दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यांच्या सीमारेषा सतत वाढत राहिलेल्या आहेत तो चीन हा एकमेव देश आहे. चीनच्या शेजाराला पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांशी त्यांनी सीमावाद उकरून काढला नसून बाकीच्या बारा देशांशी भूमीवर सागरी क्षेत्रातील असलेल्या सीमांबाबत खुसपटे काढलेली आहेत. चीनच्या या धोरणाला ‘सलामी स्लाईसिंग’ म्हणून ओळखले जाते. १९४८ साली चीनमध्ये राज्यक्रांती झाली आणि चीनमधील घराणएशाही उद्ध्वस्त होऊन चीनी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. तेव्हापासून चीनचा आक्टोपस विळखा चालू झालेला आहे. १९४९ साली चीनने लष्करी बळावर तिबेट घशात घातले, त्यानंतर १९६२ मध्ये भारताचा अक्साई चीन आणि लडाखचा काही भाग भारतावर आक्रमण करून प्राप्त केला. अशा या चीनच्या धोरणानुसार चीनची ‘सलामी स्लाईसिंग’ सुरवात डोकलामच्या आक्रमणाने सुरू झालेली आहे. जुन्या वहिवाटी, जुने नकाशे, जुने करार ऐतिहासिक जुने दाखले भासवून नवनव्या कुरापती व कारणे काढून चीन शेजारी देशाशी नवनवे सीमावाद, सागरी क्षेत्रवाद उकरीत आहे. आपल्या आर्थिक ताकदीची व लष्करी बळाची घमेंड मारून आपली साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्याची धमकी देत आहे. अरुणाचल व लडाख हे तिबेटचे भाग असल्याचे सांगून चीनी राज्यकर्ते फार पूर्वीपासूनच त्यावर वाद घालीत आहेत, हे उगाच नाही!
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.
Post a Comment