तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे जो आपल्या पत्नीशी चांगले वर्तन करतो”
पुरूषाने स्त्रीचा (पत्नीचा) सन्मान करावयास हवा. तिच्याशी अगदी प्रेमाने वागले पाहिजे. अल्लाहने सांगितले आहे,
”अल्लाहच्या संकेतापैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्यादरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात”(दिव्य कुरआन, 30ः31)
हे वर्णन करीत असताना तिचे (पत्नीचे) सर्वच गुण (सवयी) तुम्हाला आवडणारे असतीलच असे नाही. तिच्या बर्याच सवयी आवडणार्या असल्या तरी एखाददुसरी अशी सवय असेल की जी तुम्हाला आवडणार नाही. तरी श्रद्धावान पुरूषाने आपल्या श्रद्धावंत स्त्रीची घृणा करू नये. कारण तिच्या तुम्हाला न आवडणार्या सवयीच्या बदल्यात तुम्हाला तिच्या आवडणार्या अनेक सवयी बहाल केलेल्या आहेत. म्हणून एका वाईट सवयीमुळे आपण आपल्या पत्नीची घृणा केल्यास तिच्या चांगल्या सवयी (ज्या तुम्हाला आवडतात) पासून वंचित राहाल आणि तिच्या हातून वारंवार तुम्हाला न आवडणार्याच घटना जास्त घडतील. यासाठी आपण काल्पनिक उदाहरणाचा आधार घेऊ या.
पैगंबरांनी सदाचारी स्त्रीचे काही गुण सांगितले आहेत. जेव्हा पती आपल्या पत्नीकडे पाहील तेव्हा त्याला प्रसन्न करावे. जेव्हा एखादी आज्ञा करेल तेव्हा ती मान्य करावी आणि आपले शील व त्याच्या संपत्तीचे रक्षण करावे आणि त्यात त्याची अवज्ञा करू नये. तात्पर्य, जर आपला पती कामावरून घरी आला तर त्याचे हसतमुखाने स्वागत करावे. घर पती यायच्या वेळी टापटीप करून ठेवावे. घरात प्रसन्न वातावरण निर्माण करावे आणि आपला पती काय आज्ञा करणार याची वाट बघावी व त्याची आज्ञा सिरसावंद्य मानावी. एवढेच नव्हे तर त्याच्या आज्ञेशिवाय घरातील संपत्ती (पैसा) खर्च करू नये. त्याचे संरक्षण करावे. इस्लामने स्त्रीचा सन्मान केला आहे. एके ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ”सदाचारी पत्नी ही पुरूषाला अल्लाहकडून मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे.”
इस्लामपूर्व काळात स्त्रिया दोन प्रकारच्या होत्या. (1) पत्नी (जिला फक्त घर होते, प्रतिष्ठा नाही) (2) दासी. दोन्ही प्रकारात स्त्रियांची अवहेलनाच होती. त्यांची तस्करी राजरोसपणे चालायची. पत्नी असणारी स्त्री फक्त घरात सुरक्षित असायची. तिला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा व स्वातंत्र्य नव्हते. मात्र इस्लामच्या पुनरूत्थानाने स्त्रीला (मुलगी, आई, पत्नी) सन्मान मिळाला व तिच्या जवीनपद्धतीत अमूलाग्र बदल झाला. आस्मानी किताबाच्या (कुरआन) आधारे सांगितले की, ”पत्नी जरी नावडती असली तरी तिचा सन्मान करा कारण या तिच्या नावडती कारणामागे तिच्या पतीचे खूप भले होणार आहे. त्यासाठी सांगितले की, पत्नीचे मन दुखवू नका. ती आपला सर्व परिवार (आई, वडील, भाऊ, बहीण सर्व नातलग) सोडून फक्त आपल्यासाठी आपल्या जोडीदाराच्या हितासाठी सर्व त्यागून आलेली आहे. तिने आपले माहेर विवाहादिवशीच आपल्यासाठी सोडले आहे, तेव्हा तुम्ही रागाच्या भरात (एखाद्या दिवशी) घरदार पत्नी सोडून जाऊ नका. तिला तुमच्याशिवाय जगात कोणीही उरलेला नाही. तिच्या काही गोष्टी नाही आवडल्या तरी तिला टोमणे मारू नका. तसेच घालून पाडून (अपमानित) बोलू नका. तिचा खूपच राग आला तर तिला मारताना तिच्या तोंडावर अजिबात मारू नका. (याचा अर्थ शरीरावर चेहरासोडून कोठेही इजा कराव्यात असे नाही.) म्हणजेच सक्त ताकीद आहे की, आपल्या पत्नीशी दासीसमान व्यवहार करू नये. या सर्व कथनातून हे लक्षात येते की स्त्रीच्या (पत्नी) संगोपनाच्या, अस्तित्वाच्या, संरक्षणाच्या सर्व जबाबदारीबरोबर तिचा सन्मान, आदर, इज्जत करणे हेही पुरूषावर बंधनकारक आहे. तसे स्त्रीचे पतीशी सद्वर्तनच असावे यालाही पर्याय नाही.
विवाहानंतर स्त्री आपल्या पतीची सेविका होत नाही. पत्नीच्या बाबतीत कुरआनची स्पष्टोक्ती आहे, ”अल्लाहच्या संकेतापैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्यादरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात.” (दिव्य कुरआन, 30ः21).
वरील सर्व विवरणावरून हे लक्षात येते की अल्लाहने जेव्हा पृथ्वीतलावर पहिला पुरूष आदम आणि प्रथम स्त्री हव्वा यांना पाठविले. म्हणजे ते दोघे एकमेकांसाठी निर्माण केले. या दोघांपासून मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती झाली. पुरूषाची व स्त्रीची निर्मिती एकमेकांप्रती प्रेमाची भावना निर्माण व्हावी. त्या दोघांना एकमेकांचा आधार वाटावा आणि एकत्र सहवासातून दोघांना संतोष प्राप्त व्हावा, एकमेकांसाठी करूणा निर्माण व्हावी म्हणून दोघांनाही काही सूचना केल्या आहेत. पण या सूचना समाजाव्या लागतात. ते सर्वांनाच समजतात असे नाही. त्याला अभ्यासाची आणि चिंतनाची आवश्यकता आहे. म्हणतात ना,” समजदार को इशारा काफी है.” अल्लाहचे संकेत समजण्यासाठी अभ्यासाबरोबर चिंतन मनन आवश्यक आहे. तसेच समजूतदारपणाही अनिवार्य आहे.

Post a Comment