Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(९४) ...आणि जो तुम्हाला सलाम (शांतीसाठी प्रार्थना) करील त्याला त्वरित म्हणू नका की तू श्रद्धावंत नाहीस,१२६ जर तुम्ही दुनियेतील लाभाची इच्छा करीत असाल तर अल्लाहजवळ  तुमच्यासाठी पुष्कळशी संपत्ती (माले गनिमत) आहे. बरे याच स्थितीत तुम्ही स्वत:देखील तर यापूर्वी गुरफटून गेलेला होता, नंतर अल्लाहने तुमच्यावर उपकार केले,१२७ म्हणून  शहानिशा करून घ्या. जे काही तुम्ही करता त्याची अल्लाहला खबर आहे.
(९५) मुस्लिमांपैकी ते लोक की जे एखाद्या विवशतेविना घरी बसून राहतात व जे अल्लाहच्या मार्गात प्राण व संपत्तीनिशी जिहाद (प्रयत्नांची पराकाष्ठा) करतात, दोघांची स्थिती  एकसमान नाही. अल्लाहने बसून राहणाऱ्यापेक्षा प्राण व संपत्तीनिशी युद्ध (जिहाद) करणाऱ्यांचा दर्जा श्रेष्ठ ठेवला आहे. असे अल्लाहने प्रत्येकासाठी भलाईचेच वचन दिले आहे परंतु त्याच्याजवळ जिहाद करणाऱ्यांच्या सेवेचा मोबदला बसून राहणाऱ्यांपेक्षा फार जास्त आहे.१२८
(९६) त्यांच्यासाठी अल्लाहकडून मोठे दर्जे आहेत आणि क्षमा व कृपा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा व दया करणारा आहे.
(९७) जे लोक आपणच स्वत:च अत्याचार करीत राहिले होते१२९



१२६) इस्लामच्या प्रारंभिक काळात `अस्सलामु अलैकूम' चा शब्द मुस्लिमांची ओळख जाणण्यासाठीची योग्यता राखून होता. एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाला पाहून हा शब्द वापरत असे  की मी तुमच्याच समुदायातील एक सदस्य आहे, तुमचा मित्र आणि हितिंचतक आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी सुखशांतीशिवाय दुसरे काहीच नाही. म्हणून तुम्ही माझ्याशी वैर करू नका  आणि माझ्याकडून तुम्हाला कोणतीच हानी पोहचविली जाणार नाही. जसे लष्करात एक पासवर्ड (Pasword) ओळखीसाठी असतो आणि रात्री फौजी एकमेकाला ओळखण्यासाठी त्याचा  वापर करतात की आम्ही एकमेकांचे हितैषी आहोत आणि विरोधी फौजेपासून आपण वेगळे आहोत. याचप्रकारे सलामचा शब्दसुद्धा मुस्लिमांमध्ये ओळखीसाठी निश्चित केला होता. मुख्य  रूपात त्यावेळी या ओळखीचे महत्त्व यासाठी अधिक  महत्त्वाचे होते की त्या काळी अरबच्या नवमुस्लिम व मुस्लिमेतरांमध्ये पोषाख, भाषा आणि इतर गोष्टीत कोणतेच विशेष अंतर  नव्हते. त्यामुळे एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाला सहजासहजी ओळखू शकत नव्हता. परंतु युद्धप्रसंगी एक अडचण पुढे यायची की मुस्लिम जेव्हा एखाद्या शत्रुशी युद्धरत असत, आणि  तिथे शत्रुपक्षाकडे मुस्लिम असत तेव्हा दोन्ही पक्षातील मुस्लिम `अस्सलामु अलैकूम' व लाइलाह इल्लल्लाहु'' पुकारत. परंतु मस्लिमांना शंका यायची की हा इस्लाम दुश्मन (शत्रू) आहे  केवळ जीव वाचविण्यासाठी असे करत आहे. कधीकधी यामुळे एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाला ठार मारत असे आणि त्याची चीजवस्तू ग़़नीमत म्हणून घेऊन जात. पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी अशा प्रत्येक प्रसंगी तंबी दिली. परंतु अशा घटना नेहमी पुढे येत होत्या. शेवटी अल्लाहने या अडचणीला दूर केले. या आयतचा हेतु आहे की जो मनुष्य स्वत:ला मुस्लिम म्हणून जगाला ओळख देतो, त्याच्याविषयी तुम्हाला सर्रास हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही की तो केवळ जीव वाचविण्यासाठीच खोटे बोलत आहे. शक्य आहे की तो सत्यनिष्ठ असेल  किंवा असत्य. सत्यनिष्ठता तर चौकशीअंतीच सिद्ध होते. चौकशीविना सोडून देण्यात जर एक शत्रू सुटून जाण्याची भीती असते तर ठार करण्यात ही शक्यता आहे की एक मुस्लिम  तुमच्या हातून नाहक मारला जावा. एखाद्या मुस्लिमाला चुकीने ठार करणे हे एखाद्या शत्रूला चुकीने सोडून देण्यापेक्षा एक मोठे वाईट कृत्य आहे.
