊ शकत नाही आणि अमेरिकी  नीतीधुरिणदेखील इस्राईलद्वारे अरबांना ठेचू इच्छितात.

दहशतवादाची काही उदाहरणे-
* विमुक्त भारतात स्वातंत्र्यानंतर लगेच स्वाधीनता संग्रामाचे मार्गदर्शक म. गांधी यांना भरदिवसा लख्ख उजेडात निर्घृणपणे ठार केले जाते. मारेकरी उच्च जातीतील हिंदू नथुराम गोडसे  जो संघपरिवाराचा कार्यकर्ता होता. जणू स्वतंत्र भारतात हा दहशतवादाचा शुभारंभ होता.
* देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या एका शीख सुरक्षारक्षकाच्या हातून दिवसाढवळ्या निर्दयीपणे गोळ्या झाडून करण्यात आली.
* माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा हत्यारा दक्षिण भारतातील एक हिंदू व्यक्ती होती.
*  ऑस्ट्रेलियातील खिस्ती धर्मगुरू ग्रॅहम स्टोन्स आणि त्याच्या अपत्यांना जिवंतपणी निष्ठूरतेने ठार करण्यात आले. त्यांना जाळणारे बजरंग दल आणि भाजपचे लोक होते.
* नक्षलवादी, उल्फा आदी संघटनांच्या हिंसेचे काही दिवसांनंतर लोक बळी होतात. उत्तर भारतात क्षुद्र जातीच्या लोकांचे वित्त, प्राण, प्रतिष्ठा व अब्रू पायदळी तुडवणे उच्च जातीच्या  लोकांची अतिरेकी वृत्ती बनलीय.
* संघपरिवाराने अडवाणींच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बाबरी मस्जिद भुईसपाट केली. जरी खटला सुप्रीम कोर्टात सुरू होता आणि याच न्यायालयात बाबरी मस्जिदला हानी पोहचवणार  नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. नंतर मात्र कायद्याचे उल्लंघन करण्यात आले.
* गोधरा येथे मोदीछाप फॉर्मूला स्वीकारून त्याच्या प्रयोगाने गुजरातमध्ये मुस्लिम अल्पसंख्यकांचा वांशिक संहार करण्यात आला.
* महाराष्ट्रात नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, उमरखेड आदी ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या घटनांतील अपराधी आजदेखील मुक्तपणे मोकाट फिरत आहेत. त्यांची आजपर्यंत यथेष्ट चौकशीसुद्धा  करण्यात आलेली नाही.
* मुंबई येथे गणेशविसर्जन मिरवणुकीत एका व्यक्तीजवळ पिशवीमध्ये जिवंत बॉम्ब सापडले होते. कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी ती पोलिसांच्या हाती लागली. परंतु या घटनेची  पूर्ण चौकशी व्हायला हवी होती. (दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली असती तर त्याचे खापर कुणावर फोडण्यात आले असते, हे सांगायला नको!)

उपरनिर्देशित उदाहरणे काही दहशतवादी घटनांशी निगडीत आहेत. काय यामध्ये दहशतवादी दृष्टीस पडत नाहीत का? त्यांना हिंदू दहशतवादी संबोधणे तर योजने दूर राहिले, कोणी त्यांना साधे दहशतवादीसुद्धा म्हणण्यास तयार नाही. अर्थात हे वाक्य केवळ इस्लामी जनसमूहाशी संबंधित होय.

अपराध आणि धर्म
विद्यमान काळातील ही मान्यताप्राप्त वास्तविकता आहे की गुन्हेगार व अपराधिक व्यवसायातील व्यक्तीला कोणताही धर्म किंवा देश नसतो. परंतु मुस्लिम जनसमूहाचा संबंध आल्यावर लगेच मापदंड बदलून जातात आणि त्याच्या प्रत्येक कृती व आचरणास विशिष्ट सूक्ष्मदर्शक यंत्रातून बघितले जाते की कशा प्रकारे आणि कसे त्यांना बदनाम केलेजाईल  आणि आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी मार्ग प्रशस्त केले जातील.
उसामा बिन लादेनच्या गटास अमेरिकेनेच सोव्हिएत रशियाविरूद्ध अफगाणिस्तानमध्ये काम करण्याचे प्रशिक्षण देऊन तयार केले होते. तालिबानला जन्मास घालणारीसुद्धा अमेरिकाच  होय. जेव्हा या लोकांशी त्यांचा उद्देश पूर्ण झाला, मग ते स्वत: अमेरिकेच्या नजरेत दहशतवादी बनले. कारण आता ते अमेरिकेच्या उपयोगाचे राहिले नव्हते. यास्तव अमेरिकेचा प्रचार  सुरू झाला. यांच्यापासून समस्त जगाला धोका उत्पन्न झालाय. अशा प्रकारे ते स्वत: अत्याचारपूर्ण महत्त्वाकांक्षा व जुलूम, अन्यायास उचित ठरविण्यासाठी कारणे एकत्रित करून  घेतात. हे सर्वांना माहीत आहे की अमेरिकेची सीआयए आणि इस्राईलची मोसाद दहशतवाद्यांना प्रशिक्षणासाठी तयार करून संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांना वापर करून घेतात.

प्रसारमाध्यमे आणि पोलिसांची भूमिका
सर्व साधारणपणे देशात जिथेसुद्धा हिंसेची अप्रिय घटना घडते, शासनाजवळ दहशतवादी गटांच्या नावांची यादी अन् उपयोगात आणलेल्या स्फोटक साहित्याचा तपशील अगोदरच उपलब्ध  असतो. पोलीस आणि प्रसारमाध्यमांकडून मुस्लिम युवकांभोवती संशयाच्या सुया फिरवून कपोलकल्पित कथा रचून तरुणांना अटक केली जाते. त्यांना अन्याय व अत्याचाराचे लक्ष्य बनविले जाते. अशा प्रकारे संपूर्ण मुस्लिम समाजास अपराधी सिद्ध करण्याचे षङ्यंत्र अंमलात आणले जाते. पोटा व मकोकासारखे कायदे तर केवळ यासाठीच बनविण्यात आलेले आहेत, ज्यांचा नि:संकोचपणे वापर मुस्लिम अल्पसंख्यकांकरिता केला जाऊ शकेल. म्हणून ही व्सातविकता आहे की आजपर्यंत या कायद्यांच्या कलमाखाली समाजातील युवकांना अटक  करण्यात आलेली आहे.
विद्वेषाची परिसीमा तर अशी आहे की मालेगाव, हैद्राबाद,समझोता एक्सप्रेस, अजमेर इ. येथील मस्जिदींमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट घटनेच्या संबंधातसुद्धा समाजातील व्यक्तींनाच अटक  करून अत्यंतिक वेदना व भयंकर यातना देण्यात येऊन अनन्वीत छळ करण्यात आला आहे. नंतर सत्य समोर आले की समझोता एक्सप्रेस, मालेगाव, हैद्राबाद, अजमेर येथील  घटनांमध्ये कोण होते. मग त्यांचा गुन्हा समोर आला. अपराधी कोण होते ते समजले आणि त्यांना कसे सोडवले जाते हेसुद्धा सर्वांना माहीत आहे.

कार्यक्रम
या वेळी आवश्यकता आहे की इस्लामी जनसमुदायासमोर पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवनचरित्र सादर करून पैगंबरांनी त्यांच्या प्रेषित्वाच्या प्रारंभिक पंधरा वर्षांत कशा तऱ्हेने  आपुलकीसह धर्म प्रसार-प्रचाराचे कार्य पार पाडले आणि स्वत:च्या आचरण व चारित्र्याद्वारे जनसामान्यांची मने जिंकली. त्यांच्या अंत:करणात आणि मष्तिष्कात अधिराज्य केले. छिन्नभिन्न समाजास कल्याणकारी जनसमूहात परिवर्तित करून टाकले. इस्लाम आपल्या अनुयायी जनसमुदायाकडे हीच मागणी करीत आहे की त्यांनी आपले कर्म व सदाचाराद्वारे जनतेची हृदये जिंकून घ्यावीत. खरे तर हेच प्रत्येक समाजबांधवाचे जीवनध्येय होय. या कर्तव्यापासून गफलतीचा परिणाम इहलोक व परलोक दोन्ही ठिकाणी भयानक अन् धोकादायक
असेल.
काळाजी अपेक्षा आहे की इस्लामी समाजाने स्वत:चे संप्रेक्षण करावे की तो इतका निष्प्रभ का झालाय? या देशात आम्ही जवळपास २० कोटी आहोत, त्याअर्थी जगात सुमारे २०० कोटी,  त्याच्या उलट आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचा कोणताही प्रभाव जाणवत नाही. आम्ही कचरा आणि शेवाळ्याप्रमाणे बनून राहिलो आहोत.
हदीसमध्ये अल्लाहचे संदेष्टा मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लवकरच मुस्लिमेतर समाज तुमचे दमन करण्यासाठी एकमेकास बोलावतील आणि (मग ते सर्व मिळून) हल्ला करतील.  जसे अनेक भोजन करणारी माणसे परस्परांना बोलावून पक्वान्नावर तुटून पडतील.’’
एका व्यक्तीने विचारले, ‘‘हुजूर! त्या वेळी आमची संख्या अल्प असेल?’’ मुहम्मद (स.) उत्तरले, ‘‘नाही किंबहुना त्या वेळी तुम्ही बहुसंख्याक असाल. परंतु तुमची अवस्था महापुरातील  कचरा आणि शेवाळ्यांपेक्षा अधिक नसेल. त्या वेळी अल्लाहचा निर्णय असा असेल की वैरी समाजाच्या मनातून तुमचे भय संपून जाईल आणि तुमची हृदये ‘वहन’चा बळी ठरतील.’’ एकाने विचारले, ‘‘हे प्रेषिता! वहन कशाला म्हणतात?’’ पैगंबर मुहम्मद (स.) वदले, ‘‘जगाविषयी माया आमि मृत्यूसंबंधी द्वेष-मत्सर.’’ (हदीस-अबू दाऊद)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget