Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)

(२७५) वास्तविक पाहता अल्लाहने व्यापाराला वैध केले आहे आणि व्याजाला निषिद्ध.३१८ म्हणून ज्याला त्याच्या पालनकत्र्याकडून हा उपदेश मिळेल आणि तो भविष्यात व्याज खाण्यापासून परावृत्त होईल तर जे काही त्याने पूर्वी खाल्ले असेल ते खाल्ले, त्याचे प्रकरण अल्लाहच्या स्वाधीन आहे.३१९ आणि जो या आज्ञेनंतर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करील तो नरकवासी आहे, जेथे तो सदैव राहील.


३१८) व्यापार आणि व्याजादरम्यान सैद्धान्तिक अंतर आहे ज्यामुळे दोघांची आर्थिक व नैतिक स्थिती एकसारखी होऊच शकत नाही,
(१) व्यापारात विक्री व खरेदी करणारा यांच्यात फायद्याचे वाटप होते. कारण खरेदी करणारा त्यापासून नफा उठवितो. आणि विक्री करणारा आपल्या श्रम, योग्यता आणि वेळेचा नफा खरेदी करणाऱ्याकडून वसूल करतो. याविरुद्ध व्याजबट्ट्ट्यात नफ्याचे वाटप या न्यायाने होत नाही. सावकार तर एक निश्चित रक्कम व्याजाच्या रूपात वसूल करतो. त्याच्यासाठी हे फायदेशीर आहे परंतु कर्जदाराला त्याच्या धंद्यात नफा मिळतच राहील याची शाश्वती नाही. त्याने रक्कम आपल्या स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी घेतली असेल तेव्हा स्पष्ट आहे की त्याला निश्चित रुपाने फायद्याचे नाही. मनुष्य व्यापार, उद्योग किंवा शेती धंद्यात लावण्यासाठी रक्कम दुसऱ्याकडून घेतो या स्थितीत लाभ  व  नुकसान  दोन्ही  संभावना  आहेत. म्हणून  व्याजबट्ट्याचा व्यवहार एकाच्यासाठी फायद्याचा असतो तर दुसऱ्यासाठी हानिकारक असतो किंवा एकीकडे  निश्चित ठरलेले लाभ तर दुसरीकडे अनिश्चित लाभ.
(२) व्यापारात विक्री करणारा खरेदी करणाऱ्यांपासून जेवढा जास्त फायदा घेतो तो एकदाच. परंतु व्याजबट्ट्ट्याच्या व्यवहारात रक्कम व्याजावर देणारा शाश्वत व निश्चित फायदा घेतच राहातो आणि वेळ वाढते तसा त्याचा नफासुद्धा वाढतो. कर्ज घेणाऱ्यांने कर्जाऊ रकमेद्वारा कितीही फायदा कमविला तरी तो एक मर्यादेपर्यंतच असणार. परंतु सावकार मात्र अमर्याद नफा कमवितो. त्याच्यासाठी कोणतीच सीमा नाही. शक्य आहे की तो सावकार कर्ज घेणाऱ्याची पूर्ण कमाई, कमाईची त्याची सर्व साधनसामुग्री, तसेच त्याच्या शरीराचे कपडे, घरातील भांडीकुंडी तसेच घरसुद्धा हडप करतो; तरी त्याचा नफा मात्र पूर्ण होत नाही. 
(३) व्यापारात वस्तू आणि त्याच्या किमतीची देवाणघेवाण होते आणि व्यवहार पूर्ण होतो. यानंतर खरेदी करणाऱ्याला विक्री करणाऱ्यास काहीएक देणे घेणे लागत नाही. घर, जमीन किंवा वस्तूच्या वापरासाठीचा नफा (भाडे) असते. मूळ खर्च होत नाही तर बाकी राहाते आणि त्याच रूपात मालकाला परत दिले जाते. परंतु कर्ज घेणारा मात्र रक्कम खर्च करून बसतो आणि त्याला तो माल पुन्हा जास्त प्रमाणात निर्माण करून सावकाराला व्याज द्यावेच लागते आणि जास्त परत करावे लागते.
(४) व्यापार-उदीम, शेती, उद्योगधंद्यांपासून मनुष्य श्रम, वेळ आणि योग्यता खर्च करून लाभ प्राá करतो. परंतु व्याजबट्ट्ट्याच्या व्यवहारात सावकार आपली उरलेली रक्कम व्याजाने देऊन दुसऱ्याच्या कमाईत विनात्रास व विनाश्रम सामील होतो. त्याची स्थिती भागीदाराची नसते जो लाभ आणि हानी दोहोत सामील असतो. सावकार मात्र असा भागीदार असतो जो लाभ आणि हानीचा विचार न करता निश्चित लाभ उठवित असतो. म्हणून व्यापार आणि व्याजाच्या आर्थिक योग्यतेत खूप अंतर पडते. व्यापार मानवसभ्यतेला निर्माण करणारी शक्ती बनते आणि व्याज तिच्या बिघाडाचे एक प्रबळ कारण बनते. नैतिकतेच्या दृष्टीने व्याजाचा हा मूळ स्वभाव आहे की तो माणसात कंजूषी, स्वार्थ, संकुचित वृत्ती, निर्दयता आणि धनपूजेचे वैशिष्टç निर्माण करतो. सहानुभूती आणि आपापसात सहकार्याच्या आत्म्याला नष्ट करतो. याच कारणाने व्याज आर्थिक आणि नैतिक या दोन्ही दृष्टीने मानवजातीसाठी घातक आहे.
३१९) येथे हे सांगितले नाही की जे काही त्याने खाल्ले त्यास अल्लाह माफ करील. परंतु सांगितले जात आहे की त्याचा मामला अल्लाहच्या हवाली आहे. या वाःयाने माहीत होते, ""जे खाल्ले ते खाल्ले'' म्हणण्याचा अर्थ जे खाल्ले त्याला क्षमा केली असे नाही तर त्याने तात्पर्य केवळ कायदेशीर सवलत आहे. म्हणजे जे व्याज पूर्वी खाल्ले त्याला परत देण्यासाठीची कायदेशीर मागणी केली जाणार नाही. तशी मागणी केली गेली तर दाव्यांची व खटल्यांची न संपणारी शृंखला तयार होईल आणि नैतिकतेच्या दृष्टीने व्याजाची घाण बाकी राहील. मनुष्य वास्तविकपणे अल्लाहशी भिणारा असेल आणि त्याचा आर्थिक आणि नैतिक दृष्टिकोन इस्लाम स्वीकारल्याने बदलून गेला असेल तर तो अवैधतेने व अपराधी वृत्तीने कमविलेली संपत्ती आपल्यावर खर्च करणार नाही आणि हकदारांचा पत्ता  लावून  त्यांना  त्यांचा  माल  परत  करील  आणि  ज्यांचा  पत्ता  मिळाला  नाही  त्यांची  संपत्ती सार्वजनिक हिताच्या कामात खर्च करील. हेच कर्म त्याला अल्लाहच्या कोप होण्यापासून वाचवेल. ती व्यक्ती जो पूर्वी कमविलेल्या या अवैध संपत्तीने मजा लुटत राहील तर अशा व्यक्तीला हरामखोरीची शिक्षा मिळणारच.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget