Halloween Costume ideas 2015

इस्लामी विधी आणि चरित्र धारण करून रुग्णांना आर्थिक पिळवणुकीपासून वाचविले पहिजे - डॉ. अन्वर सिद्दीकी

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)
अल्लाहला तरुणांची भक्ती फार पसंत आहे, तरुणांमध्ये प्रत्येक काम करण्याची भरपूर क्षमता असते. त्यांनी वाईट गोष्टी रोखणारे आणि चांगल्या गोष्टी पसरविणारे आणि चांगल्या व्यक्ती बनले पाहिजे. असे विचार शाखेचे सचिव डॉ. नुरुल अमीन ख्वाजा यांनी पवित्र कुरआनच्या सूरह लु़कमानच्या संदर्भाद्वारे सदर मुस्लिम लायब्रेरीमध्ये ‘मेडिकल सर्व्हिस सोसायटी ऑफ इंडिया’, नागपूर शाखेच्या ‘मिलन समारोह कार्यक्रम’मध्ये आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांना संबोधित करत म्हटले. त्यांनी सांगितले की आम्हाला चिकित्सा सेवेच्या माध्यमातून धार्मिक ज्ञानांची मोठी मदद होते. अस्वस्थ मानवतेची सेवा अल्लाहच्या समीप प्रशंसनीय आहे. धर्मापासून दूर राहून शैतानाच्या पकडीत फसून मनुष्य लोभी बनतो.
आर्थोपेडिक सर्जन डॉ. मोहम्मद फैजान यांनी ‘जादेराह’ या विषयावर सांगितले की ‘जादेराह’चा अर्थ परलोकात जाण्यासाठी नेकीयुक्त सामान जमा करणे आहे. हे तकवा आणि  ईशभयामुळे प्राप्त होते. चिकित्सा सेवेत आम्हाला यांचीच गरज आहे की आम्ही अधिकाधिक नेकी कमवावी. या नेकीयुक्त क्षेत्रामध्ये आम्हाला रूग्णांसोबत हळू आणि मधुर संवाद करावयास हवा, धैर्य आणि सहानुभूती देत त्यांचे दु:ख दूर केले पहिजे. जी. ए. सी. नागपूर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अन्वर सिद्दीकी यांनी सांगितले की इस्लामच्या अनुषंगाने मुस्लिम चिकित्सक यावर मोठी जबाबदारी आहे. आम्हाला इस्लामी विधी आणि चरित्र धारण करून रुग्णांचा आर्थिक शोषणापासून बचाव आणि स्वास्थलाभात त्यांची शक्य ती मदत केली पाहिजे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अ़जी़ज ़खान यांनी सांगितले की इस्लामची मूलभूत शिकवण आम्हाला रोग उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. आम्हाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला हवे. त्यांनी आर्थिक दृटीने दुर्बल विद्याथ्र्यांची मदत केली पाहिजे. या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ. कश़फद्दुजा ़खान तसेच ढाबा होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज, के.आर.पांडव आयुर्वेदिक कॉलेज, श्री आयुर्विेदक कॉलेज, गव्हर्मेंट आयुर्वेदिक  कॉलेज, भाऊसाहेब आयुर्वेदिक कॉलेज आणि ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच चिकित्सक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget