येवला (शकील शेख)-
शहरातील ‘अंजुमन फरोग ए तालीम’ संचालित एँग्लो उर्दू हायस्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज’ येथे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष निसार शेख निंबूवाले यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी मुशायरा (रोमांचित करणाऱ्या कविता) सादर केल्या.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. माणिकराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी भिमराज दराडे, येवला न. पा. मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, उषाताई शिंदे, गोल्डमॅन पंकज पारख, बंडू क्षीरसागर, शहर काझी हाजी राफीउद्दीन होते. परवीन शेख, प्रशांत शिंदे, रि़जवान शेख आदि उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचा ‘ग्रीन कॅंडेल ग्रुप’चे अध्यक्ष अंसारभाई शेख व रायगड ग्रुपचे शाहू शिंदे तसेच मनमाडचे फुले-शाहू मंचचे कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख व इनायत भाई आदिंच्या हस्ते पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अब्दुल वाहिद यांनी दिवसेंदिवस उर्दू भाषा लोप पावत चालली असून लहान मुलांमध्ये उर्दूविषयी आकर्षण व आवड निर्माण व्हावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
आपण केलेल्या सामाजिक कार्यात आपल्या कुटुंबाचा मोठा वाटा असून त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य आणि प्रोत्साहान दिल्यानेच आपण हे कार्य करू शकलो असल्याची प्रतिक्रिया निसार शेख यांनी सत्काराला उत्तर देतांना दिली.
विद्याथ्र्यांनी अतिशय सुरेख शैलीत कविता सादर केल्या तर उपस्थित रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमास आलमगीर शेख, अतीक गाजी, एजाज शेख, हारून शेख, असद गाजी, सनाउल्ला फारुकी, अजीज शेख, सद्दाम शेख, मोबीन शेख, शकील शेख, सलीम मुकादम व अफजल सर, सहशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँग्लो उर्दू हायस्कूलचे सर्व अध्यापक, सद्दाम शेख, अनीस शेख, रिजवान शेख, उबैद अंसारी यांनी विशेष परिश्रम घेतले आणि आभार शाळेचे मुख्याध्यापक जावेद अंसारी यांनी मानले.
Post a Comment