रमजान हा इस्लामचा अत्यंत पवित्र व महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव अगदी मन लावून ईश्वराची प्रार्थना करतात आणि मानवाला या पृथ्वीवर शांततामय, सुखी समाधानी व पवित्र जीवन जगून मृत्यूनंतर ईश्वरासमोर एक आदरणीय-स्वगीय व्यक्ती म्हणून हजर होता यावे यासाठी ईश्वराचे संपूर्ण मार्गदर्शन असलेल्या पवित्र कुरआनचे वाचन व पठण करण्यात जणू तत्लीन झालेले असतात. त्यातून मिळालेल्या प्रेरणेने ईश्वराजवळ दयेसाठी, कृपादृष्टीसाठी आणि क्षमेसाठी रात्रंदिवस याचना करीत असतात. त्याबरोबरच विधवा व निराधार स्त्रियांना, पोरक्या पोरांना व गरजू व्यक्तींना शोधून शोधून, अगदी गुप्तपणे निव्वळ ईश्वराला प्रसन्न करण्याच्या पवित्र हेतूने खूप दानधर्म करतात (कारण इस्लाम धर्मात ‘दिखाऊ पुण्याई’ पुण्याऐवजी पाप ठरते). तसेच इस्लामी प्रार्थना म्हणजे नुसते मस्जिदीत जाऊन पूजापाठ करणे नव्हे तर आपल्या जीवनातील सर्व दैनंदिन व्यवहारांत ईश्वराच्या मार्गदर्शनाला व आज्ञांना अग्रस्थान देऊन ते पार पाडणे, मग ते घरगुती व्यवहार असोत, समाजकार्य असो की राजकारण असो. या महिन्यात वातावरण अगदी पवित्र व मोकळेपणाचे झालेले असते. कारण इस्लामी रोजा म्हणजे फक्त खाणे-पिणे वर्ज्य करून उपाशी राहणे इतकेच नव्हे (तसेच तो उपवास करणाऱ्याच्या लहरीवर व इच्छेवर अवलंबून नसतो) तर तो ईशधर्म इस्लामच्या पाच मुख्य तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे म्हणून तो ईश्वराने घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच करावयाचा आहे. इस्लामी रोजा माणसाच्या शरीरस्वास्थ्याबरोबरच त्याच्या आत्मशुद्धीचे, विचारशुद्धीचे, स्वभावशुद्धीचे आणि मानव समाजाच्या संपूर्ण व्यवहारशुद्धीचे एक उत्कृष्ट साधन, ईशप्रेरणा आहे. माणसाला सत्यशील, सहनशील, परोपकारी, पवित्र आणि एक आदर्श मानव बनविणारी ती एक ईशतपश्चर्या व प्रशिक्षण आहे.
रोजामध्ये मुख्य उद्देश तीन आहेत.
(१) माणसाच्या मनात ईशभाव (ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल खात्री) आणि पूर्ण श्रद्धा निर्माण करणे.
(२) ईशआज्ञापालनाचे प्रशिक्षण.
(३) एक पवित्र, परोपकारी व आदर्श समाज निर्माण करणे.
सबंध महिनाभर रोज सरासरी १३ ते १५ तास आपल्या नैसर्गिक व रास्त गरजा, इच्छा व कामनांपासून जसे खाणे-पिणे, स्वत:च्या पत्नीजवळ जाणे (शरीरसंबंध ठेवणे) खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू व स्वत:ची पत्नी समोर असूनसुद्धा, ईश्वराची तशी आज्ञा आहे म्हणून स्वत:ला पूर्णपणे अलिप्त ठेवणे हे ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय शक्यच नाही आणि इतकी कडक तपश्चर्या करूनसुद्धा मानवसमाजात ज्यामुळे अविश्वास, दूही निर्माण होू शकतात त्या दुष्कृत्यांपासून स्वत:ला अलिप्त ठेवण्यात थोडी जरी कसूर झाली तर रोजा फुकट जातो. तो ईश्वराला मान्य नाही. यावरून इस्लाम धर्मात मानवांच्या पवित्र व शांततामय जीवनाला किती महत्त्व देण्यात आले आहे हे स्पष्ट होते. ईश्वर (अल्लाह) पवित्र कुरआनात म्हणतो, ‘‘माझा अपराध करणाराला मी कदाचित क्षमाही करीन, परंतु कोणा मानवाचे मन दुखवले असेल तर त्याला मी क्षमा करणार नाही, जोपर्यंत तो माणूस त्याला माफ करणार नाही.’’ दुसऱ्या ठिकाणी ईश्वर म्हणतो, ‘‘ज्याने एका निरपराध माणसाची हत्या केली त्याने जणू पृथ्वीवरील सर्व मानवांची हत्या केली. तसेच ज्याने एका व्यक्तीचे प्राण वाचविले त्याने जणू पृथ्वीवरील सर्व मानवांचे प्राण वाचविले.
इस्लाम हाच एक असा ईश्वरी सत्यधर्म आहे जो प्राणहानीलाच काय माणसाचे मन दुशविण्याला सुद्धा मोठे पाप ठरवितो आणि त्याचा इतका प्रखर विरोध करतो. तो त्याच्या अनुयायांना निर्दयी व अमानवी कृत्यांपासून सदैव दूर राहण्याची सक्तीने ताकीद करतो. रणांगणावरसुद्धा संयम राखण्याची, पशुतुल्य आणि राक्षसी कृत्यांपासून दूर राहण्याची आज्ञा करतो. शत्रूंच्या स्त्रियांवर, मुलांवर, वृद्धांवर व आजारी व्यक्तींवर मुळीच हात न उचलता त्यांना माणुसकीने मदत करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणावरही मग तो मित्र असो अथवा शत्रू, अन्याय करण्यास मनाई करण्यात आली आहे. ईश्वर सर्वांचा एकच आहे. तो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. त्याची सर्व तत्त्वे, नियम व आज्ञा, माणसाला दयाशील, पवित्र व श्रेष्ठ बनविणाऱ्याच आहेत, त्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाचे अचूक मार्गदर्शन आपल्या पवित्र ग्रंथांत केले आहे. मग ते कौटुंबिक व सामाजिक जीवन असो की राजकारण असो. त्याला जर अगदी तंतोतंत आचरणात आणले तर मानव समाजात सगळीकडे बंधुभाव, प्रेम, पावित्र्य, न्याय व शांतताच दिसेल. कोठेच अन्याय राहणार नाही. कोणालाच कोणाबद्दल तक्रार राहणार नाही. सर्वांचे जीवन अगदी पवित्र, समाधानी आणि सुखी बनेल.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment