Halloween Costume ideas 2015

शिवरायांनी स्वराज्यात अठरा पगड जातीत आणि सर्व धर्मांत सलोखा निर्माण केला - सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर
शिवरायांनी विविध जाती धर्माच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची उभारणी केली, हिंदूंच्या देवदेवळांचा आदर केला, तसा मुस्लिम पीर, फकीर व मस्जिद यांनाही मान दिला, स्वराज्यात  सर्वधर्म समभाव निर्माण करून जातधर्मात सलोखा निर्माण केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व करवीर काशी चे संपादक सुनीलकुमार सरनाईक यांनी केले. कैलास गडची स्वारी  मंदीराचे वतीने शिवजयंती निमित्त ‘शिवरायांचा सर्वधर्म समभाव’ या विषयावर सरनाईक यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्या वेळी ते बोलत होते.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य सरकारने राजमान्यता दिलेल्या कलायोगी जी. कांबळे यांच्या तैलचित्राचे अनावरण सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत मंदिराचे अध्यक्ष  बबेराव जाधव यांनी केले.
आपल्या व्याख्यानात सरनाईक यांनी शिवरायांचे पदरी असलेल्या मुस्लिम मावळ्यांची सविस्तर माहिती देऊन सभासद बखर तसेच सेतूमाधवराव पगडी, वि. का. राजवाडे या व इतर इतिहासकारांच्या लेखनाचा दाखला दिला. सध्या जातीजातीमध्ये व धर्माधर्मामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे राजकारण केले जात आहे, ते शिवरायांच्या धोरणास अनुसरून  नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे मिरासाहेब मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, उदय कारंजकर,  अजितराव जाधव, वसंतराव देसाई, विठ्ठल जाधव, किशोर भोसले, शिवाजी जाधव, गणेश भोसले, प्रदीप गौड, राजेंद्र भोसले, शरद गौड, कुलदीप भोसले, बबन कांबळे, अजय भोसले,  बाबू जाधव, रोहित कारंडे, अनिल गौड, रमाकांत आंग्रे, दिलीप राऊत, गौरीशंकर संगोळी, विजय जाधव, चंद्रसेन जाधव आदींसह भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित  होते, शेवटी विलास गौड यांनी आभार मानले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget