जागतिक आरोग्य संघटनेने जगातील दारूचे प्रमाण 2025 पर्यंत 10 टक्क्याने कमी करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. परंतु, या ध्येयाला हरताळ फासण्याचे काम आपल्या देशात सुरू आहे. जगप्रसिद्ध लान्सेट मासिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 1990 ते 2017 या 27 वर्षाच्या कालावधीत भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या 38 टक्क्यांनी वाढली आहे. 1990 मध्ये एक माणूस वर्षाला सरासरी 4.3 लिटर दारू पीत होता. तर 2017 मध्ये त्याचे प्रमाण वाढून 5.9 लिटरवर पोहोचले आहे. 2017 ते 2019 मध्ये यात आणखीन वाढ झाली असेल, यात शंका नाही.
जगामध्ये उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशामध्ये पूर्वी मद्यपानाचे प्रमाण वाढलेले होते. मात्र मागच्या काही काळामध्ये या देशामध्ये मद्यमापानचे प्रमाण एक तर स्थिर आहे किंवा कमी झालेले आहे. मात्र मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांच्या देशात वाढ झालेली आहे. या अहवालात असाही अदांज व्यक्त करण्यात आलेला आहे की, 2030 पर्यंत जगातील 50 टक्के लोक मद्यपान करतील.
मद्यपान हे आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहित आहे. दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जगभर अनेक उपक्रम राबवित आहेत. तरी परंतु, मद्यपींच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.
मद्यपान आणि इस्लाम
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मद्याला वाईट गोष्टींची जननी म्हटली आहे. दारूच्या सेवनानंतर माणसामध्ये कृत्रिम ऊर्जा निर्माण झाल्याचा भास होतो, मात्र हा केवळ भासच असतो वास्तविकता वेगळी असते. माणसाची जी नैसर्गिक शक्ती असते त्यालाच मद्यपानाने मोठी हानी पोहोचते व दारूचा अंमल उतरताच माणसाला ग्लानी आल्याचा अनुभव येतो. दारूच्या सेवनामुळे फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक हानी सुद्धा होते. अनेक मनोविकार दारूच्या आहारी गेल्यामुळे उत्पन्न होतात. दारू सारखी वाईट सवय दूसरी नाही. नशा मग दारूचा असो का ड्रग्जचा माणसाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. अल्लाहची कृपा आहे की, दारू पिणाऱ्यांच्या या वाढत्या लोकसंख्येमध्ये मुस्लिमांचे प्रमाण कमी आहे. ते आणखीन कमी करून शुन्यावर आणण्यासाठी अनेक मिल्ली संघटना प्रयत्नशील आहेत. कुरआन आणि हदीसचा जेवढा प्रभाव वाढेल, तेवढे मद्यसेवनाचे प्रमाण कमी होईल, यात शंका नाही.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अगोदर अरबस्थानामध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण फार जास्त होते. अरबी लोकांसारखे दारूचे शौकीन त्याकाळी जगात इतर लोक फार कमी होते. जुनी दारू बाळगण्यामध्ये त्यांचा हतखंडा होता. त्याच्यावर ते गर्व करीत असत. साहजिकच मद्यपानानंतर माणसामध्ये जे नकारात्मक बदल होतात त्यामुळे समाजामध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढते आणि अरबांच्या कबिल्यावर आधारित समाजरचनेमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. मात्र कुरआनमध्ये ज्या दिवशी नशाबंदीची आयत अवतरित झाली त्या दिवसापासून आजतागायत 1440 वर्षे झाली अरबस्थानामध्ये विशेषतः सऊदी अरबमध्ये दारू बंद करण्यात आली. विशेष म्हणजे ही दारूबंदी कुठलाही कायदा करून बंद करण्यात आलेली नाही. जगात सऊदी अरब एक असा देश आहे ज्या ठिकाणी स्वयंस्फुर्तीने झालेली दारूबंदी टिकलेली आहे. हे समीकरणच आता रूढ होऊ पाहत आहे. फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर नशा करणाऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या कमी आहे. हे अल्लाह सुबहानहूतआलाचे उपकार आहेत.

- बशीर शेख, उपसंपादक
Post a Comment