ज्या काळी जगातील श्रेष्ठ तत्त्वज्ञान ‘स्त्रीमध्ये आत्मा असतो की नाही?’सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रांत समान (एकसारखे नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध माक्र्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षांच्या कालखंडात प्रेषितांनी अशा प्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४५० वर्षांच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार भारतीय मुस्लिम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक Annemarie Schimmel म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असता असे दिसते की इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांचा मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आईला हा दर्जा दिला की धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत माँ के कदमो के निचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला की ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लिम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले की ‘ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल.’ अशी शिकवण प्रेषितांनी दिली.
संकलन- आमीन चौहान
यवतमाळ, मो. ९४२३४०९६०६
Post a Comment