Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

२८०) तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थित असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या. आणि जर दान करून टाकाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले आहे, जर तुम्ही समजून घ्याल.३२४
(२८१) त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.
(२८२) हे ईमानधारकांनो! जेव्हा एखाद्या ठराविक मुदतीसाठी तुम्ही आपापसांत कर्जाची देवघेव कराल,३२५ तेव्हा ते लिहून घेत जा.३२६ उभयपक्षांमध्ये न्यायपूर्वक एका माणसाने दस्तऐवज लिहावे. ज्याला अल्लाहने लिहिण्या-वाचण्याची क्षमता प्रदान केली आहे, त्याने लिहिण्यास नकार देता कामा नये. त्याने लिहावे आणि दस्तऐवजाचा मजकूर त्याने सांगावा ज्याच्यावर जबाबदारी येते (अर्थात कर्ज घेणारा), आणि त्याने अल्लाहचे, आपल्या पालनकत्र्याच्या क्रोधाचे भय बाळगले पाहिजे की जो करार झाला असेल त्यात काहीही कमी-जास्त करू नये. परंतु जर कर्ज घेणारा स्वत: नादान किंवा दुर्बल अथवा मजकूर सांगण्यालायक नसेल तर त्याच्या मुखत्याराने न्यायसंगतरीतीने मजकूर सांगावा. नंतर आपल्या पुरुषांपैकी३२७ दोघांची यावर साक्ष घ्या. जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीने तिला आठवण करून द्यावी. हे साक्षीदार अशा लोकांपैकी असावेत ज्यांची साक्ष तुमच्यात मान्य असावी.३२८ साक्षीदारांना साक्षीदार म्हणून काम करण्यास सांगितले गेल्यास त्यास त्यांनी नकार देऊ नये. बाब लहान असो किंवा मोठी, मुदत ठरविण्याबरोबरच तिचे दस्तऐवज लिहून घेण्यात आळस करू नका. अल्लाहजवळ ही पद्धत तुमच्यासाठी अधिक न्यायसंगत आहे, त्यामुळे साक्ष सिद्ध होणे सवलतीचे ठरते, आणि तुम्ही शंका-कुशंकांमध्ये गुंतण्याची शक्यता कमी राहते....



३२४) याच आयतपासून शरियत (धर्मशास्त्र) चा आदेश देण्यात आला आहे. व्यक्ती कर्जफेड करू शकत नसेल तर इस्लामी न्यायालय सावकारास सवलत देण्यास बाध्य करील आणि काही स्थितीत न्यायालयास कर्ज पूर्ण माफ करण्याचा किंवा काही भाग माफ करण्याचा अधिकार आहे. हदीसकथन आहे की एका व्यक्तीच्या व्यापारात तोटा आला आणि त्याच्यावर कर्जाचे ओझे चढले. मामला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासमोर गेला. त्यांनी लोकांना अपील केले की आपल्या भावाची मदत करा. अनेक लोकांनी त्याला आर्थिक सहाय्य केले तरी पूर्ण कर्जफेड होऊ शकली नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सावकाराला बोलावून घेतले आणि त्याला राहिलेली रक्कम सोडून देण्यास सांगितले. फिकाह विद्वानांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत राहाते घर, खानपानाची भांडी, नेसायचे पोषाख आणि कमाईची संसाधनं सावकारला जप्त करता येत नाही.
३२५)     यावरून हा आदेश स्पष्ट होतो की कर्जाच्या देवाणघेवाण मामल्यात मुदत निश्चित होणे आवश्यक आहे.
३२६)     सामान्यत: मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या कर्जाच्या मामल्यात लिखापढ करण्यास अप्रिय व अविश्वासपूर्ण  समजले  जाते. परंतु  अल्लाहचा  आदेश  आहे  की  कर्ज  आणि  व्यापारी  व्यवहार  लेखी  स्वरुपात असणे आवश्यक आहे. आणि त्यावर ग्वाही (साक्ष) घेणे आवश्यक आहे जेणेकरून लोकांच्यामध्ये साफ व सरळ व्यवहार व्हावेत. हदीसकथन आहे की तीन प्रकारच्या व्यक्ती अशा आहेत की ज्या अल्लाहशी विनंती  करतात पण अल्लाह त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
(१) ती व्यक्ती ज्याची पत्नी संबंधितांशी वाईट वर्तणूक ठेवून आहे आणि तिला तो तलाक देत नाही.(२) तो माणूस जो अनाथ मुलास सज्ञान होण्याअगोदर त्याचा माल (संपत्ती) त्याच्या हवाली करतो. (३)  तो माणूस जो कोणाला कर्ज देतो आणि कोणालाही त्यावर साक्षीदार बनवत नाही.
३२७)     म्हणजे मुस्लिम पुरुषांमधून. यावरून कळून येते की जेथे साक्षीदार बनविणे आपल्या अधिकारात असेल तिथे मुस्लिमाने केवळ मुस्लिम व्यक्तीलाच साक्षीदार बनवावे. होय, मुस्लिमेतरांचे साक्षीदार मुस्लिमेतर होऊ शकतात.
328)     म्हणजे ऐरेगैरे ग्वाही देण्यास सक्षम ठरत नाही. चारित्र्यसंपन्न, सत्यप्रिय व विश्वासू लोकांनाच साक्षीदार बनवावे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget