अत्यंत निर्भीड आणि जातियवादविरोधी असलेल्या अत्यंत लढवय्या पत्रकार म्हणून ओळख असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमध्येहत्या करण्यात आली. कारण गौरी यांच्या लेखणीने सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटनांवर व त्याच्या नेत्यांवर, त्यांच्या पक्षपाती धोरणांवर आणि कर्मठ व जातियवादी विचारांवर हल्लाबोल केला होता. जातियवाद्यांचा त्यामुळे थयथयाट होत होता आणि गौरी लंकेश त्यांचे शत्रू बनल्या होत्या. म्हणून अशाच जातियवाद्यांनी व हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा काटा काढला असावा अशी सध्या चर्चा चालू आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एस. कलबुर्गी यांना मारण्यात आले अगदी तशीच पद्धत गौरी लंकेश यांची हत्या करण्यात अवलंबली आहे. म्हणून या हत्यासत्रामागे एक मजबूत साधनसंपत्ती असलेली व राजकीय वरदहस्त लाभलेली शक्ती असावी, असा संशय येऊ लागला आहे. या मागची विचारधारा, असले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मुडदे पडत आहेत. ही फौज ट्विटरवर पण सक्रीय आहे. आणि गौरीच्या खुनाचे समर्थन करीत आहे. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा वाचाळ वाह्याताच्या ट्विटचा मागोवा घेत आहेत. जणू त्याला प्रोतास्हनच देत आहेत. गौरी लंकेशच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या व हळहळणाऱ्यांची खिल्ली उडविणाऱ्यांपैकी काहींना आपले प्रधानसेवक ट्विटरवर फॉलो करतात, याचा अर्थ आपणच किती दुर्दैवी, नालायक आणि मूर्ख आहोत हेच स्पष्टहोत नाही काय?
- निसार मोमीन, पुणे.
Post a Comment