१२७) म्हणजे एक वेळ तुमच्यावरही अशी येऊन गेली आहे की वैयक्तिक रूपात विविध विरोधी कबिल्यामध्ये विखुरलेले होते. आपल्या इस्लामला उत्पिडन, अत्याचार आणि भीतीपोटी  लपवित होते. त्या वेळी फक्त तुमच्याकडे तर मौखिक स्वीकाराची साक्षच उपलब्ध होती. आता हा अल्लाहचा उपकार आहे की त्याने तुम्हाला सामाजिक जीवन प्रदान केले आहे आणि  तुम्ही यायोग्य झाला आहात की विधर्मियांच्या समोर इस्लामचा ध्वज उंचावत आहात. या उपकारांसाठी ही उचित कृतज्ञता नाही की जे मुस्लिम पहिल्या दशेत अद्याप पडलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही नरमीने आणि सवलतीने घेऊ नये?
१२८) येथे त्या घरी बसणाऱ्यांचा उल्लेख आला नाही ज्यांना जिहादवर जाण्याचा आदेश दिला आणि ते बहाणे बनवून घरातच बसून राहिले होते किंवा जाहीर घोषणा करून जिहाद  अनिवार्य झाला तरी जिहादसाठी निघण्यास आडेवेढे घेत होते; परंतु येथे उल्लेख त्या बसणाऱ्यांचा आला आहे जे जिहाद फर्जेकिफाया (सामुदायिक अनिवार्यता) च्या स्वरुपात असूनसुद्धा  युद्ध मैदानात जाण्याऐवजी दुसऱ्या कामात गुंतून जातात. पहिल्या दोन स्थितीत जिहादसाठी न निघणारा फक्त दांभिकच होऊ शकतो आणि त्याच्यासाठी अल्लाहकडून कोणत्याच  भलाईचे वचन नाही. याशिवाय की तो एखाद्या वास्तविक विवशतेत अडकलेला असेल. या विपरीत शेवटची संधीही आहे की ज्यात पूर्ण सैन्य दलाने भाग घेणे अनिवार्य ठरत नाही तर  त्याचा काही भागच अपेक्षित असतो. जर शासनाध्यक्षाकडून प्राणार्पण करण्याचे लोकांना अपील केली गेले तर या आवाहनाला ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, ते श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा जे दुसऱ्या कामात मग्न झाले मग ती कामे कितीही लाभप्रद असोत.
१२९) म्हणजे ते लोक जे इस्लाम स्वीकारून काही विवशतेचे व मजबुरीचे कारण नसताना आपल्या विधर्मी लोकांमध्येच राहात होते आणि अर्धे मुस्लिम आणि अर्धे मुस्लिमेतर जीवन  जगण्यास तयार होते. त्या वेळी एका इस्लामी राज्याची स्थापना झालेली होती. त्या इस्लामी राज्याकडे हिजरत करून तिथे इस्लामी जीवनपद्धतीत जगणे त्यांच्यासाठी शक्य होते आणि  इस्लामी राज्याकडून त्यांना यासाठी निमंत्रणसुद्धा होते, की त्यांनी हिजरत करून यावे. तरी ते आले नाहीत, हा त्यांनी स्वत:वर केलेला अत्याचार होता. कारण त्यांना पूर्ण इस्लामी  जीवनपद्धतीऐवजी त्या अर्धे अधर्म आणि अर्धे इस्लामी जीवनावरच समाधान मानावे लागत होते, ती त्यांची मजबुरी नव्हती तर ते आपल्या परिवारासाठी आपल्या धनसंपत्तीसाठी आणि  भौतिक लाभासाठीच तेथे थांबले होते आणि याचमुळे त्यांनी आपल्या धर्माला (इस्लामी जीवनपद्धतीला) भौतिक सुखावर प्राधान्य दिले नाही. (तपशीलासाठी पाहा, टीप नं. ११६)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget