Halloween Costume ideas 2015

ब्लू व्हेल आणि इस्लामचा गळ

-अ‍ॅड. मो. यूसुफ थोरात
मो.: ९९७५८९५१७८

‘ब्लू व्हेल’ हा शब्द अनेक वेळा माझ्या कानावर
आला आणि मी दुर्लक्षच करीत राहिलो. हा एखादा दुर्मिळ मासा असावा आणि याची प्रजाती धोक्यात आली असेल म्हणून मच्छप्रेमिंनी एखादा उपक्रम सुरू करून त्याची प्रजाती संवर्धित करण्यासाठी काही योजना आखल्या असतील असे मला वाटले. भारतात हे असे नेहमीच घडते. वाघांना इतकं संरक्षण द्यायचं की मानवांना जीव गमवावा लागेल.
टायगर प्रोजेक्टच्या जवळपास अथवा त्याच्या बगलेतच वसलेली छोटी छोटी खेडी रात्रंदिवस दहशतीत जगेपर्यंत अथवा लागोपाठ नरबळी होतराहीपर्यंत शासन आणि प्रशासनाचे डोळेच उघडत नाहीत. ब्लू व्हेलचंही असंच काहीसं झालं आहे. नेटवर काय चालू आहे याकडे शासन आणि प्रशासन पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत आहे. भारतात या खेळामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्याचे जेव्हा समोर आले आणि सर्वत्र कल्लोळ माजला तेव्हा कुठे त्याच्या बंदोबस्तात येथील सुस्त शासन प्रशासन कामी लागले. तो एक खेळ आहे. त्याला खेळण्याकरिता प्रथम आकर्षित केले जाते आणि नंतर आत्महत्येस प्रवृतच्त केले जाते. असे या ब्लू व्हेलच्या बाबतीत सांगितले जाते. ते कसे आणि का याची चर्चा करण्यापूर्वी आपण एक नजर संपूर्ण जगावर टाकू.
संपूर्ण जगावर एक साधी जरी नजर टाकली तरी तुमच्या नजरेस जगातील साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढ ह्या दोन गोष्टी सहजच दिसतील. जगातील लहानात लहान देश असो की मोठ्यात मोठा, त्याची नीती, त्याच्या योजना इत्यादी सर्व बाबी साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढीच्याच प्रभावात बनत असलेल्या आणि बिघडत असलेल्या आपणास दिसतील. त्यामुळे संपूर्ण जगात एक प्रकारची अस्थिरता, अविश्वास याचेच साम्राज्य निर्माण होत आहे. मित्र की शत्रू याची ओळख अंधुक झाली आहे. मित्र म्हणविणारे एकमेकांचा गळा कापतील की खिसा याचा नेम राहिला नाही. या साम्राज्यवादाच्या आणि आर्थिक चढाओढीच्या शर्यतीत कोणी जिंकतो तर कोणी हारतो. जिंकलेल्याला समृद्धी आणि समाधान मिळते तर हारलेल्याला गरिबी आणि असमाधान नाइलाजाने स्वीकारावे लागते. त्यामुळे त्याची विकासासाठी असफल धडपड सुरू असते आणि त्यातून कुटनिती, संहारक युद्ध, अतिरेक, आतंक यांचा जन्म होऊ लागतो. यासारखेच बदल जिंकलेल्या देशामध्येसुद्धा पहावयास मिळतात. जिंकलेला देश समृद्धी आणि समाधानातून विकासाकडे झपाट्याने वाटचाल करतो. झपाट्याने होणारा विकास परत साम्राज्यवादाकडे उग्र स्वरूप धारण करून धावू लागतो आणि त्याचे उग्र साम्राज्यवादात रूपांतर होते. शिवाय त्याला आर्थिक एकाधिकाराची जोड जोडली जाते. उग्र साम्राज्यवाद आणि आर्थिक एकाधिकार पुढे पुढे युद्ध, कुटनिती, अतिरेक, आतंक, संहारकता यालाच जन्म देऊ लागते. म्हणून शेवटी साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढ अशा काही विचारांना जन्म देते की त्यांच्यापासून जगाचे कल्याण होत नाही तर जगाचा विनाश होतो.
या विनाशावर मात्र इस्लामजवळ उपाय आहे जो इतर कोणत्याही धर्माजवळ नाही. इतर धर्मांजवळ मग काय आहे? असा प्रश्न आपणासमोर नक्कीच उभा राहणार! इतर धर्मांजवळ याला प्रत्युत्तर म्हणजे युद्धाला युद्धाने उत्तर देऊन त्याचा देश, त्याचे साम्राज्य आपल्या ताब्यात घेणे किंवा युद्ध नको म्हणून विनवणी करणए. कुटनितीला कुटनितीने, आतंकाला कायदेशीर आतंकाने, संहारकतेलाही युद्धयिमांनीच संहारक उत्तर देणे इत्यादी बाबी आहेत. ज्याचा परिणाम संपूर्ण जगाला युद्धाच्या कामी लावून सर्वत्र अशांतता निर्माण करून मानवी अहितच घडवून आणणे असे आहे. शिवाय योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता राहावी याबाबत निर्देश नाहीत. बळी तो कान पिळी हेच तत्त्व वापरले जाते. हे तत्त्व शेवटी त्याच मार्गावर जाते ज्यातून मानवी अहित होते.
इस्लामजवळ असे काय आहे जे इतर धर्मीयांजवळ अथवा धर्माजवळ नाही; तर याचे उत्तर असे आहे की इस्लामजवळ साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढ संपविण्यासाठी तत्त्व आहे. ज्या तत्त्वांच्याच आधारे इस्लाम जगामध्ये शांती निर्माण करू शकतो. ते तत्त्व आहे जिहाद आणि जकात.
जिहाद म्हणजे जी शक्ती मानवी मूल्यांची पायमल्ली करीत असेल आणि ज्यामुळे मानवाचे अहित होत असेल, ती शक्ती नष्ट करून टाकणे होय. ही शक्ती म्हणजे जिच्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्व प्रकारच्या शक्ती एकवटल्या असतील. ही शक्ती साधारणत: एखाद्या देशाच्या प्रमुखाकडे किंवा प्रमुख गटाकडे एकवटलेली असते. त्या व्यक्तीला किंवा व्यक्तीसमूहास बसविणे की जी खात्रीने मानवी कल्याण करील आणि मानवी हित जोपासेल. मौ. अबुल आला मौदूदी यांनी त्यांच्या ‘जिहाद फी सबिलिल्लाह’ या लेखात जिहाद अतिशय स्पष्टपणे सादर केला आहे. त्यात त्यांनी आवर्जुन सांगितले आहे की मुस्लिमांनी जिहाद करणे म्हणजे हे नव्हे की एखादा दुसऱ्या धर्माचा राजकीय प्रमुख नष्ट करून तेथे मुस्लिम धर्माचा व्यक्ती आरूढ करणे. जिहाद त्या राजकीय शक्ती अथवा शक्तीगटाला तेथे आरूढ करतो जो त्या योग्यतेचा आहे. इस्लामने मुस्लिमांना जिहादकरिता अर्थात मानवी कल्याणार्थ होणाऱ्या युद्धात आपले प्राण आणि संपूर्ण संपत्ती लुटवून देण्याचा आदेश दिला आहे. आहे का असा आदेश जगातील कोणत्यातरी एखाद्या धर्मात? नाही ना! म्हणूनच इस्लामला जगामधील ज्ञानी लोक श्रेष्ठ धर्माची उपाधि जोडतात.
जगात म्हणजे आपल्या शुद्ध मिळकतीचा काही ठराविक भाग गरजवंतांना दान देणे होय. सदरहू दानाचा कसल्याही प्रकारचा गवगवा अथवा प्रसिद्धी केली जात नाही. हे दान अतिशय गुप्तपणे केले जाते. यामागचा उद्देश असा की जगातील आर्थिक चढाओढ संपुष्टात येऊन आर्थिकदृष्ट्या सर्व लोक समान असले पाहिजेत. जकात देणे ही श्रीमंत मुस्लिमांवर बंधनकारक आहे, तर गरिबांवर बंधनकारक नाही. जगातमध्ये जगातील श्रीमंत-गरीब यांच्यामधील असलेली दरी दूर करता येते.
अर्थात, साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढ या ज्या दोन बाबी जगाला सतत भेडसावत असतात आणि त्यामुळे जगामध्ये सतत अशांतता आणि अविश्वासाचे वातावरण तयार होत असते, त्यातूनच ब्लू व्हेलचा जन्म झाला आहे. त्यावर उपाय म्हणून केवळ इस्लाम धर्माजवळच त्याचा गळरूपी उपाय आहे.
ब्लू व्हेल हा एक साधा खेळ नसून या खेळामागे जगातील साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढ यामधून जन्म घेणारी अथवा घेतलेली कुटनिती आहे आणि दहशत आहे. हे असे कृत्य साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढीत जिंकलेला आणि हारलेला यांपैकी कोणीही करू शकतो. फरक मात्र एवडाच आहे की हारलेला लवकर असे कृत्य करतो तर जिंकलेला थोडे थांबून. कुटनितीचे उदाहरण सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की भारतामध्ये धान्याचा दुष्काळ पडला असताना अमेरिकेने मिलो ज्वारी भारताला दिली. त्या ज्यावीवर अशा प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून पाठविले होते की ती जास्त दिवस टिकून राहू नये. चीन-भारत व्यापारिक संबंधातून चीनने भारतात असे मोबाईल पाठविले की ज्याची बॅटरी ब्लास्ट होऊन अपघात घडून जीवित हानी व्हावी. काही देश एड्सचे रोगी दुसऱ्या देशात केवळ त्या देशात एड्सचा प्रसार व्हावा आणि तेथील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघावे याकरिताच पाठवितात, ज्यातून अराजकता उत्पन्न व्हावी. काही देश अशा कृमी, कीटक, जंतूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून दुसऱ्या शत्रूदेशात त्यांना सोडतात, ज्यापासून मानवाचे अहित होईल. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणे, मानवी बॉम्बचा उपयोग करणे, नकली औषधी पसरविणे, शरीराला घातक ठरेल अशी प्रक्रिया करून कापड निर्यात करणे. दोन देशांमध्ये युद्ध घडवून आणणे आणि त्या दोन्ही देशांना शस्त्रे विकणे. अशा नाना प्रकारच्या युक्त्यांपैकी ब्लू व्हेल ही एक युक्ती आहे. ही युक्ती साम्राज्यवाद आणि आर्थिक चढाओढीपासून जन्म घेऊन टप्प्याटप्प्याने कुसंस्कारित होऊन मानवविद्वंस करण्यासाठी तयार होते, अथवा तयार केली जाते. इस्लाम मानवी अहित अथवा मानवविद्वंस यांच्या विरोधी आहे. आत्महत्या करणे इस्लाम निषिद्ध मानतो. तसेच विनाकारण एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जीवानिशी मारावे याचाही धिक्कार करतो. तसेच मोठ्या प्रमाणात मानवी अहित, विद्वंस, विनाश याच्या विरोधात मुस्लिमांना जिहादचा आदेश देतो. जगामध्ये अशा घटना सतत सुरू राहतील. हे दुष्टचक्र तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत पूर्ण जग इस्लामी होत नाही. जगामध्ये इस्लाम पसरविण्याची नैतिक जबाबदारी मुस्लिमांवर आहे. ते किती प्रमाणिकपणे या जबाबदारीला निभावतात यावर सर्व निर्भर आहे. त्याचप्रमाणे जे मुस्लिम नाहीत ते इस्लामला अशा प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात यावरही हे निर्भर आहे. हे असे काहीही घडो, पण मुस्लिमांना हा पक्का विश्वास आहे की एक ना एक दिवस हा ब्लू व्हेल इस्लामच्या गळाला लागेलच!

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget