Halloween Costume ideas 2015

आश्रय नाही, आरोप घ्या!

 -शाहजहान मगदुम

भारतात आश्रय मागण्यासाठी आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांनी आपला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी कसलाही संबंध नसल्याचे त्यांनी सिद्ध करावे. त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला त्यांचा कसलाही धोका नाही आणि मानवतस्करीसह इतर कोणत्याही वाईट कामांमध्ये त्यांचा कसलाही संबंध नाही याचा पुरावा द्यावा. त्यानंतरदेखील त्यांना भारतात शरण मिळेलच याची शाश्वती नाही. काहींशा अशाच प्रकारच्या अटी म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सांग स्यू की यांनी रोहिंग्या मुस्लिमांना परत देशात प्रवेश देण्यासंदर्भात घातल्या आहेत. याचाच अर्थ भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये धार्मिक आणि वांशिक मुद्द्यावर विभाजनाचे राजकारण खेळले जात असल्याचे स्पष्ट होते. रोहिंग्या शरणार्थींना आश्रय देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला विचारणा केल्यानंतर भारत सरकारने एका प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे की रोहिंग्या मुस्लिमांचा भारतीय सुरक्षेला धोका आहे. त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्या कारणाने त्यांना आपल्या देशात आश्रय देण्यात आम्ही असमर्थ आहोत. रोहिंग्या शरणार्थींचा भारतातील दहशतवाद्यांशी संबंध आहे असे वेंâद्र सरकारने म्हटले नाही ते बघा! त्याऐवजी त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाच्या बळावर भारतात अगोदरपासूनच दहशतवादी घटना, तस्करी, हवाला, दहशतवादी संघटनांना मदत यासारख्या सत्यता यापूर्वीच स्पष्ट झाल्या आहेत. काश्मीरमधील हुर्रियत नेत्यांच्या घरांवर छापे, त्यांना कारागृहात पाठविणे यासारख्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. प्रश्न असा आहे की नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अथवा संकटसमयी या हुर्रियत नेत्यांना अथवा त्यांच्याशी संबंधितांना सरकार मदत करणार नाही काय? वादग्रस्त काश्मीरमध्ये सेनेने जेव्हा सामान्य नागरिकांची जी मदत केली होती तेव्हा सरकारने त्या नागरिकांचा संबंध पाकिस्तानशी नसल्याचा पुरावा घेतला होता काय? शरणाथ्र्यांच्या समस्येला दहशतवादाशी जोडण्याचे हे व्रूâर उदाहरण आहे. एक तर आश्रय देणार नाही आणि दुसरे त्यांच्यावर आरोपही लावले जातील. असे उदाहरण जेव्हा सामान्य लोकांच्या जीवनात आढळते तेव्हा अशा व्यक्तीला लोक श्राप देतात आणि म्हणतात की मदत करायची नसेल तर करू नकोस, परंतु आरोप करू नकोस. आश्रय घेण्यापूर्वी शरणाथ्र्यांनी घूसखोर बनून भारतात प्रवेश केला आहे, त्यांच्यावर दया केली जाणार नाही, असे म्हटले असते तर पटण्यासारखी गोष्ट होती. परंतु संपूर्ण रोहिग्या मुस्लिमांच्या समुदायाला दहशतवादाचा समर्थक ठरविले जाऊ शकते काय? असे म्हणून आम्ही भारताच्या सामूहिक विवेकाचा अवमान करीत नाही काय? आम्ही भारताच्या परंपरागत सहिष्णुतेची टिंगल उडवत नाही काय? इ.सन १९५१ मधील शरणार्थींच्या दर्जाबाबतचा करार आणि इ.सन १९६७ मधील शरणार्थींच्या दर्जासंबंधीच्या प्रोटोकॉलवर भारताने सही केलेली नाही. हा युक्तिवाद पुढे करून भारत सरकारने म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ता याच कारणास्तव आंतरराष्ट्रीय कराराचा आधार घेऊन भारतात आश्रय मागू शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या ही गोष्ट बरोबर असली तरी जेव्हा जगातील इतर देश भारतावर आण्विक साहाय्याबाबत अंगुलीनिर्देश करीत होते, कारण भारताने आण्विक अप्रसाराच्या करारावर सही केलेली नव्हती, तेव्हा आम्हाला ही गोष्ट का पटली नव्हती? वंâधहार विमान अपहरणाची घटना आठवा. तत्कालीन वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांच्या बदल्यात निर्दोष प्रवाशांना वाचविले होते. निर्दोष आणि निरपराध व लाचार लोकांच्या संरक्षणासाठी आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवाद्यांनादेखील सन्मानाने विमानाने वंâधहारमध्ये पोहोचविले होते. तेच भाजपचे सरकार आज रोहिंग्या मुस्लिमांना अशा संकटसमयी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत आहे, जेव्हा त्यांना मदतीची सर्वाधिक आवश्यकता आहे. जर वेंâद्र सकारने आपल्याकडील साधनसामुग्रीचा अभाव, राजकीय अस्थिरता, डेमोग्राफी यासारखा मुद्दा उपस्थित केला असता तर कदाचित त्याचा विरोध करणे शक्य नव्हते. जर सरकारने म्हटले असते की जोपर्यंत म्यानमार सरकारशी चर्चा करून समस्येवर तोडगा निघेपर्यंत आम्ही सीमाभागात एकेठिकाणी त्यांना वॅâम्प बनवून सोयीसुविधा देऊ. तर ती गोष्ट निश्चितच प्रशंसनीय होती. ज्या शरणार्थींनी भारतात प्रवेश केला आहे त्यांना वैकल्पिक व्यवस्थेशिवाय त्यांना देशाबाहेर काढणे अथवा त्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करणे म्हणजे ही एक प्रकारची हिंसाच आहे. म्हणतात ना, दोष नेहमी भिकाऱ्यांचा असतो, भीक देणारे अप्परहँड असतात. मग त्यांनी वाटेल ते करावे! श्रीलंकेतील तमिळ शरणार्थींनी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती, म्हणून काय आम्ही त्यांना आश्रय देण्याचे बंद केले आहे काय? तिबेटिंना आम्ही आश्रय देऊन चीनला कायमचे निराश करून ठेवले आहे. रोहिंग्या शरणार्थींना विरोध करून राष्ट्रवादी, मुस्लिमविरोधी आणि हिंदुत्ववादी भावनांना खतपाणी घातले जात आहे. मानवतावादी विचारसरणीच्या लोकांना हा सतर्कतेचा इशारा आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget