Halloween Costume ideas 2015

प्रेषित मुहम्मद (स.) : आद्य महिला उद्धारक

-वकार अहमद अलीम, पुणे
हाय अबला नारी तेरी कैसी यह कहानी।
आँचल में तो है दुध, पर आँखों में है पानी।।
आठ मार्च या महिला दिनानिमित्त महिलांचा आविष्कार सर्वच प्रसारमाध्यमांतून घडविला जातो. महिलांच्या प्रश्नांचा, समस्यांचा वेध घेतला जातो. समाज, संस्कृतीची पुरुष आणि महिला हे दोन चाके आहेत. पण समाजनिर्मितीची सुरूवातच मुळी महिलेपासून होते. कारण प्रकृतीने स्त्रीला निर्मितीक्षम बनविले आहे. म्हणूनच ‘स्त्री’ विश्वाचा केंद्रबिंदू आहे. स्त्री, कुटुंब, समाज, देश आणि विश्व अशी समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे. तरीही जगतजननी सर्वत्र उपेक्षित राहिल्याचे कटू पण वास्तव नाकारता येत नाही. अशिक्षितांपासून उच्च विद्याविभूषित, अप्रगत देशापासून अतिप्रगत देशापर्यंत स्त्रीची दुर्दशा पाहावयास मिळत आहे. याला प्रामुख्याने जबाबदार पुरुषांची मानसिकता आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा नारा देऊन पाश्चात्य विद्वानांनी स्त्रीचा पुरुषांची उपभोगण्याची वस्तू म्हणूनच प्रसार व प्रचार केला. पाश्चात्यांच्या प्रत्येक कृतचीचे आंधळेपणाने अनुकरण करण्याचा परिणाम समस्त जगात होत आहे.
विसाव्या शतकाच्या मध्यावर ‘सिमॉन द बुब्हाँ’ यांच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाने संपूर्ण जगात खळबळ माजविली. ‘‘स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडविली जाते.’’ हा सिद्धान्त लेखकाने माडला. खरेच याच्यात विद्वानांनी स्त्रीला प्रभावी मार्केटिंगचे साधन बनविले. प्रभावी जाहिरता करून गडगंज नफा मिळविणे हाच त्यामागचा एकमेव हेतू होता. काडीपेटापासून ते आगगाडी, प्रत्येक ठिकाणी जाहिरातीसाठी स्त्रीची अर्धनग्न, अत्यंत कामुक, हिडीस प्रदर्शन करीत स्त्री ही माणूस आहे हे विसरण्यास भाग पाडले. केवळ पैशासाठी. ‘अमेरिकेला शकिं आली तर जगाला सर्दी व्हावी’ ही त्यांची अपेक्षा. भारतासारख्या अनेक विकासशील देशांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या पाश्चात्य बहुराष्ट्रीय कंपन्या आले उत्पादन विकण्यासाठी स्त्रीदेह प्रदर्शनाचा बाजार मांडला.
स्त्री-स्वातंत्र्य- पाश्चात्य विद्वानांकडून स्त्री-स्वातंत्र्य व समानतेच्या कल्पनेच्या स्वरूपात सिद्धान्त उभे करण्यात आले. स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा विंâचितही कमी नाही. स्त्री-पुरुष प्रत्येक बाबतीत समान आहेत. स्त्री ही हर प्रकारे स्वतंत्र आणि स्वावलंबी आहे. ही कल्पनाच मुळात स्त्री-हृदयास भुरळ पाडणारी होती. तिने झपाट्याने ही कल्पना हृदयास कवटाळली. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रात परपुरुषांबरोबर सामील होत गेली. जीवन कल्पनेच्या दर्शनीय सौंदर्यावर स्त्री मोहित झाली. परंतु... त्याच्या आत दडलेल्या अंधकारमय धोक्यापासून अज्ञानीच राहिली. एकीकडे पुरुषांच्या अत्याचारांपासून तिला मुक्तीचे स्वप्न दाखविण्यात आले तर दुसरीकडे तिची शक्ती, कार्यक्षमता, स्वभाव व मानसिकतेची अजिबात गय केली गेली नाही. ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’च्या गोंडस नावाखाली शरीराचे ओंगळ प्रदर्शन, लज्जासुलभ अवयवांचे जाहीररित्या मोजमाप सुरू झाले. पाश्चात्य जगातील अत्यंत कडक थंडीपासून बचावासाठी समस्त पुरुष, थ्री-पीस सूट, बूट, एका हातात व्हिस्कीचा प्याला, दुसऱ्या हातात सिगारेट; पण याच जीवघेण्या थंडीमध्ये स्त्रीला मात्र अल्पवस्त्रामध्ये पेश करून, वासनांध पुरुषाने आपली चंगळवादाची तृष्णा भागवण्यास सुरूवात केली. इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा स्त्रीने आपले घर सोडून चारचौघात आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन केले, तेव्हा लैंगिक स्वाराचाराने उग्र रूप धारण केले. जी क्लिष्ठता चार भिंतींच्या आत असहनीय असते, ती मार्केट, बाजारात व सार्वजनिक ठिकाणी उफाळून आली. अतिशय पवित्र नातेसुद्धा या अग्नीत होरपळून निघाले. कला आणि संस्कृतीच्या नावाने लैंगिक व कामुक भावना व्यक्त होऊ लागल्या आणि स्त्री ही पुरुषाच्या हातातील बाहुली बनली. या साऱ्या उचापतींचा फक्त एकच उद्देश की पुरुषांची लैंगिक तृष्णा भागविणे! पूर्ण समाज, संस्कृती वासनेच्या तालावर नाचू लागली. लैंगिक भावनेच्या या व्रूâर साम्राज्याने ग्रीस, रोम, इजिप्त व इतर अनेक प्राचीन संस्कृती नष्ट केल्या.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुषांच्या स्वैर व स्वतंत्र देवाणघेवाणीमुळे लैंगिक स्वाराचाराची मानसिकता बळावली आहे. या स्वैराचाराने सार्वजनिक रूप धारण केले आहे. मग याच्या दुष्प्रभावाने एका निर्लज्ज संस्कृतीने जन्म घेतला, जिच्या विषारी प्रभावाने नैतिकतेची पुâलबाग जळून भस्म झाली. आज लाज, शरम आणि नैतिकता टाहो फोडत राहिली आहे.
महिलांवरील लैंगिक अत्याचार- ३० नोव्हेंबर २०१७ रोजी भारताचे गृहमंत्री राजनाथ सहिं यांनी राष्ट्रीय गुन्हेगारी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, देशात ८४,७४६ इतके लैंगिक गुन्हे नोंदविण्यात आले. (नोंद नसलेल्या गुन्ह्यांची कल्पनाच करू शकत नाही.) या गुन्ह्यांमध्ये पुरोगामी महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ११,३९६ गुन्हे महाराष्ट्रात, पाठोपाठ उत्तर प्रदेश ११,३३५ तर ८,७१७ गुन्ह्यांसह मध्य प्रदेश. सन २०१५ मध्ये महिलांवरील बलात्कारासंबंधित गुन्हे ३४,६५१ होते तर २०१६ मध्ये ३८,९४७, गुन्ह्यांमध्ये १२.४ टक्के वाढ. ४,८८२ गुन्ह्यांसह मध्य प्रदेश अव्वल क्रमांकावर, ४,८१६ गुन्ह्यांसह उत्तर प्रदेश द्वितीय क्रमांकावर तर महाराष्ट्र ४,१८९ गुन्ह्यांसह तृतीय क्रमांकावर. या तीन्ही राज्यांत २०१५ पेक्षा २०१६ मध्ये अनुक्रमे १२.५, १२.४ आणि १०.७ टक्के गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही तीन राज्ये संस्कृतीरक्षक भाजप शासनाची आहेत. देशात महिलांविरूद्ध अत्याचारांमध्ये ५२.२ टक्के वाढ झाली आहे. कारण स्त्री-पुरुषांचे स्वैराचार!
कौटुंबिक व्यवस्था- भारतात स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहाद्वारे दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येऊन नैसर्गिकरित्या कामेच्छा पूर्ण करीत नवीन पिढीला जन्म घालीत असतात. यामुळे स्त्रीला धार्मिक, सामाजिक व न्यायिक अधिकार प्राप्त होतो. पण स्त्रीकडून, तिच्या पालकांकडून हुंडा घेण्याचा सामाजिक कलंक समाजमनामध्ये पसरला आहे. पैशाच्या लोभापैकी अनेक घरांतील स्वयंपाकघर हे स्त्री-दहनाचा कट्टा ठरला आहे. नवरा दारूडा, नपुंसक वा कुठलेही अर्थार्जन करीत नसेल तरीही अन्यायग्रस्त्र स्त्री अशा नवऱ्यापासून सहजासहजी घटस्फोट घेऊन स्वतंत्ररित्या मनपसंत दुसरा घरोबा करू शकत नाही. कारण विवाह हा धार्मिक संस्कार आहे. तो मोडता येऊ शकत नाही. न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दिल्यास दोघांनाही वेगवेगळे राहून अनेक वर्षे व्यतीत करावी लागतात. विवाहित स्त्री आणि पुरुषांना कायदेशीर दुसरे लग्न करण्याची मनाई न्यायालयाकडून होते. पण... अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासंबंधी कायद्याकडून कोणताही प्रतिबंध नाही. त्यामुळे समाजात अनैतिकता बळावत जाते. पण यात स्वच्छंदी परित्यक्ता म्हणून स्त्रीचाच बळी जातो.
‘‘माती जेव्हा अंकुरते, इवल्या सोनुल्या बीजांनी!
तेव्हा मातीचीही माता होते!!
माती जेव्हा बरबटते, कर्मकांडांच्या वेलांटीने!
तेव्हा मातेचीही माती होते!!’’
विशाल संस्कृतीची निर्मिती करणारी माता आणि माती एकाच नाण्याच्या दोन बाजू. वर्तमानकाळात स्त्रीवर असा अत्याचार होत आहे. मध्ययुगीन काळात स्त्रियांचे जीवन म्हणजे केवळ वासनांध पुरुषांच्या हातातील खेळणे इतकेच. अशा चिंताजनक अवस्थेत आजपासून १४५० वर्षांपूर्वी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईशग्रंथ कुरआनद्वारे आणि स्वत:च्या उच्चतम आदर्श आचरणाने महिलांच्या अंधकारमय जीवनामध्ये सुख, माधान, सन्मानाचा प्रकाश पैâलाविला, तो एक प्रकारे प्रकाशरूपी जीवनमार्ग होता.
इस्लाम स्थिर परिवारास समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक समजतो. परिवाराचे स्थैर्य म्हणजेच समाजाचे स्थैर्य आणि परिवाराचे विघटन म्हणजेच समाजाचे विघटन असे समीकरण इस्लामने मांडले आहे. इस्लाम स्त्रीचे मूलभूत अधिकारही प्रदान करतो आणि तिच्या विकासाची जबाबदारीही स्वीकारतो. इस्लामने पुरुषाप्रमाणेच स्त्रीलादेखील हे संपूर्ण आर्थिक, सामाजिक व राजकीय अधिकार प्रदान केले आहेत. मात्र तिला काही जबाबदाऱ्यांपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे की ज्या तिच्या स्वभाव आणि शारीरिक स्वरूपाशी विसंगत आहेत.
आर्थिक जबाबदारी- इस्लामने स्त्रियांवर कोणतीही आइर्थक जबाबदारी लादलेली नाही. पण तिला मर्यादेच्या आत राहून अर्थार्जनाचा अधिकार देण्यात आला आहे. लग्नापर्यंत मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या पित्याची आहे. लग्ननानंतरची जबाबदारी पूर्णत: तिच्या पतीची आहे. या बाबतीत प्रेषित मुहम्मद (स,.) यांनी फरमाविले आहे, ‘‘ज्याने दोन विंâवा जास्त मुलींचे संगोपन योग्य रीतीने केले, त्यांना शिक्षण दिले, योग्य वेळी, योग्य स्थळी विवाह करून दिले आणि लग्नानंतरसुद्धा सद्व्यवहार केला तर त्याच्यासाठी निश्चितच स्वर्ग आहे.’’ (हदीस- अबू दाऊद)
विवाहाचा अधिकार– इस्लामने विराहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास महत्त्व अवश्य दिले, पण हेही स्पष्ट केले की मुलीचा विवाह तिच्या परवानगीनेच व्हावा.
महेरचा अधिकार- इस्लामने पुरुषांना आदेश दिला की ज्या स्त्रीशी विराह कराल तिला महेर अवस्य देण्यात यावा. ‘‘स्त्रियांचा महेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा.’’ (दिव्य कुरआन, सूरह निसा) ‘‘महेर पत्नीची स्व-संपत्ती असून केवळ तिचाच त्यावर अधिकार आहे, तिच्या पालकाचा त्यावर कोणताच अधिकार नाही.’’ (कुरआन, २:६९)
शील व अब्रू सुरक्षेचा अधिकार- ‘‘जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील (व्यभिचाराचा आरोप), मग चार (प्रत्यक्षदर्शी) साक्षीदार घेऊन येत नसतील तर त्या (पुरुषाला) ५० फटके मारा व त्याची साक्ष (यापुढे) कधीही स्वीकारू नका.’’ (कुरआन, सूरह नूर-४,५)
वारसा हक्क- वारसा हक्कामध्ये स्त्रीचा वाटा आहे. आईवडिलांच्या संपत्तीमध्ये मुलगी म्हणून वारसा वाटा आहे. पतीच्या संपत्तीमध्ये पत्नी म्हणून, मुलाच्या संपत्तीत आई म्हणून, भावाच्या संपत्तीत बहीण म्हणून वाटा आहे. म्हणजे स्त्री एक पण रूपे चार. कन्या, पत्नी, आई व बहीण. इस्लामने एकाच स्त्रीला वारसाहक्कामध्ये चार प्रकारे संपत्तीचा हिस्सा दिला आहे. शिवाय लग्नामध्ये पतीकडून महेरची रक्कमही स्त्रीलाच मिळते. स्त्रीला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. त्यामुळे अर्थार्जनासाठी अन्य पुरुषांच्या एकत्रित व्यवहारामुळे निर्माण होणआरे वाईट परिणाम भोगण्याची वेळसुद्धा येत नाही.
बहुपत्नित्व- इस्लाममध्ये बहुपत्नित्वाची परवानगी आहे. पण सक्तीने करण्यासंबंधीचा आदेश नाही. केवळ विशिष्ट परिस्थितीतच ही परवानगी आहे.
तलाक- इस्लामने स्त्री आणि पुरुष दोघांनाही तलाकचा अधिकार दिला आहे. पती आणि पत्नींमध्ये अतिशय क्लिष्ठ व गुंतागुंतीच्या कलहामध्ये योग्य समाधान म्हणजे तलाक होय. पती, पत्नीच्या स्ववबावामध्ये अनुकूलता नसणे, दुर्लक्ष न करण्यासारखी आर्थिक व सामाजिक तफावत त्यांच्यात असेल, शारीरिक जवळीक असतानाही मानसिक व वैचारिक दुरावा असेल. कधी कधी दोघांपैकी एकाचे दुर्वर्तन उघड झाले, अशा बिकट अवस्थेत एक दुसऱ्याचे जीवन नरकासमान करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने विभक्त होऊन नवीन आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठीच इस्लामने तलाकची परवानगी दिली आहे. एकमेकांचे पटत नसतानाही एकत्रित राहण्यास जबरदस्ती करणे हे सारासार विवेकाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तलाकसाठीही दिव्य कुरआन, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अत्यंत कडक कायदा, बंधने घातली आहेत. प्रसारमाध्यमांत ज्या पद्धतीने इस्लामी तलाकचे चित्रण रंगविले जाते ते वस्तुस्थितीच्या अत्यंत विपरीत आहे, हे निर्विवाद सत्य.
भारतामध्ये प्रत्येक २० मिनिटात एक बलात्कार घडतो. अमेरिकेत प्रत्येक ७ मिनिटाला एक बलात्कार. हा क्राइम रेट सर्वोच्च असून मानवतेला घातक आहे. पण सऊदीअरबचा क्राइम रेट जगातील सर्वांत कमी आहे.कारण तिथे इस्लामी कडक कायद्याची अंमलबजावणी होते. तसेच समाजमनावर दिव्य कुरआन व अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदर्श विचार, आणि वर्तणूक याचा फार मोठा प्रभाव आहे. जगात इस्लामी तत्त्वानुसार आचरण सुरू झाले तर महिलांचे अत्याचार थांबतील. एक आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण होईल. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असा न्यायपूर्ण समाज निर्माण करून दाखविला आहे. इतिहासातून बोध घेऊन भविष्याचा वेध घेणे वर्तमानात जगलो तर मानवता जीवंत राहील. ईश्वर समस्त मानवांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना!

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget