Halloween Costume ideas 2015

मूल्याधारित पत्रकारितेची शिकार


स्थापितांच्या विरोधात मूल्याधारित पत्रकारितेचा दावा करणाऱ्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मालकी हक्कदार म्हणून आता देशातील आघाडीच्या कॉर्पोरेट घराण्यांकडे पाहिले जात आहे. आता तो आशियातील सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे म्हटले जाते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याचे उत्पन्न १४३ अब्ज डॉलर्स (आजतक डॉट इन, ३१ ऑगस्ट २०२२) पर्यंत गेले आहे, मुख्यत: सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर. तर दुसरीकडे अदानी समूहाकडून घेण्यात आलेले कर्ज सुमारे २.२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यात दर वर्षी १२ टक्क्यांनी वाढ होत आहे. (स्वराजमॅग डॉट कॉम, २६ ऑगस्ट, २०२२) देशातील या 'महान उद्योजका'चा उल्लेख जगातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी केला आहे. वॉशिंग्टन पोस्टने तर त्याला सरकारचा सहयोगी असेही म्हटले आहे, जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय वृत्तपत्राला जमू शकलेले नाही. म्हणजे आपल्या देशात उद्योजकतेची स्पष्ट व्याख्या आहे- प्रस्थापितांशी जवळीक. देशातील इतर श्रीमंत घरांची कथाही फारशी वेगळी नाही.

पाच महिन्यांपूर्वीच म्हणजे २६ एप्रिलला गौतम अदानी यांनी एएमजी मीडिया नेटवर्क्स या कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली आणि पुढच्याच महिन्यात ते राघव बहल यांची शिकार करतात. मे महिन्याच्या मध्यात अदानी यांनी राघव बहल संचालित डिजिटल बिझनेस न्यूज प्लॅटफॉर्म क्विंटिलियन बिझनेस मीडियामध्ये 49 टक्के हिस्सा खरेदी केला. द क्विंट हे एक इंग्रजी आणि हिंदी पोर्टल आहे. जे क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडद्वारे चालविले जाते. हे पोर्टल  भारतीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेट कायदा आणि प्रशासन यासह अनेक विषयांवर निःपक्षपाती बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध होते.

अदानीने क्विटची खरेदी करणे हा त्याचा पहिला बळी नव्हता. काही वर्षांपूर्वी त्यांनी ईपीडब्ल्यू या प्रतिष्ठित इंग्रजी नियतकालिकाचे संपादक असलेले प्रांजॉय गुहा ठाकुरता यांची शिकार केली होती. खरं तर परांजय यांनी ईपीडब्ल्यूमध्ये दोन बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या,  पहिली बातमी म्हणजे अदानी समूहाने 1000 कोटी रुपयांचा कर चुकवला का? (१४ जानेवारी २०१७) आणि दुसरे म्हणजे मोदी सरकारने अदानी समूहाला ५०० कोटी रुपयांचा नफा (२४ जून २०१७). हे दोन रिपोर्ट प्रसिद्ध झाल्याने अदानी इतके संतप्त झाले होते की, त्यांनी या नियतकालिकाच्या मालकांवर मानहानीचे मोठे दावे करण्याची धमकी दिली, धास्तावलेल्या मालकांनी ट्रस्टची बैठक बोलावून लेख काढण्याचा निर्णय घेतला. येथील लेख काढून टाकण्याचा निर्णय झाला आणि ते प्रकाशित करणारे संपादक प्रांजॉय गुहा ठाकुरता यांनी राजीनामा दिला. 

आता गौतम अदानी यांनी एनडीटीव्हीची शिकार केली आहे. खरं तर एनडीटीव्हीचे मालक प्रणॉय रॉय यांनी २००८ साली आरआरपीआर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना केली होती आणि 'इंडियाबुल्स'कडून  ५०१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मग या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी एनडीटीव्हीचे अनेक शेअर्स खरेदी केले. इंडियाबुल्सचे कर्ज फेडण्यासाठी आरआरपीआर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडने आयसीआयसीआय बँकेकडून ३७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले, ज्याचा व्याजदर १९ टक्के निश्चित करण्यात आला होता. ही गोष्ट ऑक्टोबर २००८ मधील आहे. 

ऑगस्ट २००९ मध्ये आर.आर.पी.आर. होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडला आणखी एक कंपनी मिळाली - विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड - जिने आयसीआयसीआयचे कर्ज फेडण्यास सहमती दर्शविली. कर्जाची अट अशी होती की, परतफेड न केल्यास आणखी ३५० कोटी व्याज इक्विटीमध्ये रुपांतरीत होईल. तिथेच प्रणॉय रॉयसोबत गेम झाला. आता अदानी यांनी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड विकत घेतल्याचं आढळून आलं आणि त्याआधारे ते २९ टक्क्यांचे मालक झाले आहेत. अदानी एनडीटीव्हीमधील आणखी २६ टक्के हिस्सा नियंत्रक भागभांडवलासाठी विकत घेत आहेत. हा हिस्सा खरेदी करण्यासाठी अदानी समूह सुमारे ४९३ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी कंपनीने मंगलदास अमरचंद यांची नियुक्ती केली आहे.

खरे तर अदानी यांना त्यांच्याविरोधात येणाऱ्या बातम्या दाबून २०२४च्या निवडणुकीत मोदींच्या बाजूने वातावरण तयार करायचे आहे असे म्हटले जाते. नुकतेच आंतरराष्ट्रीय एजन्सी फिचनंही अदानी समूहाच्या प्रगतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  फिच रेटिंग्जच्या क्रेडिट साइट्सनी अदानी ग्रुपबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये अदानी समूहाच्या आक्रमक विस्ताराव्यतिरिक्त कर्ज आणि रोख प्रवाहाबद्दल तसेच नवीन आणि असंबंधित व्यवसायात प्रवेश केल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. अदानी समूहाचे बँका तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनाशी दृढ संबंध असून याचा फायदा समूहाला होत असल्याचे क्रेडिट साइट्सच्या विश्लेषकांचे मत आहे. गेल्या वर्षी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रेंच मीडिया वॉचडॉग रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स किंवा रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटियर (आर.एस.एफ.) यांनी "प्रेस स्वातंत्र्याचे भक्षक" म्हणून ३७ राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुखांच्या यादीत अग्रस्थान दिले होते.

भांडवलदार ही नेहमीच्या सत्तेच्या वळचणीला राहणारी जमात असते. एखाद-दुसऱ्या भांडवलदारानं सत्तेच्या विरोधात शंखनाद केल्यानं फारसा काही फरक पडत नाही. त्यातून फक्त त्या भांडवलदाराचा व त्याचा वर्तमानपत्राचा त्या काळापुरता बाणेदारपणा सिद्ध होतो. आणि अशा वाकड्या भांडवलदाराला युक्तीने, शक्तीने सत्ताधारी आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात. भांडवली वर्गाला प्रसारमाध्यमांची गरज ह्यासाठी असते, कारण त्याची सत्ता ही प्रभुत्वावर आधारलेली नसून ती वर्चस्वावर आधारलेली असते. त्यांना आपल्या सत्तेसाठी ‘सहमती’चे उत्पादन आणि पुनरुत्पादन करणे गरजेचे असते. निश्चितपणेच, आजच्या समाजाचे वास्तव सांगून भांडवली वर्ग आपल्या सत्तेसाठीची सहमती निर्माण करू शकत नाही. उघडच आहे की हे साध्य करण्यासाठी त्याला एका आभासी चेतनेची निर्मिती करावी लागते, त्याला जनतेच्या चेतनेमधील प्रतिक्रियावादी शक्यता आणि सिद्धतांना क्रियान्वित करावे लागते, त्याला मिथक हे सामान्य ज्ञानाच्या (Common sense) रूपात स्थापित करावे लागते, त्याला समाजाचे एक खोटे, काल्पनिक चित्र उभे करावे लागते, त्याच्याकडे जनतेला दाखवण्यापेक्षा लपवण्यासाठी जास्त गोष्टी असतात. 

नोम चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे – जनतेच्या मेंदूला नियंत्रित करण्यासाठी शासक वर्ग वाद-विवादासाठी मर्यादित आणि अप्रभावी स्पेस उपलब्ध करून देतो, परंतु त्या स्पेसमध्ये तो खूपच जिवंत वाद-विवाद आयोजित करतो. उघडच आहे की अशा वाद-विवादांनी व्यवस्थेसमोर कुठलाही धोका उत्पन्न होत नाही, किंबहुना तिचे वर्चस्व अधिकच प्रस्थापित होते. ह्या सबंध प्रक्रियेमध्ये भांडवली प्रसारमाध्यमे भांडवली मिथके आणि पूर्वग्रहांना सामान्य ज्ञानाच्या रूपात प्रस्थापित करतात आणि त्याबरोबरच भांडवली शासन व्यवस्थेला तिच्या एकूण विकृतींसह सर्वाधिक नैसर्गिक आणि उपयुक्त घोषित करतात.

आपला देश हा जगातील एक असा अद्वितीय देश आहे जिथे जगातील  सर्वात श्रीमंत लोक अत्यंत निराश्रित, गरीब, सर्वात अशिक्षित आणि आजारी देशवासीयांसोबत अत्यंत प्रेमाने राहतात. तसे पाहिले तर हेच मॉडेल इतर क्षेत्रांतही यशस्वीपणे काम करत आहे. अंडरवर्ल्ड, वितरक, राजकारणी वगैरेंचा इतका जबरदस्त भूलभुलैया आहे की, या प्रकारातला सर्वात मोठा तज्ज्ञ एक तर त्यांच्या हातात खेळतो किंवा इंडस्ट्रीतून बाहेर पडतो. खेळांच्या बाबतीतही असंच आहे, सचिन व्हायचंय की विनोद कांबळी व्हायचंय हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता हेच मॉडेल शिक्षण, वैद्यकीय आदी क्षेत्रांत स्पष्टपणे दिसू शकते.

माहिती मिळवणे हा जनतेचा अधिकार आहे. अर्थात, माध्यम क्षेत्रात अनेक कलागुण आणि बाजारपेठा उतरल्या आहेत, तरीही मूल्याधारित पत्रकारितेचे स्थान कायम आहे. सर्व बंधने असतानाही डिजिटल माध्यमे लोकशाहीच्या चौकीदाराप्रमाणे लोकांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत देशातील जनता लोकशाहीतील भूमिका आणि हस्तक्षेपासाठी पूर्णपणे तयार होत नाही, तोपर्यंत ही दरी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आस्थापना आणि कॉर्पोरेटचा नैसर्गिक प्रयत्न असेल.

माध्यमे पत्रकारिता आणि उद्योगाच्या बाजूकडे स्वतंत्रपणे न पाहिल्याने टीव्ही आणि प्रिंटच्या या साम्राज्यात शोध घेताना ध्येय, चिंता, भावुकता असे शब्द निरुपयोगी ठरताना आढळतात. टूथपेस्ट कंपनीप्रमाणेच मीडिया कंपन्याही शेअर बाजारात लिस्टेड आहेत.

भारतीय माध्यमांचे मालक/ संचालक

१. एन.डी.टी.व्ही. - अनेक ट्रोलर्स कॉंग्रेसबद्दलच्या उघड पक्षपातीपणासाठी नेहरू-घराणेशाही टेलिव्हिजन म्हणण्यास प्राधान्य देतात, तर पक्षपातीपणा स्वीकारार्ह आहे, परंतु एनडीटीव्ही आजकाल कुप्रसिद्धपणे भाजपविरोधी आहे. प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय, आरआरपीआर (आता अदानी ग्रुप), ओस्वाल ग्रीनटेक लिमिटेड. राधिका रॉय ही वृंदा करात यांची बहीण आहे, ज्या सीपीआय (एम) च्या राज्यसभेच्या खासदार आहेत, प्रणॉय रॉय हे अरुंधती रॉय यांचे पहिले चुलत भाऊ आहेत.

२. सी टी.वी.- एस्सेल समूहाचे प्रवर्तक सुभाषचंद्र यांच्या मालकीचे. झी समूहात त्यांचे सुमारे 54% शेअर्स आहेत. आता ते भाजपसमर्थक आहेत कारण भाजप सत्तेत आहे. त्यांनी नवीन जिंदाल आणि त्यांच्या गटाला 100 कोटींसाठी ब्लॅकमेल केले आहे, आणि ते टेपवर पकडले गेले आहेत, सध्या त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे. आणि सुभाषचंद्र जामिनावर बाहेर आले आहेत. 

३. सन समूह- कलानिधी मारन यांच्या मालकीच्या या कंपनीचा थेट संबंध द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्याशी आहे. मुख्यतः त्यांचे कव्हरेज दक्षिण भारतात तमिळ, कन्नड आणि तेलगू चॅनेल्समध्ये आहे, ते एआयएडीएमकेवर नकारात्मक कथा चालवतात. कलानिधी मारन यांचे बंधू दयानिधी मारन हे काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते आणि मला ए. राजा यांचे नाव आणि त्यांचा प्रसिद्ध टूजी घोटाळा ही घ्यावी लागेल का?

४. द हिंदू- कस्तुरी रंगन आणि मुलांच्या मालकीची, सहसा वादांपासून दूर असते, त्यातील समस्या संपादकीय स्तंभातील एकाच कुटुंबाच्या वर्चस्वाबद्दल असतात. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, द हिंदू हे डाव्या विचारसरणीचे वृत्तपत्र आहे.

५. जागरण ग्रुप- जागरण मीडिया इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जागरण हे गुप्ता कुटुंबाचे मालक आहेत, मालक हे भाजपमध्ये खासदार आहेत, म्हणूनच या वृत्तपत्राने हिंदूसमर्थक, भाजपसमर्थक मते व्यक्त केली आहेत. हे बहुतेक हिंदी पट्ट्यात प्रसिद्ध आहे.

६. हिन्दुस्तान टाइम्स- हिंदुस्थान टाइम्सच्या मालक आणि मुख्य संपादक  शोभना भरतिया राज्यसभेतील काँग्रेसच्या खासदार आहेत  अंबानींची भाची असलेल्या नयनतारा कोठारी यांच्याही सासूबाई आहेत. हे वृत्तपत्र काँग्रेसच्या पक्षपातीपणासाठी प्रसिद्ध आहे.

७. सागरिका घोष आणि राजदीप सरदेसाई- सागरिका घोष या आयएएस आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या भास्कर घोष यांच्या कन्या आहेत. मग राजदीपबद्दल अधिक सांगण्याची गरज आहे का? 

८. नेटवर्क 18 ग्रुप- मुख्यत्वे रिलायन्स समूहाच्या मालकीचा, पण त्याचा संयुक्त उपक्रम आयबीएन लोकमत आणि आयबीएन १८ हा महाराष्ट्रातील काँग्रेस राजकारणी राजेंद्र दर्डा यांच्या मालकीचा होता आणि विजय दर्डा हे काँग्रेसचे खासदार होते.

९. टीव्ही टुडे ग्रुपचे हेडलाईन्स टुडे- आदित्य बिर्ला ग्रुपच्या लिव्हिंग मीडियाच्या मालकीची. करण थापर. तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की नेहरू कुटुंबच रक्त आणि विवाहाच्या माध्यमातून हायप्रोफाईल थापर कुटुंबाशी संबंधित आहे. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल पी. एन. थापर हे विजयलक्ष्मी पंडित यांची कन्या आणि पं. नेहरूंची पुतणी नयनतारा सहगल यांचे मेहुणे. जनरल थापर यांचा मुलगा काँग्रेससमर्थक पत्रकार करण थापर आहे. जनरल थापर यांची बहीण रोमिला थापर ही एक प्रसिद्ध 'अव्वल' टिपिकल जेएनयू नेहरूवादी कम्युनिस्ट विचारवंत इतिहासकार आहे.

१०. इंडिया टीवी- रजत शर्मा यांच्या मालकीचे, विजय गोयल यांच्यासह एबीव्हीपी (भाजपची युवा शाखा) मध्ये जनरल सेसी होते. चॅनेल सुरू झाले तेव्हा भाजपच्या खासदार मनेका गांधी या बोर्डात होत्या.

११. टाइम्स ग्रुप- टाइम्स समूह आश्चर्यकारकपणे जैन कुटुंबाच्या मालकीचा आहे. तर, आरोपांवर विश्वास ठेवला तर पडद्यामागची व्यक्ती म्हणजे रॉबर्टिओ मिंडो, एक इटालियन आणि सोनिया गांधीयांचे जवळचे नातेवाईक.

अशा प्रकारे हे राजकारणी किंवा व्यावसायिक गट लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी सत्तेत नसतानाही सत्तेत राहतात.


- शाहजहान मगदुम

8976533404


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget