Halloween Costume ideas 2015

कपिल सिब्बल यांची हदरवून टाकणारी पत्रकार परिषद

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नुकतीच दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात एक वार्तापरिषद घेतली. जिला एकाही वृत्तवाहिनीने प्रक्षेपित केले नाही. एनडीटीव्हीने प्रक्षेपित करायला सुरूवात केली पण लगेच बंद केली. या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आलेला असून कोणत्याही सुज्ञ भारतीयाचे काळीज हेलावून टाकणारे आरोप कपील सिब्बल यांनी भाजपवर लावलेले आहेत.
    कपिल सिब्बल यांचे म्हणणे असे आहे की, नोटबंदीच्या अगोदर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने दोन हजार रूपयांच्या नोटा प्रचंड प्रमाणात विदेशात छापण्यात आल्या व त्या विमानाने एअरफोर्सच्या विमानतळावर आणल्या गेल्या व रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा खाजगी संस्थांना बदलून देण्यात आल्या. त्यातून फोर मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. याकामाकरिता रॉ आणि आरबीआयची काही विशिष्ट माणसे कामावर लावण्यात आली. एकूण 3 लाख कोटी रूपये बदलून देण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर शाखेच्या मदतीने हे सर्व व्यवहार पूर्ण झाले. कपिल सिब्बल यांनी इंडस बँक फोर्ट मुंबई, रबाळे नवी मुंबई येथील एमआयडीसीचे गोडावून याकामी वापरण्यात आले. यासंबंधीचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ व संभाषणाच्या ट्रान्सक्रीप्ट सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविल्या. त्या व्हिडीओमध्ये अमित शहा, जय शहा, बँकांचे अधिकारी, रॉ चे अधिकारी व गुजरातचे उपमुख्यमंत्री इत्यादींची नावे आहेत.
    हे सर्व आरोप यू ट्यूबवर आजही उपलब्ध आहेत. यासंबंधी केंद्र सरकारने किंवा भाजपने कपिल सिब्बलवर कुठलीच कार्यवाही केलेली नाही. त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केलेला नाही. यावरून शंका घेण्यास जागा आहे, अशी चर्चा जनतेमध्ये आहे. कपिल सिब्बल एक जबाबदार नेतेच नसून त्यांचे उभे आयुष्य सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्यात गेलेले आहे. आजही ते प्रथम श्रेणीचे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत. तेव्हा आपण जे आरोप अनेक दिग्गजांच्या व सरकारी अधिकार्यांच्या विरूद्ध नावानिशी लावतोय ते किती गंभीर आहेत व ते चुकीचे असतील तर त्याचे किती गंभीर परिणाम होतील, याची जाणीव त्यांना असणारच. असे असतानांही त्यांनी हे आरोप लावले व त्यावर सरकार शांत आहे, याचे आश्चर्य वाटते. आत्तापर्यंत यू ट्यूबवर हा व्हिडीओ साडेपाच लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला.
    उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुद्धा कपिल सिब्बल यांच्या आरोपांना बळ मिळते. सिब्बल यांनी लावलेले आरोप जर खरे असतील यापेक्षा मोठे लोकशाहीचे दुर्दैव ते काय.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget