ब्रह्मदेशातील (म्यानमार) बौद्धांनी व तेथील सरकारने स्थानिक रोहिंग्या मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचे नाकारले असून त्यांना देशाबाहेरकाढण्याचे सत्र अहोरात्र चालविले आहे. ज्यामुळे हजारो रोहिंग्या मुस्लिम बांग्लादेश, भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि शेजारच्या राष्ट्रांत पळ काढीत आहेत व त्याच्या होड्या समुद्रात मुलाबाळांसहित बुडत आहेत. आजमितीला म्यानमारमध्ये दहा लाख रोहिंग्या मुस्लिम असून ते सुन्नी इस्लामी पंथाचे आहेत. त्यांची म्यानमारच्या राइकन (अरकान) प्रांतात प्रामुख्याने वस्ती आहे. म्यानमार सरकार त्यांना नागरिकत्वाचा दर्जा देण्यास तयार नसल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत त्यामुळे ते देशविहीन बनले आहेत. याला दहशतवादी बौद्ध व म्यानमार सरकार जबाबदार आहेत. दहशतवादी बौद्ध भिक्षुक व बौद्ध समाजाने रोहिंग्या मुस्लिमांच्या कत्तली चालविल्या असून त्यांची घरेदारे जाळून टाकीत आहेत. त्यांच्या महिलांवर बलात्कार करीत आहेत. यामुळे या आशियाई भागात बौद्ध-मुस्लिम संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नमके याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारची वारी केली आहे. या प्रश्नावर मोदींनी कडक भूमिका घ्यायला हवी. कारण बौद्ध-मुस्लिम संघर्ष भारतातसुद्धा पेट घेऊ शकतो आणि दहशतवादाला बळ मिळू शकते. सध्या देशात पन्नास हजार रोहिंद्यांनी आश्रय घेतला आहे. म्यानमारच्या वांशिक हिंसाचारामुळे जानेवारी १४ ते मे २०१५ या महिन्यांत ९८ हजार रोहिंग्यांनी बंगालच्या उपसागरामधून पलायन केले आहे. बांग्लादेशात रोहिग्यांनी आश्रय घेतला असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.
- निसार मोमीन, पुणे.
- निसार मोमीन, पुणे.
Post a Comment